ग्रामव्यवस्था...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ. फौजदारी स्वरूपाची कामे . या तिघानाही पगार नसे. जमिनी इनामस्वरूपात मिळत आणि ही पदे त्या घराण्यात वंश परम्परेने चालत. पुढे नवीन प्रशासकीय बदलात ही पदे शासनाचे नोकर या स्वरूपात बदलण्यात आली ते पगारी नोकर झाले आहे . जमीनीचे रेकॉर्ड आता तलाठी ठेवतात आणि त्यांच्या बदल्याही होतात त्याना पगार मिळतो. मउलकी पाटील गेले आता वसूलीचे काम तलाठीच करतात. पोलीस पाटील आहेत पण त्यांची नेमणूक जाहिरात देऊन रिक्रुटमेन्ट रुल्प्रमाने होते त्यात आरक्षणे वगरे आहेत. महिला पोलीस पाटीलही आहेत. जुन्या कुलकरण्यांचे व पाटलांचे इनाम अल्प पैसे भरून घेऊन म्हनजे २००-३०० रुपये भरून घेऊन त्यांच्या घराण्याना कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत.

तात्पर्य जमीनींच्या कुळाचे रेकॉर्ड ठेवणारा तो कुळकरणी . पुढे इन्ग्रजीच्या व प्रादेशिक प्रभावाने त्याचे कुलकर्णी झाले एवढेच....

सीकेपी कुळकएणी पदावर असू शकतील त्या भागात...

पाटील, देशमुख, कुलकर्णी ही सगली ऑफिसेस आहेत. आडनावे नव्हेत . पण इतर सामान्य मराठे(खरे तर कुणबीच), ब्राम्हण यापासून वेगळेपणा ठसविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणा ते मुदाम नावापुढे लावण्याची पद्धत सुरू होऊन शेवटी आडनावातच रूपान्तर झाले. यांची मूळ आडनावे आणखी वेगळीच असतात. शिवाय पुढे तर ज्यांच्या घरात पाटीलकी अथवा कुळकर्ण असेल त्यांचे भाऊ विभक्त झाल्यावर सन्मानदर्शक आडनावही 'वाटपा'त घेऊन ही आडनावे लावू लागले
माझ्या कामाचा भाग म्हणून मला जातीव्यवस्थेचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यात जुन्या रेकॉर्डाचा अभ्यास करावा लागतो. मोडी शिकणे भाग आहे. दुसर्‍या कुठल्या तरी बीबी वर कुणीतरी मुस्लीमात जातीव्यवस्था नसते असे अज्ञान मूलक विधान केले आहे. त्यात ह्या आडनावांचा बर्‍याच्दा उपयोग होतो. पाटील, देशमुख्,देशपान्डे ही नावे मुसलमानांच्यात देखील आहेत. कारण एकच. ही नावे नसून ऑफिसची नावे आहेत. खानदेशात ह्या पिढीत देखील जातीवाचक आडनाव लावण्याची पद्धत आहे. ऊदा. माळी, सोनार, न्हावी,भावसार्,तेली इत्यादी.

विषय: 
प्रकार: 

ग्रामव्यवस्था हे तायटल नन्तर बदलले आहे . मागे सांगितल्याप्रमाने नन्दिनीच्या कुठल्याशा प्रश्नाबद्दल उत्तर देताना कुलकर्णी शब्दाच्या उपपत्तीबद्दल लिहून ते इथे सेव्ह केले होते. पन तो बन्द करण्यात आलेला बीबी मी इकडे पुन्हा सुरू केला आहे आणि मीच जणू मंत्री आहे अशा थाटात काही.नी त्यांची नेहमीची 'दुकानदारी' इथे सुरू केली त्यामुळे ग्रामव्यवस्था असे नाव द्यावे लागले. खरे तर इथली पिढी अगदीच नवी आहे , ग्रामीण समाजरचनेशी फार थोडा संबंध राहिला आहे. भोज्याला शिवण्यापुरताही. काहींचा तर तोही नाही. मुळे शोधण्याची. प्रत्येकाची जिज्ञासा असतेच. माझ्या'धन्द्यामुळे' मला पुन्हा या जुन्या ग्रामव्यवस्थेत डोके घालणे पडले. सुदैवाने बरेच जुने सरकारी दप्तर अधिकारात पाहता येते. माझ्याकडे एक बारावीची 'पाटकर' जातीची मुलगी आली होती कामानिमित्त. तिला मी विचारले पाटकर म्हणजे काय ? तुमच्या जातीचे पारम्परिक काम काय. वगैरे. ती गोंधळली माहीत नाही म्हणाली. घरचे म्हणतात आपण पाटकर आहोत म्हणून मला माहीत आहे. तिला सगळा इतिहस सांगितल्यावर तिला आणि तिच्या घरच्यानाही खूप गम्मत वाटली.
जुनी ग्रामव्यवस्था तिच्या गुणदोषासह आणि वैशिष्ट्यासह विलक्षण होती. ग्रीकांच्या नगरराज्याशीच त्याची तुलना करता येईल. त्याबद्दल इथे काही लिहावे असा मानस आहे म्हणून शीर्षक बदलले आहे.....

