इमु पालन

Submitted by एजे on 15 January, 2010 - 00:08

ईमु पालन : ईमु ह्या पक्षाला खुप मागणी आहे,त्यांचा वापर मांस, लेदर , तेल तसेच अंडी मिळवण्यासाठी होतो.
प्रकल्पाचा खर्च अंदाजे
दहा जोड्या : ३००,०००
जमीन १-२ एकर : ४००,०००
कुंपण : १००,०००
सालगडी : ७५,०००
पशुखादय (१ वर्ष) : १००,०००

--------------------------------------------
एकून अंदाजे ९,७५,००० ~ १०,००,००० रू

हा पक्षी १८ महिन्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतो.
एक जोडी प्रत्येक हंगामात १०- २० अंडी घालतो. म्हणजे एकून १००- २०० अंडी.
त्याची बाजार कींमत आहे प्रत्येकी १००० - २०००. म्हणजे सरासरी २,२५,००० रू/वर्ष.
ह्या पक्षाचे आयुष्य २०- २५ वर्ष आहे, त्यामुळे २० वर्षापर्यंत उत्पादन मिळु शकते.
जर अंडी उबवून पिल्ले विकल्यास जास्त भाव मिळतो, पण त्यासाठी इन्क्युबेटर घ्यावे लगते.

हा उद्योग भागिदारीत केल्यास कमी भांडवलात उत्तम मिळकत होते.
चला आहे का कोणी तयार.

(माहिती स्त्रोत: माझ्या मित्राच्या अनुभवावरून, तरी काही त्रूटी आढ्ळल्यास सुचना करावी. )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईमु पालन : चांगला व्यवसाय दिसतो.
१) स्थिर कॅपिटल : ७,५०,००० =००
२) खेळते भांडवल : २,५०,००० =००
स्माल स्केल इंडस्ट्रीज मध्ये समावेश झाला तर ३५ टक्के सबसिडी मिळू शकते.

गंगाधरजी, खेळते भांडवल २००,००० - २५०,००० रू होईल, कारण पक्षी पण स्थिर कॅपिटल मधे येतील (२० वर्षासाठी) Happy

इमु पालनः मी सध्या सुरु केलेल्या दुध व्यवसायाकडुन शेतकर्‍यांचे लक्ष लगेचच दुसरीकडे लगेच वेधले जाउ नये म्हणुन बॅक बर्नर वर ठेवलेला व्यवसाय आहे. कारण शेतकरी अन मेंढी ह्यात एक साम्य असते- एक मेंढी एका खड्ड्यात पडली कि सगळ्या मेंढ्या तिच्या मागे त्याच खड्ड्यात पडतात. असो. जमीण, कुंपण, सालगडी माझेकडे आहेत, त्यामुळे हा प्रयोग/व्यवसाय मला सहज करता येणार आहे. हा प्रयोग २०१२ ला प्रत्यक्षात येईल.

इमु पालना मध्ये अंडी खरेदीची हमी हा महत्वाचा मुद्दा आहे. बारामतीला काही शेतकरी नर-मादी जोडी ची विक्री करतात. तेच शेतकरी अंडी खरेदीची हमी घेतात.

माझ्या गावी एका मित्राने ससे पालन सुरु केले होते. परंतु त्यात तो फसला कारण ससे/मांस खरेदीची हमी घेतलेले लोक पळुन गेले. ते प्रकरण सध्या वृत्तपत्रांत गाजते आहे. सुरुवातीला इमु पालन मध्ये ही हाच धोका होता अन म्हणुन मी त्यावेळी हा प्रयोग टाळला.

