कॅनडा, मेक्सिको, चीन या देशातून येणार्या मालावर अतिरिक्त आयात शुल्क लागू होणार असा मोठा निर्णय आज जाहिर झाला. तो निर्णय टाळण्यासाठी कॅनडा , मेक्सिकोने त्यांच्या परिने प्रयत्न केले पण यश आले नाही. कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवर २५% अतिरिक्त शुल्क आणि चीनमधून आयातीवर १०% अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे. कॅनडातील ऊर्जा आयातीवर १० % दर असेल.
ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा शपथविधी झाल्यावर पहिल्याच दिवशी टेरिफ संदर्भातला महत्वपूर्ण निर्णय जाहिर होणार होता पण काही कारणाने हा निर्णय १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला. या जाहिर झालेल्या आयात शुल्काला उत्तर म्हणून कॅनडा, मेक्सिको या देशांनी अमेरिकेतून येणार्या वस्तूंवर पण आयात शुल्क ( counter tariff ) जाहिर केले आहे.
कॅनडा तसेच मेस्किकोमधून अमेरिकेमधे फळभाज्या पासून auto parts, गॅस, ऑईल, स्टिल, खनिजे ( ॲल्युमिनियम, स्टिल, युरेनियम), लाकूड -लंबर अशा अनेक वस्तू आयात होतात. आता या प्रत्येक वस्तूंच्या किंमती महागणार, मागणी घसरणार (?). अमेरिकेतल्या प्रत्येकालाच या २५ % शुल्काची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झळ बसेल तसेच कॅनडा/ मेक्सिको मधे शेकडो जॉब धोक्यात येणार आहेत.
( आर्थिक , लष्करी) वाटाघाटी मधे अमेरिकेची बाजू बळकट करण्याचा किंवा चीनची कोंडी करण्याचा उद्देश असेल आणि त्यात काही प्रमाणांत यश येईल पण हा ट्रेड वॉर आहे आणि यात सर्वांचेच नुकसान होणार आहे. आधी कोलंबियाला नमविले, आता कॅनडा, मेक्सिको, चीन... मग ब्रिक्स देशांवर पण १०० % टेरिफची टांगती तलवार आहे.
काही मागण्या, अटी पुढे करत अमेरिकेने टेरिफ जाहिर करणे, मग त्याला उत्तर म्हणून इतर देशांनी अमेरिकेतून येणार्या मालावर counter tariff जाहिर करणे आणि या सर्वांचे जगावर , अर्थ विश्वावर होणारे परिणाम यासाठी हा बाफ.
एक असाही परिणाम...
एक असाही परिणाम...
२०१४ मध्ये कॅनडात होत असलेल्या एका हॉकी गेमच्या आधी अमेरिकन राष्ट्रगीत म्हणताना काही तांत्रिक कारणांनी आवाज ऐकू येणे बंद झाले आणि ताबडतोब कॅनेडियन प्रेक्षकांनी उच्चरवात अमेरिकन राष्ट्रगीत पूर्ण केले.
आणि आज खेळाच्या आधी गायला जाणाऱ्या अमेरिकन राष्ट्रगीताला बू चे आवाज येत आहेत.
सगळ्या समस्यांचे उत्तर टेरिफ आहे तर होऊनच जाऊ द्या अशी तिरस्काराची भावना बहुसंख्य लोकांच्या मनात आहे. इतर जग जास्त जवळ येऊ लागेल. मागण्या आणि अटी हा फक्त दिखावा आहे. फेंटनाल हे कारण हास्यास्पद आहे. गेल्यावर्षी ७२ पौंड फेंटेनाल कॅनेडियन बॉर्डर वर सापडले आहे.
एकूण अमेरिकन वस्तू न वापरणे, अमेरिकेत फिरण्यावर पैसे खर्च न करणे हे थेंबे थेंबे उपाय जास्त लोक करू लागतील.
