Submitted by एम.कर्णिक on 1 March, 2010 - 04:59
('बाळांसाठी' आहे म्हणून ही 'बाल'कविता)
कशी येत नाही अजुनी नीज तुला बाळा
गडद रात्र झाली आता तरी पुरे चाळा ॥धृ॥
चिऊ काउ सारे सारे झोपले कधीचे
लावतोस छकुल्या तूही सूर जांभईचे
का रे तरी झोप नाही पांघरीत डोळा ॥१॥
सानुल्या फुला तू आता मीट पाकळ्या या
जरा दे विसावा अपुल्या पंख आणि पाया
आणि पाखरा ये माझ्या बिलगुनी कुशीला ॥२॥
उघड हळुच पापण्याना सकाळी सकाळी
चिमुकल्या मुखाने मजला 'अअ' साद घाली
हसुनि गोडसे बाळा तू पहा एक वेळा ॥३॥
गुलमोहर:
शेअर करा
मस्त! अगदी पर्फेक्ट वर्णन
मस्त! अगदी पर्फेक्ट वर्णन आहे.
<< का रे तरी झोप नाही पांघरीत
<< का रे तरी झोप नाही पांघरीत डोळा >>
अप्रतिम बालकविता..!!
सुरेख आणि सुरेल अंगाई आवडली.
सुरेख आणि सुरेल अंगाई आवडली.
सुरेल अंगाई
सुरेल अंगाई
छान
छान
खुप छान.
खुप छान.
सुंदर !!!
सुंदर !!!
वाह... मस्तच
वाह... मस्तच
खुपच सुंदर !!!
खुपच सुंदर !!!
मस्त !!!!
मस्त !!!!
सुंदर!!
सुंदर!!