Submitted by के बालचंद्र on 4 January, 2010 - 09:35
अहो बाबा इकडे या,येवुनी इकडे पहा जरा,
हे चित्र किती छान,हा मित्र किती छान
रोज पहाटे उठतो हा पिंजर्यामधला मिठू
पेरु आंबा डाळींब खातो बोलतो विठू विठू
आई त्याची कुठे असे केविलवाना शोधितसे
डांबुन त्याला पिंजर्यामध्ये दादाला काय मिळतसे?
सोडावे का त्याला? उघडू का दरवाजा?
मिळेल आई बाबा आणि पेरु ताजा ताजा.
अहो डॅडी इकडे या,येवुनी इकडे पहा जरा,
या माड्या किती छान,या गाड्या किती छान
रस्त्यावरती पळती उडवित धुर काळा
नाकीतोंडी श्वास कोंडला खिचखिच करतो गळा
हे हॉर्न म्हणु की भोंगे? वाजविती जोरानी
हात उचलता कानावरचा कर्कश होई कानी
खेळायाला जाता धुर हॉर्न छळती
चल जाते मिच आता वरच्या माळावरती.
गुलमोहर:
शेअर करा
ही बालकविता कोणीच वाचली नाही.
ही बालकविता कोणीच वाचली नाही.
छान आहे! आवडली
छान आहे! आवडली