ग्रंथाली वाचक चळवळीच्या उपक्रमांची माहिती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सप्रेम नमस्कार
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे.
या स्पर्धीची प्रश्नावली सोबत पाठवत आहे.
आपल्याला आवडेल, मजा येईल.
त्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
आपण ही प्रश्नावली स्वत: सोडवावी.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इतरांना प्रवृत्त करावे.
जास्तीत जास्त मित्र मंडळींपर्यंत ती पोचवावी.
आपल्या ओळखीच्या प्रसार माध्यमातून तिचा प्रसार होईल असा प्रयत्न करावा.
प्रश्नावली सोडविण्याचा उत्तम प्रयत्न करणा-यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन पाळण्यासाठी आर्थक मदत करावी अथवा उपलब्ध करून द्यावी
शक्य असल्यास आपल्या अन्य भाषिक मित्रांना त्या त्या प्रादेशिक भाषेत भाषांतर करून प्रसार करायला सांगता येईल.
मी आपल्याकडे बरेच सहकार्य मागितले आहे. तुम्ही कराल ते ते सहकार्य वैज्ञानिकतेच्या संवर्धनासाठी मोलाचेच असणार आहे.

विनय र. र.
कार्यावाह, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग

सर्वांसाठी खुली .
विज्ञान रंजन स्पर्धा २०१०

नियमावली
१.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
२.प्रवेशमूल्य नाही.
३.खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मानाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील
४.जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०१० पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक सरक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०.

५.उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे.
६.२८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी विजेत्यांची नावे जाहीर केली जातील
७.शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०).
वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६)

8. आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी- १. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण.
9. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा. कार्यवाह, म. वि. प., पुणे - विनय र. र., ९४२२०४८९६७, ई-मेल mavipa.pune@gmail.com

प्रश्नावली
प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १०)
पोस्टाच्या ५ रु. किमतीच्या पाकिटाची लांबी रुंदी किती असते?
खेळाच्या पत्त्यांमधील कोणत्या राजाच्या हातात शस्त्र नसते?
२००९ मध्ये किती पौर्णिमा होत्या? २०१० मध्ये किती पौर्णिमा आहेत?
मोराच्या नेमक्या कोणत्या भागाचा रंग मोरपंखी असतो?
उंबराची फळे उंबराच्या वृक्षाच्या नेमक्या कोणत्या भागावर येतात?
घड्याळात मिनिट काटा सहावर असताना किती वाजता त्याचा तास काट्याशी होणारा कोन १३५ अंशापेक्षा जास्त असतो?
सायकलची उंची आणि पाया यांचे गुणोत्तर लिहा. (कंपनीचे नाव आणि मोडेलचे नाव लिहा)
घरात एका बशीत सकाळी ८ वाजता ८ चमचे पाणी ठेवले तर रात्री ८ वाजता त्यातले शिल्लक राहिलेले पाणी किती?
विकस व्हेपोरब या मलमात कोणती औषधी द्रव्ये आहेत?
तुमच्या डाव्या हाताच्या फक्त मधल्या बोटाचे टोक तळहातावर टेकले असता इतर बोटे कोणत्या स्थितीत असतात त्याची समोरून आणि बाजूने दिसणारी आकृती काढा.

प्र. २ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण १०)
उजेडात आहे पण अंधारात नाही, असे काय?
भारतात १४ जानेवारीच्या आसपास कोणकोणते सण असतात?
हवामान शास्त्रज्ञांना हवेतील कोणते पाच घटक महत्वाचे वाटतात?
पृथ्वीवर पृथ्वीच्या मध्यापासून सर्वात लांब असणा-या ठिकाणाचे नाव काय?
कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ल्यावर साखर गोड लागत नाही?
गेल्या २० वर्षात कोणत्या वाळवंटाचे क्षेत्र कमी झाले आहे?
मातीच्या वरच्या थरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा अधातू कोणता?
दुस-या वनस्पतीवर वाढणा-या वनस्पतीला काय म्हणतात?
मांज-या दगडाचा रंग कोणता असतो?
आपल्या आहारात नियमित असणारा पण येथे न पिकणारा पदार्थ कोणता?