इथे आडनावांची चर्चा चालू आहे ती बहुधा मुटेंना त्यात रस आहे म्हणून. अर्थात तीही मनोरंजक आहेच.

खोती ही जमीनमाल्कीची पद्धत आहे. ह्या जमिनी कुणबी कुळे कसत. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी भूमिहीन आहेत. बाकी कुणबी जमीनधारक आहेत

मस्त माहिती आहे.

जुनी ग्रामव्यवस्था तिच्या गुणदोषासह आणि वैशिष्ट्यासह विलक्षण होती. ग्रीकांच्या नगरराज्याशीच त्याची तुलना करता येईल. त्याबद्दल इथे काही लिहावे असा मानस आहे म्हणून शीर्षक बदलले आहे.....

रॉबीन, लिहा, वाचायला आवडेल..

अर्थात वर निरजाने संबंधीत पुस्तकांची नावे दिलीत, तरी पुस्तके मुद्दाम घेऊन वाचली जातातच असे नाही. पण इथे लिहिले तर ज्यांना विषयात रस नाही त्यांनाही माहिती मिळेल (विषय माहित असला तर रस आहे की नाही ते कळते ना, मुळात असे काही आहे हेच माहित नसेल तर रस तरी कसा निर्माण व्हावा?) आणि पुन्हा प्रतिक्रियांवरुन इतर ठिकाणची माहितीही मिळेल.

मुट्यांची माहितीही इंटरेस्टींग आहे. वेगळा बीबी काढुन लिहिली तर दोन वेगवेगळे विषय तयार होतील आणि योग्य माहिती योग्य जागी जाईल.

पुतण्यासाठी कुणबी सर्टीफिकेट काढण्यासाठी कचेरीत अनेक हेलपाटे घालुन शेवटी एक'पुरावा' मिळाला. हे सगळ झाल्यावर प्रान्ताकडे प्रकरण गेल्यावर म्हणे दुसरा पुरावा पाहीजे. हा पुरावा शोधायचा म्हणजे वाड्-वडिलांनी केलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री यावरुन काढतात. मग वडीलांनी १९२९ साली आमच्या आजोबांनी केलेल्या एका जमिन खरेदीची आठवण सांगितली. चौकशी केल्यावर ह्या काळातले कागदपत्रे जुन्नरला सापडतील असे समजले. जुन्दरला Proud गेलो तर मोडी वाचणारा अळमटळम करायला लागला. मोडी वाचण्यासाठी वडीलांना घेवुन गेलो तर म्हणे मोडी वाचणारे शासनाने पुरस्कृत केलेलीच व्यक्ती पाहीजे. मग त्याला दादापुता करुन नोदी काढल्या.

हे उगीच कुणबीचा उल्लेख आला म्हणुन सांगितल. बाकी तुमच चालु दया ग्रामव्यवस्थेच....... Happy

नीरजा / हूड, इरावतीबाईंची मानववंशशास्त्र या विषयावर कोणती पुस्तके आहेत? (विषयांतराबद्दल क्षमस्व.)

,, << ह्या जमिनी कुणबी कुळे कसत. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी भूमिहीन आहेत. बाकी कुणबी जमीनधारक आहेत >>
कोरडवाहू शेतकरी म्हणजे - कुणबी
आणि
बागायती शेतकरी म्हणजे - माळी
हरीतक्रांतीपुर्वी समिकरण दृढ असावे याचे स्पष्ट पुरावे आढळतात.
पिकाच्या प्रकारानुसार पोटजाती याचे सुद्धा स्पष्ट पुरावे आढळतात.

