१ वाटी दलिया, पाऊण वाटी सालं असलेली मुगाची डाळ, १ कांदा उभा चिरुन, २ लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, १ हिरवी मिरची, २ चमचे खोबर्याचा किस (ओला नारळ असेल तर उत्तम), १ गाजर, पाव वाटी मटार, १ टॉमेटो , थोडासा फ्लॉवर, १ बटाटा, २ चमचे धण्याची पुड, १ चमचा कच्चा मसाला, चवीप्रमाणे मीठ. फोडणीसाठी तुप, जीरे, मेथ्या, हिंग.
कुकरमध्ये थोडेसे तुप घेवून त्यात जीरे अन मेथ्याची फोडणी करावी. त्यातच ठेचलेलं आलं-लसूण्-हिरवी मिरची परतावी. हिंग घालावा. यामध्ये खोबरे थोडेसे परतून मग उभा चिरलेला कांदा परतावा. त्यानंतर दलिया परतून घ्यावा. मग यात टॉमेटो व इतर भाज्या घालाव्यात. नंतर धुतलेली डाळ घालावी. उरलेला सगळा मसाला व मीठ घालुन चार वाट्या पाणी घालावे. दोन शिट्ट्यांमध्ये दलियाची खिचडी तयार.
आमच्या सासरी थंडीमध्ये शक्यतो तांदुळ खात नाहीत. सर्दी -तापाने आजारी व्यक्तीला तर भात थंड असल्याने खिचडी देणे टाळतात. अश्यावेळी ही दलियाची खिचडी करतात.
मी बर्याचदा मुगाच्या डाळीऐवजी मुग अन हरभर्याची डाळ मिक्स करुन घेते. फक्त असे केल्यात एखाद्-दुसरी शिट्टी जास्त करावी लागते. तसेच बरेचदा यात इतर भाज्यांबरोबर सोया चंक्स पण घालते
दलिया म्हणजे काय?
दलिया म्हणजे काय?
अल्पना दलिया म्हणजे खीर करतो
अल्पना दलिया म्हणजे खीर करतो तो च ना ? भरडलेला गहु थोडक्यात.
करुन बघेन नक्की
भरड दळलेला गहु. गहु तसा भरड
भरड दळलेला गहु. गहु तसा भरड दळायच्या आधी त्यावर काही प्रोसेस करतात का हे माहित नाही. इंग्रजीत बहुदा Cracked Wheat म्हणतात.
हा दलिया वापरुन दुध घालुन खीर किंवा शिर्यासारखा पदार्थ पण करतात. तसेच दलिया वापरुन सांज्यासारखा पण पदार्थ करता येतो. हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक पदार्थ.
छान पाककृती आहे. नक्की करून
छान पाककृती आहे. नक्की करून बघेन
~साक्षी
दलिया दळताना काही प्रोसेस
दलिया दळताना काही प्रोसेस केली जात नाही.
सांजा दलिया पेक्षा बारिक दळला जातो.
>>१ चमचा कच्चा मसाला कच्चा
>>१ चमचा कच्चा मसाला
कच्चा मसाला म्हणजे काय?
बाकी पाकक्रुती मस्त आहे. वन डिश मिल वाटतेय अगदी !
मस्तच. मसुरीच्या डाळीची पण
मस्तच. मसुरीच्या डाळीची पण छान लागते.
मला डायटीशीयननी दलिया
मला डायटीशीयननी दलिया सुचवलेला डायेट मध्ये बदल करण्यासाठी...
अशी दलिया खिचडी मी फोडणी न देता करते आणि खाते.... चवीलाही चांगली, पोटभर्रीची, आणी महत्वाचे म्हणजे वजन कमी करायला मला खुप मदत झाली ह्याची.
वरील कृतीचा खुप उपयोग होईल मला अजुन बदल आणण्यासाठी. मी पाहिलेय की गरम मसाल्याऐवजी काळा मसाला वापरला तर चव खुप छान येते.
प्रथमच log-in झाले आहे
प्रथमच log-in झाले आहे
मस्तच. मी डाळ न घालता आणि
मस्तच. मी डाळ न घालता आणि सगळ्या भाज्या घालून करते. आता डाळ घालून करून बघते.
अशीच बाजरीची भरड आणी मुगाच्या
अशीच बाजरीची भरड आणी मुगाच्या डाळीची खिचडी पण छान लागते, फक्त बाजरीची भरड थो डा वेळ भिजत ठेवावी लागते.
मस्त आहे ही रेसिपी! सोपी आणि
मस्त आहे ही रेसिपी! सोपी आणि पटकन जमणारी.
सोपी वाटते आहे पाकृ....आणि
सोपी वाटते आहे पाकृ....आणि हेल्दीपण आहे.
आज केली होती. छान झाली होती
आज केली होती. छान झाली होती सालासहीत डाळ नव्हती म्हणून मोड आलेले मूग घातले.
छान आणि सोप्पी वाटत्ये पाकृ.
