आता मात्र ठरवलं... बास झालं.... जेव्हा आरश्यामधे ही स्वतःची प्रतिमा मावेनाशी झाली तेव्हा काहीतरी केलंच पाहिजे... अगदी ६० नाही पण निदान ७०/७५ पर्यंत खाली उतरलंच पाहिजे... (वजन हो..!!) अगदी चवळीची शेंग नाही पण निदान मटारची किंवा शेवग्याची शेंग तरी व्हायचा प्रयत्न केलाच पाहिजे.. तसही बरेच दिवसांपासून त्या कोपर्यावर उघडलेल्या हेल्थ क्लब च्या आत जाऊन "बघायचंच" होतं... एकदा ठरलं आणि तयारी पण जोरात सुरू झाली.. मॉल मधे जाऊन Nike चे t-shirts, Rebok ची track pant, Adidas चे shoes आणले.. (सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे ना !!), आयपॉड मधे गाणी भरली, recharge केला, Cover आणालं, हेल्थ कल्ब मधे जाऊन नाव नोंदवलं, nutrionist ची appointment घेतली आणि ह्या खुषीत येता येता फक्त १ पायनॅपल संडे खाल्लं..
प्रथम ग्रासे का काय म्हणतात तसं nutrionist नी सांगितलं नुसत्या व्यायामाने काय होणार "जिव्हानियंत्रण" हवं (हा आपला माझा शब्द... हल्लीच्या इंग्रजाळलेल्या मुलांना काय येणार असं शुद्ध मराठी) डाएट च्या नावाखाली दिवस भर उपवास (तरी सकाळी खाल्लेले २ पेढे आणि थोडे चिप्स सांगितले नाही instructor ला) २० मिनीटं ट्रेड मिल, त्यानंतर १५ मिनिटं स्टेपर, सगळी स्नायू हलवून टाकणारे स्ट्रेचेस आणि हे सगळं करूनही वर कोक, ज्यूस न पिता भयंकर रंगाचा बीट आणि गाजराचा रस... कसं व्हायचं आपलं????????????
********************************************************************
नियम :
१. शब्दमर्यादा २००० शब्द.
२. एक आयडी कितीही प्रवेशिका टाकू शकतो.
३. निकाल मतदानाद्वारे.
४. कथा तुम्ही हवी अशी फुलवू शकता. आजूबाजूची पात्र, लोकेशन(देश/परदेश), प्रसंग हे सगळं हवं ते घेऊ शकता.
५. कथेला logical end असावा.
६. कथेला शीर्षक असावे.
७. कथा प्रतिसादामध्ये लिहावी.
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
या
या स्पर्धेला काही अंतिम तारीख आहे का?
सर्व
सर्व स्पर्धाची अंतिम तारीख अनंतचतुर्दशी (१४ सप्टे. २००८) आहे.
चवळी, मटार
चवळी, मटार किंवा शेवग्याची शेंग... म्हणजे ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांतल्या महिलावर्गासाठी आहे का? (भोपळा, वांगं, तोंडलं अश्या उपमा वर दिलेल्या नाहीत म्हणून ही चौकशी!)
मृ... सहीच
मृ... सहीच
मृ, तुला
मृ, तुला समानता बीबी वर ह्या विषयी वाचाफोड (किंवा टाहोफोड)केली पाहीजे की महिलावर्गना अशी दुषणे दिली आहेत नी नावे ठेवली आहेत.:)
मुलिंनो, वा
मुलिंनो,
वाद विवाद गणेशोत्सव संपल्यावर करु या.
"कथा तुम्ही हवी अशी फुलवू शकता" , त्यामुळे, पुरुषांच्या वजन वाढण्याच्या आणि उतरवण्याच्या (काल्पनिक) अनुभवाला तुम्ही शब्दबद्ध करु शकता. (कराच! )
तेच की, मला
तेच की, मला खरंतर पुरुष अँगलनीच लिहायचं होतं, पण 'शेंगा' वाचून थबकले
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
पण ह्या
पण ह्या कथा वाचायला कधी मिळणार?? आणि कुठे??
सुचलं तसं
सुचलं तसं लिहिलंय मंडळी.. गोड मानून घ्या..
--------------------------------
(करतायत) डायटींग!
आईगं, अंग काय ठणकतंय! त्या मेल्या इन्स्ट्रकटरला काय जातंय सांगायला-ट्रेडमिलवर २० मिनिटं पळवलंन मेल्यानं! आणि नंतर गाजराचा रस दिला प्यायला. 'आता १ वाजेपर्यंत काही नाही, दुपारी दिड पोळी, भाजी, आमटी, अर्धी वाटी भात आणि एक वाटी ताक' इतकंच अशी तंबीही दिली. ह्यॅ! मी एका कानाने ऐकलं आणि दुसर्याने दिलं सोडून! एवढुसं खाऊन बारीक व्हायचंय की काय! अय्या! विसरलेच. बारीक व्हायचं आहेच की..