कमी खर्चात्/कमी कष्टात करता येणारा हा उद्योग आहे. इमु खुप शांत अन अगदी काहीही खाणारा पक्षी आहे.
(इमु ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. इथल्या संसदेवर इमु अन कांगारु च्या प्रतिमा आहेत. इमु अन कांगारु ला उलटे चालता येत नाही. एकदा पाउल पुढे टाकले कि टाकले, माघार नाही! अन म्हणुन ते इथले राष्ट्रीय प्राणी-पक्षी आहेत! :स्मित:)

आपल्याकडे डुक्कर आहे ना. तो पण सरळच पळतो.त्याला इकडे तिकडे वळता येत नाही,जे आडवे येईल त्याला तुडवुन पुढे पळतो आणि त्याचे खाण्यापिण्याचेही चोचले नाही. अगदी आपल्या नेतेमंडळींसारखा.. Sad
आपले पण राष्ट्रीय प्राणी-पक्षी बदलायला हवेत.:स्मित:

एक जोडी प्रत्येक हंगामात १०- २० अंडी घालतो. म्हणजे एकून १००- २०० अंडी.
त्याची बाजार कींमत आहे प्रत्येकी १००० - २०००. >>> अंड्याची किंमत २००० रु. , कशासाठी वापरतात ही अंडी किंवा हे पक्षी ?

इमुपालन पुण्याच्या जवळ बघायचे झाल्यास, खडकवासल्याहून पानशेतकडे थोडे पुढे गेल्यावर खानापुरपाशी एक फाटा डावीकडे वळतो, तो आख्ख्या सिंव्हगडाला वळसा मारुन मधे पाबे घाट पार करुन थेट विन्झर जवळ पाबे या गावापाशि जातो. तर या रस्त्यावर साधारण आठ दहा किलोमीटर वर उजव्याहाताला रस्त्याकडेलाच इमुपालनाचा फार्म आहे. या फार्मचा मालक कुणी मराठी माणूस माझ्या मित्राचा मित्र आहे. माझा मित्र या फार्मवर जाऊन आला होता. तिथे प्रत्यक्ष गेल्यास अनुभवजन्य बरीच माहिती मिळू शकेल. (मात्र गेल्या २५ डिसेम्बरला मला येथुन जाताना थाम्बुन विचारपुस करता आली नाही. सुमोचा सायलेन्सर निखळला होता व अन्धार पडायच्या बेतात होता Sad ) याबद्दल मित्राने माहिती दिली होती, पण आपणांस त्या फन्दात पडायचे नाही म्हणून नजरेआड केली नि बरीचशी विसरलो. आता पुन्हा नीट पणे विचारुन घेईन अन सान्गेन.

ससेपालन प्रत्यक्ष बघायचे असल्यास खेडशिवापुर नन्तर सातार्‍याकडे जाताना जो टोल नाका आहे, तिथुन उजवीकडे एक फाटा जातो. त्या गावठी रस्त्याने पाच सहा किलोमीटर आतवर डोन्गर पायथ्यास गेल्यावर तिथे ससेपालनाचा फार्म आहे जो मी प्रत्यक्ष बघुन आलो आहे. (मला नि धाकटीला हौसेखातर ससे पाळायचेत म्हणून). हल्ली येथे रस्त्यावरच सशान्चे विक्रिसाठी प्रदर्शन असते. मला सान्गितलेला दर १८० रुपये किलो असा होता, तर रस्त्यावर ४५० रुपयास जोडी असा सान्गितला गेला.

अजुन एक कमी जागेत व भान्डवलात होऊ शकणारा हटके उद्योग निसुटता माहित आहे तो म्हणजे "जळवान्चे पालन". पण याबद्दल तपशीलवार माहिती काढावी लागेल.

इमु ची ही अंडी प्रोटीन चा सर्वात चांगला सोर्स आहे
मग इमुची अंडी खायची म्हणता ?
थांबा थोडे गणित करुद्या.
एका वेळेसच्या जेवनाला.
प्रत्येकी ४ गुनिला कुटूंबातील ६ माणसे गूनिला २००० प्रती नग
बरोबर फक्त ४८००० रुपये फक्त एका जेवणाला..
काही चुकतय ?

गन्गाधरजी, काहीही चूकत नाहीये. अण्डी जे विकत घेऊन खाऊ शकतील अशान्ना "विकून" पैका करायाचा आहे.
आपल्याच घरात खायची नाहीत! Lol Proud
दूसर म्हणजे ही अण्डि कोम्बडीच्या अण्ड्यायेवढी लहान नसतात! एका अण्डे दोन चार जणान्ना आरामात पुरू शकेल.... अनुभव वा अनुभुती नाही म्हणुन जास्त लिहीत नाही!

