Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57
आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिनी मातीच्या कप बशीला खूप
चिनी मातीच्या कप बशीला खूप विरोध होता कारण चीनी मती ची भांडी तयार करताना त्यात हाडांचा चुरा घातला जातो हे कारण असू शकतं.
आमची आजी कधी ही नॉर्मल कप बशीतून कॉफी पीत नसे, तिची सेपरेट स्टील ची कप बशी होती जी गरम कॉफी ओतली की खूप गरम होई.
होय, बोन चायना असे explicit
होय, बोन चायना असे explicit नाव होते
हो माझी आजी सुद्धा पितळी
हो माझी आजी सुद्धा पितळी फुलपात्रात चहा पीत असे.
तीचं चहाच पितळी कानाच पातेल मी घेऊन आलो आहे
तिची चहा द्यायची पद्धत वेगळी होती आधी ती पातेल्यातला कढलेला कोरा चहा फुलपात्राने कपात ओतायची मग त्यात गडूतून दूध ओतायची. मला ही पद्धत नवी होती. बाबांकडे डायरेक्ट दुधाचा चहा कपात गाळायचे.
अवांतर खूप झाले
स्टील ची कप बशी…
स्टील ची कप बशी…
रच्याकने, माझी एक आत्या ९१ वर्ष फक्त दोन भांडी वापरून जगली- चांदीची एक ताटली आणि एक फुलपात्रवजा ग्लास.
चहा, जेवण, न्याहरी सर्व त्यात. पुन्हा पुन्हा धुवून वापरायची.
घरात स्वयंपाकाची भांडी अर्थातच होती पण personal वापर फक्त हा.
रच्याकने, माझी एक आत्या ९१
रच्याकने, माझी एक आत्या ९१ वर्ष फक्त दोन भांडी वापरून जगली- चांदीची एक ताटली आणि एक फुलपात्रवजा ग्लास.>>>>>>> Respect _/\_
कधीच चहा पिण्यासाठी न
कधीच चहा पिण्यासाठी न वापरलेला हा एकमेव मग.
माले शहरात एका परिचित जोडप्याने क्रोकरी-सजावटी सामानाचे पहिलेवहिले दुकान उघडले त्याची मी केलेली बोहनी
आत मालदीवच्या समुद्रातले शंख शिंपले कोरल्स.
बोन चायना माझं आवडत आहे.
बोन चायना माझं आवडत आहे. हिटकारी च्या वस्तू उत्तम असत. पण हल्ली ती कंपनी बंदच झालीय. तसं बोन चायना हल्ली मिळतच नाही. मला अलीकडे मिळतात तसे जाड काचेचे, रंगीत आणि खूप मोठे चिनी मातीचे कप अजिबात आवडत नाहीत चहा प्यायला त्यामुळे शोधून शोधून त्यातल्या त्यात पात्तळ काचेचे , बेसिक पांढऱ्या रंगावर डिझाईन असलेले आणि नॉर्मल साईजचे कप आणत असते माझ्यासाठी.
.. हल्ली ती कंपनी बंदच झालीय…
.. हल्ली ती कंपनी बंदच झालीय…
नाही नाही. Hitkari आहे अजून. Amazon वर दिसतात त्यांचे कप नेहेमी. तुम्ही म्हणता तसे पात्तळ काचेचे पण दिसतात. Old style classic पांढरेही.
घरी बशीत चहा ओतूनच प्यायला आवडते म्हणून फँसी त्रिकोण चौकोन उथळ डिझायनर बश्या चालत नाहीत. हे क्लासिक डीप डिशवाले बेस्ट 👍
हेमाताई, जांभळीजवळ
हेमाताई, जांभळीजवळ पेढ्यामारुतीसमोर काही स्टील आणि क्रॉकरीची दुकाने आहेत. त्यातल्या एका दुकानात बोन चायनाचे कप मिळाले होते मला (दिवाळी-२३). एकदा विचारुन बघा तिथे.
अनिंद्य, किसलेस कप आणि
अनिंद्य, किसलेस कप आणि त्यातले ते कोरल अतिशय सुंदर
विषय जिव्हाळ्याचा असल्याने
विषय जिव्हाळ्याचा असल्याने सचित्र प्रतिसादानेच ह्या धाग्यावर एंट्री मारायची असे ठरवले (आणि धागाकर्त्याला कळवलेही 😀) होते... पण अजून तो योग काही जुळून आला नाही, त्यामुळे तूर्तास फक्त रुमाल तेवढा टाकून ठेवतोय...
सगळ्यांनी दिलेले क्रोकरीजचे फोटोज खूप आवडले आहेत 👍
“किसलेस कप”
“किसलेस कप”
आमच्या एकमेव अनामिकेचे सुंदर नामकरण केलेत माधव.
तुम्हाला बारश्याच्या घुगऱ्या लागू
@ संजय,
Replace the रुमाल with असली माल asap
Replace the रुमाल with असली
"यो यो"... 👍
किसलेस कप आणि रीप्लेस रुमाल
किसलेस कप आणि रीप्लेस रुमाल दोन्ही एकदम छान...
अनिंद्य, माधव थँक्यू.. बघते अमेझॉन वर आणि जांभळी नाक्यावर .