कशीबशी घरी आले, तो पोह्यांचा खमंग वास आला. सकाळची नाश्त्याची वेळ. सगळ्यांची धावपळीची. मिनी-चिंटू एकमेकांवर ओरडत आवरत होते, 'हे' नेहेमीप्रमाणे पेपर उघडून बसले होते. मी जिमला जाऊन आले, कोणी विचारलंही नाही, 'कसा गेला पहिला दिवस?' मी मिनी, चिंटूला अजूनही रोज विचारते उत्सुकतेनी, 'काय केलं दिवसभर?'- बालवाडीपासून जे सुरु केलं, ते अगदी अजूनही विचारते. पण मला कोणी विचारत नाही! या विचारानी भयंकर विमनस्कता आली आणि वाटीभर पोहे खाऊन झाल्यावरच ती गेली. तसे अजून चालले असते म्हणा, पण गाजराच्या रसानी तोंडाची चवच गेली बाई.
सगळ्यांना घराबाहेर घालवून- म्हणजे आपापल्या उद्योगांना हं, नाहीतर म्हणाल सगळ्यांना घराबाहेर हाकलण्याइतकी विमनस्कता आली की काय व्यायामानी! छे, इतकं काही मी व्यायामाचं मनावर घेतलं नाहीये काही. तर सगळे कामाला गेले आणि मी नि सखूबाई इतकेच उरलो. सखूलाही मी दळण, भाजी, किराणा आणायला पिटाळलं आणि जरा सोफ्यावर टेकले.
आईगं, काय वेदना या. मांड्या भरून आल्या. हात तर अगदी उचलवत नाहीये. समोरच यांना ऑफिसतर्फे कसलंतरी बक्षिस म्हणून फोटोफ्रेम मिळाली होती ती दिसली जिच्यामुळे मला हे जिम सुरु करावं लागलं! काहीतरीच मेली बक्षिसं! बाहेरून पुस्तकासारखी दिसणारी, उघडली की दोन फोटो शेजारी शेजारी लावता येईल अशी. सध्या डावीकडे हृथिक रोशन होता आणि उजवीकडे होती कोणीतरी फटाकडी. फ्रेम उघडून पाहिल्याबरोब्बर हे म्हणाले, "हेच फोटो बरे दिसत आहेत यात, मुलं मोठी झाली आता, माझे केस-बिस गेलेत आणि तू काही एका फ्रेममधे मावशील असं वाटत नाही!"
आणि हे खड्या आवाजात मुलांसमोर!!!!!!!!
इतके क्लेश झाले मनाला! म्हटलं, "तीळतीळ झिजले मी तुमच्या संसारासाठी अन् शेवटी ऐकायला लागलं हे!"
तर, "तीळतीळ झिजलीस ना म्हणूनच.. तोळातोळा तरी झिजायला हवं होतंस, मग तुझा फोटो फिट्ट बसला असता इथे!" असं म्हणाले वर आणि गडगडाटी हसले! मुलंही लगेच त्यांच्याबरोबर सामिल!
असं बोचणारं बोलतात बघा येताजाता. पण मी ही काही कमी नाही, म्हणजे तशी कमी नाहीच्चे, पण होईन कमी. असं काही डायट करते की बघाच!
त्या रात्री सगळे जेवायला बसले. सुरुवात केली पालक सूपनी. मग भाकरी, पातळ आमटी आणि लाल भोपळ्याची भाजी. साधा भात आणि ताक. विविध प्रकारचे आंबट चेहरे करत, जमेल तितक्या प्रकारानी नाकं मुरडत मंडळी कशीबशी जेवली.
दुसरा दिवस. नाश्त्याला काकडी, बीट, टमॅटोचे काप, त्यावर मिरपूड आणि मीठ असं मोठा बाऊलभरून, आणि अर्धा कप दूध. चहा/कॉफी बंद! हे सगळ्यांनाच हं. अपेक्षेनुसार मिनी आणि चिंटूनी दंगा केला. हेही मोठे डोळे करून बघत होते. म्हटलं, "हे बघा, मी डायटवर आहे, आणि माझ्यासाठी वेगळे, तुमच्यासाठी वेगळे असे पदार्थ करायला मला जमायचे नाही. माझी अवस्था झालीये तशी तुमची होऊ नये यासाठी, आणि मला वजन कमी करायचं आहेच, त्यासाठी हेच खाणं आपल्यासर्वांसाठी योग्य आहे. बघा, दोन महिन्यात कसे हेल्दी होऊ आपण. मी बारिक, तुम्ही सशक्त! मग मस्तपैकी ग्रूप फोटो काढून त्या फ्रेममधे लावता येईल आपल्याला.." फ्रेमचे शल्य असे सहजासहजी मनातून जाणार नव्हतेच. माझ वजन कमी करायला बघता काय बच्चमजी.
