बाबा आSSSले !

Submitted by अश्विनी के on 7 April, 2008 - 00:20

BABA_AALE_0.jpg

गुलमोहर: 

मस्तय चित्र. वॉटर कलर का?

नाही मिनू, हा माझा पोर्ट्रेट रांगोळीचा पहिलाच प्रयत्न. पेपरवर स्केच काढून त्यावर रांगोळी काढायची असते हे तेव्हा माहित नसल्याने mad सारखं direct जमिनीवरच काढली. त्यामुळे पाच सहा तासांनी फोटो काढेपर्यंत रांगोळी हलली आहे (आजुबाजूला वावर असतो ना!)

धन्यवा मिनू, आय टि.

सुंदर आलीये गं

वॉव.....

काय मस्त आलीये गं ........ खूप खूप छान Happy

मस्त आहे रांगोळी. Happy
हि कला देखील आहे का हातात? छान!

फारच गोड चित्रय ग, आणि रांगोळी मस्त आलीये एकदम. कॅप्शन सहि दिलंयस Happy

छानच आलीये की ही पण रांगोळी. पहिला प्रयत्न वगैरे काहीही वाटत नाहीये. Happy
पुढच्या वेळी रांगोळीचा फोटो टाकतांना कीती बाय कीती हे पण टाक म्हणजे किती मोठी आहे याचा सहज
अंदाज येईल.

डेंजरसली सुंदर!
आमचं म्हणजे नुस्ती रेघ काढायची (कागदावरच) तर एक पेंन्सिल आणि पाच खोडरब्बर... असलं! हे रांगोळी प्रकर्ण... इतकं उच्चं वाततं की... बस्स!
अश्विनी, माझी ही अवस्था आहे म्हणून नाही... पण ही रांगोळी.... खरच सुंदर आहे.

मस्त आलीये रांगोळी....... तिचे चेहर्‍यावरचे भाव सही आलेत एकदम.. अश्विनी , लगे रहो....

Thanks. काय गं सगळ्याजणी काहिच्याकाहीच कौतुक करताय. हि मुलगी मला लोकप्रभा मधे "दुधाच्या दातांचे महत्व" यालेखात मिळाली. पण तिच्या चेहर्‍यावरचे भाव मला खुप आपलेच वाटले. आपणही लहानपणी संध्याकाळी बाबांना ऑफिसमधून येताना पाहून असेच खुष होत होतो नाही का? तेच डोळ्यासमोर आले म्हणून हे caption दिले.

मंजू, याच रांगोळ्या मी रांगोळीच्या BB (ते नाही का "पाण्याखालची रांगोळी"!)वर मागे upload करणार होते पण काहीतरी गडबड होत होती. अगं अजून Black n White मध्ये मधुबाला पण आहे. तीचा फोटो सासुबाई मैत्रिणींना दाखवायला घेऊन गेल्या होत्या, मग मी विसरून गेले. त्यांच्याजवळ मिळाला तर तोही टाकेन.

अप्रतिम! Happy
रान्गोळीतून साकारलेय यावर विश्वास बसत नाहीये!
आपला, लिम्बुटिम्बु

बघा हं लिंबुटिंबू, रांगोळी आहे कि नाहि बघायला हात नाहि हं लाउन बघायचा, नाहितर फरफटून जाईल.

रांगोळी आहे अस वाटतच नाहिये.. सहिच.

रांगोळी? आणि इतके सुंदर भाव? अश्विनी खरच कलेचा वरदहस्त आहे हो तुझ्यावर. फार सुंदर. captionपण अगदी perfect.