छान आणि सोप्पी वाटत्ये पाकृ. पण कच्चा मसाल मला पण कळल नाही. गोडा टाकुन बघेन.
कालच केली दलिया खिचडी.. मस्त
कालच केली दलिया खिचडी.. मस्त झालेली. मी आपली साधीच मुगडाळ घातली.
मिही आज केली ही खिचडी, मस्त
मिही आज केली ही खिचडी, मस्त लागते आहे. धन्स अल्पना
अग आमच्याकडे आई नेहेमीच्या
अग आमच्याकडे आई नेहेमीच्या खिचडीसाठी काळा मसाला / गोडा मसाला नाही वापरत. कच्चा मसाला वापरते (पुलाव साठी पण तोच वापरते, बहुतेक अन्नपुर्णामधल्या पुलाव मसाल्याच्या प्रमाणानुसार करते) नक्की प्रमाण माहित नाही. मी तिच्याकडूनच घेवून येते.
गोड्या मसाल्याने पण छानच होते खिचडी.
दलिया आधी भिजवुन ठेवावा लागतो
दलिया आधी भिजवुन ठेवावा लागतो की तसाच फोडणीत परतुन घेतला तरी शिजतो ?
काल केलेली ही खिचडी मी.
काल केलेली ही खिचडी मी. माझ्याकडे पण पिवळी ( सालीशिवाय) मूगडाळ होती - तीच घातली. अन फ्लावर नव्हता म्हणून लाल अन हिरव्या फुग्या मिर्च्या घातल्या. मस्तच झाली एकदम. पुढच्यावेळेस प्रेशर पॅन मधे न करता साध्या भांड्यात करून बघणार.
दलियाच्या ऐवजी तांदूळ वापरले.
दलियाच्या ऐवजी तांदूळ वापरले. दलिया नव्हता. बाकी हिच रेसिपी. कच्चा मसाला ऐवजी खडा मसाला वापरला. एकदम मस्त चव.
मी नेहेमी खिचडीत ४ कप पाणी घालयच असेल तर ३ कप पाणि आणि एक कप दूध वापरते. फार छान लागते खिचडी.
अल्पना, गेल्या आठवड्यात दोनदा
अल्पना, गेल्या आठवड्यात दोनदा केली लागोपाठ एकदा नुसतंच पुलाव सारखं केलं होतं डाळ न घालता तेही आवडलं सगळ्यांना. जाम हेवी होतं पण थोडंसच खाल्ल तरी पोट फुल्ल.
तुला धन्नो या रेसिपीसाठी
अल्पना, कालच ही रेसीपी करुन
अल्पना, कालच ही रेसीपी करुन पाहिली.
छान झाली होती.
आर्च, सेम मी पण थोडे दुध घालते खिचडी आणि पुलाव करताना, त्याने छान चव येते.
आज पुन्हा केली ही खिचडी. अशी
आज पुन्हा केली ही खिचडी. अशी लसूण खोबरं घातलेली डाळ-तांदुळ खिचडी मला एरवीच खूप आवडते. ही पण आवडायला लागलीये. ट्रॅडिशनल ओट खपवायला म्हणून एक वाटी दलिया बरोबर अर्धी वाटी ओट घातले. चवीत अर्थातच फरक पडला नाही.
ओटच्या आयड्याबद्दल आर्च (आणि रुनी ?) ला धन्यवाद
अल्पना, आज केली ही खिचडी.
अल्पना, आज केली ही खिचडी. मस्त झाली एकदम. फक्त मी कुकरला न शिजवता वाफेवरच शिजवली.
मस्त कृती आहे.
मस्त कृती आहे.
मस्त झाली होती!!! वाफवून
मस्त झाली होती!!! वाफवून केली. पण कच्चा मसाला म्हणजे काय? मी त्यात काळे मिरे, सिनॅमन आणि पान टाकलेल.
कच्चा मसाला म्हणजे खिचडी
कच्चा मसाला म्हणजे खिचडी किंवा पुलावाचा मसाला. हा मसाला करताना मसाल्याचे पदार्थ भाजत नाहीत. सहसा मी ताजाच करते हा मसाला १-२ वेळा पुरेल इतका.
मी ह्या प्रमाणात करते - ४ चमचे धणे, २ चमचे जीरे, १ चमचा शहाजीरे, ४-५ दालचीनीच्या काड्या, २ मोठ्या विलायच्या, ३-४ छोट्या वेलच्या, ३-४ लवंगा, ४-५ काळे मिरे, २ तमालपत्राची पानं. सगळे पदार्थ एकत्र करुन कच्चेच मिक्सरमध्ये कुटून घ्यायचे. मसाला तयार.
माझी मुलगी लहान असताना पोळी
माझी मुलगी लहान असताना पोळी खयचीच नाही तेव्हा मी हा पर्यायी गव्हाचा करयाची . खूप छान लागते ही खिचडी!.
आज बर्याच दिवसानी करून बघते!