मी धडाकाच लावला. सखूलाही ट्रेन केले. भोपळा, दोडका, दुधी, पडवळ या आमच्या घरी आत्तापर्यंत न आलेल्या भाज्या फ्रीजमधे विराजमान झाल्या. सकाळी गाजराचा किंवा दुधीचा रस मस्ट. जेवणात भाकरी किंवा फुलके. ताक हवं तितकं. भात अगदी कमी. उकडलेली कडधान्य, काकडी, टमॅटो, मुळा, पालक, माठ, शेपू हवे तितके. आमटी मूगाच्या डाळीची. पात्तळ. खा पाहिजे तितकं. पण खायचं हेच. खाऊचे डबे गायबच करून टाकले. दृष्टीसच पडले नाहीत, तर मोह तरी कसा होईल? कूकरीचे टीव्हीवरचे शो बघणं बंद केलं. 'आस्था' चॅनलवरचे रामदेवबाबा माझं अराध्य दैवत झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेच डायट इतर तिघांनाही लागू केलं. कळूदे कळूदे, त्यांनाही 'यातना', 'वेदना', 'मोह टाळणे म्हणजे काय असते' ते सगSSSSSSSळं कळूदे जरा.
असा कसाबसा आठवडा काढला. देवा! हे सगळं करताना जीभेला काय त्रास झाला माझं मला ठाऊक. मधेच चमचमीत पदार्थांचे वास यायचे अचानक, डोळ्यासमोर गोड पदार्थ फिरायचे, दुपारी ११ आणि संध्याकाळी ६ यावेळा तर अमानुष! जे समोर येईल (त्याला) ते खावं वाटायचं. पण नाही! ती फ्रेम खुणावायची. जिम चालू होतंच. यांचे, मुलांचे चेहरे दिवसागणिक पडलेले, ओढलेले दिसू लागले. गोली तो निशानेपे लगी थी. आता मात्रा कधीही लागू पडणार होती. मी वाटच बघत होते.
एका संध्याकाळी मिनी कॉलेजातून येतानाच बटाटेवडे घेऊन आली. ती यायच्या आधी तो वेड लावणारा खमंग वास आत आला. मी काही बोलायच्या आतच ती म्हणाली, "आई, आज राहूदे गं डायट. कंटाळा आला बघ ते घास-फूस खाऊन. मस्त वडे खाऊ. खरंतर मी बाहेर एकटीच खाऊन येणार होते, पण तुझा दु:खी चेहरा डोळ्यासमोर आला. चिंटू, बाबाही किती दिवस उपाशी असल्यासारखे दिसत आहेत. मग ठरवलं, lets celebrate one week of dieting आणि दोन डझनभर वडे आणलेत बघ. घे घे, आम्ही काही बोलणार नाही तुला.."
इतक्यात हे देखील आलेच, चिंटू घरीच होता.
मी मुद्दामच दु:खी चेहरा करत म्हटले,"मिनी, माझ्यामुळे तुम्हालाही त्रास होतोय ना गं! अगं पण तुमच्या भल्याचंही मलाच बघायला हवं ना. उद्या माझ्यासारखी तूही जाड झालीस तर? बाबांचं वय होतंय, चिंटूचं वाढतंय.. तुम्हाला डायट फूड खावंच लागेल. यातच सगळ्यांचं भलं आहे... आण ते वडे, देऊन टाकू आपण सखूला.."
आता चिंटू-मिनीचा पेशन्सच संपला. एकतर जेवण मनासारखं मिळत नव्हतं. बेचव जेवून वैताग आला होता. आणि वर हे वडे चक्क देऊन टाकायचे? सर्वथा अशक्य!
"आई नाही हां. अजिबात नाही, एक तर तुझ्यामुळे आम्हालाही बोरींग जेवावं लागतंय. हे वडे मुळीच कोणाला द्यायचे नाहीयेत. हे हेल्दी फूडचंही बघू आपण नंतर, आधी वडे. मला जर वडे मिळाले नाहीत तर वेड लागेल आता.." चिंटू बरळायला लागला.
