Submitted by कौतुक शिरोडकर on 6 April, 2010 - 00:12
बोलशी खोटे जरी तू
क्षण दिलाश्याचा तरी तू
वेदना गोंजारली मी
"मागलीपेक्षा बरी तू"
धीर हा दु:खास जात्या
सल बनून मित्रा उरी तू
यातना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू
भाग्य भाळी, रेघ हाती
ते खरे का ही खरी तू ?
चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू
जी क्षणी बदलेल जग हे
बोल गझले, ती परी तू
तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू
गुलमोहर:
शेअर करा
ही गझल बहुदा दोनेक
ही गझल बहुदा दोनेक वर्षांपुर्वी तुमच्या आवाजात ऐकल्याचे स्मरते....
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
व्वा!!!
मला सरी , बासरी, मक्ता.....हे
मला सरी , बासरी, मक्ता.....हे शेर आवडले
वेदना, छत, मरणा छानेत. मन अरी
वेदना, छत, मरणा छानेत. मन अरी पण वोके. (बाकी सपाट! मी 'कुणाच्याही' 'चुका' दाखवत फिरत नै, लोकांचे तरीपण पाय ओढले जाऊन दुखतात म्हणे :P, ते पण कितीतरी काळ दुखतच राहतात म्हणजे काय म्हणावं! बरं, सुधारीत आवृत्ती अपेक्षित. छोटा बहर घेतलास आता मेहनत लागेलच :))
छान गझल... भाग्य भाळी, रेघ
छान गझल...
भाग्य भाळी, रेघ हाती
ते खरे का ही खरी तू ?
खूप आवडला.. एकदम मार्मिक आहे..
नचिकेत, सॉल्लिड मेमरी.
नचिकेत, सॉल्लिड मेमरी. चिन्नू, माझ्या चुका दाखवणे थांबवले तर मग दुखणं वाढेल. आवृत्ती सुधारेन. पुन्हा एकदा गझलेच्या नादास लागेन म्हणतो. वैभव सर, कार्यशाळा केव्हा घेताय ?
छान आहे. कौतुका तुम्ही नादाला
छान आहे. कौतुका तुम्ही नादाला लागा आणि मग आम्हाला नादवा. लव्करच.
कौतुका ,छोट्या बहराची गझल लै
कौतुका ,छोट्या बहराची गझल लै झाक .आवडली .
कौतुक.... सरी शेर मस्त.. त्या
कौतुक.... सरी शेर मस्त.. त्या शेर मुळेच ही ऐकल्याचे आठवत आहे.. कोजागिरी च्या कार्यक्रमाला ...
जीवना शरपंजरी तू >>> हा सुटा मिसरा पण आवडला
मस्त गझल, मक्ता विशेष आवडला !
मस्त गझल, मक्ता विशेष आवडला !
छोटेखानी वृत्तातली छान गझल.
छोटेखानी वृत्तातली छान गझल.
तू न राधा, तू न मीरा हो हरीची
तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
आवडले.
(No subject)
मस्त. आवडली गझल.
मस्त.
आवडली गझल.
छत न मी शाकारलेले थांब ना,
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू>>>व्वा..मस्त!!
छान गझल!
खूप आवडली गझल!! एक से बढकर एक
खूप आवडली गझल!!
एक से बढकर एक शेर!!
मस्त गझल..
मस्त गझल..:)
यातना, चिंता हजारो जीवना
यातना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू
व्वा........
भाग्य भाळी, रेघ हाती ते खरे
भाग्य भाळी, रेघ हाती
ते खरे का ही खरी तू ?
चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू------------ क्या बात है..!
कौतुक, --करावे अशी गझल.
कौतुक,
--करावे अशी गझल. शेवटचे २ शेर स्मरणीय.
जयन्ता५२
सगळेच शेर खूप आवडले... तुझं
सगळेच शेर खूप आवडले...
तुझं बरंच लिखाण वाचायचं राहून गेलंय हे लक्षात यायला लागलंय..
बघ नको, रस्त्यात भेटू ये सरळ
बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू >>>>> मला आवडला हा.
तुझं बरंच लिखाण वाचायचं राहून गेलंय हे लक्षात यायला लागलंय..>>> अगदी अगदी दक्षे!
खूपच छान आहे.. मस्त.. कौतुक
खूपच छान आहे..
मस्त..
कौतुक शिरोडकारांची क्षमा मागून या गझलेचे विडंबन करायचा एक प्रयत्न..
http://www.maayboli.com/node/21744