Submitted by एम.कर्णिक on 4 March, 2010 - 00:41
फुला रे फुला
तुला हातांचा झुला
पंखा नाही तरी पण
वारा बघ आला
वार्याच्या बरोबर
डोल जरासा
आई आणि बाबांशी
बोल जरासा
"अ अ" नि "ब ब"
"ई गि ग्गि गिक्"
रडु नको सारखं
हसायला शिक
आजोबांचं पोट
घोड्याची पाठ
हो स्वार पण तरी
मान ठेव ताठ
हाताची डावली
जर्राशिच मार
चाल्वु नको पायाची
साय्कल फार
बरऽ आता जरासा
हो उपडा
दाखव उचलुन
नागाची फडा
दमला नं आता?
मऽ मांडीवर या
चिडिचुप गिडगुडुप
झोपुन जा
गुलमोहर:
शेअर करा
छानै !!
छानै !!
छान !
छान !
(No subject)
मस्त .
मस्त .
मस्तच!
मस्तच!
छान..!
छान..!
मस्तच
मस्तच
क्युट!
क्युट!
(No subject)
छानच!
छानच!
छानच. आवडली. सध्या घरात
छानच. आवडली. सध्या घरात लहान बाळ आलं आहे का?
सगळ्यांचे आभार. आर्च, हो.
सगळ्यांचे आभार.
आर्च, हो. माझा नातू पार्थ (बंटीबाबा), आज वय २ महिने १८ दिवस.
तुम्ही आता समस्त मा बो करांचे
तुम्ही आता समस्त मा बो करांचे लाडके आजोबा झालात. मस्त कविता.