त्या निमित्ताने कॅनडाचे व्यापारात अमेरिकेवराचे अवलंबित्व कमी झाले, रिफायनरी इथेच तयार झाल्या तर ती एक चांगली गोष्ट असेल.
बाकी दहापट जास्त लोकसंख्येच्या देशाशी ट्रेड डेफीसिट आहे त्यात विशेष ते काय... पण सॉरी! चुकून लॉजिकल बोलू लागलो परत... !
https://www.bbc.com/news
https://www.bbc.com/news/articles/c1kmp99431mo
ट्रंपचे म्हणणे आहे की कॅनडा व मेक्सिको हे देश बेकायदेशीर घुसखोरी व अमेरिकेत मादक द्रव्यांची बेकायदेशिर ने-आण यावर जोपर्यंत बंदी आणत नाहीत तोवर ४ फेब्रुवारीपासून, या देशांच्या, अनेक उत्पादनांवरती, आयातशुल्क (टेरिफ) लावले जाणार आहे.
तज्ञांचे म्हणणे आहे की या आर्थिक निर्बंधांमुळे, कॅनडा व मेक्सिकोमध्ये मंदीचे सावट येउ शकते.
७२ पौंड किती लोकांना ठार
७२ पौंड किती लोकांना ठार करायल पुरेसे आहे ?
ट्रंप ने टेरिफ लादू नये म्हणून काय करता येइल याचा विचार न करता ट्रुडो यांनी (ते कोणत्याही पदावर नाहीत, निवडणूका घेण्याचे धाडस नसल्याने पार्लमेंट स्थगित केली आहे) उलट टेरिफ लावायचे जाहीर केले आहे, मग ट्रंप ने आपल्या स्वभावानुसार 'तुम्हारे बाद्शह पर हमारा इक्का' वगैरे प्रमाणे जास्तच टेरिफ लावायची धमकी दिली आहे. बरं ट्रुडोंना पर्याय काय तर फ्रीलँड वा कार्नी ! अवघड आहे.
ट्रुडो अजूनही सर्व अधिकार
ट्रुडो अजूनही सर्व अधिकार असलेला पंतप्रधान आहे, पार्लमेंट परोग करायची पद्धतच आहे, धाडस वगैरे व्हॉटस्अप अंकलना बेटकुळ्या काढून दाखवा, त्यात काही अर्थ नाही. आणि मार्क कार्नी तुम्हा ट्रम्प समर्थकांना अवघड वाटतोय म्हणजे योग्य असण्याची लिटमस टेस्ट तरी पास झाली म्हणायची.
त्यासाठी ५०० बिलियन आयातीवर कर!
एकदा अमेरिकेत चीन आणि साऊथ मधून किती सबस्टांस येतो याचे आकडे बघा. ट्रंप ने टेरिफ लावू नये म्हणून पुरेसे प्रयत्न केले आहेत, चालू ही असतीलच. टेरीफचे कारण वेगळे आणि जगजाहीर आहे. माहीत नसेल तर विचारा. ते कॅनडा साठी इमिग्रंट नाही, की फेंटेनल नाही, की डिफेन्स स्पेंडींग नाही.
७२ पौंड किती किरकोळ आहे याची काही कल्पना आहे का?
यातला कुठलाही उपाय त्यावर काम करणार नाही. जोवर अमेरिकेत महागाई वाढत नाही, नोकऱ्या जात नाहीत तोवर प्रकाश पडणार नाही. त्याला किती दिवस लागतील, कोलॅटरल किती वाट लागते ते बघायचं. तर होऊन जाऊद्या. बाकी चीन वर कमी निर्बंध का आहेत ते पण विचारू शकता.
यातला कुठलाही उपाय त्यावर काम
यातला कुठलाही उपाय त्यावर काम करणार नाही. जोवर अमेरिकेत महागाई वाढत नाही, नोकऱ्या जात नाहीत तोवर प्रकाश पडणार नाही. त्याला किती दिवस लागतील, कोलॅटरल किती वाट लागते ते बघायचं.
