भाग १ : तीर्थक्षेत्र तीथवाल

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 02:15
तीथवाल

निवांत ट्रॅव्हल ब्लॉग्ज वाचत राहणे आणि आवडलेल्या ठिकाणांसाठी ट्रीप प्लॅन करणे हा छान पासटाईम आहे आमच्याकडे. भले ती ट्रीप घडो व ना घडो. असाच एक ब्लॉग वाचत असताना शोध लागला तो कर्णाह व्हॅलीचा आणि कृष्णगंगा नदीचा. कर्णाह व्हॅलीत नेमकं कुठं जायचं तर तीथवाल. उत्साहाने नवऱ्याला तो ब्लॉग दाखवल्यावर त्याचेही डोळे चमकले. कधी तरी इथे जायचे याची
खूणगाठ त्याच क्षणी मनाशी बांधली गेली. मुलगी तेव्हा लहान होती. त्यामुळे कधी तरी हे लांब असणार आहे याची जाणीव होतीच.

तेवढ्यात कोविड आला. सगळ्यांचीच सगळी गणितं उलटी पालटी झाली.

कोविड संपला, ३७० गेलं आणि कुठून तरी न्यूज आली की तीथवालला म्हणे काश्मीरी पंडितांच्या आग्रहाने शारदा मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. हे काहीतरी नवीनच होतं. शारदा पीठ तर पाकव्याप्त काश्मिरात आहे ना? शारदा कॉरिडॉरची वाट न बघता आहे त्यात समाधान मानून घ्यायचे ठरवले काय लोकांनी? तसं तर तसं. ती शारदेची मूर्ती म्हणे शृंगेरी मठात घडवलीय आणि वाजत गाजत तीथवालला जाणार आहे. मला परत प्रश्न पडला की काश्मिरी पंडित शारदेची मूर्ती कर्नाटकातून का नेत असावेत?? तोपर्यंत मूर्ती पुण्यात पोहोचली होती. नवरा अनायासे पुण्यातच होता. तीथवालला जाऊ तेव्हा जाऊ, सध्या विश्रांतवाडीला जाऊन ये म्हटलं. नवरा गेला. तिथे त्याला सेव्ह शारदा समितीचे लोक भेटले. प्रसाद आणि पॅम्प्लेट घेऊन परत आला तेव्हा समजले की शारदापीठाशी संबंधित एक मंदीर भारतातच होते.

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@जिज्ञासा >>> क्रमशःच आहे. पण मला त्यात अनुक्रमणिका किंवा पुढच्या भागाची लिंक टाकताना एरर येते आहे. त्यामुळे आधी सगळे भाग टाकून मग लिंक करण्याचा प्रयत्न करेन

मस्त! वाचतोय.
शेवटी नुसती हाताने पुढच्या भागाची लिहिलास तरी आत्ता चालुन जाईल.

छान सुरुवात.
फोटो सुंदर.
त्या कर्णाह व्हॅलीचा आणि कृष्णगंगा नदीचा आणि एकंदरीत परिसर कसा असेल ते जाणवतेय.