कॉर्न फ्लेक्स
मिरची,
आलं,
कांदा,
टोमॅटो,
कोथिंबीर,
भाजलेले शेंगदाणे,
धणे जिरे पूड,
मिरची पूड,
फोडणीसाठी मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, तेल
पाणी
कढईत थोड्या जास्त तेलात फोडणी करून त्यात मिरची, आलं, कांदा, टोमॅटो परतून घ्या. थोडे भाजलेले शेंगदाणे घालून परतून घ्या.
त्यावर धणे जिरे पूड, मिरची पूड घालून मिसळून घ्या.
मग कॉर्न फ्लेक्स घालून सगळा मसाला त्याला नीट लागेल असे मिसळून घ्या.
आता महत्त्वाची स्टेप आहे. साधारण ३:१ प्रमाणात पाणी घ्या. म्हणजे तीन वाट्या कॉर्न फ्लेक्स असतील तर एक वाटी पाणी घ्या.
कढईतल्या मसाला कॉर्न फ्लेक्सवर पाणी घालून कॉर्न फ्लेक्स पाण्यात नीट भिजवून घ्या.
एक वाफ आली की वरून अंदाजाने मीठ घालून नीट मिसळून घ्या. आणि झाकण ठेवून एक दोन वाफा येऊ द्या.
वरून कोथिंबीर घालून, लिंबू पिळून खायला घ्या.
पाण्याचे प्रमाण Kellogg's कॉर्न फ्लेक्स साठी परफेक्ट आहे. लोकल, लुजमध्ये घेतलेले कॉर्न फ्लेक्स असतील तर कदाचित पाणी जास्त घालावे लागेल. पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे कारण पाणी कमी पडले तर कॉर्न फ्लेक्स चामट होतात आणि जास्त पडले तर लगदा होतो. शक्यतो
मीठ पाण्यात फ्लेक्स थोडे शिजले की मगच घाला. पाणी घालायच्या आधी मीठ घातलेत तर फ्लेक्स नंतर आकसून कमी होणार आहेत हे लक्षात ठेवून मीठ घाला.
हेच मक्याचे पोहे मिळतात
हेच मक्याचे पोहे मिळतात बाजारात, त्याचे ट्राय केले तर?
आधी पोह्यांप्रमाणे चाळणीत निथळून करुन बघता येईल...
मी कधी करून पाहिले नाहीत.
मी कधी करून पाहिले नाहीत. मक्याचे पोहे कधी वापरले नाहीत. त्यामुळे कल्पना नाही. तुम्ही करून पाहिले तर नक्की सांगा.
छान, रागी फ्लेक्सचे करतो असे,
छान, रागी फ्लेक्सचे करतो असे, त्यात टोमॅटो नाही घालत आता घालुन पाहीन.
मक्याचे पोहे आणि कॉर्न फ्लेक्समध्ये काय फरक आहे?
उपयुक्त रेसिपी करून बघणार
उपयुक्त रेसिपी
करून बघणार
मानव, मला कल्पना नाही. मी
मानव, मला कल्पना नाही. मी बहुतेकदा जे पोहे मक्याचे पोहे म्हणून पाहिले आहेत ते नॉयलॉन पोह्यांसारखे पातळ पण कडक असे पाहिले आहेत.कधी आणले, वापरले नाहीत. कॉर्न फ्लेक्स त्यापेक्षा जरा जाड असतात असं मला वाटतं.
जाई, एकदम मस्त ब्रेकफास्ट आयटम आहे हा. नक्की करून बघ.
मस्त आहे
मस्त आहे
मक्याचे पोहे कच्चे असतात ते तळून किंवा बेक करून वापरावे लागतात. आम्ही हेच आणून तळून त्याचा चिवडा करतो. हेच पोह्यांप्रमाणे भिजवून करता येईल का हे पाहिले नाही कारण ते जरा कडक असतात.
कॉर्न फ्लेक्स म्हणजे हेच असावे पण त्या नावाने रेडीमेड तळलेले किंवा बेक्ड मिळत असावे.
अच्छा, आठवलं बहुतेक पाहिले
अच्छा, आठवलं बहुतेक पाहिले आहेत ते पोहे.
छान सोपी पाकृ!
छान सोपी पाकृ!
मक्याचे पोहे वेगळे आणि कॉर्न फ्लेक्स वेगळे. कॉर्न फ्लेक्स हे रेडी टू इट असतात. भिजवणे, शिजवणे करायची गरज नाही पण तसे करता येते. थोडक्यात आपल्या नेहमीच्या पोह्यांसारखे. मक्याचे पोहे नुसतेच खाता येत नाहीत.