पुढील कृतित दिल्याप्रमाणॅ
सांडग्याचे प्रकार
मूगाचे सांडगे, (यालाच मूगवड्या पण म्हणतात. )
अर्धा किलो मूगाची डाळ, अर्धी वाटी उददाची डाळ, वाटीभर सोललेला लसूण,
पाव किलो हिरव्या मिरच्या वा एक वाटी तिखट (आवडीप्रमाणे कमीजास्त)
एक छोटी जूडी कोथिंबीर, मिठ, हींग जिरे, मिरीदाणे, हळद
मूगाची डाळ कोरडीच भरड वाटून घ्यावी.त्याबरोबर जिरे आणि मिरीदाणे
वाटावेत.(या सर्व मिश्रणाचे प्रमाण असे नाही. भिजवलेले पीठ झणझणीत
लागले पाहिजे, चवीला.)
उडदाची डाळ रात्रभर भिजत घालून सकाळी वाटावी. वाटताना त्यात लसुण
व मिरच्या घालाव्यात. कोथिंबीर मात्र बारीक चिरुन घालावी, वाटू नये.
त्यात बाकीचे जिन्नस व मूगडाळीचे मिश्रण घालावे. नीट मिसळून घ्यावे.
अर्धा तास थांबावे. परत मिश्रण नीट मिसळून घ्यावे. यावेळी ते हाताला
कोरडे लागू नये. लागल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
मग प्लॅष्टीकच्या कागदावर वा ताटात, सांडगे घालावेत. हाताने घालण्यापेक्षा
जर जाडसर प्लॅष्टिकच्या पिशवीला छोटेसे भोक पाडून (जिलबीसाठी करतो
तसे ) घातले तर हात खराब होत नाहीत, व सुबक सांडगे घालता येतात.
हे सांडगे दोन दिवस कडक उन्हात वाळवावेत. मग सोडवून उलटवून परत
वाळवावेत. पूर्ण वाळल्याशिवाय, डब्यात भरु नयेत.
हे सांडगे तेलात लालसर रंगावर तळून, वांगी, बटाटा, कडधान्य यासारख्या
भाजीत घालतात. हे सुके असल्याने, नीट शिजवावे लागतात. नूसत्या
या सांडग्याची पण भाजी करता येते. शिजल्यावर हे थोडे फ़ूगतात.
कोल्हापूरकडे हे सांडगे मुहुर्ताचे म्हणून करतात. लग्न ठरले, कि पहिल्यांदा
हे सांडगे करायचे. त्यातले पहिले पाच, पूजायचे.
कोहळ्याचे सांडगे
अर्धा किलो कोहळा, १०० ग्रॅम गवारी, १०० ग्रॅम भेंडी, एक छोटी काकडी,
पाव किलो भाजके पोहे, लाल मिरच्या, मीठ, हिंग
पोहे भरड दळून घ्यावेत. कोहळा, गवारी व भेंडी या भाज्यांचे तूकडे
करुन घ्यावेत व ते एकत्र करुन कूटावेत. अगदी बारीक करायचे
नाहीत. मग त्यात काकडीचा किस, लाल मिरच्यांचे तूकडे घालून
परत कूटायचे. त्यात पोहे मिसळायचे. मीठ व हींग घालायचा.
या मिश्रणाचे हलक्या हाताने लिंबाएवढे गोळे करुन कडक
उन्हात वाळवायचे.
हे तळल्यावर सुटे होतात. नूसतेच जेवणात घेतात (भाजीत वगैरे घालत
नाहीत. ) पण चवदार लागतात.
हिरव्या मिरच्यांचे सांडगे
पाव किलो हिरव्या मिरच्या. अर्धी वाटी उडीद डाळ, मीठ आणि हिंग
उडीद डाळ, रात्रभर भिजत घालून कमी पाण्यात अगदी बारीक वाटावी.
मिरच्यांचे तूकडे करुन, भरड कूटावेत. त्यात डाळिचे मिश्रण व हिंग
घालावा. नीट मिसळून याचे सांडगे घालून कडक उन्हात वाळवावेत.
हे सांडगे तळून, दहीभाताबरोबर खातात.
कुडाच्या फ़ूलांचे सांडगे.
या दिवसात कोकणात गेलात, तर सगळीकडे पांढरा कुडा, फ़ुललेला
दिसतो. त्याची फ़ूले खुडून आणायची.
ती सावलीतच वाळवायची. मग रात्री उघड्यावर (गच्चीत ) ठेवायची.
