Submitted by Adm on 24 April, 2010 - 13:46
पुन्हा एकदा सारेगमप !!!!
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
७. अपुर्वा गज्जला
८. विजय गटलेवार
९. अनिकेत सराफ
१०. संहिता चांदोरकर
हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांडोडकर काय? चांदोरकर आहे
चांडोडकर काय? :p
चांदोरकर आहे ना?
खव्याच्या पोळीचा बकाणा भरला
खव्याच्या पोळीचा बकाणा भरला असेल ते लिहिताना
ह्यावेळी आम्ही गाण्यांबरोबर
ह्यावेळी आम्ही गाण्यांबरोबर पल्लवी, तिच्या साड्या, मेकप, तिचं मराठी, अवधुतचा पाचकळपणा ह्यावर पण चर्चा करणार बरं का.. तुझं अजिबात ऐकणार नाही पराग
चांडोडकर <<< बोबडी वळली
चांडोडकर
<<< बोबडी वळली संहिताच्या आठवणीनी कि रणछोडदास चांचड-फुंगसुक वांगडु शी मिक्स झालं हिच लास्ट नेम?
केलाय बदल.. काय पण बाया..
केलाय बदल.. काय पण बाया..
परत तेच स्पर्धक, तीच तीच
परत तेच स्पर्धक, तीच तीच गाणी, तीच अँकर, तेच परीक्षक, त्याच कमेंटस् , त्याच टाळ्या आणि तेच ते 'या मंचावर येऊन कसं वाटतंय?'...
नाही नाही गाणी कधी जुनी असतात
नाही नाही गाणी कधी जुनी असतात आणि गाणारे नवीन असतात ना. वाजले कि बारा किती छान म्हणल त्या .... अभिलाषा चेल्लम ने. यु ट्युब्वर पहा नसेल पाहिल तर.
जोरदार टाळ्या होउन जाऊ देत
जोरदार टाळ्या होउन जाऊ देत
आणि विजेता कोण असेल सांगा बरे
आणि विजेता कोण असेल सांगा बरे मुलानो..
फारच अवघड प्रश्न बुवा पण
फारच अवघड प्रश्न बुवा
पण यापैकी एक नक्की
ज्ञानेश्वर मेश्राम(१) / मंगेश बोरगावकर(३) / विजय गटलेवार(२)
ज्ञानेश्वर मेश्राम .
ज्ञानेश्वर मेश्राम :).
मंगेश बोरगावकर खूप छान गातो
मंगेश बोरगावकर खूप छान गातो असं ऐकलं होतं, कोसंबी पेक्षा तो डिझर्विंग होता म्हणे.
कळेलच अता.
आकडे लावायचे का?
आकडे लावायचे का?
ज्या प्रमाणे बाहेर जातील
ज्या प्रमाणे बाहेर जातील त्याचा माझा अंदाज
१. आनंदी जोशी
२. अनिरुध्द जोशी
३. अनिकेत सराफ
४. संहिता चांदोरकर
५. अपुर्वा गज्जला
६. सायली ओक
७. राहूल सक्सेना
८. मंगेश बोरगावकर
९. विजय गटलेवार
१०. ज्ञानेश्वर मेश्राम
विजय गटलेवार आणि ज्ञानेश्वर
विजय गटलेवार आणि ज्ञानेश्वर मेश्राम हे दोघं जरा जास्तच लाडके आहेत झी वाल्यांचे..
माझा आकडा संहिता साठी....
माझा आकडा संहिता साठी....
अरे असे काय करताय... ह्या
अरे असे काय करताय...
ह्या वेळेस सक्सेनाच येणार... त्याच्या साठीच तर ठेवलीये ही ह्या वेळची स्पर्धा....
साडेनवाला एखादी दुसरी बरी
साडेनवाला एखादी दुसरी बरी सीरीयल असेल, किंवा रीअॅलिटी शो ही चालेल.. कोणाला दिसला तर चॅनेल कळवा. नाहीतर पर्याय नसल्यामुळे पल्लवी- अवधूत आणि कंपनीला सहन करावं लागणारे
तो गटलेवार म्हणजे तोच ना लांब केसांचा, मध्ये एकदा येऊन पॉप की कायसं गाऊन गेला त्याच्या अल्बममधलं? बंडल होतं ते गाणंही आणि त्याचा आवाजही! मेश्राम? अर्र. म्हणजे 'कोणता झेंडा घेऊ हाती?'च टायटल गाणं करावं सारेगमपचं. गुप्तेसाहेब आहेतच साथीला.