>>> अक्षरशः हेच मनात आले होते. चेन रिॲक्शन असते ही, कधीतरी भोवणारच. महामूर्खपणा चालू आहे. कॅनडाचे तर उगाच आहे. आता अमेरिकेत महागाई वाढणे ओघाने आलेच. गॅस प्राईसेस शूट झाल्या की एकुणएक गोष्ट महाग होत जाते.
माझा असा कयास आहे की काहीही
माझा असा कयास आहे की काहीही फरक पडणार नाही.
१-२ आठवड्यानंतर (किंवा फार तर १-२ महिन्यानंतर) ट्रंप असे जाहिर करेल की कॅनडा आणि मेक्सिकोने त्याच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे आता टेरीफची गरज उरलेली नाही. आणि सर्व पूर्ववत होईल. कॅनडा आणि मेक्सिकोला अशा काही वाटघाटी झाल्या हे आठवणारच नाही (कारण त्या झालेल्याच नसतील) . पण टेरीफ जात असेल तर काय हरकत आहे असे म्हणून ते कदाचित दुजोरा देतील. कारण कोणी नक्की काय कबूल केले आहे हे तपासून पहायची गरज फक्त काही मिडीयातल्या लोकांना असेल , त्यांच्याकडे आधिच सगळे दुर्लक्ष करत असल्याने कोणीही याचा पाठपुरावा करणार नाही. ट्रंप ने हे घडवून आणले यातच लोक खूष राहतील.
काही दिवसांपूर्वी ट्रंपने जाहिर केले की , मेक्सिकोच्या प्रेसिडेंट्ने त्याच्या मागण्या मान्य केल्याने इमिग्रेशनचा प्रश्न सुटला आहे.
https://www.cbsnews.com/news/trump-mexico-president-tariffs-border-immig...
या पद्धतीने येत्या ५-६ महिन्यात अमेरीकेचे सगळे प्रश्न सुटले असतील. २०२६ च्या निवडणूकीपर्यंत ट्रंपमुळे अमेरिका कधी नव्हती इतकी ग्रेट झालीअसेल.
अजय, जबरदस्त.
अजय, जबरदस्त.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अजय अगदीच शक्य आहे. गेल्या
अजय, अगदीच शक्य आहे. गेल्या खेपेला NAFTA केराच्या टोपलीत टाकून USMCA केला. फरक उन्नीस बीस. पण करून दाखवलं, वठणीवर आणलं सांगता येतंय तर सांगा. दरम्यान कॅनडाने arbitration/ डिसपयुट सेटलमेंट अटी बदलून घेतल्या. बाकी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, लंबर, कार्स/ पार्टस, बीफ आणि माणसे नियम फार बदलेच नाहीत. पण ग्रेटेस्ट डील आहे! हो तर हो!
तेच स्टील/ अल्युमिनम साठी. गेल्या खेपेला स्टील आणि अल्यूमिनम वर काहीही बदल न होता एक दिवस अचानक थातुर मातुर अटी टाकल्या सारखं करून टेरीफ बंद झालेले.
बघू आता काय होतंय!
यातून धडा घेऊन कॅनडाचे चीन सकट युरोपीय आणि आशियाई देशांबरोबर मुक्त व्यापार करार जोरात करावे. पुढची १२ वर्षे बेभरवशी अमेरिकेच्या नादाला लागू नये. दूर जाऊ लागावे. समुद्र वाहतुकीत अमेरिकेचे महत्त्व कमी कमी होऊ लागलेच आहे. म्हणूनच पनामा आणि ग्रीनलँड आणि कॅनडावर डोळा आहे अर्थात. रेड राज्यांतील लोकांना ( माबोकर सोडून) जास्तीत जास्त त्रास कसा होईल ते बघावे.
अजय तसेच होवो, तेच सगळ्यात
अजय
तसेच होवो, तेच सगळ्यात चांगले ठरेल.
