मभागौदि २०२५: लहान मुलांसाठी खेळ: अक्षरचित्रे

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 22 February, 2025 - 08:34

कसे आहात बच्चे मंडळी? मजेत ना?

अभ्यास करताय ना? काय म्हणता ? अभ्यासाचा कंटाळा आलाय ?

तुमचा कंटाळा घालवण्यासाठी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक मस्त उपक्रम - अक्षरचित्र
अक्षरचित्र म्हणजे अक्षरांपासून बनवलेली चित्रं. पण ही अक्षरं देवनागरी हवीत बरं का!

तुमची कल्पनाशक्ती लढवून तुम्ही एका अक्षरापासून कितीही चित्रे बनवू शकता. उदाहरण म्हणून ही पहा दोन चित्रे.

PHOTO-2025-02-22-15-57-14.jpg

चला तर मग! लागा तयारीला. मस्त मस्त चित्रे तयार करा, रंगवा आणि आम्हाला पाठवा. आम्ही वाट पाहतोय.

नियम -
१. 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे.

२. हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही. हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.

३. वयोगट - 15 वर्षे पर्यंत.

४. धाग्याचे नाव "मभागौदि २०२५ - अक्षरचित्र - पाल्याचे नाव - मायबोली सदस्यनाम किंवा खरे नाव (ऐच्छिक ) अशा प्रकारे द्यावे.

५. एक सभासद एकापेक्षा अधिक प्रवेशिका देऊ शकतो.

६ . प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत : अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत.

छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही काढलेली छान छान चित्र ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झ का स !
खूपच छान उपक्रम.

लग्गेच ५-६ चित्रं सुचलीत पण अटींमधे “वयोगट - 15 वर्षे पर्यंत” हे वाचले अन् खट्टू झालो.

मानसिक वय कंसिडर कराल का ?