माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.
त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
माझा मुद्दा असा होता की ज्या
माझा मुद्दा असा होता की ज्या मुलाने धंध्यात उमेदवारी केली नाही तो पैसे मागतो त्यास देऊ नये. ( काही व्यापारी आपल्या मुलांना आपल्याच धंध्यात ठेवण्या अगोदर दुसऱ्याकडे कामाला ठेवतात. ) आइवडलांनी नोकरीत पैसे कमवून साठवून ठेवलेले ते आयते मुलांना धंध्यात 'टाकण्यासाठी' देऊ नये. बाकी इतर छप्पन उदाहरणांशी काही संबंध नाही.
भारत सरकार नी एक अभ्यास केला
भारत सरकार नी एक अभ्यास केला आहे त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत .
अशिक्षित लोकांत बेरोजगारी चे प्रमाण 1 % पेक्षा कमी आहे .
पण शिक्षित लोकात बेरोजगारी चे प्रमाण 17% पेक्षा जास्त आहे.
आताची पिढी समजदार आहे ह्या विरुद्ध ही रिॲलिटी आहे.
भारताची आता ची पिढी वयाच्या
भारताची आता ची पिढी वयाच्या तीस वर्षा पर्यंत आई वडील वर अवलंबून असते
ही आताची पिढी समजदार आहे हे वाक्य च पूर्ण चुकीचे आहे..
भासमय जगात वावरणारी,रिॲलिटी पासून लांब गेलेली आताची भारताची जवान पिढी देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे ह्याची खात्री देत नाही.
सर्वात जास्त जवान लोकसंख्या असलेला भारत म्हणून अभिमान वाटण्यासारखे काही नाही.
फक्त संख्या जास्त आहे पण लोकसंख्येचा दर्जा खूप खूप खालच्या दर्जा चा आहे.
बौध्दिक,शारीरिक आणि बाकी सर्व युनिट वर.
आताची पिढी हुशार आणि समजदार
आताची पिढी हुशार आणि समजदार आहे
उदाहरण म्हणून.
ऑटोमोबाईल मध्ये मास्टर डिग्री घेतलेल्या मुलांना 100 kg लोखंड ध्या.
इंटरनेट बंद करा.
आणि स्वतःच्या बुद्धी नी कोणतेही वाहन बनवायला सांगा.
ते सांगतील त्या प्रकारचे पार्ट फक्त एकदाच बनवून दिले जातील
साधी बैल गाडी पण त्यांना बनवता येणार नाही.
आयएएस ,आयपीएस हुशार हा आपला असाच भास आहे .
प्रतेक क्षेत्रात काम करणाऱ्या आयएएस ,आयपीएस ह्यांना त्या मधील किती माहिती आहे ,त्यांनी रिअल मध्ये त्या क्षेत्रात काय प्रगती केली आहे ..
ह्याचे ऑडिट जागतिक स्तरावर करा.
एक नंबर चे अडाणी आहेत आयएएस आणि आयपीएस हे सिद्ध होईल.
फार चुकीच्या क्रायटेरिया
फार चुकीच्या क्रायटेरिया ठेवल्यात हो परिक्षा घ्यायच्या.
पूर्वी स्वयंवरात माशाचा डोळा फोडायला वगैरे सांगायचे , मग तसे जमले नाही तर आजचे सगळे नवरे नापास का ?
आजचे काम जर प्रगत यंत्रावर आहे , तर ती न वापरण्याचे बंधन का घालावे ?
डिग्री घेतलेला बाद , आयएएस बाद , मग कुणाला अन कसली पोस्ट देणार ?
एक नंबर चे अडाणी आहेत आयएएस
एक नंबर चे अडाणी आहेत आयएएस आणि आयपीएस हे सिद्ध होईल. ??
मुळात डोके चालवण्यासाठी तो वर्ग / पद नसून मंत्री /सरकारने ठरवलेले धोरण अंमलबजावणी करण्यासाठी आहे. त्यांनी धोरण ठरवण्याची अपेक्षा नाही. ते काम करण्यासाठी देशाचा इतिहास भूगोल, स्थानिक जनतेची भाषा, आर्थिक स्थिती याची माहिती असावी आणि ती आहे का याची परीक्षा असते.
मंत्री लोकांना धोरण
मंत्री लोकांना धोरण ठरवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती, धोरणाचे /निर्णयाचे परिणाम सांगणं हेही आय ए एस ऑफिसर्स करत असतील ना. वेगवेगळ्या खात्यांचे सचिव मुळातले आय ए एस ऑफिसर्सच असतात ना?
सर्व बाजूंनी विचार करून पटपट
सर्व बाजूंनी विचार करून पटपट निर्णय पण घेता यायला लागतात.
हेमंत33, गेले 3-4 दिवस
हेमंत33, गेले 3-4 दिवस तुमच्या पोस्ट्स वाचते आहे. केवढी ती negativity. केवढा कडवटपणा. पुर्वी कोणकोणत्या बाफवर तुमच्या पोस्ट्स वाचायचे, कडवट शब्दात लिहिता, पण काही मुद्दे पटायचे. विचार वेगळे वाटायचे. पण या धाग्यावर फारच एकांगी आणि कडवट विचार करताहात. सरसकट तरुण पिढी एवढी काही निकम्मी आणि स्वार्थी नाही.