हा हा हा! मनातून हास्याच्या उकळ्या फुटल्या मला. पण करूण नजरेनी मी ह्यांच्याकडे पाहिलं.
"अहो, बघा ना मुलं कसं करत आहेत ते. आता असं अरबटचरबट खाणं बंद केलंय आपण. यानीच वजन वाढतं हो. मग माझ्यासारखे व्हाल, कुठे बाहेर फिरायची चोरी होईल, एकएक नसते रोग पाठीशी लागतील.." अजून बरीच मोठी लिस्ट होती, पण यांनी मला अडवलं.
"तू पण जरा जास्तच करतेस हं. अगं डायट करायचं म्हणजे इतकं नाही काही, अधूनमधूम जीभेलाही विरंगुळा हवाच की. तू म्हणजे एकदम मनावरच घेतलंस, वर आम्हालाही त्यात ओढलंस. मी काय म्हणतो, की हे डायट तसं आहे उत्तमच, पण आपण थोडं शिथील करूया ते. म्हणजे खरंतर तू आम्हाला त्यात नको धरूस.. तू तुझं तुझं चालू ठेव ना.. आम्ही आहोत मस्त fit and fine.."
अस्सं! आता मात्र ब्रम्हास्त्र काढायची वेळ झाली होती.
माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहायला लागले..
"तुम्हीही घ्या त्यांची बाजू. इतकी वर्ष तुम्हाला पाहिजे ते खाऊ घातलं, कधी टाळाटाळ केली नाही आणि जरा एक आठवडा माझ्यासाठी भाज्याबिज्या खाव्या लागल्या, तर लग्गेच माघार घेताय ना? कधी माझ्यासोबत नसता तुम्ही. सगळा संसार माझा एकटीचाच, खस्ता मीच काढायच्या, सोसायचंही मीच. तुम्ही फक्त चांगल्या प्रसंगी येणार. हेच ना २२ वर्षांच्या संसाराचं फळ?"
हे चांगलेच बावरले."अगं, अगं, रडतेस काय? साध्या वड्यांवरून इतकं टोक काय गाठतेस? अगं डायट करावंच, उत्तमच ते तब्येतीसाठी. पण त्यालाही तारतम्य असावं ना. हे डायट फूड खाऊन खरंतर चमचमीत खायची इच्छा अजूनच जागृत होते बघ. आपण असं करूया का.. एक दिवस डायट फूड, एक दिवस असलं मस्त काहीतरी आणि बाकी दिवस नेहेमीचं साधं जेवण- असा आठवडा प्लॅन करूया का? तूही सगळं खा, आम्हीही खातो. पण तू जरा जास्त नियंत्रण ठेव, आणि व्यायाम चालू ठेव. काय? कशी वाटते आयडीया मिनी-चिंटू?"
आता कुठे हे पटण्यासारखं बोलले काहीतरी. मिनी-चिंटूनी आज्ञाधारकासारख्या माना हलवल्या. मिनी म्हणाली,
"हो आई, मी तुला कध्धी कध्धी चिडवणार नाही, तू मस्त मस्त पदार्थ कर आधीसारखेच. प्लीज.."
ह्म्म. आता फायनल एन्ट्रीची वेळ झाली.
"बरं, तुम्ही बोलता त्यातही तथ्य आहे. मी तुम्हाला उगाच वेठीला धरायला नको होतं. करते बंद ते डायट फूड रोजचे. पण व्यायाम आणि नियंत्रित खाणं हे मी तरी आचरणात आणणारे. याची जाणीव करून दिल्याबद्दल त्या फ्रेमवाल्यांचे आभारच मानले पाहिजेत.."
"त्यावरून आठवलं.. आपल्या कॅमेर्याला सेल्फटायमर आहे की.. चिंटू आण रे कॅमेरा.. आठवड्याच्या उपासानंतरच्या सेलीब्रेशनचा फोटो काढलाच पाहिजे.. सगळ्यांनी वडे हातात धरूया, आणि हाच फोटो फ्रेममधे लावूया.. घे गं, दोन वडे घे तूही..."
आणि हसत हसत डायटची फ्रेम फ्रीझ झाली!
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
पूनम *** If dreams
पूनम
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
वैनी... ही
वैनी... ही कथा लिहायची होती म्हणून सही अशी ठेवलीस काय???
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
मस्त गं
मस्त गं पूनम!
फक्त सहीच्या आधी ' तात्पर्य :' असे लिही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
हिम्या, ही
हिम्या, ही सही केली तेव्हा या स्पर्धेची घोषणाही नव्हती झाली. कदाचित ही सही पाहून मग घोषणा झाली असेल
स्लार्ती, आशू, धन्स!
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
वाह वाह..