सायली ओक चांगली आहे. आनंदी जोशी मला आठवतच नाहीये. मंगेश खरंच चांगलं गायचा- कोसंबीपेक्षा तर नक्कीच. अनिरुद्ध जोशी नाट्यसंगीतातच बेस्ट होता फक्त. राहुल सक्सेना मला आधीही आवडत होता. आता त्याच्यासाठीच असेल हा शो, तर चालेल
पल्लवी आणि अवधूतबद्दल मी काहीही लिहिणार नाही अॅडमा. काही उरलेलंच नाहीये त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं. एका भागात १०१% सलील येणार. तेव्हा तर मी 'बेहेनें, सात फेरे' इतादी बघेन, पण सारेगमपचा तो भाग नाही पहाणार!
आनंदी जोशी पहिल्या शेड्यूलला
आनंदी जोशी पहिल्या शेड्यूलला चौथ्या नंबरावर होती. चांगली गाते.
थोडक्यात, ज्यांच्यावर आपण अन्याय केलाय असं झी ला वाटतंय त्यांना आणलंय परत. पण आमच्यावर अन्याय होतोय त्याचं काय
आयला आजपासून इंडियन आयडोल पण
आयला आजपासून इंडियन आयडोल पण चालू होतय ना???
अन्नो मलिक की पल्लावी जोशी???? दोघापैकी आचरटपणा कोण जास्त करेल???
दोघापैकी आचरटपणा कोण जास्त
दोघापैकी आचरटपणा कोण जास्त करेल???
>>
कधीही अन्नूच..
पल्लवीला त्यातही वैविध्य आणता येत नाही... तिचा स्कोप भलताच लिमिटेड आहे...
त्या मानानी अन्नू परवडला....
वाह मेरे भाई तू क्या कमाल गाता है.. आय हाय.. तू अगर ऐसा ही फिल्मोंमे गाया तो कमाल कर देगा...
काही उरलेलंच नाहीये
काही उरलेलंच नाहीये त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं.>>> अगदी, लिहून लिहून आम्ही कंटाळलो पण ते बधत नाहीत अज्जिबात
ह्म्म्म्म्म... मी इंडीयन
ह्म्म्म्म्म... मी इंडीयन आयडॉलचा पहिला सिजन भाग १ला पासुन भाग शेवटचा पर्यंत न चुकता पाहिलेला. ते दिवस येतील का परत आता?????????/
ते दिवस येतील का परत
ते दिवस येतील का परत आता????????
>>
दिवसांचं माहिती नाही...
प्राजक्ता शुक्रे आणि अभिजीत सावंत अँकर्स म्हणून परत येताहेत...
>>>ह्या वेळेस सक्सेनाच
>>>ह्या वेळेस सक्सेनाच येणार... त्याच्या साठीच तर ठेवलीये ही ह्या वेळची स्पर्धा....<<< असं असेल तर चालेल बघू आम्ही मनापासून
मेगा फायनलला गज्जला, राहूल
मेगा फायनलला गज्जला, राहूल सक्सेना आणि ज्ञानेश्वर मेश्राम..
आणि विजेता ज्ञानेश्वर मेश्राम...
मी मागे पण लिहिलं होतं.. राहूल सक्सेना फक्त अबाव्ह अॅव्हरेज आहे.. फार काही ग्रेट वगैरे नाहिये.. सलिल आणि अवधूत ने उगीच जास्त डोक्यावर चढवां होतं त्याला.. गज्जलाचं पण तेच... भयंकर मंद चेहेर्याने गाते... पाठ करून म्हंटल्यासारखी.. आणि सलिल म्हणे तू गायलेल्या गाण्याचा अर्थ समोरच्याच्या अगदी आत पर्यंत पोचतो...!!!! :| तो तिचा तिला तरी कळतो का काय महित..
आनंदी जोशी मला पण आठवत नाहिये.. सायली ओकने काही काही गाणी मस्त म्हंटली होती माडे पर्वात.. नाट्यसंगीत अनिरुध्द जोशी सारखच ती पण छान गाते.. मंगेश बोरगावकर कमी मतांमूळे दुसरा आला होता म्हणे कोसंबी पर्वात... संहिता डोंबिवलीची आहे म्हणून तिला माझा पाठींबा..
एकदा पल्लवीच्या साडीसाठी
एकदा पल्लवीच्या साडीसाठी जोरदार टाळ्या, एकदा लिपस्टीक साठी , एकदा मिंग्लिशसाठी..
तेव्हा गाणं असेल की नाही ते माहीत नाही..
पूनम, >>>'बेहेनें, सात फेरे'
पूनम, >>>'बेहेनें, सात फेरे' इतादी बघेन>>> ह्या सगळ्या सिरियल केव्हाच बंद झाल्या ग. तुला सारेगम बघावं लागेल म्हणून मलाच काळजी वाटतेय. नवीन सिरीयल सुचवू का?
पल्लवी अनिकेत सराफबद्दल
पल्लवी अनिकेत सराफबद्दल म्हणतेय तरुणींना मोहवून टाकणारा चेहरा
हा अनिकेत सराफ अशोक्-निवेदिता
हा अनिकेत सराफ अशोक्-निवेदिता सराफचा मुलगा का?
Pages