मभागौदि २०२५ शशक - मोह - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2025 - 09:08

'आलास संभ्या, ये ये! अलाबला घिऊ दे तुजी!' म्हातारीनं त्याला जवळ बोलावलं. त्याच्या आठवणीत कायम तिला माजघरातच पाहिली असली, तरी ती त्याची पणजी नाही हे त्याला माहीत होतं. कधी आईला विचारलं तर ती 'तुला कशापायी चौकशा? त्या हाइत म्हून आपन हाओत!' एवढंच म्हणायची. पण त्याची शहरातली नोकरी सुटून तो परत आला, तेव्हा गणा मांत्रिक म्हणाला 'ती लासवट हाय, तंवर आसंच! तुज्या खानदानाला खाऊन बसली, तुला बी गिळंल! शाना आसशील तर येत्या अमुशेला...'.
म्हातारी कानशिलांवर बोटं मोडत असतानाच त्याने हातातली सुरी तिच्या फासळ्यांत खुपसली. ती जागीच कलंडली, तिच्या कनवटीची पुरचुंडी सुटून त्यातून सोन्याच्या मोहरा बाहेर घरंगळल्या... आणि त्याच्या डोळ्यांदेखत... अदृश्य झाल्या!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
मस्त.
आणि हा नक्की कोणता रिपु म्हणायचा?

>>> सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीची गोष्ट आठवतीय मला
बिंगो! Happy

छल्ला, हा मोह (म्हणजे काल केकूंनी दाखवून दिल्यानुसार संमोह/संभ्रम/मायामोह वगैरेंपैकी) - असा विचार होता. Happy

मस्त.
मला कोंबडी आणि आपला हस्तर पण आठवला.

मस्त.
लोभी...मलापण तुंबाड आठवला .

मस्त रचलीय.
कोंबडी आणि आपला हस्तर> +१

सर्व अभिप्रायदात्यांचे आणि संयोजकांचे अनेक आभार! Happy

अमित, ‘तुंबाड’ मी पाहिलेलाच नाही हे आठवलं त्यावरून - बघेन आता. Happy
माझ्याच कथेवरून काढलाय होय लबाडांनी! Proud

मस्त जमली आहे.
मलापण तुंबाडमधील म्हातारी आठवली