रेड राज्यांतील लोकांना ( माबोकर सोडून)![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अमेरिकन वस्तूंची लिस्ट बनली
अमेरिकन वस्तूंची लिस्ट बनली आहे
, काय वस्तू विकत घ्यायला हव्यांत आणि काय नको.
टेरिफ युद्ध कॅनडावर लादले गेले आहे.
फेंटॅनील , अमली पदार्थ हे कारण असेल तर मूळ स्त्रोत असलेल्या चीनवर १० % जादा आयत शुल्क आणि कॅनडावर २५ %. कॅनडा आणि मेक्सिको या दोघांनाही २५ % जादा आयात शुल्क लावले आहे. २०२४ मधे, कॅनडा सिमेवरुन ४३ lb तर मेक्सिकन सिमेवरुन २१, १४८ lb फेंटॅनील अमेरिकेत बेकायदेशीर रितीने आले आहे ( USCBP चा दावा ) म्हणजे मेक्सिकोच्या तुलनेत कॅनेडीयन सिमेवरुन < १ % फेंटॅनील आले पण " शिक्षा " देतांना दोन्ही देशांना २५ % जादा आयात शुल्क.
'मागण्या आणि अटी हा फक्त दिखावा आहे ' - या अमितव यांच्या मताशी सहमत.
आम्हाला कॅनेडियन ऑईल - गॅस
आम्हाला कॅनेडियन ऑईल - गॅस नको असे ट्रम्प म्हणाले होते. US doesn't need Canadian oil, gas, lumber, vehicles... पण ५१ स्टेट म्हणून मिळाले तर वरचे न मागताही मिळेलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेरिकेत ५० अधिक अणुऊर्जा प्रकल्प आहेत आणि १०० च्या आसपास रिअॅक्टर आहेत. यांना लागणार्या इंधनाचा स्त्रोत काय आहे? फळभाज्या, आणि शेतीसाठी अत्यावश्यक असणारे पॉटॅश ( KCl असते ) चा स्त्रोत काय आहे ?
डेटा २०२३ चा आहे. २७ % कॅनडातून आयात होते, अमेरिकन स्त्रोत फार कमी आहे.
https://www.eia.gov/energyexplained/nuclear/where-our-uranium-comes-from...
<< माझा असा कयास आहे की काहीही फरक पडणार नाही. >>
----- असे झाले तर फार चांगले होईल. मागच्या वेळी ( ट्रम्प #१) स्टिल, ॲल्युमिनियम बद्द्ल धरसोड करणार्या वक्तव्यांनी, धोरणांनी इकडे उद्योगांचे कंबरडे मोडले होते . एक प्रकारची uncertainty /अनिश्चितता उद्योगधंद्यांना मारक आहे.
https://www.reddit.com/r
https://www.reddit.com/r/Snorkblot/s/oGWAmeMV2b
रेड्डीट वर हे मजेशीर कार्टून सापडले.
या बातमीनुसार टेरिफ वॉरमुळे
या बातमीनुसार टेरिफ वॉरमुळे कॅनडात मंदी येणार, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
The cost of the taxes put across the border will be borne by consumers in both countries,
हे टेरिफ वॉर बराच वेळ चालले की महागाई वाढेल, मालाची आयात कमी केली जाईल, नोकऱ्यामध्ये कदाचित कपात होईल. पण त्यामुळे अमेरिकेत (आणि कदाचित इतर देशातही) स्टॉक मार्केट खाली येईल, कदाचित भरपूर कोसळेल. गेली १५ वर्षे सुबत्तेत गेली, स्टॉक मार्केटची सूज कमी झाली तर हा परिणाम अगदीच वाईट नाही.
<< The cost of the taxes put
<< The cost of the taxes put across the border will be borne by consumers in both countries, >>
------ अमेरिकन आयात करणारी कंपनी स्वत : चा होणारा फायदा कमी करुन हा २५% भार हलका करेल....
किंवा कॅनेडियन निर्यात करणारी कंपनी मालाची किंमत आहे त्यापेक्षा कमी करेल.... पण अनेक गोष्टींवर profit margin तेव्हढेही मोठे नाही म्हणजे शेवटी ग्राहकाच्या खिशालाच झळ बसण्याची शक्यता आहे.