प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १०)
गुलाबाच्या झाडाला कधीच फळ धरत नाही.
मासा या प्राण्याची विष पचविण्याची क्षमता माणसाच्या क्षमतेच्या कैकपट असते.
एक किडा नाकावर बसून नाक तोडतो म्हणून त्याला नाकतोडा म्हणतात.
पाणी १००% शुद्ध राहू शकत नाही.
सेटेलाईट टिव्हीची अन्टेना उत्तर ध्रुवाकडे रोखलेली असते.
वादळ येण्यापूर्वी पाणी उकळायला वेळ कमी लागतो.
उसाला सर्वात जास्त पाणी लागते म्हणून ऊस अधिक पावसाच्या प्रदेशात उगवतो.
सजीवाच्या शरीरात किरणोत्सारी पदार्थ असतातच.
भागाकार म्हणजे तितक्यांदा केलेली बेरीज.
बुडबुडा पाण्यातून वर येताना मोठा मोठा होतो.

प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)
हलवा काटेरी असतो.
छापील कागदात घेऊन तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
ई-मेल पत्त्यामध्ये @ हे चिन्ह असतेच.
शस्त्रक्रिया करताना डॉक्टर नाकातोंडावर कापडी मुखवटा लावतात.
हिंदू पंचांगात कधी कधी वर्षात १३ महिने येतात.
आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यावर ते गोड लागते.
कंकणाकृती सूर्यग्रहण फारच कमी वेळा दिसते.
माणसाचे हात चालताना खाली तर पळताना वर असतात.
बोटे मोडताना कड कड आवाज येतो.
हत्ती आपले कान सतत हलवत असतो.

प्र. ५ सविस्तर उत्तरे लिहा (गुण १५)
धिरडे, घावन, आंबोळी, डोसा, उत्तप्पा यात फरक काय?
थंडीमुळे अगर भीतीमुळे - अंगावर काटा येतो, म्हणजे नेमके काय होते? त्यामुळे शरीराला कोणता फायदा होतो?
एच१एन१ असे नाव असणा-या जीवाणूच्या नावातील एच आणि एन चे स्पष्टीकरण करा.
जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाणांवर कोणकोणते आक्षेप घेतले जातात?
पेन ड्रIईव्ह मध्ये इलेक्ट्रोनिक माहिती कशी साठवली जाते?

प्र. ६ करून पहा उत्तर लिहा (गुण २०)
"माणसाला बत्तीस दात असतात" या वाक्याचा पडताळा किमान १० व्यक्तींचे दात मोजून घ्या. अपवाद आढळल्यास त्याचे कारण नोंदवा.
अखंड सुतळीच्या सहाय्याने अ, औ, ख, छ, ज, ध, न, ढ र, क्ष ही मुळाक्षरे ५ सें. मी. उंचीची होतील अशी वळणदारपणे काढा. प्रत्येक अक्षरास किती लांबीची सुतळी लागली ते लिहा.

प्र. ७ स्पष्टीकरणासह सोडवा (गुण १५)
माझ्याकडे काही पेढे आहेत. दहा जणांना सारखे वाटले तर दोन उरतात, पंधरा जणांना सारखे वाटले तरी दोन उरतात, वीस जणांना सारखे वाटले तरी दोनच उरतात, पाच जणांना सारखे वाटले तर किती उरतील?
एका टेकडीवरून एकाने सूर्योदयाचा देखावा बघितला. त्या वेळी त्याला समोरच्या डोंगरामागे बरोब्बर अर्धे सूर्यबिंब दिसले. टेकडीच्या पायाथ्याशी असलेल्याने ७० सेकंदानंतर सूर्योदय बघितला तेव्हा त्यालाही समोरच्या डोंगरामागे अर्धेच सूर्यबिंब दिसले. तर टेकडीची उंची किती?
आठवड्यातल्या कोणत्या तरी तीन वारांची नावे एका गुप्त लिपीत - फ:किही, कुयै, पूदि - अशी लिहिली जातात. त्यातील संकेत शोधा. तोच संकेत वापरून सर्व वारांची नावे क्रमाने लिहा. ( रवि, सोम इ.)

प्र. ८ वैज्ञानिक कथा लिहा (गुण २०)
कल्पना करा की चंद्रावर माणसासारखे सजीव - "चांदेरे" - खोल द-यांमध्ये राहतात.
ते कालगणना करतात, आकाश निरीक्षण करतात, त्यांच्या आकाशातली सर्वात मोठी चांदणी म्हणजे पृथ्वी.
या "चांदेरे" लोकांमध्ये पृथ्वीला अनुसरून कोणत्या कथा, समजुती, कल्पना असतील? या बाबत प्रत्येकी ३०० शब्दांपर्यंत तीन छोट्या छोट्या गोष्टी लिहा.

