सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार,
केदार,

ह्या मार्केट मध्ये माझे
ह्या मार्केट मध्ये माझे आवडते.
एल अॅन्ड टी ( गेले ३-४ वर्षांपासून माझा आवडता शेअर, माझ्या जुन्या पानांवर अनेकदा ह्यावर लिहीले आहे.
रिलायन्स - प्रॉमिसिंग वाटतोय. जनरली मी रिलायन्सच्या पाठीमागे लागत नाही, पण ह्यावेळी घेतला.
सेसा गोवा - नविन कंपन्या अक्वायर केल्यामुळे आउटपुट वाढले आहे.
लुपीन - अमेरिकेत औषधे विकते. एका ड्रगचे पेटंट ज्याचा खप येत्या दोन वर्षात खूप वाढणार.
रेड्डीज - हा पण चांगला आहे, अजून रिसर्च करायचा आहे.
स्टर्लाइट इन्डस्ट्रिज
हिंदूस्थान झिंक *
टिस्को ( चांगल्या व्हॅल्यूला आला आहे, मी दोन दिवसात घेईन). फर्स्ट सपोर्ट लेव्हल ५६०, सेकंड ४३० +/- )
विजा स्टील - सध्या रिसर्च करत आहे, प्रॉमिसिंग वाटतोय.
* ही कंपनी पण स्टर्लाइटचीच आहे.
त. टी. मी टेक व फंडामेंटल रिसर्च असे दोन्ही करतो, त्यामुळे कधी कधी व्हॅल्यू नसणारी पण मोमेटंम असणारी स्क्रिप्ट पण घेतो. (ऑफकोर्स स्टॉप लॉस ठेवून.)
मस्त माहीती देतोयेस केदार
मस्त माहीती देतोयेस केदार .
मार्केट २१००० वरुन गडगडल्यापासुन मी माझा पोर्ट फोलीओ उघडुन बघणं बंद केलं आहे , आता बघावं लागेल अजुन किती लाल टोमॅटो आहेत .
केदार, मी फक्त फंडामेंटल
केदार,
मी फक्त फंडामेंटल अॅनॅलिसिस आणि बिटविन द लाईन्स जाणवणार्या गोष्टींवरून आडाखे बांधतो. ऑफकोर्स टेक्निकल अॅनॅलिसिसचे महत्त्व आहेच, पण तेवढा अभ्यास नाही.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक मेटॅलिक्स आणि अलेंबिक केमिकल्स याचा अभ्यास करून सांग तुला काय वाटतं ते. फायदा मिळवून देणार्या स्क्रिप्सची यादी मी केली आहे. मार्केट पडलं की घेणार आहे.
Please अमेरिकेतले सुद्धा शेअर
Please अमेरिकेतले सुद्धा शेअर suggest करा. कुठले चांगले असतिल तर.
असा specific प्रश्न चालेल का
असा specific प्रश्न चालेल का ? -
मी आज एल अॅन्ड टी घेतले १४३५ ला, long term साठी ठेवावेत का ? मी घेतलेला शेअर जरा खाली गेला की मला वाटत फार नुकसान नको, विकून टाकावा (नवीन आहे शेअर मार्केट मधे म्हणून असेल कदाचित).
प्रयोग, तुमचे स्क्रिप्टस शेअर करणार ?
प्रयोग, तुमचे स्क्रिप्टस शेअर
प्रयोग, तुमचे स्क्रिप्टस शेअर करणार ?
येस मलाही हेच वाटले वाचुन... तुमच्या अभ्यासाचा फायदा होईल आम्हाला..
केदार, धन्यवाद तुमची लिस्ट शेअर केल्याबद्दल....
मित्रहो, वरती मी केदारला
मित्रहो,
वरती मी केदारला विचारलेले रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक मेटॅलिक्स आणि अलेंबिक फार्मा हे तीन शेअर माझ्या यादीतील आहेत. त्याशिवाय मार्केट पडेल तसे आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, इन्फोसिस घ्यावेत. करेक्शन ही चांगली संधी आहे. पुढचा काळ मार्केट तेजीत असेल आणि चढेल. साधारणतः बजेटच्या सुमारास. तेव्हा थोडा पैसा कमवता येईल. लॉंग टर्मचे शेअर्स मात्र लगेच काढू नयेत. ते देव्हार्यातील टाकासारखे वर्षानुवर्षे पुजून ठेवावेत.
भेल्, स्टेट बँक, रिलायन्स, टी
भेल्, स्टेट बँक, रिलायन्स, टी सी एस,इन्फोसिस --माझे आवडते लॉंग टर्मचे शेअर्स
आय डी एफ सी, एल एन गी पेत्रोनेट, आय एफ सी आय --माझे आवडते शार्ट टर्मचे शेअर्स
मागच्या ३-४ वर्षापासुन तरी काही तोटा नाहि झाला...
