अजुन एक water colour

Submitted by lopamudraa on 31 March, 2008 - 16:38

chitra.jpg

गुलमोहर: 

आवडलं लोपा,
लाकडी दरवाजा, त्याला लागुन असलेले लाकडाचे कंपाउंड, वीटा सगळ्याचाच पोत छान वाटला मला.

मस्तच,
लोपा,
कुठल्याही चित्रातील एखाद्या पृष्ठभागाचा पोत तू नेहमीच छान पकडतेस. अगदी हात फिरवावासा वाटतो.

खूप छान लोपा,

उठावदार रंग, काचेची तावदानं आणि सावल्या सुद्धा खूप छान !

thank you दिनेशदा, रुनि,लालु,आणि सोन्चाफा..
मागच्या वेळी मृणालिनी ने चित्राचा अर्ध्यात फोटो टाकायला साण्गितला होता. पण नव्हता काढलेला ,
म्हणुन थोडे सांगते. सगळ्यात आधी चित्रात विटांमध्ये masking fluid लावुन घेतले . याला बह्रपुर पेशन्स आणि वेळ लागतो. ( जो माझ्यकडे नसल्याने मी ह्या कामाला अर्धा दिवस लावला)
त्यानंतर एक raw sienna chaa wash दिला. मग फरशी त्यासाठी ultraa marine madhye crimson mix केला. सावलीसाठी सुधा हाच रंग वापर्ला. थोड्या dark सावलीसाठी थोडा जास्त अल्ट्रा मरिन टाकयचा. विटांच्या रंगात वेरिअशन साठी सुद्धा हाच रंग टाकयचा . ultraa marine हा रंग खुप उपयोगि आहे, विटांसाठी रऍ सिएन्ना त yello orcher, indian yello , aaNi burnt sienna वापरला. मग मस्किंग फ्लुइड काढुन विटा सार्ख्या कराय्च्या आणि बारकावे दाखवाय्चे.

तुझ्या घराभोवतीचाच भाग आहे का ग हा?
गेल्यावर्शी टाकलेल्या फोटोमधलं काहीतरी आठवतय मला.

किती देखणं काढलं आहेस गं!! खूपच सुंदर...

लोपा,
खूप आवडलं हे चित्र! एका रंगाच्या विविध छटा फार परिणामकारकपणे वापरल्या आहेस.

लोपा, सुरेख आहे चित्र. आणि तु दिलेले रंगाचे combinations पण आवडले.

उजव्या बाजुची जी खिडकी आहे, त्या खिडकीखालची भिंत थोडी उढे कलल्या सरखी वाटतेय तो फोटोचा दोष आहे की ती भिंतच तशी आहे?
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

हेम्स, शैलजा thank you very much.
कराडकर.. thank you very much.. ( ती भिंत म्हणजे माझा कंटाळा आहे:) kasaa to aataa discribe naahi karat:)
shymali te back yard naahiye.

लोपा मस्तच आलय चित्तर. Happy सुंदर. आत्ता कळले कुठे गायब होतीस ते.

मस्तच आहे हे चित्र... तू कुठे शिकलीयेस की मुळातच कला आहे हे तुझ्यात? किती दिवस लागलेत तुला हे पूर्ण करण्यासाठी?
-प्रिन्सेस...

कांदेपोहे, मीनु आणि पूनम thank you very much...
पूनम अग इथे आता शिकतेय मी हे english water colour आहेत. एक दिवस उठत बसत लागला.:) ,पुर्वि मी फक्त oil land scapes and abstract कराय्चे.

लोपा......... खूपच सुरेख आहे गं चित्र...... !! फारच natural आलंय. मान गये तुस्सी Happy

लोपा,
चित्र अगदी छान आहे...
वॉटर कलर असुनही अतिशय टवटवीतपणा आलाय चित्रामध्ये..
छान!
Happy

लोपा, अप्रतिम!!! खुप सुंदर Happy
बरेच दिवसात फिरकली नाही ईथे तर लक्षच गेलं नाही. डिटेलिंग आणि पोत तर फारच सुंदर जमलय. मस्त Happy पण एक सांगु का यात पण उजव्या बाजूची खिडकीचे पर्स्पेक्टीव थोडे चुकलय. वरचे छ्प्पर आहे त्याला समांतर हवं ना? तुला कळल असेलच. एवढ्या देखण्या चित्राला तिथे थोडे गालबोट लागते म्हणून सांगितले.

हाय लोपा,
tuzhe painting khup sahi aahe..its awsome
mala land scape painting chi khup aavad aahe...
i would have loved to learn it from u...

अप्रतिम आहे...

मस्त.