Vidnyan Ranjan Spardha 2010 on net. You can see, copy, print, forward the questioneer of Vidnyan Ranjan Spardha 2010, organized by Marathi Vidnyan Parishad, PuneVibhag.
http://www.mavipamumbai.org/PDF/Vidnyan_Ranjan_Spardha.pdf
http://marathividnyanparishadpunevibhag.blogspot.com/

प्रकार: 

Book Release Function Sat.30th Jan 6pm at Mah.Phule Kanya Shala Dadar.

"SonyachyaDhuracheThasake"

by Dr Ujjwala Rege Dalvi

Guests :
Dr Snehalata Deshmukh, Dr V.N. Shrikhande and Dr Meena Prabhu.

All are co-ordially welcome.

Indradhanu invites you for talkshow titled "Katha Harishchandrachya Factoryichi".

Partcipants : Team of famous film Harishandrachi Factory.-- writer and director Paresh Mokashi, artists Nandu madhav, Vibhavari Deshpande
Date : Sunday, 21st Feb. 2010 at 6.30 pm.
Venue : Saraswati Secondary school, Naupada, Thane

Thanks and regards,
Indradhanu

http://www.loksatta.com./index.php?option=com_content&view=article&id=51...

महाराष्ट्राचे e-पर्व
www.thinkmaharashtra.com
www.marathisrushti.com
http://maharashtra.gov.in
मुंबई, १ मार्च/ प्रतिनिधी
मराठी अभिमान गीताच्या वैश्विक सादरीकरणानंतर आता महाराष्ट्राचे ‘e- पर्व सुरू होत आहे. मराठी माणसाचे सामथ्र्य स्थळ व्यक्त करण्यासाठी अनेक संस्थानी सध्याचा टेकसॅव्ही पर्याय निवडला आहे. या माध्यमातून मराठी समाजाचं दर्शन ‘ग्लोबलाइज्ड’ करण्याचा प्रयत्न मोठय़ाप्रमाणावर होऊ लागला आहे. आजच्या युगात जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी असलेल्या ‘e -’ अर्थात इंटरनेट माध्यमाचा पर्याय मराठी मंडळींनीही स्वीकारला आहे. गेल्या शतकाच्या अखेरीस अनेक खाजगी व्यक्तींनी आणि सांस्कृतिक संस्थानी मराठी वेबसाइट सुरू केल्या होत्या. परंतु त्या साइटस् काही विषयापुरत्याच मर्यादित होत्या. त्याचे स्वरुपही आता बदलू लागले आहे. या माध्यमाची अधिक उपयुक्ततता आणि मराठीत वेबसाइट तयार करण्यासाठीची उपलब्ध झालेली सुलभ साधनं यामुळे या पर्यायाचा अधिक वापर होऊ लागला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला ‘www.thinkmaharashtra.com’ या वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. महराष्ट्रीय समाजातील चांगुलपणा आणि गुणवत्ता यांचे नेटवर्किंग व्हावे तसेच विविध कतृत्त्ववान व्यक्तींची सर्वसामान्यांना ओळख व्हावी या उद्देशाने ही वेबसाइट लॉन्च करण्यात येत असल्याची माहिती या साइटचे मुख्य संपादक दिनकर गांगल यांनी दिली. या वेबसाइटवर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक घडामोडिंचीही नोंद करण्यात येणार असल्याचे गांगल यांनी सांगितले. या साइटचे तांत्रिक नियोजन माधव शिरवळ यांनी केलेले आहे. माधव शिरवळकर यांनी महाराष्ट्रातील पहिले मराठी ‘e-बुक्स’ सादर केलं होतं. या साइटचे उद्घाटन ५ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा येथे पार पडणार आहे. यावेळी ‘ब्लॉग्ज वेब आणि मराठी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात संजीव लाटकर, अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर आणि रामदास (द्वारका बिवलकर) सहभागी होणार असून याचे संचलन माधव शिरवळकर करणार आहेत. या वेबसाइटमध्ये गांगल यांच्याबरोबर आदिनाथ हरवंदे, विदुर महाजन, ज्योती शेटय़े, प्रमोद शेंडे, पद्मा कऱ्हाडे, विश्वनाथ खांदारे, निलिमा कानेटकर यांनीही काम केले आहे.
*‘मराठीसृष्टी’ डॉट कॉम नव्या रुपात
गेली १० वष्रे महाराष्ट्रातील विविध घडामोडींची नोंद ठेवणारी ‘www.marathisrushti.com’ ही वेबसाइट नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. या नव्या रुपात मराठीतील अनेक नामवंत आणि मान्यवर व्यक्तींचा वेध घेणारा आगळावेगळा संदर्भकोष उपलब्ध करण्यात येणार आहे अशी माहिती मराठीसृष्टीचे निनाद प्रधान यांनी दिली. या संदर्भकोषाचे काम गेले सहा महिने सुरू असून साइटवरील हा पर्याय अल्पावधीतच सुरू होणार आहे.
*खुली संकेतस्थळ स्पर्धा
राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्य मराठी विकास संस्थान म्हणजेच सीडॅक मुंबई आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या सहकार्याने शासकीय आणि बिगर शासकीय संकेतस्थळांसाठी खुल्या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटात होणाऱ्या या स्पध्रेत दोनही गटात मिळून प्रत्येकी तीन पारितोषिके घोषित करण्यात येणार आहेत. या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी ‘http://maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावरील ऑनलाइन प्रवेशपत्रिका ६ मार्चपूर्वी भरुन पाठवावी.

