हातात होत पेन
डोक्यात होता ब्रेन
कविता लिहिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
सचिनचे आहे नेम
त्याला आहे फेम
फेम-रूप पाहण्यात सर्वकाळ गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजला एक
अजुनी दिवस अनेक
दिवस मोजण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले दोन
मित्राचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले तीन
TV वर आले Bean
बीनला हसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले चार
लिहायचे होते सार
विचार करण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले पाच
खेळण्यात फुटली काच
ओरडा खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले सहा
sms आले दहा
उत्तर देण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले सात
पाहुणे आले घरात
उठबस गप्पात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले आठ
मराठीचा वाचला पाठ
अर्थ समजण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले नउ
आता काय मी करू
भोजनात माझा एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले दहा
झोप किती आली पहा
दप्तर भरण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले अकरा
गादीवर हातपाय पसरा
गजर लावण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळ्यात वाजले बारा
अभ्यासाचे ही तीन्-तेरा
स्वप्ने पाहण्यात एवढा वेळ गेला
मी नाही अभ्यास केला ..
माझ्या दहावीतल्या मुलाने
माझ्या दहावीतल्या मुलाने केलेली बालकविता-पहिलीच!
त्यात शेवटची २-३ कडवी भर घालून केलेले हे विडंबन.
गंमत म्हणजे त्याला मूळ कविता लक्षातच नाही;
(पण मनात असावी म्हणून हे विडंबन सुचले असावे!)
विषय अगदी जिव्हाळ्याचा !
भारीच, खरच जिव्हाळ्याचा विषय
भारीच, खरच जिव्हाळ्याचा विषय आहे मुलांचा
छान आहे. मी हि कविता एकलेली
छान आहे.
मी हि कविता एकलेली अशी आहे. मूळ कविता आहे की नाही माहित नाही.
घड्याळात वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
घड्याळात वाजले दोन
बाबांनी केला फोन
फोन घेण्यात एक तास झाला
मी नाही अभ्यास केला....
घड्याळात वाजले तीन
आईची हरवली पीन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
घड्याळात वाजले चार
आईने दिला मार
मार खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
घड्याळात वाजले पाच
आईने केला नाच
नाच बघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
घड्याळात वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला..
घड्याळात वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
ईतकेच माहित आहे. माझ्या मुलाला कधी कधी एकवते....
छान आहे.!
छान आहे.!
अलका आणि जुई, दोन्ही कविता
अलका आणि जुई, दोन्ही कविता छानच आहेत. कुठुनकुठुन सबबी शोधून काढण्यात ही छोटी मंडळी अगदी बिलंदर, उस्ताद असतात हे खरं!!
टू गूड
टू गूड
जुई, धन्यवाद, बहुधा तीच मूळ
जुई, धन्यवाद, बहुधा तीच मूळ कविता असावी.
स्मिता, गंगाधरजी,डुआय, धन्यवाद.
एमकेजी, आपला बालकविता लिहिण्यात हातखंडा आहे. पूर्वी मी क्रिकेट वर एक कविता केली होती, ती सुद्धा याच मुलाने खेळायला जातो असा हट्ट केला होता, तेव्हा ५-१० मिनिटात लिहिलेली.
मनःपुर्वक धन्यवाद. त्याला सांगते, सर्वांना आवडली तुझी कारणे, आता तरी अभ्यास कर!
धन्यवाद .. छान कविता
धन्यवाद .. छान कविता आठवली...
मल अजून दोन कविता पुसटश्या आठवताहेत, पण कुठेच सापडत नाहीत..
१. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले..
फिरायला चालले फिरायला चालले
जाता जाता चालले जंगलातून
जंगलात दिसले छोटेसे तळे,
छोटासा तलाव , मोट्ठी नदी...
( पूर्ण करा..)
२. गाडीत बसल्या चिमणाताई
गाडीत बसल्या मैनाताई
गाडीत बसले कबूमामा
निशाण वाला पोपट मामा..
गाडी चालली दिल्लिला.
पाहून थांबली बिल्लीला
( पूर्ण करा..)
कोणाला सापडल्यास मदत करा..
आता आम्ही अभ्यास नाही करत
आता आम्ही अभ्यास नाही करत माबो-माबो खेळतो
हे फार आधी केलेले विडंबन
http://www.maayboli.com/node/20043
अट्टू आणि गट्टू फिरायला
अट्टू आणि गट्टू फिरायला चालले..
फिरायला चालले फिरायला चालले
जाता जाता चालले जंगलातून
जंगलात दिसले छोटेसे तळे,
छोटासा तलाव , मोट्ठी नदी...
कुणीतरी हे गाणं पूर्ण कराल का ?
जुई..अगदी अगदी.. माझी मुलगी
जुई..अगदी अगदी.. माझी मुलगी के जी त असताना ही कविता तू लिहिली तशी शाळेत शिकवली होती तिला..
नवीन वर्डिंग पण छानै
.
.
मी शारदाश्रम विद्यामंदिर,
मी शारदाश्रम विद्यामंदिर, दादर-२८ येथे शिकत होते...
शाळा मोट्ठी..सकाळ व दुपार च्या वेळेत मुलांची व मुलींची भ्ररायची...
'अभ्यर्चन' नावाचे एक वार्षिक निघत असे...विध्यार्थ्यांचेंच साहित्य यात लिहिलेले असे...
अगदी सर्व विध्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेआधी विनामुल्य देत असत...
मी दुसरी वा तिसरीत असताना (१९७५ / १९७६) उपरोक्त कविता होती...
माझी तर तोंडपाठ होतीच.. तशीच बरयाचजणांची...
लहान मुलांना घड्याळातले सकाळ्चे, दुपारचे, संध्याकाळ्चे व रात्रीचे कोणाला,
किती व कधी म्हणावे ते सहज कळ्त असे...
हि ती पूर्ण कविता...
सकाळचे वाजले अकरा
बागेत मारल्या चकरा
चकरा मारण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
दुपारचे वाजले बारा
गाईला दिला चारा
चारा भरवण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
दुपारचा वाजला एक
आईने दिला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
दुपारचे वाजले तीन
आईची हरवली पीन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
दुपारचे वाजले चार
आईने दिला मार
रड्ण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
संध्याकाळचे वाजले पाच
आईने शिकवला नाच
नाचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला..
संध्याकाळचे वाजले सात
आईने शिजवला भात
खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
रात्रीचे वाजले आठ
पाण्याचा फुटला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
रात्रीचे वाजले नऊ
आईचे सांडले गहु
निवडण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला...
रात्रीचे वाजले दहा
मी झोपलो पहा (मी झोपले पहा)
सगळा दिवस असा तसा गेला
मी नाही अभ्यास केला...
भन्नाट !
भन्नाट !