वाह वाह.. पूनम मस्तच.. !
सुचलं तसं
सुचलं तसं लिहिलंय मंडळी.. गोड मानून घ्या.. >>> आवडलं पूनम पण गोड मानून घेतलं तर वजन वाढेल ना!
================
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!
छानच
छानच रंगव्ली आहे कथा.
पूनम,
पूनम,
तीळतीळ झिजलीस ना म्हणूनच.. तोळातोळा तरी झिजायला हवं होतंस
सहीच लिहिलयस एकदम.....
सही....पूनम
सही....पूनम मस्त...
हेहेहे,
हेहेहे, अगदी माझी गोष्टच लिहिलीस की.
माझी
माझी खाद्ययात्रा
शी याक्!! चव गेली अगदी तोंडाची.. लोक कसे काय इतके भयंकर चवीचे आणि रंगाचे रस पितात कोणास ठाऊक. आज गाजर-बीट रस झाला, आता उद्या कार्ल्याचा दिला नाही म्हणजे मिळवलं. मुळ्ळी पिणार नाही असले भंगार चवीचे आणि रंगाचे रस... आई ग्गं.. इतकं अंग दुखतंय चोहो बाजूंनी.. बरोबरच आहे म्हणा, चोहोबाजूंनी वाढलंय म्हटल्यावर चोहो बाजूंनीच दुखणार.. Instructor ला सांगितलं तर ती आगाऊ म्हणते, no pain no gain. जळलं आता इथे gain काय करायचंय loose तर करायचंय... वजन पण loose आणि जमलंच तर जीन्स पण loose :हाहा:.... पण कुठून ह्या फंदात पडले देव जाणे... कुठला बरं तो दुष्ट दिवस ज्या दिवशी माझ्या मनाने वजन घटवण्याचा विचार पक्का केला?? हां, आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी.. विम्याची पॉलिसी काढायला गेलो, तर मेडिकल चेक्-अप मध्ये overweight म्हणून रीपोर्ट आला, मग मेल्याने एक्स्ट्रा प्रिमियम लावला.. नवर्याने एक डोळा तिरका करून अश्या काही नजरेने पाहिलं की मला ब्रम्हांड आठवलं.... चक् चक्.... ब्रम्हांड कॉम्प्लेक्स नव्हे हो, ते वरचं ब्रम्हांड. तेव्हाच मनाचा हिय्या केला आणि घेऊन टाकला एकदाचा तो अवघड निर्णय.. अनंत चतुर्दशीपर्यंत निदान ५ किलो तरी वजन घटवून दाखवेन असं नवर्याला ठासून सांगितलं... माझ्या बुलंद आवाजाचा त्याच्यावर परीणाम झाला असावा बहुतेक, कारण प्रिमियमचा चेक लिहिताना फार काही बडबड केली नाही त्याने, आणि जिमची फी सुद्धा मुकाट दिली.
जायला तर लागले जिमला... एक्सरसाईझची सवय झाल्यावर अंगही दुखायचं थांबलं. तशी लहानपणी जिम्नॅस्टिक्स खेळलेली असल्याने बहुतेक व्यायाम प्रकार ठाऊक होतेच, फक्त स्ट्रेचिंग करताना दाणादाण उडत होती अगदी.. पण जिव्हानियंत्रण!! हाय रे कर्मा... तेच अवघड जात होतं. आधीच काय खादाडीची हौसच भारी.... त्यातून आता श्रावण सुरू होणार... छे बाई!! मी खरोखरच कुमुहुर्त साधला होता.
श्रावण सुरु झाल्यावर पहिल्याच रविवारी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरली. बेतही खासा ठरला होता.. आम्रखंड, पुर्या, रस्सा भाजी, मसालेभात, टोमॅटोचं सार तेही नारळाचं दूध घालून. बाकी इतर प्रसादाचा शिरा, खीर-पुरण, वरण भात होतंच.. सगळाच मेनू भन्नाट आवडीचा.. आणि माझा प्रसादही असा काही जमलाय म्हणता.. आम्रखंडही अगदी ताजं मिळालं... हम्म्!! अंमळ जडच झालं जरा जेवण, पण ठिक आहे, उद्यापासून परत जीभेवर ताबा ठेवायचाच असं मनाशी पक्कं ठरवून झोपले. दुसर्या दिवशी उठून जिमला जाऊन आधी काट्यावर उभी राहिले, पण जळला मेला तो ढिम्मंच... पंधरा दिवस झाले, इमाने इतबारे घाम गाळून एक्सरसाईझ करतेय, पण वजनात फरक म्हणून नाही.
