डाउन द ऑलिंपिक्स मेमरी लेन!
बैजिंग ऑलिंपिक्स संपुन दोन आठवडे होत आले... आणी त्या बिझी २ आठवड्यांनंतर सर्व क्रिडाप्रेमींना एक अतिशय व्यवस्थित ऑर्गनाइझ केलेले भव्य दिव्य ऑलिंपिक्स बघण्याचे समाधान मिळाले... या ऑलिंपिक्समधील जे काही ठळक विशेष होते त्याबद्दल मी ऑलिंपिक्स चालु असताना वेळोवेळी लिहिले होतेच... पण इतर बर्याच स्पर्धा.. ज्या एन बी सी च्या प्राइम टाइमच्या टाइमटेबलमधे बसल्या नव्हत्या... त्याबद्दलही दोन शब्द लिहावेसे वाटले म्हणुन हे पोस्ट!
मी माझ्या वरच्या पोस्टमधे सॉकर व बास्केटबॉलमधे जे भाकीत केले होते ते खरेच ठरले.. पुरुषांमधे लायनल मेसीच्या अर्जेंटिनिअन संघाने नायजेरियाला फायनलमधे हरवुन सुवर्णपदक मिळवले... खर म्हणजे फायनल अगदीच बोअरींग झाली.. त्यापेक्षा मला इटली-बेल्जिअम व अर्जेंटिना-हॉलंड हे उपांत्यपुर्व फेरीचे सामने जास्त आवडले...
महिलांच्या सॉकरमधे अमेरिकेने अनपेक्षितपणे अंतिम फेरी गाठली.. फायनलमधे ब्राझिलविरुद्ध अतिशय टुकार खेळुनही.. केवळ डिफेन्सच्या बळावर.. व ब्राझिलच्या फॉरवर्ड्सनी वाया घालवलेल्या असंख्य संध्यांमुळे.. अमेरिकन महिला सुवर्णपदक जिंकुन गेल्या.. कधी कधी सुवर्णपदक विजेता संघ हा सर्वोत्तम नसु शकतो.. याचे ही अमेरिकन महिलांची टिम हे उत्तम उदाहरण होय!
याउलट पुरुषांच्या व महिलांच्या बास्केटबॉलमधे.. अमेरिकन संघांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले... नाही म्हणायला पुरुषांचा अंतिम सामना.. अनपेक्षितपणे अतिशय अतितटीचा झाला.. स्पेनने अगदी शेवटच्या २ मिनिटांपर्यंत अमेरिकच्या तगड्या संघाला.. बास्केट टु बास्केट... तोडिस तोड जबाब देउन.. अमेरिकन संघाच्या तोंडचे पाणी पळवले होते.. पण शेवटी कोबी ब्रायंट व लब्रॉन जेम्स.. आणि खासकरुन ड्युवेन वेड.. स्पेनच्या संघाला थोडेसे भारी पडले...
हॉकीमधे मात्र.. स्पेनने संभाव्य विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला अतिशय अटितटीच्या उपांत्य फेरीत हरवुन अंतिम फेरीत धडक मारली व सगळ्यांना चकित केले.. हॉलंड्-जर्मनी हा दुसरा उपांत्य सामनाही अतिशय चुरशीचा झाला व त्यात जर्मनीने बाजी मारली.. त्यामुळे अंतिम सामना जर्मनी-ऑस्ट्रेलिया असा... मी भाकीत वर्तवल्याप्रमाणे न होता... जर्मनी-स्पेन असा झाला...अंतिम सामन्यात जर्मनीने स्पेनला १-० असे हरवुन सुवर्णपदक पटकावले.
टेनिसमधे नादालने सुवर्णपदक जिंकुन.. २००८ सालातला सर्वोत्तम टेनिस खेळाडु तोच आहे हे सर्व जगाला दाखवुन दिले... पण त्याच्या सुवर्णपदकाबद्दल मला जितका आनंद झाला तितकेच दु:ख मला फेडररच्या उपांत्य फेरीतल्या पराभवाचे झाले.. जेम्स ब्लेक मस्तच खेळला.. पण फेडररच्या हातुन झालेल्या इतक्या अन्फोर्स्ड एरर्स पाह्ताना.. या वर्षात त्याचा खेळ किती ढेपाळला आहे हे पाहुन खुप वाइट वाटले.. गेली चार वर्षे इन्व्हिंसिबल असणारा तो हाच होता का व त्याला दगा न देणारा त्याचा चाबकासारखा फोरहँड इतक्या वेळा चुकताना बघुन... तो फोरहँड तोच मारत आहे का... असा मला संभ्रम पडत होता.. दुहेरीत सुवर्णपदक मिळवल्यावर.. आनंदाने बेभान होउन आनंदाश्रु ढाळणारा फेडरर... सगळ्या जगाला प्रथमच तसे करताना दिसला...