मस्त पोस्ट.
यावरील सर्वात अप्रतिम पुस्तक म्हणजे "गावगाडा"- त्र्य. न. अत्रे. (प्रकाशन घरी जाऊन पाहून सांगते)
गावगाड्याची जातीनिहाय वर्गवारी आणि रचना यावरील खरोखर महत्वाचे पुस्तक.
सॉरी सॉरी- हे पुस्तक वर नीरजाने आधीच सुचवलेलं आहे हे आत्ता पाहिलं. Happy

कोरडवाहू शेतकरी म्हणजे - कुणबी
आणि
बागायती शेतकरी म्हणजे - माळी
<<
ही वर्गवारी कोकणात अशीच्या अशी नाही लागू पडत. कोकणात कलमं, काजू, माड-पोफळी, केळी बघणार्‍या कुळांनाही कुणबीच म्हणले जाई.

रैने सॉरी सॉरी काय मला कधीही त्यांची पहिली आद्याक्षरं आठवत नाहीत. ती तू सांगितलीस.

नीधप, कोकणात बहुतेक माळी नसतातच.. कुणबीच असतात.. आणि कलमं, काजू वगैरे बागायती नाहीये ना..

कोकणस्थांच्यात सुद्धा कामावरुन आडणावे लावण्याची प्रथा येउन गेलेली आहे.. माझ्या आजोबांच्या पिढीपर्यंत आडणाव पोतनीस आहे (म्हणजे पोतनीसाचे काम करणारे). पोतनीशीच्या बदल्यात संस्थानकडून वतन (जमिनीचा डाग) होता. तो घरातल्या सगळ्यात मोठ्या मुलाकडे जातो. संस्थानं बंद पडल्यावर आडणाव परत बेडेकर झाले.

साठे ह्या आडणावासारखे जोशी हे आडणाव पण बर्‍याच जातीतून दिसेल. भविष्य सांगणारे (पुढच्या सात दिवसात सकाळी सकाळी पश्चिम दिशेने एक स्त्री येउन तुमच्या आयुष्यात एकदम मोठा धनलाभ होईल वाले) कुडमुडे जोशी.

सांगली-मिरज भागात पाटील आणि चौगुले ही दोन आडणावे प्रामुख्याने जैनांच्यात दिसतात.

वरती हुडाने लिहिल्याप्रमाणे मुसलमानांच्यात व ख्रिश्चनांच्यात सुद्धा जाती आहेतच. ख्रिश्चन लोकांच्यात तशाच्या तश्या हिंदू जाती दिसतील (माझ्या वर्गातल्या एका मित्राच्या बहिणीने जातीबाहेर लग्न केल्याने त्यांच्या घरात जाम धुसफुस झाली होती. मी त्याला म्हणलं बेट्या तुम्ही ख्रिश्चन झाला आता तरी हे जातीचं जोखड सोडा तर म्हणाला, अरं टण्या, तसं नाय. ते एमजी ख्रिश्चन हायेत, आमी एमआर ख्रिश्चन, कसं चालायचं). मुसलमानांच्यात प्रामुख्याने शिंपी, सुतार, लोहार अश्या टाइपच्या जाती दिसतात. ह्याचे मुख्य कारण कारागिर समाजाने प्रामुख्याने मुसलमान धर्म घेतला. कोकणात जे ब्राह्मण मुसलमान झाले त्यांच्यात लग्नात वगैरे काय करतात माहिती नाही. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मात जाती ह्या मुख्यतः लग्नातच वर येतात.

लवकरच ह्या सर्व जातींचा नि:पात होवो अशी त्या (असला तर) परमेश्वरचरणी प्रार्थना.