आईला आधीच सांगून ठेवलं होतं की यंदा १५ ऑगस्टला शुक्रवार आहे, तर सवाष्ण म्हणून मलाच बोलाव. अनायासे सुट्टी आहे आणि कित्ती दिवसात तुझ्या हातच्या गरम गरम पुरण पोळ्या खाल्ल्या नाहीयेत.... आमची आई अतिशय सुगरण.. खुपच मन लावून निगुतीने सगळा स्वयंपाक करते आणि त्यातून माझ्यासारखं कोणी मनापासून जेवणारं असेल तर मग अजून काय हवं... गरम पुरणपोळी त्यावर ताज्या साजूक तुपाची धार.. अहाहा!! माझी अगदी ब्रम्हानंदी टाळीच लागली होती. नैवेद्याला काहीतरी तळण करायचं म्हणून आईने कोबीची भजीही केली होती. आई आई गं... का तू इतका चांगला स्वयंपाक करतेस? का?? का??
मंगळागौरीसाठी दोन मंगळवार आधीच लागले होते आणि चक्क खेळायलाही बोलावणं होतं. नाहीतर हल्ली ह्या मुली जागरण नकोच म्हणतात, म्हणे दुसर्या दिवशी ऑफिस असतं. येत नाहीत हो खेळ त्यांना आमच्यासारखे म्हणून काहीतरी कारणं द्यायची झालं.... मंगळागौरीला भाजणीचे वडे, दही, मटकीची उसळ, गुलाबजाम वगैरे मेनू ठरलेलाच असतो. तिथे घरचा डबा घेऊन जावं की काय असा विचार करत होते... ओ, काहीतरीच काय... गुलाबजाम भरून आणण्यासाठी नव्हे... आपला घरचा दहीभात कालवून घेऊन तिकडे जाऊन खाण्यासाठी.... हे सगळं केवळ जिव्हानियंत्रण साधावं म्हणून.. आपली श्रद्धा नाही का वविला घरून डबा घेऊन आली होती, पटलं बाई मला तिचं... पण ते आचरणात आणलं तर लोक म्हणतील काय शिष्ठ मुलगी आहे ही... एवढं कौतुकाने फराळाला बोलावलं तर ही बया दहीभात खातेय, म्हणून मग ते डबा वगैरे नेणं कॅन्सल केलं.
राखीपौर्णिमेच्या दिवशी मामीचा आग्रहाचा फोन... राखी बांधायला येशील ती तिघंही या आणि जेवूनच जा.. बहिणीसाठी साकेतची खास फर्माईश होती बटाटे वडे करण्याची... आमच्या मामीची बटाटे वड्यांची किर्ती सर्वदूर पसरली आहे. पुन्हा राखीपौर्णिमा म्हणून नारळीभात हवाच..... शिवाय मी ओल्या नारळाच्या करंज्या करून नेलेल्या. मग भावाचा बहिणीला, मेहूण्याला आग्रह, मामाने आणलेलं माझ्या आवडीचं आईस्क्रिम.... अरे देवा!! का ही माणसं एवढं प्रेम करतात आपल्यावर.... दुसर्या दिवशी जिममध्ये पुन्हा आपला वजनाचा काटा जैसे थेच..
गणपतीसाठी नविन काहीतरी प्रसाद सुचव असं म्हटल्यावर पूनमने तत्परतेने '7 cup sweet' ची रेसिपी पाठवली. डायरेक्ट प्रसाद करण्यापेक्षा आधी एकदा ट्रायल घेऊन पहावी म्हणून त्या वड्या करून पाहिल्या... छानच झाल्या होत्या अगदी खुसखुशीत ..ही म्हणे आपल्या मिनोतीची खासियत.... चव बघताना मीच ५-६ तोंडात टाकल्या. चक्क सा. बा. ना पण आवडल्या. पण त्यांना ते इंग्लिश नाव आवडलं नाही म्हणून त्यांनी प्रसादाला रव्याचे लाडू करण्याचं फर्मान सोडलं. मग काय केले नारळ घालून रव्याचे लाडू.... शोनूने सांगितलेल्या प्रमाणाने केले की अज्जिबात बिघडत नाहीत हां... लक्षात ठेवा अगदी.