आमच्या भागात स्टेशनसमोर,
आमच्या भागात स्टेशनसमोर, रेस्टॉरंटबाहेर, चर्चबाहेर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आल्यासारख्या दिसणार्या वृद्ध व्यक्ती पथारी टाकून पडलेल्या , बसलेल्या दिसतात
. त्यांची मुलं पण जास्त शिकून शहरी मध्यमवर्गीय झालेली असतील.
माझ्या बोलण्यात कडवट पना आहे
माझ्या बोलण्यात कडवट पना आहे हे मान्य आहे.
पण तेच घडतं आहे.
भारतात त्याचे प्रमाण जास्त आहे.
काल्पनिक जगात पिढी वावरत आहे ..
भारताला त्याच्या ताकतिचा विसर पडला आहे.
पहिल्या पिढीतील कोणाला ही विचारा वयाच्या कमीत कमी १६ vya वर्षी किंवा जास्तीत जास्त पंचवीस व्हया वर्षी त्यांनी कुटुंब ची जबाबदारी घेतली आहे.
अवास्तव अपेक्षा नाहीत ,इच्छा पण नाही.
जाहिरात बाजी आणि विविध तंत्र वापरून तरुण पिढी काल्पनिक जगात च राहावी असे व्यावसायिक डावपेच आहेतं
हे काल्पनिक जग सत्य वाटत पण तो एक भास आहे.
Metaverse त्यालाच म्हणतात
.
पुढे हेच तंत्र वापरून जवान मुलांना काल्पनिक जगात ठेवले जाईल.
स्वतःचे प्लस पॉइंट ओळखा.आणि रिअल जगात या
हिंजेवाडी म्हणजे स्वप्न साकार करणारी जागा नाही.
Hinjewadi चे स्वप्न बघून आयुष्य वाया घालवू नका.
एक kg आंबा २.५, लाख ल विकला जातो .
ह्याचे भान ठेवा.
कष्ट करा रिअल जगात रहा.
पुढे स्वार्थी लोक तरुण लोकांस metaverse मध्येच गुंतवून ठेवून स्वार्थ साधतील .
सावध व्हा.
हेच सांगायचे आहे.
लाखात एकाला वीस लाख चे पॅकेज मिळाले आणि त्याच स्वप्नात ९९००० हजार लोक असतील तर कठीण आहे.
हेमंत ही पोस्ट चांगली आहे. पण
हेमंत ही पोस्ट चांगली आहे. पण मला काय वाट्ते सांगू का. आपण कमविलेले जे काही आहे ते अगदीच स्ट्रेंजर च्या हातात सोपवून मरण्या पेक्षा आपल्या ओळखीच्या व आपण चांगल्या व्हॅल्युज देउन वाढविलेल्या आपल्याच मुला बाळांना का देउ नये. त्याचे चीज तरी होईल. व मुलांना एक प्रकारे मोठी उडी मारायला मदत होईल प्रत्येक पिढी पुढेच जात असते. आपला कार्यभाग संपला की पेट्रोल संपे परेन्त जगावे व मग मातीत विलीन.
मला तर पुढील जन्मात व्हेल व्हायचे आहे बुवा. किंवा बाओबाब् वृक्ष.
तेच तर
तेच तर
अपने बच्चे के बारे मे सोचो शिवगामी
आयटीसेल, कंगनाच्या नादी लागून
आयटीसेल, कंगनाच्या नादी लागून नेपोटिजम, नेपोटिजम ओरडणारे लोक काय करणार आहेत? आपला पैसा, घरदार, नेटवर्कचे फायदे मुलांना मिळु देणार की " डिझर्विंग, गरजु" ला देणार?
की नेहमीप्रमाणेच दुटप्पीपणा? मी माझ्या पोरांना सर्वतोपरी मदत करणार पण माझ्यापेक्षा श्रीमंताने केले तर नेपोटिजम म्हणून ओरडणार?
>>आपण चांगल्या व्हॅल्युज देउन
>>आपण चांगल्या व्हॅल्युज देउन वाढविलेल्या आपल्याच मुला बाळांना का देउ नये<<
डिसेंडंट मधे जॉर्ज क्लुनी सांगुन गेलाय - गिव योर किड्स इनफ मनी टु डु समथिंग, बट नॉट इनफ टु डु नथिंग...
True true
True true
सचिव माहिती सादर करतात पण
सचिव माहिती सादर करतात पण अंतिम निर्णय मंत्री आणि सरकारचा धरतात. असं नसतं तर गरीबरथ गाडी अर्ध्या तिकिटात आलीच नसती.
मित्राने पुढे काय केले?
मित्राने पुढे काय केले? retirement घेतली का?
गिव योर किड्स इनफ मनी टु डु
गिव योर किड्स इनफ मनी टु डु समथिंग, बट नॉट इनफ टु डु नथिंग...>> परफेक्ट.
हा धागा आज चाळताना पडलेले
हा धागा आज चाळताना पडलेले प्रश्न -
अमेरिकेत आणि भारतात गुंतवणुकीवर मिळणार्या परताव्याचा दर rate of ROI आणि सारख्या राहणीमानाला दोन्ही ठिकाणी येणारे खर्च यात किती फरक असेल.
परतोनि आल्यावर किती खर्च येईल असा एक धागा होता, तो वाचल्यावर मला मी दारिद्र्यरेषेखाली आहे, असं वाटू लागलं होतं.
Pages