कोकणात जे ब्राह्मण मुसलमान झाले त्यांच्यात लग्नात वगैरे काय करतात माहिती नाही.>>> विधीसकट माहिती लिहू का??? Happy

कोकणी मुसलमान हे साधारण वीस वर्षापूर्वी इतर मुसलमानापेक्षा अगदी वेगळे होते. एकही बुरखा घातलेली स्त्री किंवा दाढी वाढवलेला बाबा मला तरी तेव्हा दिसलेली नाही (माझे लहानपण मुसलमान एरियातच गेले) पण आता मात्र परिस्थिती नक्कीच बदलली आहे (तो वेगळ्या बीबीचा विषय होइल)

देसाई हे आडनाव कर्नाटकात "ब्राह्मणाचेच" असते. आणि तो गावाचा जमिनदार असतो. इकडे कोकणात देसाई म्हटले की डायरेक्ट मराठा समजतात आम्हाला.. जरी आम्ही ब्राह्मण असलो तरी पूजा सांगण्याचा अथवा दक्षिणा मागण्याचा आम्हाला हक्क नाही. ... तो हक्क फक्त "आचार्य" असलेल्या घराण्याचाच असतो. या आचार्य घराण्यात सोवळं ओवळं प्रचंड प्रमाणात आजही असतं. मात्र आम्ही सेना बाळगून लढाया वगैरे करत होतो.. त्यामुळे आमचे सोवळे ओवळे थोडे कमी प्रमाणात असते.

आमच्या अख्ख्या वंशावळीत आडनावं अशीच असतीलः देसाई/ देशपांडे/ कुलकरणी (श्रीमंती पण याच उतरत्या क्रमाने असते Happy )

कलमं, काजू वगैरे बागायती नाहीये ना..<<
मग काय आहे? आंब्याची वा काजूची बागच म्हणली जाते की. शेत नाही म्हणत.

>>कोकणस्थांच्यात सुद्धा कामावरुन आडणावे लावण्याची प्रथा येउन गेलेली आहे.. <<
हो. नाही कोण म्हणतंय. वरच्या लिस्टमधे मीच फडणवीस, पेशवे, वर्तक अशी आडनावं लिहीली आहेत की.

कर्नाटकातले देसाई ब्राम्हणच असतीलच असे नाही. ते का ते माझ्या पुढच्या विवेचनात येईल. पण बेळगावचे देसाई, दळवी मराठाच आहेत्.खरे तर मराठा ही जातच अस्तित्वात नव्हती. हे स्थलवाचक विशेषण आहे.

इकडे कोकणात देसाई म्हटले की डायरेक्ट मराठा समजतात आम्हाला.. <<
कोकणातच देसाई आणि दळवी ही दोन्ही आडनावे सारस्वतांच्यात पण आहेत. सिंधुदुर्ग-गोवा भागात भरपूर उदाहरणे मिळतील.
आपले परदेसाई किंवा प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी ही काही उदाहरणे.

चिपळुण , गोवळकोट , गुहागर , अंजनवेल ह्या गावांत तांबे , दळवी , देसाई , कुलकर्णी , पांगारकर अश्या आडनावाचे मुसलमान आढळतात.

नीधप. रत्नागिरीत देसाई मराठाच आहेत!!

हूडा, बेळगाव महाराष्ट्रातच पकड रे बावा!! आम्ही नुसते देसाई नसतो तर कुठल्यातरी गावाचे देसाई असतो. त्याच्यावरून आम्ची "लायकी" ठरते. उदा. माझी आत्या धारवाडच्या देसायाकडे दिली आहे. धारवाड देसाई म्हणजे लई श्रीमंत Happy त्यामनाने आम्ही बागलकोट (दुष्काळी भाग) जरा गरीब.. Proud

श्री, कोकणात काही गावच्या गावं मुसलमान बनवली गेली.. खेडमधलं फुरूस, रत्नागिरीजवळचं सैतवडा.. इत्यादि. जबरदस्तीनं अथवा फसवून मुसलमान बनवल्यानंतर त्याना परत हिंदू धर्मात यायचा रस्ता बंद होता... त्यामुळे त्याचा वेगळा समाज तयार होत गेला.. त्यामुळे असेल कदाचित पण त्याच्यामधे जबरदस्त एकी आहे.. कुणाच्याही कसल्याही वेळेला धावून जातात ते. मात्र या गावामधून पुरातन देवळाना वगैरे कधीही तोडलं फोडलं गेलेलं नाही हे विषेश... जयगडमधलं कर्हाटेश्वर हे असंच एक पूर्णपणे मुसलमान गावामधे असलेले शंकराचे देऊळ. या देवळाचे काही मानकरी मुसलमान आहेत!!