आणी.. एम एस एन बीसी च्या क्रुपेने मला.. बॅडमिंटनमधला... मी सांगीतल्याप्रमाणे झालेला... चायनाच्या वर्ल्ड नंबर वन...लिन डान व मलेशियाच्या वर्ल्ड नंबर २ ली चाँग वी.. यांच्यातला अंतिम सामना पुर्णपणे बघायला मिळाला.. पण लिन डानने.. अतिशय आक्रमक खेळुन ली चाँग वीचा.. स्ट्रेट सेट्समधे धुव्वा उडवुन अगदीच एकतर्फी सामना करुन टाकला...त्यामुळे माझा खुपच हिरमोड झाला..
शंतनु... तौफिक हिडायत दुसर्याच फेरीत गारद झाला.. व डेन्मार्कचा पिटर गेड.. उपांत्यपुर्व फेरीत.. लिन डानकडून हरला...
आणी या बैजिंग ऑलिंपिक्सबद्दल लिहीताना जर मी फ्लॉलेस...चायनिज डायव्हर्सचा(दोन्ही.. पुरुष व महिलांमधे!) उल्लेख केला नाही तर ते गैर ठरेल... ज्यांनी ज्यांनी बैजिंग वॉटर क्युबमधे या चायनिज डायव्हर्सना स्प्रिंगबोर्ड व प्लॅटफॉर्म डायव्हिंग करताना पाहीले.. त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.... वैयक्तिक व सिंक्रोनाइझ्ड... या दोन्ही प्रकारात... या चायनिज डायव्हर्सनी.... डायव्हिंगमधले पर्फेक्शन कशाला म्हणतात त्याचे प्रात्यक्षिक सगळ्या जगाला दाखवुन दिले... काय ते त्यांचे स्किल.. काय ते त्यांचे प्रसंगावधान.. काय तो त्यांचा पॉइज! हॅट्स ऑफ्!जर तुम्ही ते मिस केले असेल तर... तु नळीवर(तु नळी...) जरुर पहा...
आणी आता थोडेसे एन बी सी प्राइम टाइम कव्हरेजबद्दल.... मायकेल फेल्प्स व स्विमिंग बघताना खुप मजा आली.. पण सगळ्यात वैताग आणला.. बिच व्हॉलिबॉलने.. त्या मिस्टी मे.. टेरि वॉल्शचे रोजचे तास तासभर प्राइम टाइम कव्हरेज बघुन... अक्षरशः विट आला... पण बाकीचे बरेच इव्हेन्ट लाइव्ह नसल्यामुळे बघताना तेवढी मजा आली नाही...
पण हे बैजिंग ऑलिंपिक्स मात्र ३-४ गोष्टींमुळे लोकांच्या लक्षात कायमचे राहील.... आणी त्या म्हणजे....अप्रतिम व भव्य दिव्य कलरफुल असा उदघाटन सोहळा.. मायकेल फेल्प्सचा ८ सुवर्णपदके मिळवण्याचा अद्वितीय पराक्रम... १०० व २०० मिटर्स स्प्रिंटमधे..युसेन बोल्टने दाखवलेल्या आपल्या विद्युत वेगाचे प्रात्यक्षिक व चायनिज डायव्हर्सचे फ्लॉलेस डायव्हिंगचे प्रदर्शन!
आता २०१२ मधे लंडन शहरावर.. बैजिंगसारख्या नेत्रदिपक ऑलिंपिक्सला टॉप करण्याची.. अतिशय अवघड कामगीरी येउन पडली आहे.. पाहुयात ते त्या परिक्षेला कसे उत्तिर्ण होतात ते....