मला नाही वाटत की कुणी कंपनी
मला नाही वाटत की कुणी कंपनी स्वतः:चा फायदा कमी करेल. शेवटी भुर्दंड ग्राहकाच्या माथीच बसणार.
राजकारणात फारसे न शिरता, इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने माहिती देणारा हा एक चांगला व्हिडीओ नुकताच बघण्यात आला,
ट्रंपच्या बिझनेस अॅक्युमन
ट्रंपच्या बिझनेस अॅक्युमन वरती विश्वास टाकायचा न काय आता. आयुष्य काढलय ना बिझनेस करण्यात. उगाच नसतील केस पिकले. हा आपला आशावाद. बाकी कोणत्याच देशावर मंदीचे सावट येउ नये अशी इच्छा.
>>मागच्या वेळी ( ट्रम्प #१)
>>मागच्या वेळी ( ट्रम्प #१) स्टिल, ॲल्युमिनियम बद्द्ल धरसोड करणार्या वक्तव्यांनी, धोरणांनी इकडे उद्योगांचे कंबरडे मोडले होते .<<
मगच्या वेळी काहि फरक पडला नाहि कि कंबरडं मोडलं, यापैकि एक काय ते नक्कि करा..
नाव, जस्ट टु पुट थिंग्ज इन द राइट पर्स्पेक्टिव -
१. कॅनडाज एक्स्पोर्ट टु अमेरिका अॅज ए पर्सेंटेज ऑफ कनेडियन जिडिपी = १८; अॅज ए पर्सेंटेज ऑफ टोटल एक्स्पोर्ट्स = ७६
२. कॅनडाज इंपोर्ट फ्रॉम अमेरिका अॅज ए पर्सेंटेज ऑफ कनेडियन जिडिपी = ३४; अॅज ए पर्सेंटेज ऑफ टोटल इंपोर्ट्स = ४९
३. अमेरिकाज एक्स्पोर्ट टु कॅनडा अॅज ए पर्सेंटेज ऑफ अमेरिकन जिडिपी = १.२; अॅज ए पर्सेंटेज ऑफ टोटल एक्स्पोर्ट्स = १७.३
४. अमेरिकाज इंपोर्ट फ्रॉम कॅनडा अॅज ए पर्सेंटेज ऑफ अमेरिकन जिडिपी = १.५; अॅज ए पर्सेंटेज ऑफ टोटल इंपोर्ट्स = १३.६
नंबर्स डोंट लाय. वरच्या तक्त्यावरुन, एस्पेशियली पर्सेंटेज ऑफ जिडिपीच्या नंबर्स वरुन लक्षात येइल कि टॅरिफचा फटका जास्त कोणाला बसणार आहे..
बाकि, नेहेमीचंच चालुद्या...
“ रेड राज्यांतील लोकांना” -
“ रेड राज्यांतील लोकांना” - इथे तर निळ्या राज्यातल्या लोकांचच जास्त समर्थन आहे ट्रंपला.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अजय, जबरदस्त पोस्ट!
अजय, जबरदस्त पोस्ट!
मेस्किकोचे टेरिफ उडाले.
मेस्किकोचे टेरिफ उडाले. महिनाभर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
“ मेस्किकोचे टेरिफ उडाले.” -
“ मेस्किकोचे टेरिफ उडाले.” - म्हणजेच बर्याचश्या मेजर चायनीज कंपन्यांवरचे टेरिफ उडाले (पॉज झाले)
>>>>>या पद्धतीने येत्या ५-६
>>>>>या पद्धतीने येत्या ५-६ महिन्यात अमेरीकेचे सगळे प्रश्न सुटले असतील. २०२६ च्या निवडणूकीपर्यंत ट्रंपमुळे अमेरिका कधी नव्हती इतकी ग्रेट झालीअसेल.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
स्टँड अप कॉमेडीची झलक दिसतेय हो.