एकूण ही सर्व चर्चा आणि माहिती फार मनोरंजक ठरतेय!!

माझ्याकडे एक बारावीची 'पाटकर' जातीची मुलगी आली होती कामानिमित्त. तिला मी विचारले पाटकर म्हणजे काय ? तुमच्या जातीचे पारम्परिक काम काय. वगैरे. << असे तुम्हि लोकांना कसे हो विचारता??

माझ्या वडिलांच्या गावात कुलकर्णी आणि सावकारच सगळ्या गावचा कारभार पहात असत. त्यामुळे तिथे पाटिल वगैरे आडनावाची लोक दिसत नाहीत. यावर कोणी माहिती सांगणार का?

जयगडमधलं कर्हाटेश्वर हे असंच एक पूर्णपणे मुसलमान गावामधे असलेले शंकराचे देऊळ. या देवळाचे काही मानकरी मुसलमान आहेत
>> औंधच्या यमाईचे (मुळपीठ) पुजारीही मुसलमानच आहेत.
पूर्वी हिंदूही ताबूत नाचवायला जायचे मोहोरम दरम्यान.

कुलकर्णि हे आडनाव मुस्लिम लोकात देखिल असत अस ऐकल आहे.ममता कुलकर्णि ही नटि हिन्दु कि मुस्लिम ?:p

मग ढेकणे, झुरळे अशी नावे कशी आली? आमचे एक नातेवाईक झुरळे आडनावाचे आहेत.

डॉ. खानखोजे म्हणून एक क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांचे चरित्र वाचन सध्या इ-प्रसारण वर होत आहे, दर गुरुवारी. त्यात सांगितले, की 'खान' नावाच्या माणसाला शोधून काढायचे काम त्यांच्या पूर्वजांना दिले होते, नि त्यांनी बरोबर 'खान' शोधला. म्हणून त्यांचे आडनाव बदलून 'खानखोजे' असे झाले.

काही लोकांना ते मुसलमान असतील असेच वाटत असे. पण देशभक्त असल्याने जातीपातीची तमा त्यांना नव्हती. फक्त भारतातले ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंतचे हिंदू, सर्व प्रकारचे मुसलमान नि इतरहि धर्माचे सर्व लोक इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवायचे एव्हढेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय!

ते आम्हाला १९६१ साली जर्मन भाषा शिकवायला होते. प्रत्येक वर्गाला पँट वर करून गुढघ्याच्या वर इंग्रजांची गोळी कुठे लागली ते दाखवत असत. गोष्टीहि सांगत.

किंवा त्यांचा धंदा असेल, ढेकूण, झुरळे मारण्याचा. पूर्वीचे 'Pest Exterminator'.

आता एक माबोकर असे आडनाव करू. त्यांच्यात जात पात, लहान, मोठे, विशिष्ठ गावातले, इतर गावातले, भारतातले, भारताबाहेरचे असे काहिहि भेद करू नयेत. Happy

,,<< मग ढेकणे, झुरळे अशी नावे कशी आली?
एकाचे आडनाव नागवे आहे त्यांचा काय इतिहास असावा?
>>
कमाल आहे. मी आडनावाचा विषय थांबवला तरी गाडी पुन्हा त्याचं पटरीवर आलेली दिसते. Happy

मलाही तसेच वाटते. पण ते नागावरुन दुसरे आडनावपण घेउ शकले असते ना.
पण त्यांना विचारु शकत नाही म्हणुन इथे विचारले रे. Happy

मी आडनावाचा विषय थांबवला तरी गाडी पुन्हा त्याचं पटरीवर आलेली दिसते

तुम्ही एकट्याने थांबवले किंवा चालू केल्याने फार थोड्या गोष्टींवर परिणाम होतो. तिथे सहकार्यच पाहिजे. कधी होईल बरे सर्व मराठी लोकांच्यात एकी? Light 1

नागवे - कदाचित् त्या कुठल्या मराठी सिनेमात दाखवल्याप्रमाणे, ते लोक जन्म झाल्यावर कपडे न घालता नवजात अर्भकाला देवळात घेऊन जात असतील.

Pages