स्वप्नातली रात्र

Submitted by अर्चना दंडे on 18 March, 2010 - 11:57

चिवचिव चिमणी, सर्वांची लाडकी
येते म्हणते घरात, उघडना खिडकी !

कावकाव कावळा, ओरडतो दारी
पाहुणे येतील म्हणतो आज तुमच्या घरी !

विठु विठु पोपट वाजवतो शिट्टी
दे म्हणतो पेरु नाही तर कट्टी !

काळी काळी कोकिळा, म्हणते कुहु कुहु
कावळ्याचं घर कुठे, कुठे मी राहु ?

बांधते सुन्दर घरटे, तिला म्हणती सुगरण पक्षी,
घर लटकते फांदिला, देव बाप्पा त्याला रक्षी !

गुट् र्र गुम गुट् र्र गुम कबुतराची जोडी
घर करायला हवी त्यांना अडगळीची जागा थोडी !

थुई थुई नाचे मोर फुलवतो पीसारा
घर म्हणजे त्याचे तर जंगलचा परिसर सारा !

सगळे सगळे पक्षी असे आहेत माझे मित्र
स्वप्नात येतात सारे मग पटकन संपते रात्र!

गुलमोहर: 

छान Happy

छान..!!

<< सगळे सगळे पक्षी असे आहेत माझे मित्र
स्वप्नात येतात सारे मग पटकन संपते रात्र!>>

कित्ती छान! Happy

गोड Happy