विशेष निमंत्रण,
www.thinkmaharashtra.com ह्या मराठी संकेतस्थळाचा शुभारंभ कार्यक्रम...

दिनांक : 5 मार्च 2010, शुक्रवार
वेळ : सायंकाळी 6.00 वाजता
स्थळ : दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, बाँबे ग्लास वर्क्ससमोर,
यशवंत नाट्यगृहाचे शेजारी, माटुंगा, मुंबई.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
विशेष चर्चासत्र

चर्चासत्राचा विषय
ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी

चर्चेतील सहभागी मान्यवर
संजीव लाटकर, अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर
आणि रामदास (द्वारकानाथ बिवलकर

चर्चासत्राचे संचलन
माधव शिरवळकर

अवश्य यावे.

धन्यवाद.

आपले
दिनकर गांगल, आदिनाथ हरवंदे, विदुर महाजन, ज्योती शेट्ये, प्रमोद शेंडे, पद्मा क-हाडे,
विश्वनाथ खांदारे, निलिमा कानेटकर

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=515...

विज्ञान रंजन स्पर्धा २०१० निकाल जाहीर

विज्ञान रंजन स्पर्धा २०१० निकाल जाहीर झाला असून पुण्याच्या आबासाहेब अत्रे प्रशालेतील विद्यार्थी निरंजन गुन्नाल ९७.५% गुण मिळवून सर्वप्रथम आला आहे. दुस-या क्रमांकावर अंबडवेट, कासार आंबोळी येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेतील इरा लिमये असून तिसरा क्रमांक मुंबईतील सानिका खारकर हिने पटकावला आहे. त्यांच्या खालोखाल गुण मृणाल कुलकर्णी (कोंढवा), करण सौंदणे (विरार), पुष्कर डोंगरे ( माहीम, मुंबई) यांना मिळाले.
राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांनी घेतलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून २३ जिल्ह्यातून सुमारे सोळाशे स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातील ७९.५३% स्पर्धकांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले.
शालेय विद्यार्थांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, तंत्रज्ञ, नोकरदार, व्यावसायिक तसेच अनेक जेष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. विशेष गुणवत्ता दाखविलेल्या १३२ स्पर्धकांना शनिवार, १३ मार्च २०१० रोजी संध्या ६:३० वाजता टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे समारंभपूर्वक पारितोषिके दिली जातील, असे परिषदेच्या पुणे विभागाचे कार्यवाह विनय र. र. यांनी सांगितले. विज्ञान रंजन स्पर्धेचे हे १२वे वर्ष आहे. मराठीतून विज्ञानाची वाढ व्हावी, तसेच वैज्ञानिक मनोवृत्ती वाढावी हा या उपक्रमाचा हेतू आहे. स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद प्रेरणादायक वाटतो.
यंदा मराठी बरोबरच अन्य प्रादेशिक भाषांतूनही (हिंदी, गुजराथी) प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात आली होती, त्याचा काही स्पर्धकांनी उपयोग करून घेतला. स्पर्धेतील प्रश्नांची उत्तरे मराठी विज्ञान परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क विनय र. र. ९४२२०४८९६७ ई-मेल mavipa.pune@gmail.com विज्ञान रंजन स्पर्धा २०१०