मग सकाळी ती चुरुन त्यात मीठ, व हींग घालून मळायची. त्यात थोडे बेसन
घालून त्याचे सांडगे घालायचे. कडवट पण चवदार लागतात. शिवाय
पोटासाठी चांगले आहेत.
मेथीच्या भाजीचे सांडगे
दोन जूड्या मेथीसाठी, पाव किलो तूरडाळ वा चणाडाळ (वा दोन्हीचे
मिश्रण ) भिजत घालून भरड वाटायची. त्यात मेथीची पाने, मीठ
व आवडीप्रमाणे तिखट वगैरे घालुन मिसळायचे.
या मिश्रणाचे सांडगे न घालता, छोटा लाडू करुन, दोन्ही हाताच्या
तळव्यात अलगद दाबायचा. आणि मग ते उन्हात वाळवायचे.
(हाताला थोडे तेल लावायचे )
हे वडे तळून, रस्सा भाजीत, कढीत घालता येतात.
कांद्याचे सांडगे
एक पेला जूने तांदूळ, तीन दिवस भिजत घालायचे. रोज
पाणी बदलायचे. तिसऱ्या दिवशी, ते पाणी घालून अगदी
बारीक वाटायचे. मग त्यात मीठ, हींग व लाल तिखट
घालायचे. हे मिश्रण दूधापेक्षाही पातळ हवे. तिखट
मीठ जरा जास्तच घालायचे.
मंद आचेवर हे मिश्रण शिजत ठेवायचे. सतत ढवळायचे.
पारदर्शक झाले कि उतरायचे. मग हे जरा थंड झाले कि
तीन चार मोठे लाल कांदे, अगदी बारीक चिरुन त्यात
मिसळायचे. नीट ढवळून, त्याचे चमच्याने सांडगे घालायचे.
हे सांडगे वाळले कि आतून पोकळ होतात.
तळल्यावर ते खूप फ़ूलतात. चहाबरोबर वा जेवणात
घेता येतात.
सांडगे करणे आता विस्मरणात जात आहे. वर्षभर, खास
करुन ज्यावेळी भाज्या मिळत नाहीत, त्या काळातली
बेगमी असे ही. पूर्वी ते मोठ्या प्रमाणात करत असत,
पण थोड्या प्रमाणात केल्यास, फ़ारसा वेळ लागत नाही.
हा आणखी एक वेगळा प्रकार. खुप वर्षांपुर्वी कालनिर्णय मधे वाचला होता. करुनही बघितला होता.
मटकीचे सांडगे.
पाव किलो मटकी भिजत घालून निथळून घ्यावी. चार सहा शेवग्याच्या शेंगाचे मोठे तूकडे करुन उकडून घ्यावेत. त्याचा फक्त गर घ्यावा. मग तो गर आणि मटकी वाटून घ्यावी. त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व हींग घालावा. (मी लसूणही घातला होता ) मग त्याचे सांडगे उन्हात वाळवावेत. तळून तसेच खावेत वा भाजीत घालावेत. चवीला छान लागतात.
प्रतिसाद
प्राजक्ता | 27 April, 2010 - 10:37
प्रिती रेसिपी लिही.
हरबरा डाळिचे सांडगे(वडे)
हरबरा डाळ रात्री भिजत घालुन सकाळी उपसुन पाणि न घालता वाटायची त्यात हिंग ,हळद, मिठ आवडिप्रमाणे तिखट किंवा हिरव्या मिरच्या आणी कोंथिबिर बारिक चिरुन घालायची,मिसळून पाटावर किंवा प्लॅस्टिक कागदावर वडे घालायचे. (त्याला वडे तोडण अस म्हणतात.) कडकडित वाळवायचे.
लागेल तस भाजि किंवा तोंडिलावण म्हणून वापरायचे.
हे वडे झार्याने झारुन करायची पण पद्धत आहे.
प्रीति | 7 May, 2010 - 11:27
बाजरीच्या खारवड्या / सांड्गे
बाजरी खमंग भाजुन घ्यायची. मिक्सरमधुन ओबड धोबड काढुन घ्यायची. पाणी उकळायला ठेवायचं, त्यात तिखट, मीठ, हळद, लसुण जीरं वाटुन घालायचं आणि पीठ हळुहळु ढवळत घालायचं, गुठळ्या फोडायच्या. मिश्रण पातळ होईल इतपत पीठ पाण्यात टाकायचं, चांगलं शिजु द्यायचं. बर्यापैकी घट्ट होईल मिश्रण शिजल्यावर. पाण्याच्या हाताने सांडगे घालायचे. कडकडीत वाळवायचे. गरम गरम पीठ छान लागतं. ह्या खारोड्या तळुन किंवा नुसत्या दह्यात घालुन पण छान लागतात, तसचं तेल, तिखट, मीठ आणि शेंगदाणे लावुनही मस्त लागतात, सोबत कांदा. तोंडाला पाणी सुटलं. आजच संध्याकाळी खाणार
धन्यवाद दिनेशदा! विस्मरणातील
धन्यवाद दिनेशदा! विस्मरणातील पदार्थ झाला होता हा. या उन्हाळ्यात नक्की करुन बघते.
