Submitted by बस्के on 30 March, 2010 - 00:26
इथे अमेरिकेत पेड इंडीयन चॅनल्सचे पॅकेज कोणते चांगले आहे? मी वॉचइंडीया.टीव्ही चे पाहीले.. डिश वगैरेवर मराठी चॅनल्स नसतात ना?
अजुन काही ऑप्शन्स असतील तर पाहावे म्हणून इथे विचारते आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिश, कॉमकास्ट, डायरेक्टीव्ही
डिश, कॉमकास्ट, डायरेक्टीव्ही प्रत्येकाची वेगळी आहेत. तुझ्याकडे डिश आहे का? सॅटेलाईट वर त्यातल्या त्यात जास्त ऑप्शन्स आहेत बहुधा.
मराठी पण असतात का
मराठी पण असतात का त्यात?
माझ्याकडे नाहीये डिश. (जेवणाची आहे.. :फिदी:)
ऑनलाईन पेड चॅनल्स अजुन काय आहेत पाहात होते, नाहीच दिसत आहे..
तू बे एरीआ मधे आहेस
तू बे एरीआ मधे आहेस का?
झी-सोनी-स्टार प्लस, टी व्ही एशिया ही चॅनल्स डिश न घेता कॉमकास्ट मधे घेता येतात.
पाहिल् चेनल १२ $ , २ किंवा ३ घेतली तर काही तरी पॅकेज पण असतं, पॅकेज चार्जेस विसरले अता.
मराठी नाही अजून कोठेच.
मराठी नाही अजून कोठेच.
बेच नाही कुठल्याही एरियात
बेच नाही कुठल्याही एरियात कॉमकास्ट वर देशी दिसतात आता.
मराठीसाठी वॉचइंडिया.
वॉचइंडियावर स्टार प्रवाह नाही
वॉचइंडियावर स्टार प्रवाह नाही दिसत मात्र![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अमेरिकेत केबल आहे नि अनेक
अमेरिकेत केबल आहे नि अनेक वाहिन्या (ज्याला तुम्ही मराठीत चॅनेल्स म्हणता) आहेत. ते पाहून घ्यावेत. समजायला फारसे कठीण नसतात.
भारतीय (म्हणजे ज्याला तुम्ही 'इन्डियन' म्हणत आहात) ते भारतात गेल्यावर पहावे.
नाहीतर इथे येण्यापेक्षा भारतातच रहावे. तिथे पगार भरपूर मिळतो, नोकर असतात. फक्त सुट्टी साठी दोन तीन आठवडे यावे इथे. तोपर्यंत तिथले कार्यक्रम कुणाला तरी नोंदून ठेवायला सांगावे. म्हणजे परत गेल्यावर बघता येतील.
असे आपले मला वाटते.
(No subject)
आमच्याकडे Dish चे हिंदी
आमच्याकडे Dish चे हिंदी Mega-Package आहे. त्या मध्ये सतरा (१७) हिंदी chanels दिसतात.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Dish कडे गुजराथी , कन्नड, बंगाली, पंजाबी, तेलगु, तमिळ packages आहेत पण मराठी nahiye
मी त्यांना email वरून / फोन करून request केली आहे कि मराठी पण सुरु करा म्हणून.
त्यांचा reply आला कि आम्ही तुमची request आमच्या programming departemnt ला forward केली आहे म्हणून.
इकडे आहे हिंदी mega-package ची माहिती.
http://www.dishnetwork.com/international/Hindi/default.aspx?lang=Hindi
थँक्स सर्वांना! वॉचइंडीयाच
थँक्स सर्वांना!
वॉचइंडीयाच बरे वाटतेय. त्यांचा सेट टॉप बॉक्स पण निघालाय, टीव्हीसाठी. तेच घेऊ..
बस्के, वॉच इंडिया घेतलस कि
बस्के,
वॉच इंडिया घेतलस कि सांग मला फिडबॅक दे क्वलिटी बद्दल, मी पण अॅड करीन तुझा फिडबॅक ठरवून.:)
बस्के, आम्ही घेतलाय वॉच
बस्के, आम्ही घेतलाय वॉच इंडियाचा सेट-टॉप बॉक्स.क्वॉलिटी चांगली आहे.सेट-टॉप बॉक्सची किंमत,१ वर्षासाठी ५चॅनेल्स धरुन $१४३.९९ पडले सुरु करताना.सध्या झी मराठी,झी टिव्ही,इ मराठी,झी स्पोर्ट्स,झी सिनेमा हे चॅनेल्स घेतले आहेत...पण सध्यातरी सगळे दिसत आहेत
शूSSSS कोणी सांगू नका ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मला सेट टॉप बॉक्सची किंमत कळत
मला सेट टॉप बॉक्सची किंमत कळत नाहीए तिथे. कुणाला माहीत आहे का?
आम्ही घेतलय वॉचइंडीया. मला
आम्ही घेतलय वॉचइंडीया. मला तरी २ वर्ष चांगला अनुभव आहे. त्यातून आता त्यांनी व्हीडीओ ऑन डिमांड सुरू केल्याने बरं पडतं. वेळेचं बंधन नाही. आम्हाला गेल्या वर्षी डील मध्ये सगळे चॅनल्स $१९.९९ प्रति महिना असे पॅकेज मिळालं. सोनी सोडून. डिश पेक्षा खूपच स्वस्त आणि शिवाय कॉन्ट्रॅक्ट ची भानगड नाही.
स्वाती, सेट टॉप बॉक्सची किंमत
स्वाती, सेट टॉप बॉक्सची किंमत १५०$ आहे.५०$ चे रिबेट मिळते..
हेहे पूर्वा ! जबरी!!
सावनी - हो तेच महत्वाचे आहे, स्वस्त व मस्त..
डीजे नक्की सांगते..
वॉच इंडियाचा सेट टॉप बॉक्स
वॉच इंडियाचा सेट टॉप बॉक्स म्हणजे व्हेरेव्हर टिव्ही रिसिव्हर आहे.बाहेर त्याची किंमत $२०० आहे.तुमच्यापैकी कोणाकडे जर असा रेसिव्हर असेल तर फक्त वॉच इंडियाची सबस्क्रिप्शन घेऊन चॅनेल्स टिव्हीवर बघता येतील असं मला वाटतं.