बक्षीस विजेत्यांची यादी-
१) निरंजन चंद्रकांत गुन्नाल
११२६ नाना पेठ, कैकड गल्ली, पुणे ४११००२ / आबासाहेब अत्रे प्रशाला / ९०९६५६६३६५
२) इरा यशवंत लिमये
राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, अंबडवेट, कासार आंबोली, जि. पुणे. / ९८८९९४९००३ / 10limbu@gmail.com
३) सानिका खारकर
बी-२/१२ सिंधिया सोसायटी, सर एम व्ही रोड, अंधेरी (पू.), मुंबई ४०००६९ / sanikakharkar@gmail.com
4) मृणाल कुलकर्णी
पिकासो विला, सत्यानंद हॉस्पिटल जवळ, कोंढवा, पुणे ४११०४८ / ९८९०८९८००३ / mrunal1362@rediffmail.com
५) करण सौंदाणे
२ अगस्ती अपा. बी. विंग जीवदाणी रोड, गणेश मंदिराजवळ, विरार (पूर्व) जि. ठाणे ९८६०९६८४९१
६) पुष्कर डोंगरे
अ-३० कर्नाटक सोसायटी, मोगल लेन, माहीम, मुंबई ४०००१६ / ०२२२४३२३३७० / dongrepushkar@gmail.com
७) स्नेहल पांडुरंग गोसावी
सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९६५७६३३४०६
८) अमला कुंदन राउत
मांगल्य हॉटेल, हिल झील जवळ, बोरीगाव, पो. बोर्डी, ता. डहाणू, जि, ठाणे ४०१७०१ / ९३७२६८३२६६
९) अक्षय महादेवजी चान्देवार
'त्रिमूर्ती; सूर्यकेतू नगर, रावत रोड, भंडारा / ९९७५४५१२८७
१०) सरस्वती सुदाम शेळके
रिब मिल रोड, RB- IV/ MS-1 -578 कवा. नं. १, पुणे ४११००९ / ९८६७९१०५०३
११) कोल्हे स्नेहल तानाजी
सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९८८१०६७२८७
१२) वाघेला मानसी
आबासाहेब पवार नगर, सांगवी, पुणे ४११०२७ / ९८५०९५९६२०
१३) कुशन विठ्ठल देशपान्डे
स्वामी सह. गृह. संस्था, मोहन नगर, धनकवडी, पुणे ४११०४३ / ८१४९१२४८३१
१४) राजूल संजय भटेवरा
श्री ओम सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४ / ९२७०७९३७०७
१५) सुधीर कल्याणराव देशपान्डे
३२.२ ब एरंडवन, "रसिक" श्रम साफल्य सोसायटी, पुणे ४११००४
१६) गौतम दादू धनवडे
मु. अंबाडी पो. दिघाशी ता. भिवंडी जि. ठाणे. ४२१३०२ / ९०४९५४१८९७
१७) सुतार जयश्री आनंदा
नर्हे, वडगाव-धायरी, कन्हैयालाल कंपनी समोर, सिंहगड रोड, पुणे ४११०४१ / ९८२२४०२६१७
१८) सुमेधा मेघ:श्याम कोल्हे
सुंदराबाई राठी विद्यालय, खराडी, पुणे ४१११०१४ / ९८५०८९२५६४
१९) निरंजन पाळेकर
आनंद घन, रविनगर, बोकार रोड, उंबरी, जि. नांदेड / ९४२१८४३१९० /
nnpalekar@gmail.com
२०) सुचेता पोतदार
c -३१ दादलानी पार्क, बाळकुंभ, ठाणे (प) ४००६०८ / ९८६९२७१००७
२१) पूजा भंडारी
४९८ सोमवार पेठ, दारूवाला पूल, पुणे ४११०११ / ९३७०९५०९५५
२२) उत्कर्षा एखंडे
स. नं. ४७ गणेशनगर वडगाव शेरी, पुणे ४११०१४
२३) सायली अगवणे
४२/२ ओम सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे ४११०१४
२४) राजाराम वाघ
पी ६०३ पिनाक मेमरीज, फेज II कोथरूड, पुणे ४११०३८
या शिवाय विशेष गुणवत्ता धारक: ४२ व्यक्ती आणि प्रथम वर्ग प्राप्त: ६६ व्यक्तींनाही पारितोषिके दिली जातील. सर्व उत्तीर्ण (१२६२) स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.
पारितोषिक वितरण समारंभ -
१३ मार्च, संध्याकाळी ६:३० ला टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे -३० येथे होईल. (अनुपस्थित व्यक्तींना त्यानंतर पोस्टाने पारितोषिके प्रमाण पत्रे पाठविण्यात येतील.)
[विशेष गुणवत्ता धारक: ४२ आणि प्रथम वर्ग प्राप्त: ६६ व्यक्तींची नावे लवकरच इ-मेलने पाठविली जातील.]