मस्तच. लहानपणीच्या आठवणी
मस्तच. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! आमच्या घरीही सांडगे करण्याचा एक 'प्रोग्राम' असायचा :). मुगाचे आमच्याकडे बनायचे, पण उरलेले नाही बनवले गेले कधी. बाजरीचे पण बनायचे बहुतेक.
सांडगे करणे आता विस्मरणात जात आहे.>> सहमत!
महान बा.फ. काढले आहेत तुम्ही, सांडग्यांचा काय, वरणाच्या प्रकाराचा काय!!
अग बाजरीच्या खारवड्या. आई हे
अग बाजरीच्या खारवड्या. आई हे सांडगे, खारवड्या, पापड्या प्रकार करते अजूनही. मी उन्हाळ्यात आईकडे असले की, सांडगे, खारवड्या वैगरे प्लास्टिकवर घालत बसण्याचे काम माझ्याकडेच असतं.
अग बाजरीच्या
अग बाजरीच्या खारवड्या.>>य्स्स्स!! माझ्या खुप आवडीच्या. मागच्या बर्षी आईने येताना आणल्या, त्या संपल्या म्हणुन इथे परत करुन दिल्या.ह्या वर्षी मी करणारे.
धन्यवाद दिनेशदा!
सही, माझी आई हडाळ/ मुगाच्या
सही, माझी आई हडाळ/ मुगाच्या डाळीचे करते सांडगे.
कांद्याचे सांडगे कधी खाल्ले नाहीत. उन्हाळ्यात करुन पाहिन.
रच्याकने, बाजरीच्या खारवड्या >> ह्याची कृती आहे का कुठे?
प्रिती रेसिपी लिही. हरबरा
प्रिती रेसिपी लिही.
हरबरा डाळिचे सांडगे(वडे)
हरबरा डाळ रात्री भिजत घालुन सकाळी उपसुन पाणि न घालता वाटायची त्यात हिंग ,हळद, मिठ आवडिप्रमाणे तिखट किंवा हिरव्या मिरच्या आणी कोंथिबिर बारिक चिरुन घालायची,मिसळून पाटावर किंवा प्लॅस्टिक कागदावर वडे घालायचे. (त्याला वडे तोडण अस म्हणतात.) कडकडित वाळवायचे.
लागेल तस भाजि किंवा तोंडिलावण म्हणून वापरायचे.
हे वडे झार्याने झारुन करायची पण पद्धत आहे.
दिनेशदा, छान प्रकार आहेत
दिनेशदा, छान प्रकार आहेत सांडग्याचे.कोहळ्याचे, हिरव्या मिरचीचे सांडगे खाल्लेत, बाकी नाही.
आमच्याकडे मटकीच्या डाळीचे सांडगे करतात. आई अजुनही करते, त्यामुळे प्रत्येक भारतवारीत सांडगे आणणे होतेच. पण लगेच संपतात
कोल्हापूरकडे हे सांडगे
कोल्हापूरकडे हे सांडगे मुहुर्ताचे म्हणून करतात. लग्न ठरले, कि पहिल्यांदा
हे सांडगे करायचे. त्यातले पहिले पाच, पूजायचे <<< हो हो. आमच्याकडे लग्नाच्या वेळी सांडगे घालताना पाच सवाष्णींना बोलावतात (त्यांना थोडेतरी सांडगे घालावे लागतात ) व चहा-फराळ केला जातो.
आई अजुनही दर वेळेला सांडगे घालताना पहिले पाच वेगळे करुन हळद-कुंकु लावुन पुजते. काही ठिकाणी त्यांना पांडव असेही म्हणतात.
आमच्याकडे अजुनही सांडगे,शेवया
आमच्याकडे अजुनही सांडगे,शेवया इत्यादी मोठ्या प्रमाणावर केले जातात.
esp कोहळ्याचे सांडगे आमच्यात अगदी स्पेशालिटी आहे. पण वरती पोह्याचे लिहिलय तसे न करता साबुदाणा वापरुन करतात.