मी अगदी नियमितपणे जिमला जात होते, मन लावून एक्सरसाईझ करत होते. पण अनंत चतुर्दशी जवळ येत होती आणि माझं वजन फार तर एखाद किलोने उतरलं होतं.... कसं काय मी घेतलेलं चॅलेंज पुरं करणार ह्याची मला चिंता पडली होती. आता नाही जिभेवर ताबा त्याला काय करायचं? जळलं बडबड करून कॅलरीज् बर्न झाल्या असत्या तर कित्ती छान झालं असतं नै... मी मुलखाची बोलघेवडी अगदी जन्मभर चवळीची शेंग राहिले असते.. पण नाही... जाऊ दे, दुर्दैव एकेकाचं
गणपतीचे ५ दिवस येणार नाही असं आमच्या हिरॉइनने, अर्थात कामवाल्या बाईने अचानक जाहिर केलं तेव्हा माझ्या पोटात खड्डा पडला... नव्हे, विवर पडलं असं म्हटलं तरी चालेल. गणपतीच्या पहिल्या दिवशी दुपारी जेवायला एकूण २० माणसं होती.. केर-लादी, नैवेद्याचा स्वयंपाक, मोदक, एवढ्या माणसांच्या पंगती वाढणं, पंगत जेवल्यावर लादी पुसणं, आल्या-गेल्याची ऊठबस, सारख्या आत-बाहेर खेपा... माझा अगदी पिट्ट्या पडला. दुपारी जेवायला ३ वाजले, भुकेची वेळ टळून गेली होती, फारसं काही जेवण गेलंच नाही मला.. पहिलं वाढलेलंच जेमतेम संपवलं. मोदक गार झाल्याने तुपाचीही धार नाही घेतली त्यामुळे मोदक खायची मजाच गेली. दुसर्या दिवशीही तशीच परीस्थिती...... मोदक नव्हते, फ्रूट सॅलड होतं एवढाच काय तो फरक.
एक्सरसाईझ केले तरी इतकी खादाडी केल्यावर माझ्या वजनात अजिबात फरक पडणार नाहीये हे एव्हाना मला कळून चुकलं होतं. गणपतीत तर एक्सरसाईझही बंद होते. आमच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर आईकडे गेले.. तिच्याकडे गौरी-गणपती असतात. तिच्याकडेही कामवाल्या बाईची सुट्टी.... आणि आमच्याकडे माहेरवाशिण असली तरी तिचे फालतू लाड चालत नाहीत. घरात पडतील ती कामं केलीच पाहिजेत असा बाबांचा कटाक्ष असतो. त्यामुळे मग तिथेही केर्-लादी-भांडी मी आपण होऊन माझ्या अंगावर घेतली. त्या ५ दिवसात नीरजा मला आई न म्हणता 'लीलाबाई' म्हणूनच हाक मारत होती.
आमच्या आईसाहेबांनी गौरीजेवणाचा थाट अगदी झक्कास केला होता. रविवार असल्याने तिला कौतुकाच्या दोन्ही माहेरवाशिणी मिळाल्या होत्या. मग मोठ्या लेकीला आवडते म्हणून बासुंदी आणि धाकट्या लेकीला, म्हणजे अस्मादिकांना आवडतो म्हणून दुधीहलवा असा दुहेरी गोडाचा बेत होता. शिवाय कोथिंबीर वडी, पुलाव, रशियन सॅलड, डाळींब्यांची उसळ, अळूची भाजी वगैरे अतिआवडीचे पदार्थ होतेच. सुग्रास जेवणाची, डोळे जडावून जी दुपारची झोप लागते ना, मला फार आवडते ती... अगदी तृप्त तृप्त वाटतं... तशी एकदम झक्कास झोप लागली. विसर्जनाच्या दिवशी परत मोदक आणि गौरींच्या पाठवणीच्या पाटवड्या. मला अनंत चतुर्दशी डोळ्यासमोर नाचत होती तरीही मी खायचं काहीही बाकी ठेवत नव्हते.
माहेरपण संपवून मी ठाण्याला परत गेले तरी आमच्या हिरॉईनचा पत्ता नव्हता. ५-६ दिवस सतत भांडी घासून हात अगदी खरखरीत झाले होते. शरीरातही थोडा फरक पडला होता की काय देव जाणे... कारण जीन्स थोडी, अगदी थोssडी सैल होत होती. पुन्हा माझं जिम चालू झालं.. आता जेमतेम ३-४ दिवसच राहिले होते.. पण तोपर्यंत अजिबात वजनाच्या काट्यावर चढायचं नाही असं मनाशी पक्कं ठरवलं होतं. उगाच डोक्याला नसता ताप... आणि वजन-बिजन घटवणं आपल्या आवाक्यात नाही त्यामुळे जिमची फी परत भरायची नाही.. दिड-दोन महिने व्यायाम केला, बास झालं..... व्यायाम करूनही आपल्यात फरक पडत नाही अशी मनाची बळजबरीने समजूत करून घेतली.