केदार धन्यवाद. खूप मदत होते
केदार धन्यवाद. खूप मदत होते आहे.
मी आज एल अॅन्ड टी घेतले १४३५
मी आज एल अॅन्ड टी घेतले १४३५ ला, long term साठी ठेवावेत का >>
प्राजक्ता, ह्या क्वार्टरच्या रिझल्टस मध्ये LNT मॅनेजमेंटने त्यांच्या डिलिव्हरीला थोडा प्रॉब्लेम आहे हे सांगीतले व LNTचा ग्रोथ गाईडन्स १५ वरन १० टक्के केला. पण त्याच वेळेस आणखी एक महत्वाची बातमी देखील सांगीतली की त्यांचाकडचा ऑर्डर फ्लो Q on Q बेसवर ३० टक्यांनी वाढला आहे. ( म्हणजे बिझनेस चांगला चालेल). हा डिलिव्हरी प्रॉब्लेम म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड आहे. तो लगेच ( १,२ क्वार्टर मध्ये) बदलू शकतो. FY११ च्या अर्निंग कडे लक्ष ठेवले तर प्रोजेक्टेड EPS ६८ आहे. (आजचा ५६) म्हणजे साधारण २० टक्के ग्रोथ. त्याला अगदी आजच्या PE ने गुणले तर किंमत येते साधारण १७००. (पुढच्या वर्षी ह्या वेळेस)
पण ...
मार्केट इतके सरळ नाही चालत. कारण ते लोकं चालवतात, मग त्यांचा सेंटिमेंटस नेहमी बदलत राहतात. एकदा सरळ दोन तीन दिवस एखादा शेअर वर किंवा खाली गेला की खरेदी विक्री होते. मग किंमत वर खाली होणार. त्यामुळे जर रिअल प्रोजेक्शन १७०० असेल तर तो निदान १९००+ च्या घरात जाऊ शकतो. ( किंवा कमीही होऊ शकतो.) पण कमी होण्याची भिती निदान पुढचे तीन वर्ष नाही
कारण पुढच्या वर्षी भारत ९ टक्यांनी ग्रो होणार.
म्हणून दिर्ध मुदतीसाठी हा शेअर पोर्टफोलिओ मध्ये असायलाच हवा. फर्स्ट टारगेट १७००, सेकंड १९०० +/- )
जर मार्केट पडले, परत १०००० वर गेले तर काय होईल. नविन ऑर्डर्स कमी येतील. ग्रोथ कमी होईल. पण २००८ ते जाने २०१० मध्ये ह्या शेअर ने किती परतावा दिला हे पाहीले तर तो ब्लाईंड बाय आहे.
हे सर्व वरिल गणित दिर्धकालीन गुंतवणूकीसाठी आहे. अल्पमुदत व ट्रेडिंग ह्यात लक्षात घेतले नाही. त्याचे गणित थोडे वेगळे असते.
प्राजक्ता मीही काल एल अॅन्ड
प्राजक्ता मीही काल एल अॅन्ड टी घेतले १४३५ ला........
प्राजक्ता आणि साधना, जेव्हा
प्राजक्ता आणि साधना,
जेव्हा मार्केट सातत्याने घसरत असते तेव्हा आपल्याला हवा तो शेअर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेत राहिल्यास अॅव्हरेज प्राईसचा फायदा मिळतो.
मी काल एनएमडीसी (नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा शेअर घेतला. दुपारी मार्केट पडल्यामुळे तो २० रुपयांनी खाली आला, पण लाँग टर्मसाठी प्रॉमिसिंग आहे.
टाटा स्टील हा शेअर ५५० च्या आसपास घेऊन ठेवायला चांगला आहे. वर्षभरात तो दुप्पट होईल, अशी चिन्हे आहेत.
अरे वा, हा छान बी.बी. उघडलाय.
अरे वा, हा छान बी.बी. उघडलाय. मला खूप लाँग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट नकोय. शॉर्टटर्म किंवा ट्रेडींगसाठी कोणते शेअर्स चांगले, त्याच्याही टीप्स मिळतील काय?
मी काल टिस्कोही घेतला... आज
मी काल टिस्कोही घेतला... आज पाहते आता काय झाले ते..
भार्ती ऐर्टेल ची काही आशा आहे काय? माझ्याकडे वर्षभर पडुन आहेत....
टीप्स वरी विसंबला त्याचा
टीप्स वरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला.
