गोरापान चांदोमामा (बालकविता)

Submitted by सत्यजित on 16 March, 2008 - 10:21

का गं आई चांदोमामा
असतो गोरा गोरापान
शुभ्र ढगांच्या फेसात तो
आंघोळ करतो छान

उंच उंच ढगात
त्याचा बाथटब असतो
दिवसभर शुभ्र फेसात
आंघोळ करत बसतो

त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात

पाऊस पडुन गेला की
कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं
मग चांदण पण पावडर लावुन
छान छान नटतं.

-सत्यजित

गुलमोहर: 

काय सध्या बालगीतांचा जोर आहे एकदम Happy
झक्कास हीपण

>>त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात

पाऊस पडुन गेला की
कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं
मग चांदण पण पावडर लावुन
छान छान नटतं.

एकदम गोड! Happy

खरच्..पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले...
खूप निरागस लिहिलय...
Happy

चांगलंच आहे हे पण. पण प्रयत्नपूर्वक शब्दांचं आणि उपमांच्म रिपिटेशन टाळावं. अजून खुलेल काव्य.

Happy