तसच कुरुड्या इत्यादी तांदळाचे आणि गव्हाचे दोन्ही बनवतात. गव्हाचे करण्याच प्रमाण खुप कमी झालय. प्रचंड कष्ट आहेत त्याला.परवा मिनोतीच्या ब्लॉग वर गव्हाचे सांडगे बघुन खुप आश्चर्य वाटलेल त्यामुळ.
अग बाजरीच्या खारवड्या. >> हो
अग बाजरीच्या खारवड्या. >> हो हो खारवड्या. आम्ही त्या दाणे आणि कच्च्या (फोडलेल्या) कांद्याबरोबर खायचो!! टू मच लागतात!
हा आणखी एक वेगळा प्रकार. खुप
हा आणखी एक वेगळा प्रकार. खुप वर्षांपुर्वी कालनिर्णय मधे वाचला होता. करुनही बघितला होता.
मटकीचे सांडगे.
पाव किलो मटकी भिजत घालून निथळून घ्यावी. चार सहा शेवग्याच्या शेंगाचे मोठे तूकडे करुन उकडून घ्यावेत. त्याचा फक्त गर घ्यावा. मग तो गर आणि मटकी वाटून घ्यावी. त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व हींग घालावा. (मी लसूणही घातला होता ) मग त्याचे सांडगे उन्हात वाळवावेत. तळून तसेच खावेत वा भाजीत घालावेत. चवीला छान लागतात.
आईच्या हातची सांडगे बटाटा
आईच्या हातची सांडगे बटाटा भाजी आठवली!! :यम्मी:
माझ्याही लग्नाच्या वेळेस मुहुर्ताचे सांडगे घातले होते, व पाच सवाष्णींना बोलवले होते..
दिनेशदा खुप खुप धन्यवाद. आता
दिनेशदा खुप खुप धन्यवाद. आता मला सुरुवात करायला लागेल सांडगे करायची.
दिनेशदा, मी स्वतः कधी सांडगे
दिनेशदा, मी स्वतः कधी सांडगे घातलेले नाहीत, पण गेल्या पिढीच्या बायका घाऊक प्रमाणात एखादी भाजी, डाळ, भात, उसळ वगैरे उरली तर त्याचे सरळ सांडगे घालायच्या असे ऐकले आहे, त्या प्रकारात केलेले सांडगे खाल्लेही आहेत. त्यांच्या काही कृती किंवा करण्याविषयी टिप्स माहीत असतील तर त्याही द्याल का?
अन्न वाया जाऊ न देणे व त्याचबरोबर त्याचे एका टिकाऊ व बेगमीच्या पदार्थात रुपांतर करणे म्हणजेही कौशल्यच वाटते!
[आजकाल विकतच मिळतात सांडगे, आणि फार कोणी खात नाही घरी म्हणून ते घरी केलेही जात नाहीत!]
साधारणपणे पदार्थात खोबरे नसेल
साधारणपणे पदार्थात खोबरे नसेल तर त्याचे सांडगे घालणे सहज शक्य आहे. उन मात्र कडक पाहिजे.
उरलेला भात असाच वाळवून ठेवता येतो, त्यात ताक मीठ मिरची घालून सांडगे करता येतात किंवा तसाच वाळवून, तळून चिवडा करता येतो.
उरलेल्या भाताचे, खिचडीचे
उरलेल्या भाताचे, खिचडीचे घातलेत सांडगे आईकडे. इथे घालायला जागाच नाही, त्यामूळे बर्याचदा इच्छा असुनही नाही करता येत असलं काही.
धन्स दिनेशदा!
धन्स दिनेशदा!
माझ्याकडे आईनी दिलेले सांडगे
माझ्याकडे आईनी दिलेले सांडगे आहेत. (कोणत्या प्रकारचे आहेत हे तिला विचारावे लागेल). त्याचे अजुन पर्यंत काही केल गेल नाही आहे मी सांडग्याचे प्रकार विशेष खाल्ले नाही आहेत. लहानपणी एकदा सांडगे घालुन आमटी खाल्ली होती.... सांडगे घालून आमटी ,भाजी याची रेसिपी सांगाल का ?
मस्त आहेत सर्व सांडगे.
मस्त आहेत सर्व सांडगे.
आमच्याकडे गुडमकाइचे सांडगे घालतो. मी इथे दर उन्हाळ्यात घरच्या गुडमकाइचे घालते.
