जिंजर स्कॅलियन नूडल्स

Submitted by सायो on 30 January, 2025 - 19:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्कॅलियन(हिरवा पातीचा कांदा), आलं किसून, लसूण-स्लाईस, लाल चिली फ्लेक्स, सोया सॉस, मिसो पेस्ट (ऐच्छिक), तीळ भाजून, मीठ, साखर, तीळाचं तेल, लिंग्विनी नूडल्स किंवा स्पॅगेटीही चालेल.

क्रमवार पाककृती: 

एका पसरट बोलमध्ये हिरव्या कांद्याची फक्त पात आडवी चिरुन घ्यावी. त्यात किसलेलं आलं, कच्चा लसूण (तसा आवडत नसल्यास करा तेलावर परतून चालेल), भाजलेले तीळ, मिसो पेस्ट, सोया सॉस, मीठ, साखर एकत्र करुन घ्यावं. एकीकडे पास्ता/नूडल्स शिजवत ठेवावं. शिजल्यावर चाळणीवर निथळून बोलमध्ये मिक्स करावं. साधारण ४ टेस्पून तीळाचं तेल कडकडीत गरम करुन ह्या नूडल्सवर घालून खायला घ्यावं. हवं असल्यास मायक्रोवेवमध्ये जरा गरम केल्यासही चालेल.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

ही रेसिपीन्मला इन्स्टाग्रॅमवर दिसली आणि आवडली म्हणून २,३ वेळा करुन इथे शेअर केली आहे.

माहितीचा स्रोत: 
इन्स्टाग्रॅम
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसायला भारी आहेत.

म्हणजे कांदा पात, आले वगैरे काही परतलेच नाही ना. इंटरेस्टिंग

धनि, हो. ते सगळं कच्चंच आहे. कुणाला तसं आवडत नसल्यास नॉनस्टिक पॅनमध्ये तेल वगैरे मिक्स केल्यावर जरा चटका देऊनही चालेल.

छल्ला, मूळ रेसिपीत ४ टेबलस्पून म्हटलंय पण आपल्याला हव तसं/नूडल्सच्या प्रमाणात कमी जास्त चालेल केलेलं.

सकाळी सकाळी आज पदार्थ्यांचे धागे वाचतेय.
नशीब आज शनिवार नाही Happy
.
मस्त पाकृ आहे सामो..
खावीशी वाटतेय फोटोतून उचलून

मस्त दिसताहेत नूडल्स. आलं सांगितले तसे लसुण कच्चे घालुन करून बघतो आधी.
तुम्ही काळे तीळ घातलेत का?

यम्मी दिसतायत!! बाकी साधेच इन्ग्रिडियन्ट्स असले तरी तिळाच्या तेलाने एकदम ऑथेन्टिक फ्लेवर येतो. करून पहाणार .

भारतात कोणी मिसो पेस्ट वापरली आहे का? कोणत्या ब्रँडची? कमी क्वांटिटी आणि जास्त दिवस चालू शकेल असे काही सापडलं तर घेवून बघता येईल. मिसो पेस्ट काही नेहेमी वापरली जाणार नाही. महिना -दोन महिन्यातून एखाद्या वेळी थोडीसा वापर होवू शकतो जास्तीत जास्त.

मस्तच... कोणत्याही प्रकारचे न्युडल्स कधीही खाऊ शकते. मिसो पेस्ट शॉपराईट मधे वगैरे मिळेल का?
थँक्यू!

ओके.

फोटो खुपच टेम्पटिंग आहे.
ईटालियन नुडल शिवाय अजुन कोणत्या प्रकारच्या नुडल्स तुम्ही वापरता? एशियन मार्केट मधुन? ज्या हेम्दी पण आहेत?

एशियन दुकानात असतात बर्‍याच टाईपच्या. त्यातल्या राईस वगैरे आणू शकता पण त्या जरा चिकट होऊ शकतील. इटालियनमध्ये होल व्हिट किंवा इतर काही चिकपी ऑप्शन्स हवेत तर ट्राय करता येतील.

सायो सहसा चायनीज रेसिपीत चायनीज लोक आले उभे अगदी बारीक आयताकृती कापून घालतात. तसे चावुन खायला फार मस्त लागते. सहज सांगतेय.

Looks nice.

Will try someday soon.

Must tell you, your Masalebhat recipe is fail safe and is superhit in my kitchen 👍

Pages