थेंब

Submitted by देवनिनाद on 18 March, 2010 - 04:05

पानाची करून
घसरगुंडी
थेंबाने छान
मारली मुंसंडी

घसरत घसरत
थेंब खाली पडला
सदाफुलीला जाऊन
हलकेच बिलगला

सरकत सरकत
मातीवर पडत
थेंब तो झाला
एकदम गडप

थेंबाची पाहून गंमत सारी
थेंब दुसरा जागीच थबकला
सरकू लागता पानावरून
मनोमनी तो हबकला

- देवनिनाद

गुलमोहर: 

छान मांडलत.
पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच प्रयत्नाची माती
झाली की मग माणसाचेही असेच होते.