आणी सगळ्यात शेवटी....... या बैजिंग ऑलिंपिक्सच्या निमित्ताने मी जानेवारीमधे हे सदर सुरु केल होते. ते सदर सुरु करुन दिल्याबद्दल नेमस्तकांचे मनापासुन धन्यवाद.. तसेच या सदरात मी लिहिलेल्या..( काही प्रत्य्क्षात अनुभवलेल्या.. काही नुसत्याच टिव्हिवर पाहीलेल्या तर काही बड ग्रिनस्पॅनच्या संचातुन पाहुन लिहीलेल्या...) गोष्टी वाचुन.... त्यांना भरघोस प्रतिसाद दिलेल्या.. मायबोलीच्या सर्व वाचकांचे परक एकदा मनापासुन आभार... तुमच्यापै़की बर्याच जणानी मला या सर्व गोष्टी पुस्तकरुपाने प्रसिद्ध करायला सांगीतले.. त्यातल्या काही जणांनी मला प्रत्यक्ष इ पत्र पाठवुन मदतही करायची इच्छा दर्शवली.. त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार... पण वेळेअभावी बैजिंग ऑलिंपिक्सआधी तसे पुस्तक प्रकाशीत करण्यास जमले नाही.. पण माझ्या गोष्टी आवडलेल्या सर्व वाचकांना हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की २ प्रकाशन कंपनिजनी.. असे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी... मला ऑफर दिलेली आहे... ते पुस्तक प्रकाशन प्रत्यक्षात कधी साकार होइल... याबद्दल मायबोलिच्या सर्व वाचकांना मी जरुर सांगीनच.... पण या सदराच्या निमित्ताने मीसुद्धा तुमच्या बरोबर त्या सर्व गोष्टी परत एकदा जगलो.... हा माझा... डाउन द ऑलिंपिक्स मेमरी लेन..... प्रवास मला स्वतःला जितका आनंद देउन गेला.... तितकाच आनंद तुम्हा सगळ्यांनाही देउन गेला असेल अशी आशा करतो........
>>> २
>>> २ प्रकाशन कंपनिजनी.. असे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी... मला ऑफर दिलेली आहे...
खूप खूप अभिनंदन!! ये हुई ना बात!!
नाव सांग आम्हांला या पुस्तकाचे एकदा सगळे ठरले की!! घेणार तुझे हे पुस्तक!! त्यावर तुझी स्वाक्षरी मिळेल की नाही??
>>>>>पण
>>>>>पण सगळ्यात वैताग आणला.. बिच व्हॉलिबॉलने.. त्या मिस्टी मे.. टेरि वॉल्शचे रोजचे तास तासभर प्राइम टाइम कव्हरेज बघुन... अक्षरशः विट आला...
अगदी सहमत. वैताग यायचा त्यांच्या बीच वॉलीबॉलचा. पूर्ण प्राईमटाईम अडवायच्या त्या दोघी. मला त्यावेळेत जास्तीतजास्त 'sync diving/gymनastics'बघायचं असायचं. जे दाखवायचे ते मला अपुरंच वाटायचं. पण असो, एकंदरीत खूप मजा आली ऑलिंपिक बघताना.
मुकुंद याव
मुकुंद
यावेळी तुमच्यामुळे मी ऑलिंपिक्स डोळसपणे बघीतले. तुमच्या लेखमालेमुळे बर्याच गोष्टी कळल्या. या आधी पण ऑलिंपिक्स बघीतले होते पण तेवढे समजुन उमजुन नाही. यावेळी मात्र तसे बघता आले. त्याबद्दल तुमचे मनापासुन आभार आणि अभिनंदन नविन पुस्तक लिहीण्याचे मनावर घेतल्याबद्दल.
मनापासून
मनापासून अभिनंदन मुकुंद !!
खरंच बैजिंग ऑलिंपिक्स आणि ऑलिंपिक्स इतिहास, खूप छान पोहोचलवंत तुम्ही सगळं मायबोलीकरापर्यंत.
तुमची मेहनत पुस्तकरुपाने नक्कीच पुन्हा एकदा सार्थकी लागेल. त्यासाठी अनेक शुभेच्छा.
२ प्रकाशन
२ प्रकाशन कंपनिजनी.. असे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी... मला ऑफर दिलेली आहे... >>>
वाह अभिनंदन.. ! नक्की सांगा पुस्तक आलं की.. संग्रही ठेवण्यजोगं पुस्तक असेल ते..
अभिनंदन
अभिनंदन मुकुंद आता लवकर पुस्तक पण येउ द्या.
पुस्तक पारायणामधे मग लिहायला आम्ही मो़कळे
मुकुंद तुम
मुकुंद
तुम्ही फार छान लिहिता. अभ्यासपूर्ण.
आता नवीन पुस्तक आले की सांगा.
अभिनंदन!!!