बाप्पा मोरया.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 September, 2008 - 06:50

वाजत गाजत काल बाप्पा आले
येउन ऐटीत मखरात बसले

आईने त्यांच्यापुढे लाडू ठेवले
म्हणाले नाहीत कशाला एवढे ?

वगळुन मला त्यांचेच कौतुक झाले
त्यांच्यासाठी जागुन सार्‍यांचे डोळे लाल झाले

सकाळी पण बप्पासाठी वेगवेगळा खाऊ
विचारतो मला कि मी आता जाऊ

एवढ्यात मारली बाप्पाने हाक
म्हणाला तु सगळी खीर खाऊन टाक

खीर फस्त करून मी गाढ झोपलो
संध्याकाळी सगळ्यांच्या गड्बडीने उठलो

पाहतो तर बाप्पा होते दारात
मागे वळुन मला टाटा करतात

आता सगळ घर होईल सुन्न
नका जाऊ बाप्पा मला करुन खिन्न

तेवढ्यात बाप्पाने गुपित सांगितले कानात
पुढ्च्या वर्षी आणेन चॉकलेट तुला डब्यात

स्वारी माझी एकदम खुष झाली
सगळ्यांच्या सोबत मोठ्याने गरजली
गणपती बाप्पा मोरया
पुढ्च्या वर्षी लवकर या.

गुलमोहर: 

छान,गणपती बाप्पा अगदी प्रसन्न झालाय जगु.. आता थांबु नकोस.. लिहित रहा.. तुझ्या "विज" कथेची लिन्क दे की वाचायला..

जगु तुला बालकवितेच्या फार सुंदर कल्पना सुचतात.

वा जगु, मस्त बॅटींग सुरु केलियस....

अरे ही वाचलीच नाही... बोले तो झक्कास आहे...