जोक्स अपार्ट शॉर्ट टर्म म्हणजे किती दिवस १० ते १५ साठी का? तसे असेल तर केवळ चार्ट वर विसंबावे लागेल. ऑपश्न, फ्युचर मध्ये ट्रेडींग करणार का?
टीप्स वरी विसंबला त्याचा
टीप्स वरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला
१००% खरे.. चारजणांच्या टीप्स ऐकाव्यात आणि स्वतःला जे पटते तेच करावे... म्हणजे लॉस झाला तर स्वतःलाच दोष देता येतो
टेलकॉम मध्ये काही दम नाही.
टेलकॉम मध्ये काही दम नाही. प्रॉफिट बुक करा.
छान माहिती देतोयस केदार..
छान माहिती देतोयस केदार.. मागच्या मार्च मध्ये खरेदीची संधी घालवली ती परत मिळणार असं दिसत आहे...
>>> अरे वा, हा छान बी.बी.
>>> अरे वा, हा छान बी.बी. उघडलाय. मला खूप लाँग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट नकोय. शॉर्टटर्म किंवा ट्रेडींगसाठी कोणते शेअर्स चांगले, त्याच्याही टीप्स मिळतील काय?
शॉर्ट टर्म (म्हणजे ३-४ महिन्यांपेक्षा कमी मुदतीत विकून फायदा मिळविण्यासाठी) साठी Unitech, Hindalco, IFCI हे शेअर बरे वाटतात.
केदार, प्रयोग धन्यवाद.छान
केदार, प्रयोग धन्यवाद.छान माहिती शेअर करत आहात.
आजच एल अॅन्ड टी घेतले.
एक प्रश्न - मार्केट २१,००० ला असताना घेतलेले (टी व्ही वरील पंडितांचे ऐकून) - रिलायन्स कॉम, डी एफ एल, एशियन इले़क्ट्रॉनिक्स्, एच डी आय एल्, एच एफ सि एल्, आय एफ सि आय्, मॅग्नम वेन्चर्स, पार्श्वनाथ , पूर्वा हे शेअर्स विकावेत का ठेवावेत?
मागच्या वेळेस मार्केट आपटलं
मागच्या वेळेस मार्केट आपटलं होतं तेव्हाचा अनुभव आहे. पैसे अडकून पडले होते. माझ्याकडे काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. उ.दा. बजाज ऑटो/फिनसर्व्ह, रिलायन्स, अॅक्सिस बँक, सेल इ. त्यांनी मी हात लावू शकत नाहीये सध्यातरी. त्यामुळे मला सध्यातरी लाँगटर्म मध्ये पैसे अडकवण्यात इंटरेस्ट नाहीये.
तुम्ही कुठल्या लेवलला घेतला.
तुम्ही कुठल्या लेवलला घेतला. १२००+ मध्ये असाल तर तो तिथे परत जाणार नाही. HDIL मध्ये मी ही होतो. पण ष्टोरी थोडी वेगळी.
ते अश्वीनी गुजराल किंवा बलिगा मुळे नाही तर ती कंपनी LNT शी रिलेटेड आहे व त्यांना तेंव्हा धारावी चे कॉन्ट्रॅक्ट मिळणार होते. तेंव्हा ४५० ला घेतलेला तो शेअर १३५० ला गेला. आणि नंतर ६५ रु ला.
पण ६५, ७० वर मी खूप लोड केले जे मी अडीच आठवड्यांपुर्वी विकले. ह्या शेअर ला ३५०-६० चा खूप मोठा रेसिस्टन्स आहे. तो कनसॉलिडेट झाला आहे. कंपनी कॅश रिच आहे. ३५६-३६३ लेवलवर तो परत जाईल. गेल्यावर काढून टाका.
बाकीच्यांवर ह्या विकेंडला लिहीतो.
हे सर्व मार्केट घसरणार नाही ह्या अंदाजावर, पण ते धसरण्याची शक्यता जास्त आहे. कारण निफ्टी ने ४७०० ब्रेक केले तर स्टॉप कुठे घेईल हे अजून कळत नाहीये. तोच अॅनॅलिसीस करत बसलो आहे.
मागच्या वेळेस मार्केट आपटलं होतं तेव्हाचा अनुभव आहे. पैसे अडकून पडले होते>>> अगदी ह्याच विषयावर मी एका माबोकराशी काल रात्री बोलत होतो. गुंतवायला कुणाकडे पैसे नव्हते कारण फुल्ली इन्वेस्टेड. त्यामुळे ह्यावेळी गुंतवताना सिस्टॅमॅटिक इन्वेस्टमेंट स्ट्रॅटजी आखायची व २० टक्के पैसे नेहमी कॅश मध्ये ठेवायचे. असे मोठे करेकश्न झाले की ते लगेच बाजारात टाकायचे, मग मुळ भांडवल व हे नविन मिळून चांगला अॅव्हरेज प्राईजला शेअर होतो.