चला, आज शेवटचा दिवस असं मनाशी घोकतच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी जिमला गेले. अगदी सुटल्या सुटल्या सारखं वाटत होतं. Adidas च्या shoes वर नवर्याचा डोळा होता, ते त्याला उदार मनाने देऊन टाकायचं ठरवलं होतं. आयपॉड काय मला ट्रेनमध्येही उपयोगी पडणार होता. तेवढाच प्रवासात विरंगुळा... शिवाय ऑफिसमध्ये नेल्यावर चांगली चांगली गाणीही देता-घेता आली असती. Instructor आडून आडून subscription renewal चं विचारू पाहत होती. पण मी अजिबात तिला दाद लागू दिली नाही. उगाच कशाला एखाद्या जीवाला दुखवायचं... त्या दिवशीचं circuit ही मी वरवर पूर्ण केलं. तिथल्याच ओळखीच्या झालेल्या चार बायकांशीही मी अगदी casual वागले-बोलले. शेवटी वेळ आली ती काट्यावर उभं रहायची.... उगाच आरशात बघत, केस सारखे करत बेफिकीरीने इंडीकेटरवर पाहिलं तर काssय.... अहो आश्चर्यम्!! माझं वजन चक्क ४ किलोने कमी झालं होतं. काटा बिघडला की काय अशी शंका येऊन मी Instructor कडे पाहिलं तर तीही माझ्याकडे पाहून गोssड हसली. म्हणजे.... खरंच माझं वजन कमी झालं होतं.... ४ किलो.. huh, not bad ना....... मला काट्यावर एकदम उडीच मारावीशी वाटली, पण म्हटलं नको, वजन उतरलं असलं तरी आपण अजुन overweight च आहोत.
आनंदातच घरी आले तर नवरोबा दारात उभेच होते, खबर काढायला. खुशीतच त्याला सांगितलं की माझं ४ किलोंनी घटवलंय.... तर शहाणा म्हणतो काय, आपण लीलाबाईंना कायमची सुट्टी देऊ या, म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारले जातील... तुझं वजन कंट्रोलमध्ये राहील, फुकटात घरचं काम होइल, लीलाबाईंना वेगळा पगार द्यायला नको आणि शिवाय जिमचीही फी भरायला नको!! काय??.... ओक्के... म्हणजे माझं वजन उतरण्याचं हे गुपीत होतं तर... मलाच कळलं नव्हतं. म्हणजे तो म्हणाला म्हणून मी काय लगेच लीलाबाईंना काढून नाही टाकणार पण आता वजन उतरवण्याचा कानमंत्र तर मला मिळाला होता..... कष्ट करा, घाम गाळा, वजन उतरवा.
वा मस्त
वा मस्त लिहिल आहेस मंजु
मंजु
मंजु
मंजू, मस्त
मंजू, मस्त लिहिलेयस. पहिल्यांदा चक्क ४ कि. वजन घटवल्याबद्दल congrats! पुर्ण कथाभर माझ्या आवडीच्या सगळ्या पदार्थांची पखरण केल्याबद्दल धन्यवाद
मंजु तू WWE
मंजु तू WWE बघतेस का?
Worlds Heavywight championship मध्ये भारतातर्फे आपण तुलाच पाठवुया.
पुर्ण
पुर्ण कथाभर माझ्या आवडीच्या सगळ्या पदार्थांची पखरण केल्याबद्दल धन्यवाद
चला म्हणजे भारतातर्फे अजुन एक नावाची घोषणा तर...
..
..
नुसत ४
नुसत ४ किलो...
हे तर समुद्रातून एक मग पाणी काढण्यासारख झाल...
ही 'कथा'
ही 'कथा' आहे, 'सत्यकथा' नाही. आता तुम्ही सगळे अभिनंदन करताहात तर मी बापडी धन्यवाद म्हणते, पण खरं म्हणजे माझं वजन तसूभरही कमी झालेलं नाही.
त्या ५
त्या ५ दिवसात नीरजा मला आई न म्हणता 'लीलाबाई' म्हणूनच हाक मारत होती.
>>>>>>>>>>> अरेरे!
खरंतर या करूण वाक्यापुढे हसणं योग्य नाही, पण आलं खरं! सॉरी हां
पण खरं म्हणजे माझं वजन तसूभरही कमी झालेलं नाही. >>>>
वाटलंच मला! मी याच खुलाश्याची वाट बघत होते
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
मला वाटलच
मला वाटलच होत म्हणूनच मी तुला ऍडवान्स मध्ये सल्ला दिला.
पण सत्यकथा नसली तरी बोधकथा आहे तुझ्या मायबोलीच्या मैत्रिणींना त्याचा नक्कीच उपयोग होईल..
Pages