Submitted by वर्षा_म on 29 January, 2010 - 01:00
मी आहे एकटा एक
बाकी सगळे अनेक
मनी माऊला डोळे दोन
हळुच बघतेय आलय कोण
पळसाला ह्या पाने तीन
शंकराला नेऊन वाहीन
घोड्याला पाय चार
मी झालेय एटीत स्वार
हाताला बोटे पाच
बोट ठेवुन शब्द वाच
फुलपाखराला पाय सहा
त्याचे सुंदर रंग पहा
इंद्रधनुष्यात रंग सात
कोकीळ बघ बसलाय गात
आजीची उलटी काठी आठ
पाढे श्लोक तिचे तोंडपाठ
नवरात्रात रात्री नउ
चला नाचु आणि गाउ
एकावर शुन्य दहा
अंक पाठ झाले पहा
गुलमोहर:
शेअर करा
मस्त...
मस्त...
शाब्बास वर्षे, झले की पाठ
शाब्बास वर्षे, झले की पाठ तूझे. आता पुढचे उद्या शिकवीन हां...
कविता मस्त जमली....... मी
कविता मस्त जमली.......
मी प्रिंट घेऊन ठेवणार आहे.
(No subject)
छान
छान
Varsha , One, two, three four
Varsha , One, two, three four five, six, seven, eight, nine, ten, aata ingrajeet sudha yayla pahija na chal phat kar bagu,-
---------chaan lihilee ahyes---------
छान आहे.. मला शाळेत अशीच एक
छान आहे..
मला शाळेत अशीच एक कविता शिकल्याची आठवतेय.. त्यात महिन्यांची नाव होती..
जस.. " पहिला महिना जानेवारी, नवे वर्ष आले दारी",
"मे महिना हुश्श..हुश्श, पंख्याचं बटण करा पुश"
" मे नंतर येतो जून, चला होउ चिंब भिजून "
धन्यवाद लोकहो कविता तुला
धन्यवाद लोकहो

कविता तुला स्पेशल
एकदम छान, मी आता माझ्या
एकदम छान, मी आता माझ्या मुलीला रोज म्हणून दाखवेन..........
मुलीला हेच शिकवीन म्हणतोय
मुलीला हेच शिकवीन म्हणतोय
सुलभ आणि सुटसुटीत...सुंदर
सुलभ आणि सुटसुटीत...सुंदर बालकविता किंवा लयबद्ध असल्याने बालगीतसुद्धा म्हणता येईल.
ए मस्तच!
ए मस्तच!
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
खुपच छान ....
खुपच छान ....