माझ्या जावेच्या वडिलांनी दिड वर्षापूर्वी एक प्रयत्न करून बघितला होता औरंगाबादला इमु पालनाचा. त्यांनी विशाखापट्टणम जवळुन पिल्लं आणली होती. २०० पिल्लं १५ दिवस वयाची. परंतू त्यातले एकही पिल्लु जगलं नाही. औरंगाबादमधल्या पशुवैद्यकिय दवाखान्यातल्या कुणालाच उपचार करता आला नाही. तिथे अजून एका व्यक्तीने इमुपालन सुरु केले होते, त्याची मदतही घेतली. परंतू उपयोग झाला नाही.
माझा धाकटा दीर या प्रोजेक्टवर काम करत होता. पिल्लं आणायला तोच गेला होता. नंतरही पिल्लांची देखभाल, इंजक्शन्स देणे वैगरे तोच करायचा.

सॉरी हं - कुणाला दुखवायचा हेतू नाही..
पण आपल्याच घरात पाळलेल्या पक्षाच्या अंड्यांना खाण्यासाठी विकायचं! भयंकर वाटतं हो!
मी असा क्लेम नाही करतेय की शाकाहारात कुणाचा जीव जात नाही.. त्यामुळे मला जे वाटतय ते काही रॅशनल नाही हे ही कळतय. पण कल्पनाच नाही करववत! म्हणजे घरच्या कुत्र्याची पिल्लं म्हणजे आपली नातवंड वाटणार्‍या गटातला प्राणी मी!

(ह्या अशाच फंड्यामुळे कुठलाच व्यवसाय नाही करू शकणार बहुतेक!)

नानबा , कमीत कमी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय तर अजिबात करु नकोस , अंडी न विकल्यामुळे कालांतराने कोंबड्यांना पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. Proud

नानबा , कमीत कमी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय तर अजिबात करु नकोस , अंडी न विकल्यामुळे कालांतराने कोंबड्यांना पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही.
>> अगदी अगदी! आणि परत मी कोंबड्या पण विकणार नाही (नातवंड/पतवंड म्हणून गोंजारत बसणार!)
कालच एका आळीला "कित्ती गोड" म्हणाल्यानं लोकांनी उपहासानं 'तुला ती गोड दिसते? ग्रेट!' म्हणून झालय.. आता इथे जास्त लिहिलं तर माबोवर पण बदनाम होईन!
आणि विषय बदलला म्हणून टिल्लू पण नाराज होईल, त्यामुळे पळते!

इमु -पालन असे टायटल वाचल्यावर म्हाणावेसे वाटले, 'ये इमु इमु क्या है, ये इमु इमु' Lol पन विकि च्या लिन्क्स वर पाहिल्यावर कळ्ले की हा शहाम्रुगासारखा दिसणारा प़क्षी इमू आहे म्हणून्...मी हा अमेरिकेमधे काही ठिकणी पाहिला आहे...हे पक्षी एक रान्ग करुन एका मगोमाग एक उन्च मान हलवत चालत असतात्...अन त्याना शिस्तबद्ध चालताना पाहून वाटते कि अमेरिकेमधले पाद्चारीन्चे नियम त्यानाही माहित आहेत आणि ते नीट फोलो करतात्...पन भारतामधे हा व्ययसाय करने कितपत फायद्यचे आहे? Uhoh

हे इमु इमु क्या है, ये इमु इमु. खुप हसु आले. अच्तुअलि, मल वाटते, हे इमु भारतात जगने अवघद आहे. कसे काय करत असतिल काय माहित?

हा व्यवसाय जितका म्हटला जातो तेवढा उत्तम नाही. एखाद्यालाच क्लिक होत असेल आणि बाकीचे हात पोळून घेत असतील. ज्यांचा क्लिक झालाय अशांचे अनुभव इथे दिले तर बरे होईल.