
मध्यम आकाराचे बटाटे, अगदी बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरे, अगदी बारीक किसलेलं पनीर, बदाम्+पिस्ते+काजू ह्यांची भरड पूड, बेदाणे, किंचीत वेलदोड्याची पावडर, काजू पावडर (ऐच्छिक), फ्रेश क्रिम, कसुरी मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं एकत्र ठेचून.
फोडणीकरता आणि मसाले- तेल, हळद, लाल तिखट, बटर चिकनचा मसाला (ऐच्छिक), मीठ.
मध्यम साईझचे बटाटे धुवून घेऊन मावेत किंवा गॅसवर अगदी ५ मिनिटं उकडून घ्यावेत. एका बाजूचा आडवा टवका काढून आत पोखरुन घ्यावेत. हे झालं की पनीर अगदी बारीक किसून त्यात बदाम्+पिस्ते+काजू ह्यांची भरड पावडर, एकत्र ठेचलेलं आलं मिरची, किंचीत वेलदोड्याची पावडर, बेदाणे, मीठ सगळं एकत्र कुस्करुन पोखरलेल्या बटाट्यात दाबून बसवावं आणि हे बटाटे अगदी कमी तेलावर शॅलो फ्राय करुन बाजूला ठेवावेत.
पॅनमध्ये तेल गरम करुन त्यावर अगदी बारीक चिरलेला कांदा घालून त्यावर आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि वर लिहिलेला बटर चिकनचा मसाला परतून घेऊन त्यावर टोमॅटो प्युरे घालावी. हवं असल्यास ह्यात १ चमचा बटर घालू शकता. मी रवाळ टेक्श्चर्करता एक दोन चमचे काजू पावडरही घालते. ह्यात आता फ्रेश क्रिम घालून एक उकळी काढावी आणि त्यात बटाटे घालून वरुन कसुरी मेथी, कोथिंबीर वगैरे घालून बारीक गॅसवर शिजू द्यावं. पनीर आणि ड्रायफ्रूट मिक्स उरलं असल्यास तेही घालावं नाहीतर ते पराठ्यात वगैरे ढकलावं.
१- माझ्याकडे हीच स्टँडर्ड ग्रेव्ही पनीर किंवा बटर चिकनकरता केली जाते म्हणून बटर चिकन मसाला लिहिला आहे. तुमच्याकडे असा दम आलू किंवा पनीर मखनी मसाला असल्यास तो वापरा.
२. ही रेसिपी हेल्दी वगैरे असल्याचा दावा नाही. आपल्या आवडीप्रमाणे जिन्नस फेरफार करु शकता.
माझ्याकडे ह्या ब्रँडचा मसाला
माझ्याकडे ह्या ब्रँडचा मसाला आहे आणि मस्त चव येते.
बटाटे सालासकट ठेवायचे का?
बटाटे सालासकट ठेवायचे का?
हो.
हो.
बटाट्याच्या सलांत सी
बटाट्याच्या सलांत क जीवनसत्व असतं. बटाट्यात फक्त कर्बोदके.
छान दिसते आहे रेसिपी! काम आहे
छान दिसते आहे रेसिपी! काम आहे पण बरंच. सायो तू सारखी काही ना काही उरक पाडतेस आणि आम्हालाही कामाला लावतेस
हे सारखं नाही केलं जात.
हे सारखं नाही केलं जात. कधीतरी जरा चेंज म्हणून. किंवा कुठे पॉटलकला वगैरे काय न्यावं वगैरे प्रश्न पडल्यास.
खरंच शाही पाकृ आहे. मस्त
खरंच शाही पाकृ आहे. मस्त दिसतेय डिश.
आधी अर्धे उकडा, मग परता मग शिजवा याला स्किल लागत असावी असे वाटते त्यामुळे मला जमेल असे वाटत नाही.
मानव, अजिबात स्किल लागणार
मानव, अजिबात स्किल लागणार नाही. जरा उकडायचे म्हणजे ग्रेव्हीत खूप वेळ शिजवावे लागणार नाहीत. काही बटाटे जरा मऊच असतात आणि पटकन शिजतात. अगदी टायमर लावून करा. ग्रेव्हीत घातल्यावर फुटणं अपेक्षित नाहीये त्यामुळे थोडं स्वैपाकाचं ज्ञान असलेल्यांना हे नक्की जमेल. (म्हणजे तुम्हांला).
मस्तच रेसिपी... करून बघायला
मस्तच रेसिपी... करून बघायला पाहिजे..
शाही, indeed!
शाही, indeed!
किती ते खाण्याचे लाड.
किती ते खाण्याचे लाड.
क्या बात है सायो!
क्या बात है सायो!
(बडीशेप चिमूटभर घातली तर आणखी एक चव ऍड होईल असेही वाटले)
भारीच दिसतायत!
भारीच दिसतायत!
वेळ भरपूर असेल तेव्हा करून बघेन, पण म्हणजे कधी ते माहिती नाही. पण करून बघावेसे वाटतायत हे नक्की!
>> बडीशेप चिमूटभर घातली तर
>> बडीशेप चिमूटभर घातली तर आणखी एक चव ऍड होईल असेही वाटले>> करुन बघायला हवं पुढच्या वेळी. पण सारणात की ग्रेव्हीत?
कसली शाही रेसिपी आहे ही, फोटो
कसली शाही रेसिपी आहे ही, फोटो सॉलिड आलाय. कमाल आहे सायो.
कसली शाही रेसिपी आहे ही, फोटो
कसली शाही रेसिपी आहे ही, फोटो सॉलिड आलाय. कमाल आहे सायो.>>>१
एकदम शाही डिश आहे मस्तच.
एकदम शाही डिश आहे मस्तच.
मी पण सेम अशीच स्टॅंडर्ड ग्रेव्ही करते पनीर वगैरे साठी.बडीशेप सारणात घातली तर कचोरीसारखी लागेल पण मला वाटतं बडीशेप ग्रेव्हीतही छान लागेल, अश्याप्रकारे ट्राय करेन आता.
मस्त फोटो आणि रेसिपी..
मस्त फोटो आणि रेसिपी..
मस्तच.. फोटो सुंदर आला आहे .
मस्तच..
फोटो सुंदर आला आहे .
मस्त आहे रेसिपी! फोटो भयकर
मस्त आहे रेसिपी! फोटो भयकर टेम्टिन्ग आलाय..हा मसाला शोधते..मी किचन किन्गचा मसाला,थोड काश्मिरी तिखट्,कसुरी मेथी एकत्र करुन वापरते.
तोंपासु फोटो आलाय सायोबेन.
तोंपासु फोटो आलाय सायोबेन.
फोटो मस्त. एकदम शाही रेसिपी.
फोटो मस्त. एकदम शाही रेसिपी.
आहाहा
आहाहा
मस्त रेसिपी आणि फोटो. करून
मस्त रेसिपी आणि फोटो. करून बघायला हवी.