--
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030

IBN LokMat Great Bhet with the leading activist Pushpa Bhave on IBN-Lokmat Sat6मार्च@930pm,Sun@12am@12pm@5pm,Mon@12am

IBNLokMat Great Bhet with Dr MohanAgashe @ १५ मार्च, दुपारी १२ वाजता,

Dear Astronomy Enthusiast

Khagol Academy (a Khagol Mandal activity) is organizing A Basic Course in Astronomy in month of May 2010
Details of the syllabus attached in A Basic Course in Astronomy in a pdf file.
Poster of Basic course in astronomy to display at your college/school Notice board attached as JPG file.

Date: Monday, 17 May to Monday, 24 May 2010
Duration of the course: 8 days
Timings: 6 pm to 8 pm
Venue: Sadhana Vidhyalaya
5th Floor, behind bus depot
Sion (E) 400022
Registration Fees: Rs 1000/- for Non Members Rs 800/- for Members
Limited seats so to confirm your registration kindly download the attached registration form enclosed herewith. You could pay by Demand Draft/ Cheque/ or cash (via money order) along with registration form. Send it to the following address.
Address only for postal communication

Khagol Mandal, C\O Mr. Nandakumar Walve, A-9 Guruprasad,Swastik Park,Chembur, Mumbai- 400071
You could visit Khagol Mandal Sion Unit only on Wednesday’s between 6:30 pm to 8:30 pm to fill up the form & pay the cash & get the glimpses of small library consisting more than Five hundred books + & magazines exclusive on astronomy
Unit Address is same as venue address mention above.
--
Happy sky watching !

All are cordially invited to the Book Publication and Exhibition by Sandesh Bhandare.
Monday 3rd May 630pm @Pune Balgandharva

Dr Sudheer Patwardhan
Dr Mohan Agashe
Vasant Abaji Dahake
Parimal Chaudhari

All are cordially invited

Tue.11May.630pm @ Dadar Matunga Cultural Center

Book Release "Lalbaug"
by Adinath Harwande

-
Datta Iswalkar
Ashok hande
Jayant Pawar

*****

थिंक महाराष्ट्र वेबसाईट संदर्भातील माहिती सोबतच्या पीडीएफ मध्ये दिली
आहे.
Granthali_Web.pdf (101.75 KB)

वैज्ञानिक कथा - एक कार्य शाळा
विज्ञान रंजन स्पर्धेत एक प्रश्न होता. वैज्ञानिक कथा लिहा. त्याच्या उत्तरात अनेकांनी चांगल्या कल्पना मांडल्या. २० में ला महाराष्ट्र साहित्य परिषदेत त्यांचे कथा कथन होईल. जरूर या.
त्या आधी एक कार्य शाळा घ्यायचे डोक्यात आहे. चंद्रावर पाणी सापडले, तर समजा काही जीवही असतील - चान्देरे - म्हणू त्यांना. त्यांच्या पृथ्वी बद्दलच्या गोष्टी. चांदे-यांच्या कथा. त्या साठी वैज्ञानिक वास्तव समजुन घेणे, वैज्ञानिक कथेसाठी काय काय हवे ते लक्षात घेणे, भाषा आकर्षक करणे आणि कथा कथनाचे तंत्र समजुन घेणे असे या कार्य शालेचे स्वरुप असेल. त्यात तुम्हाला भाग घ्यायला आवडेल? कृपया संपर्क करा.
विनय र र 9422048967
तारीख 7 मे २०१० सकाळी 10 ते संध्याकाळी 5.
यात विज्ञान कथा कशाला म्हणवे? कथा कशी लिहावी? रंगवावी? रंगवून सांगावी? याबद्दल प्रयोगातून शिकता येईल.
प्रकाश तुपे, कल्पना भालेराव, मिलिंद चंपानेरकर, मीनल सावळे आणि विनय र र आपल्या बरोबर असतील. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला सामील व्हायचे असेल तर आधी जरूर कळवा.
प्रवेश मर्यादित. प्रवेश फी नाही.
--
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=669...