केदार धन्यवाद. माझीही हीच
केदार धन्यवाद.
माझीही हीच स्थिती होती.पैसे अडकून पडले होते.मार्केट पडल्यावर गुंतवायला पैसे नव्हते.
तोटा सहन करुन विकावेत की ठेवावेत यातच वर्ष गेले. पुन्हा नवीन पैसे घालायची हिम्मत होत नव्हती.
घेतानाच्या लेवल्स -
रिलायन्स कॉम - ५५० ते ७१८, डी एफ एल-११००, एशियन इले़क्ट्रॉनिक्स् - ४०० ते ५०० , एच डी आय एल्- ७०० ते ११००, एच एफ सि एल् - ४० ते ५८, आय एफ सि आय्- ६२ ते ९१, मॅग्नम वेन्चर्स- ४२, पार्श्वनाथ - ४२८ ते ५२६ ,पूर्वांकरा - ४५० .
खूप खूप धन्यवाद केदार टीप्स
खूप खूप धन्यवाद केदार
टीप्स वरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला >> अगदी खर. मी पण सुरुवातिला रेडिफ वरच्या टिप्स बघून (नशिबाने फार जास्त नाही) शेअर्स घेतले आणि पस्तावले होते.
आता जरा जरा कळायला लागलय.
वसंतराव पटवर्धनांच्या शिफारशी
वसंतराव पटवर्धनांच्या शिफारशी -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=351...
हाय केदार, माझ्ह्याकडे जे के
हाय केदार, माझ्ह्याकडे जे के लक्ष्ह्मि सिमेन्त , ताज जिविके, आय डी एफ सि, आहेत , सध्या तोटयात आहेत, पण आता ते घेउन एवरेज करावे का? तुझे काय मत आहे.
वसंतराव पटवर्धनांचे लेख
वसंतराव पटवर्धनांचे लेख चांगले असायचे. अभ्यासपूर्ण लिहायचे ते. त्यांनी उगाच कुठल्या शेअरची स्तुती केली नाही. सध्या त्यांनी लिखाण थांबवले आहे. अन्यत्र कुठे लिहितात का?
माशा, असे दिसते की तुम्ही
माशा, असे दिसते की तुम्ही सर्व शेअर बुमच्या टॉप लेग मध्ये घेतले आहेत. तितकी लेवल येणे अशक्य आहे. शिवाय काही शेअर्स हे तेंव्हा व्हॅल्यू मुळे वर न जाता ट्रेडींग मुळे वर गेले आहेत.
एशियन इलेक्टॉनिक्स - क्लासीक शेअर फॉर ट्रेड. रेंजबाऊंड ३५ ते ५०. नेहमी पॅटर्न मध्येच ट्रेड होतो. मार्केट वर जात असले की ५० खाली आले की ३५-३६. एक दोन दिवस वाट पाहून जर ३८ ब्रेक झाला तर खूप विकत घेऊन ४५ च्या वर काढा.
हिमाचल फ्युचिरिस्टिक कम्युनिकेशन - १५% वाढला. सेल करा. फार तर आणखी १ १/२ रु वाढेल. मॅक्स रेंज १६.
रिलायन्स कम्युनिकेशन १६०- १८० रेंज कन्सॉलिडेट होत आहे. प्रिडिक्ट करायला टेक्नीक्ल्स अपूरे आहेत अजून. होल्ड.
IFCI - 55-57 पर्यंत जाईल. आत्ता होल्ड पण ५५ नंतर सेल.
पार्श्वनाथ - हाउसिंगला सध्या प्रॉब्लेम आहे. तुमची लेवल येणे अशक्य. कन्सॉलिडेशन मध्ये आहे. हायर टॉप्स मध्ये आहे. १४५ पर्यंत जाईलही कदाचित. सेल.
IDFC १४२ ला चांगला सपोर्ट आहे. तो ब्रेक होत असेल तर काढून टाका. सध्यातरी होल्ड. नेक्स मेजर सपोर्ट ११८-२०
* हे फक्त टेक्नीकल्स वरुन ठरवत आहे. फंडामेंटल लक्षात घेतले नाही. पण विकली व डेली पॅटर्नस मध्येच हे वरचे शेअर ट्रेड करत आहेत, त्यामुळे फक्त टेक अॅनॅलिसिस.
अरे वा छान माहीती. भारती
अरे वा छान माहीती.
भारती बद्द्ल माझा ब्रोकर उलट आत्त इन्वेस्ट करा सांगत होता. (मी केले नाही हा भाग वेगळा)
Pages