Submitted by सायो on 30 January, 2025 - 19:56

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
स्कॅलियन(हिरवा पातीचा कांदा), आलं किसून, लसूण-स्लाईस, लाल चिली फ्लेक्स, सोया सॉस, मिसो पेस्ट (ऐच्छिक), तीळ भाजून, मीठ, साखर, तीळाचं तेल, लिंग्विनी नूडल्स किंवा स्पॅगेटीही चालेल.
क्रमवार पाककृती:
एका पसरट बोलमध्ये हिरव्या कांद्याची फक्त पात आडवी चिरुन घ्यावी. त्यात किसलेलं आलं, कच्चा लसूण (तसा आवडत नसल्यास करा तेलावर परतून चालेल), भाजलेले तीळ, मिसो पेस्ट, सोया सॉस, मीठ, साखर एकत्र करुन घ्यावं. एकीकडे पास्ता/नूडल्स शिजवत ठेवावं. शिजल्यावर चाळणीवर निथळून बोलमध्ये मिक्स करावं. साधारण ४ टेस्पून तीळाचं तेल कडकडीत गरम करुन ह्या नूडल्सवर घालून खायला घ्यावं. हवं असल्यास मायक्रोवेवमध्ये जरा गरम केल्यासही चालेल.
वाढणी/प्रमाण:
आवडीप्रमाणे
अधिक टिपा:
ही रेसिपीन्मला इन्स्टाग्रॅमवर दिसली आणि आवडली म्हणून २,३ वेळा करुन इथे शेअर केली आहे.
माहितीचा स्रोत:
इन्स्टाग्रॅम
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल करून पाहिले हे. मस्त झाले
काल करून पाहिले हे. मस्त झाले! मला कच्च्या आले लसणाचा फ्लेवर आवडला. फोटो राहिलाच पण.
काल करून पाहिले हे. मस्त झाले
ड पो
काल करून पाहिले हे. मस्त झाले
पुन्हा ड पो
वा, मिसो घातलंकी की स्कीप
वा, मिसो घातलंकी की स्कीप केलंस?
घातली मिसो पेस्ट. माझ्याकडे
घातली मिसो पेस्ट. माझ्याकडे होती, कारण मुलाचे मित्रमंडळ एशियन असल्यामुळे तो काही बाही प्रयोग करत असतो नेहमी.
छानच मग.
छानच मग.
भारी दिसतायत नूडल्स, सायो.
भारी दिसतायत नूडल्स, सायो.
रेसिपी यो.जा. पोचवली आहे.
छान. करून बघेन हे.
छान. करून बघेन हे.
मिसो पेस्ट ने मिसो सूप पण करता का तुम्ही? सुशी प्लेस मध्ये मिसो सूप फार आवडतं.
अमित, मी मिसो सूपकरता एशियन
अमित, मी मिसो सूपकरता एशियन दुकानातली रेडी पॅकॅट्स वापरते. कारण क्वचित केल्या जाणार्या पदार्थाकरता सगळं सामान जमवावंसं वाटत नाही. वायाच जाणार नंतर.
भारीच, सही एकदम.
भारीच, सही एकदम.
केले. आवडले.
केले. आवडले.

मस्त दिसतायत अस्मिता.
मस्त दिसतायत अस्मिता.
फोटो मस्त आहे. हा प्रकार
फोटो मस्त आहे. हा प्रकार करण्याचा प्रयत्न करेल.
.
वा मस्त फोटो.
वा मस्त फोटो. अस्मिताचाही फोटो मस्त.
वाह ..मस्त दिसत आहेत नूडल्स.
वाह ..मस्त दिसत आहेत नूडल्स..दोघींचे फोटो कातील आलेत
सायो आणी अस्मिता दोघीचे फोटो
सायो आणी अस्मिता दोघीचे फोटो भारी आलेत..घरातल्या नुडल लव्हरला रेसिपी फॉरवर्ड करते.
थँक्यू, थँक्यू मुलींनो.
थँक्यू, थँक्यू मुलींनो.
भारतात अर्बन प्लॅटर ब्रॅंडची
भारतात अर्बन प्लॅटर ब्रॅंडची मिसो पेस्ट उपलब्ध आहे, पण चव बघितली नसल्याने एवढा मोठा डबा घ्यायचं जिवावर आलं आहे. छोटं पाकीट कुठे मिळेल बघायला पाहिजे.
Pages