ग्रंथालीची ‘ग्रंथसरिता’!

प्रतिनिधी
मराठी पुस्तकांपर्यंत वाचक येत नसेल तर वाचकांर्पयच पुस्तके नेली तर त्याला चागंला प्रतिसाद मिळतो, असा पुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांचा अनुभव आहे. त्यामुळेच अगदी छोटय़ा गावांपासून ते मोठय़ा शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो आणि पुस्तकांचीही तडाखेबंद विक्री होत असते. मराठी पुस्तके संपत नाहीत किंवा मराठी वाचन संस्कृती धोक्यात आल्याची नुसती ओरड करण्यापेक्षा असे काही वेगळे प्रयत्न केले तर त्याला साहित्यप्रेमी आणि वाचक मनापासून दाद देतात. मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथाली वाचक चळवळीने ‘ग्रंथसरिता’ या फिरत्या पुस्तकविक्री उपक्रमाला सुरुवात केली आहे.
मैत्रेय प्रकाशन, ग्रंथाली आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथसरिता’ संपुर्ण महाराष्ट्र पालथा घालणार आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. फिरत्या पुस्तक विक्रीच्या उपक्रमातून राज्याच्या ग्रामीण भागात विविध विषयांवरील सुमारे पाच हजार पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यात येणार आहेत.
फिरत्या पुस्तकविक्रीच्या या उपक्रमास सुरुवात झाली असून अलिबाग, सावंतवाडी, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर असा पहिल्या टप्प्यातील प्रवास असून हा दौरा येत्या २६ मेपर्यंत सुरु राहणार आहे. पावासळ्यानंतर दुसरा टप्पा सुरु होणार असल्याची माहिती ‘ग्रंथसरिता’ उपक्रमाचे संयोजक अरविंद जोशी, शैलेश वाजा व सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून राज्यपालांनी स्वत: दीड हजार रुपयांचा पुस्तकांची खरेदीही या वेळी केली. ‘ग्रंथाली’तर्फे दिलीप चावरे यांनी राज्यपालांचे स्वागत केले तर लतिका भानुशाली यांनी राज्यपालांना ‘ज्ञानेश्वरी’च्या इंग्रजी अनुवादाची प्रत भेट दिली.

मराठी युनिकोड प्रसार मोहीम

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबसाइटच्या वतीने मराठी युनिकोड प्रसार मोहीम हाती घेण्यात आली आहे. संगणकीय मराठीसाठी युनिकोड तंत्र अधिकाधिक वापरले जावे या उद्देशाने युनिकोडची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग असेल. त्यानुसार पहिले शिबीर २ जून रोजी मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहात दुपारी ४.३० वाजता होणार आहे.

तीन तासांच्या शिबिरात युनिकोड तंत्राचे प्रशिक्षण दृक-श्राव्य माध्यमातून दिले जाईल. 'थिंक महाराष्ट्र...' वेबसाइटवरील लेखनाला वाचकांचा मिळणारा प्रतिसाद आणि कॉमेंट्स मराठीतून असल्या तरी बहुसंख्य मंडळी आजही इंग्रजीतून मराठी लिहितात, असे दिसून आल्याने मराठी युनिकोडची महाराष्ट्रव्यापी प्रसार मोहीम हाती घेण्याची गरज वाटली, असे वेबसाइटचे संपादक दिनकर गांगल यांनी सांगितले.

मुलुंड येथील शिबीर विनामूल्य असून प्रवेशसंख्या ५० एवढी मर्यादित असेल. मराठी अभ्यास केंदाचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून माधव शिरवळकर शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. नाव नोंदणीसाठी संपर्क संतोष शिंदे ९९८७६४२७९९.

Back to top