>>या पद्धतीने येत्या ५-६
>>या पद्धतीने येत्या ५-६ महिन्यात अमेरीकेचे सगळे प्रश्न सुटले असतील. २०२६ च्या निवडणूकीपर्यंत ट्रंपमुळे अमेरिका कधी नव्हती इतकी ग्रेट झालीअसेल.
अजय , तुमच्या तोंडात (कॅनेडियन) साखर पडो !
(No subject)
सामो. दे धमाल. बहोत खूब!!!!!
सामो. दे धमाल. बहोत खूब!!!!!
सामो. दे धमाल. बहोत खूब!!!!!
सामो. दे धमाल. बहोत खूब!!!!! तुम्हाला पांच उद्गार वाचक बहाल.
पाची पोचली
पाची पोचली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<पच्या बिझनेस अॅक्युमन वरती
<<पच्या बिझनेस अॅक्युमन वरती विश्वास टाकायचा न काय आता. आयुष्य काढलय ना बिझनेस करण्यात. उगाच नसतील केस पिकले. हा आपला आशावाद. >>
हे बहुदा सारकॅस्टीकली लिहिलं असावं अशी आशा करतो. ६ वेळा बॅकरप्सी फाईल केली आहे तात्यांनी... जोक नाय काय....
>>>>
>>>>
कॅनडा आणि मेक्सिकोला अशा काही वाटघाटी झाल्या हे आठवणारच नाही (कारण त्या झालेल्याच नसतील) . पण टेरीफ जात असेल तर काय हरकत आहे असे म्हणून ते कदाचित दुजोरा देतील. कारण कोणी नक्की काय कबूल केले आहे हे तपासून पहायची गरज फक्त काही मिडीयातल्या लोकांना असेल , त्यांच्याकडे आधिच सगळे दुर्लक्ष करत असल्याने कोणीही याचा पाठपुरावा करणार नाही. ट्रंप ने हे घडवून आणले यातच लोक खूष राहतील.
>>>>
“‘Who controls the past,’ ran the Party slogan, ‘controls the future: who controls the present controls the past.’”
हे वाचून १९८४ मधल्या या दोन पानांची आठवण झाली. वेळ असेल तर वाचा. हिस्टरी डझन्ट रीपीट, इट र्हाइम्स.
कॅनडाचे पण ३० दिवसांसाठी पॉज
कॅनडाचे पण ३० दिवसांसाठी पॉज झाले.
अजय, आमची रेडपाथ साखर कुठे पाठवू सांगा! ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खालच्या ट्विट मधुन काही ग्राउंडब्रेकिंग थुत्तरफोड अर्थबोध झाला तर ट्रम्प समर्थक सांगतीलच. गेल्या कित्येक दिवसांत हेच करणार असं आम्हा ट्रम्प विरोधकांच्या बातम्यात तरी दिसत होतं.
Justin Trudeau
@JustinTrudeau
I just had a good call with President Trump. Canada is implementing our $1.3 billion border plan — reinforcing the border with new choppers, technology and personnel, enhanced coordination with our American partners, and increased resources to stop the flow of fentanyl. Nearly 10,000 frontline personnel are and will be working on protecting the border.
In addition, Canada is making new commitments to appoint a Fentanyl Czar, we will list cartels as terrorists, ensure 24/7 eyes on the border, launch a Canada- U.S. Joint Strike Force to combat organized crime, fentanyl and money laundering. I have also signed a new intelligence directive on organized crime and fentanyl and we will be backing it with $200 million.
Proposed tariffs will be paused for at least 30 days while we work together.
गेल्या प्रेसिडंसी सारखीच सर्कस मागच्या पानावरुन पुढे चालू रहाणार तर! ठोस काहीच नाही. गेल्यावेळी कसं एकही अर्थपूर्ण बिल पास झालं नाही तरी समर्थकांना करुन दाखवलं करुन उर बडवायला भरपूर सामग्री मिळाली तसंच.
Pages