१) पाव वाटी तांदूळ
२) अर्धी-पाव वाटी चन्याची डाळ - भिजवलेली
३) एक चमच मोहरी
४) मोहरी फोडणी द्यायला तूप
५) मीठ
६) कढीपत्त्याची पाने
७) चार ग्लास ताक
१) आधी पाव वाटी तांदळाचा भात करुन घ्यायचा.
२) कढईत मोहरी आणि कढीपत्त्याची पाने तूपात फोडणी द्यायची.
३) वरतून चार ग्लास ताक ओतायचे.
४) ताकाला एक उकळी आली की त्यात भिजवलेली चना डाळ घालायची
५) लगेच भात घालायचा आणि संथपणे ढवळायचे.
ताक भात तयार. तमिळ लोकांमधे हा भात उपासाला चालतो. तुम्ही उपास नसेल तेंव्हा करा.
आज झाले काय की मला वरीची गोड खीर करायची होती उपास होता म्हणून. पण सकाळी तेवढा वेळ मिळालाचं नाही. ऑफीसजवळ एक तमिळ मंदीर आहे. तिथे दुपारी गेलो पण ते बंद झाले होते. मग संध्याकाळी गेलो त्यावेळी महाशिवरात्रीनिमित्त तिथे बरीच गर्दी होती. मी लगेच पुजा आटोपून पायरीवर बसलो. कुणीतरी मला एका ग्लासात हा ताक भात आणून दिला. मी आजूबाजूला पाहिले तर एक पुजारी सर्वांना पेल्यात हा वाफाळता ताक भात देत होता. मी एक पेला ताक भात पिऊन तृत्प झालो. चवीला तो एकदम खंग्री झाला होता. तशी त्यांना कृती विचारायची गरज नव्हतीचं कारण खाताना हा पदार्थ कसा बनवला असेल याबद्दल कधीकधी आपसूकचं कळते. तरी मी त्यांना विचारले व त्यांनी अशीच कृती सांगितली.
ताक पातळ असावे आणि भात नावापुरताच असावा.
बी, असं ताक उकळवलं तर फुटेल
बी, असं ताक उकळवलं तर फुटेल न.
हलवत राहिल तर नाही फुटणार
हलवत राहिल तर नाही फुटणार आर्च.
मंद आचेवर ढवळतं रहायचं तर
मंद आचेवर ढवळतं रहायचं तर नाही फुटतं. शिवाय असं ताक पातळं असावं लागतं.
हे बी, हे पायसम आहे ना?
हे बी, हे पायसम आहे ना? ग्लासात प्यायला देतात.
हे सायो नाही हे पायसम नाही.
हे सायो नाही हे पायसम नाही. पायसम गोड असते ना.. हे आंबट होते. छान होते गं.. अजून मागावेसे वाटलत होते
ए नाही.. पयसम म्हणजे तांदळाची
ए नाही.. पयसम म्हणजे तांदळाची खिर..
बरोबर पायसम गोड असते. एक तमिळ
बरोबर पायसम गोड असते. एक तमिळ माणूस मला म्हणाला हे पोरेज आहे म्हणून. पोरेज असे नसते ना पण आणि मंदीरात का कुणी पोरेज देतील
पायसम मधे कधी कधी कापुरचा वास का येतो?
मी असंच फोडणीविरहीत तांदूळ,
मी असंच फोडणीविरहीत तांदूळ, चणा डाळ प्रकरण प्यायलेय.पण हा प्रकार करुन बघायला हरकत नाही.
पायसम खरंतर गोडच असतं म्हणजे असायला हवं पण साखर नावालाच असते त्यात. त्यामुळे माझ्याच्याने तो पातळ भात पिववत नाही.
कधीकधी पायसम मधे साबूदाणा आणि
कधीकधी पायसम मधे साबूदाणा आणि शेवया दोन्ही असतात आणि काजूचे काप पण असतात. त्यामुळे ते छान लागतात. पण हे मात्र खरे की पायसम जरा फिके असते.
नाही पण मी जे अगदी ऑथेंटीक
नाही पण मी जे अगदी ऑथेंटीक पायसम प्यायलेय.. अगदी मस्त गाढ, तेव्हापासुन मी फॅन झाल्ये पायसमची..
आपल्याकडची तांदळाची खिर आवडत नाही मला...
माझ्या सासरी आमची कॉलनीमधे ९०% तामिळ वस्ती आहे. त्यांचे निरनिराळे कार्यक्रम सतत चालु असतात. जेवण तर असतातच.
अजुन एक पायसमचा प्रकार मी चाखलाय त्यात साखरे ऐवजी गुळ असतो... यम्मी लागत ते पण.
मी खाल्लंय ते गुळ्वालं
मी खाल्लंय ते गुळ्वालं पायसमही. पण मी पायसम फॅन नाही. इनफॅक्ट, शिक्षाच वाटते मला.
मी गुळाची खीर कधीच पिली नाही.
मी गुळाची खीर कधीच पिली नाही. माझी आई तांदळाच्या पिठाची जी वेलची आणि खवलेले खोबरे घालून खीर करते ती मला सर्वात जास्त आवडते.
अमृता, त्या गुळाच्या खारीची कृती लिहि ना येत असल्यास.
सायो, इसका मतलब तुने पि ही
सायो, इसका मतलब तुने पि ही नही..
गुळाची खिर नाही येत रे मला बी... सासरी विचारुन बघते.. तिथल्या एखाद्या मामी कडुन मिळेल.
ऑथेटिक 'पायसम' स्लो कुक आणी
ऑथेटिक 'पायसम' स्लो कुक आणी चांगले गोड असते.मी रेसिपी मिळाली तर टाकते.
अमृता, त्या गुळाच्या खारीची
अमृता, त्या गुळाच्या खारीची कृती लिहि ना येत असल्यास.>>
अमृताला माहीत नसेल रे अशा खारीबद्दल.
खारीबद्दल
खारीबद्दल
खरंतर महाराष्ट्रातच उपासाला
खरंतर महाराष्ट्रातच उपासाला साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे अशा पचायला जड असलेले व पित्तकारक प्रकार उपासाला चालतात. त्यापेक्षा हा ताकभात बरा लागतो. आमच्याकडे कर्नाटकात तांदूळ चालत नाहीत पण रवा चालतो. त्यामूळे बर्याचदा उपासाला उप्पीट अथवा शिरा असतो.
ऑथेंटिक पायस्सम... ह्म्म्म...
मंगलोरची कोंकणी लोकं तर
मंगलोरची कोंकणी लोकं तर उपासाचा भात पण खातात. साबूदाणा फक्त आपल्याचंकडे बहुतेक उपासाला वापरतात.