बाजरिचे खारवडे / सांडगे कसे
बाजरिचे खारवडे / सांडगे कसे करतात ? प्लिज कोणी सांगेल का? मागे विकत आणले होते, तेव्हा लेकिला फार आवडले होते. घरी करुन बघेन म्हणते.
बाजरीच्या खारवड्या /
बाजरीच्या खारवड्या / सांड्गे
बाजरी खमंग भाजुन घ्यायची. मिक्सरमधुन ओबड धोबड काढुन घ्यायची. पाणी उकळायला ठेवायचं, त्यात तिखट, मीठ, हळद, लसुण जीरं वाटुन घालायचं आणि पीठ हळुहळु ढवळत घालायचं, गुठळ्या फोडायच्या. मिश्रण पातळ होईल इतपत पीठ पाण्यात टाकायचं, चांगलं शिजु द्यायचं. बर्यापैकी घट्ट होईल मिश्रण शिजल्यावर. पाण्याच्या हाताने सांडगे घालायचे. कडकडीत वाळवायचे. गरम गरम पीठ छान लागतं. ह्या खारोड्या तळुन किंवा नुसत्या दह्यात घालुन पण छान लागतात, तसचं तेल, तिखट, मीठ आणि शेंगदाणे लावुनही मस्त लागतात, सोबत कांदा. तोंडाला पाणी सुटलं. आजच संध्याकाळी खाणार
हा प्र्कार जास्त करुन विदर्भ
हा प्र्कार जास्त करुन विदर्भ / खानदेशात होतो असे वाटते. देशावर हा पदार्थ नाही ऐकला कधी. गव्हाचा चिक काढल्यावर जो चोथा उरतो, त्याचे पण सांडगे घालतात.
मराठवाड्यात करतात खारवड्या.
मराठवाड्यात करतात खारवड्या. पण आईची पद्धत वेगळी आहे. परवा ती आल्यावर तिला विचारून टाकेन इथे.
आमच्याकडेपण - सोलापूरकडे -
आमच्याकडेपण - सोलापूरकडे - करतात बाजरीचे सांडगे..
हा प्र्कार जास्त करुन विदर्भ
हा प्र्कार जास्त करुन विदर्भ / खानदेशात होतो असे वाटते>> अल्पना म्हणते तसं मराठवाडा आणि अंजली म्हणते तसं सोलापूर-पंढरपुरकडचा आहे
अगदी बरोबर खानदेशात खूप
अगदी बरोबर खानदेशात खूप प्रसिद्ध.. बाजरीचे ज्वारीचे पापड ते हि मस्त असतात.. नाव आठवत नाही .. माझ्या साबा अजून भारतात हे सगळा करतात .. ह्या वयात पण इतक्या उत्साहाने करतात तेव्हा वाटता आपण घेवू का कष्ट हे सगळा जपून ठेवण्यासाठी .. नाही तर उगाच आपला नोस्त्याल्जिक होवून लहानपणी करायचो आता होत नाही .. वागिरे वागिरे ..
पण खूप धन्यवाद हे सगळे इथे लिहिल्याबद्दल.. मध्ये ज्या कृती दिल्या आहेत त्या वरती टाकल का प्लीज ..
धन्यवाद प्रीति, पण एक
धन्यवाद प्रीति, पण एक शंका... ह्यात थो़डा पापडखारपण घालतात का? कारण मी आणलेल्या सांडग्यांमधे पापडखार असल्याची चवीवरुन शंका आली आणि ते छान फुलतही होते.
दिनेश.. गव्हाच्या चोथ्याचेपण सांडगे नाही पण भुसवड्या (थापून) करुन पाहिल्या आहेत. सत्व सगळ निघाल्यामुळे नुसता हलका भुस्साच राह्तो. तळाताना पण पटकन तळायाला लागतात नाहितर लगेचच जळतात किंवा चुलितही भाजून खातात असे कुठेतरी ऐकले आहे.
म्हणजे व्हीटाबिक्स सारखेच की
म्हणजे व्हीटाबिक्स सारखेच की !!!
मी पण ज्या खारोड्या वाचल्या होत्या, त्या गव्हाच्या सत्वासारख्याच होत्या. पण मी खाल्ल्या नाहीत कधी.
ह्यात थो़डा पापडखारपण घालतात
ह्यात थो़डा पापडखारपण घालतात का?>>नाही गं, आई तरी नाही घालत.
मी भाजीचे म्हणजे दुधी,
मी भाजीचे म्हणजे दुधी, भेंडी, इ. एकत्र करून त्याचे सांडगे खाल्ले आहेत.
कसे करायचे ते माहित नाही. कोणाला माहित आहेत का?
Pages