आमचा मुलाला फुटबॉल बघायला (
आमचा मुलाला फुटबॉल बघायला ( आर्सनल चा फॅन आहे तो ) आणि टेनिस खेळायला आवडतं. एक वर्ष त्याच्या वादी ला हा कप आणि फेडरर ची RF अशी लिहिलेली टोपी आणि जरकिन भेट दिली होती.
पूर्वी ग्रामीण भागात
पूर्वी ग्रामीण भागात पितळ्याच्या ताटलीतून "चा" पीत आणि त्या ताटलीला "पितळी" असेच म्हणत.
कप बशीतून चहा पिणे हा उच्चभ्रूंचा विशेषाधिकार होता.
किसलेस कप आणि कोरल आवडले.
किसलेस कप आणि कोरल आवडले.
विषय जिव्हाळ्याचा असल्याने सचित्र प्रतिसादानेच ह्या धाग्यावर एंट्री मारायची असे ठरवले (आणि धागाकर्त्याला कळवलेही ) होते... पण अजून तो योग काही जुळून आला नाही, त्यामुळे तूर्तास फक्त रुमाल तेवढा टाकून ठेवतोय......>>>>>> लवकर पंचांग बघा.
घरी बशीत चहा ओतूनच प्यायला आवडते>>>>>> यासाठी लक्ष लक्ष अनुमोदन. माझ्यासारखं आहे कुणीतरी. मला वाटल की पद्धत लुप्त झाली.
माबोकर मिनोतीकडून घेतलेला हा
माबोकर मिनोतीकडून घेतलेला (तिने केलेला) कप. माझा फार आवडता आहे. निळा-कॉफीकलर हे कॉम्बो सुरेख दिसते. (हुश्श जमलं एकदाचं फोटो टाकायला.)
हा ग्रे + ब्राउन कप आवडला
हा ग्रे + ब्राउन कप आवडला वर्षा.
हँड मेड ची बातच न्यारी.
मस्त कप वर्षा. मिनोतीचे काम
मस्त कप वर्षा. मिनोतीचे काम खूप आवडते मला.
आमच्याकडे कॉफी साठी आम्ही एकसारखे मग वापरात नाही. सगळेजण वेगवेगळे मग घेतात. फक्त पाहुणे ( नातेवाईक सोडून) आले तरच एकसारखे मग.
मिनोतीचे काम खूप आवडते मला >>
मिनोतीचे काम खूप आवडते मला >>> मलाही. माझे ते फुलं असलेले ब्राऊन कप आहेत ना ते तिनेच दिलेत
वा! हा कॉफी रन्गाचा कप फारच
वा! हा कॉफी रन्गाचा कप फारच मस्त आहे.
निळ्या रंगाचा माझा हा आणखी एक आवडता कप
मिनोतीचा कप काय सुरेख आहे. हा
मिनोतीचा कप काय सुरेख आहे. हा निळा मगदेखिल सुरेख.
मेघना, तुमच्या नीलपरीला झब्बू
मेघना, तुमच्या नीलपरीला झब्बू - ही नीलाम्बरी.
… कालांतराने चहापावडर वर कप मोफत मिळू लागले….
ही तशीच आली. हिला एक जुळी बहीण आहे (फोटोत नाही)
Love at first sight होते हे मग. Brook Bond हे सुंदर, टॉप क्वॉलिटी मग प्रमोशन म्हणून देते आहे हे बघून दुप्पट चहा पावडर खरेदी केली.
वय = 12 Years Approx.
Kiss Count = Maybe 3K
ऑफिसमध्ये मैत्रीण समोर बसून
ऑफिसमध्ये मैत्रीण समोर बसून कॉफी पित होती.
फोटो काढायचा मोह आवरला नाही
मेघना, फारच सुंदर कप आहे.
मेघना, फारच सुंदर कप आहे.
अनिंद्य, नीलपरी झक्कास.
स्वस्ति, छान आहे मग.
सुन्दर कलेक्शन आहे सगळ्यांचे.
सुन्दर कलेक्शन आहे सगळ्यांचे.
माझ्याकडे पण बरेच काय काय आहे पण फोटो टाकायला वेळ मिळत नाहीये.
सगळेच कप मस्त.
सगळेच कप मस्त.
कप्स, मग चं मस्त कलेक्शन झालंय.@अनिंद्य मी पण फ्री बाउल मिळतायत म्हणून जास्तीची चहापावडर खरेदी केलीय.माझ्या फोटोतला आईस्कीम बोल फ्रीवालाच आहे
@सावली प्लिज वेळ काढून जेवढे असतील तेव्हडे फोटो टाका.तुमचे क्रॉकरीचे फोटो पाहणं पर्वणी असेल प्रोफेशनल टच जो असेल.
आईने एक क्यूट बोल दिलाय.
आईने एक क्यूट बोल दिलाय. minimalist नक्षी.
या छोटू आऊलमध्ये काय ठेवायचं न कळल्याने सध्यातरी पाईन कोन ठेवलाय.
उल्लू फ़ेवरेट दिसतोय खूप
उल्लू फ़ेवरेट दिसतोय खूप जणांचा.
बोल सुंदर
Pages