एच वन बी स्टँपिंग बाबत

Submitted by अवल on 7 October, 2024 - 22:04

अमेरिकेत एच वन बी मिळाल्यानंतर प्रथमच भारतात यायचे असल्यास स्टँपिंगचे नवीन नियम काय आहेत? विविध साईटस, एजंट यांच्याकडून सुस्पष्ट माहिती मिळत नाहीये.
अनेक फॉर्मस भरणे, मुलाखतीसाठी तारीख घेणे पासून फक्त ड्रॉपबॉक्स अशी विविधता आढळते आहे.
तर इतक्यात कोणी असे आले आहे का? किती वेळात हे काम झाले? ऑथेंटिक, अपडेटेड साईट वगैरे बाबत कृपया अनुभव शेअर कराल, मार्गदर्शन कराल?
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल,
https://redbus2us.com/visas/usa/h1b-visa/documents-checklist/

ड्रॉप बॉक्सचा पर्याय h1 विसा रीन्युवलसाठी आहे. आमच्याकडे भावाचा h1 आणि वहिनीचा h4 renewal चे ड्रॉप बॉक्स ने झाले मात्र भाचे कंपनीसाठी तो पर्याय मिळाला नाही कारण पहिले h4 stamping केले तेव्हा वय लहान होते, आता १४ + झाल्याने इंटरव्ह्यूसाठी तारीख घेणे वगैरे करावे लागले.

अवल,
जर तुम्ही पहिल्यांदाच एच १ बी स्टॅम्पिंगसाठी जात असाल तर ड्रॉप बॉक्सचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध नाही .
एच१बी स्टॅम्पिंग साठी तुम्हाला भारतातील (किंवा अमेरिकेबाहेर) कोणत्याही अमेरिकन वाणिज्य दूतावासात मुलाखत घ्यावी लागेल.
सर्वप्रथम तुम्हाला साइटवर लॉगिन अकाऊंट तयार करावे लागेल. आपला लॉगिन आयडी, पासवर्ड, सुरक्षा प्रश्न लिहा. प्रत्येक वेळी, लॉगिन पूर्ण करण्यासाठी सुरक्षा प्रश्न नेहमीच विचारले जातात. कृपया खालील साइटवर जा..
https://www.ustraveldocs.com/in/en/
डीएस १६० भरा, फी भरा, मग फिंगरप्रिंट आणि आय स्कॅनिंगसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करावी लागेल, दुसर् या दिवशी कॉन्सुलेट इंटरव्ह्यू असेल.

स्वाती, एरन्दोल्कर दोघांचेही खूप आभार
दोन्ही साईट बघते.
तुम्ही सांगितलेले सर्व फॉर्म भरलेत. पण आता असं कळलंय की पहिल्या वेळेसही ड्रॉपबॉक्स ऑप्शन आलाय. पण या बद्दलच नीट माहिती मिळत नाहीये.
तरी या दोन्ही साईट पुन्हा नजरेखालून घालते.
पुन्हा एकदा दोघांचेही आभार

अवल ताई , मी तुला माहिती देऊ शकत नाही कारण माझ्याकडे वेळ अपुरा आहे पण तुला एकाचा नंबर देऊ शकते ज्याचं ड्रॉप बॉक्स ने एच १ झालं आहे. लेक बोलू शकेल का बघ.
सगळी माहिती नीटच मिळेल

अवल, मी मागील वर्षी

अवल, मी मागील वर्षी ड्रॉपबॉक्सनेच एचवनबी (1st time) स्टॅम्पींग केले. एका आठवड्याभरात काम झाले पण ड्रॉपबॉक्स अपॉईटमेंट मात्र मी खूप आधीच घेतली होती असं आठवतंय.
तुला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केलाय.

फायनली ड्रॉपबॉक्सच काही झालं नाही. पण अपॉईंटमेंट मिळाली. बायोमेट्रीक्स एकीकडे, इंटरव्हु दुसरी कडे. पण ठिके. काही सुटी, काही रजा अन काही वर्क फ्रॉम होम करत लेक भारतात येऊन जातोय.
सर्वांना धन्यवाद.

एक प्रश्न आहे

माझं आणि मुलीचं ट्रॅव्हल डॉक्युमेंट (अ‍ॅडव्हान्स पॅरोल -I-131) गडबडलंय. तिचा रिसिट नं मला आणि माझा मलाच पण फोटो तिचा आलाय आणि तिचं एपी रिजेक्ट झालंय:( कारण रिसिट नं डुप्लिकेट झाला असं USCIS ला वाटतंय. चुक पूर्णपणे USCIS ची आहे मात्र वर्क परमिट बरोबर आलंय दोघींचं गेल्या फेब्रुवारीमधे (ईएडी).

तर ही एपी भानगड निस्तरायची आहे. कंपनी लॉयर म्हणतात तुम्ही करेक्शन ला टाकून पण १२ महिने -१४ महिने कितीही लागू शकतात. त्याकाळात प्रवास नाही करू शकत आणि भारतात जायचं असेल तर एच४ वर दोघी जाउन येऊ शकता आणि आल्यावर करू शकता अप्लाय. पण सद्यस्थितीत एच४ वर जावे की नाही (जुलै २०२५) कळत नाही आणि एपी जर डिनाईड आहे माझ्या मुलीचं तिला ग्रीनकार्ड मधे काही प्रॉब्लेम येऊ शकतो का (मान्य की ते फक्त प्रवासासाठी असतं पण जस्ट ग्रीनकार्डच्या आधीची एक स्टेज आहे म्हणून काळजी)

मी एका एच१ करणार्‍या कन्सलटन्सीमधेच काम करते आणि माझ्या लॉयरशी पण बोलले तर तिचं म्हणणं आहे करेक्शन डॉक्युमेंट हे लगेचच करायला हवं होतं. करेक्शन इतकं ८-९ महिने थांबून केल्यावर ते नवीनच अ‍ॅप्लिकेशन धरलं जाईल दोघींचं पण आणि एच४ ची जुलै मधे काय परिस्थिती असेल सांगू नाही शकत. नवर्‍याचा एच१ पण स्टँप्ड नाहीये.

आता मी पुरती गोंधळली आहे. कोणाला असा USCIS च्या चुकीचा फटका बसलाय का? काय करता येतं जनरली?

टेलिग्राम मधे ग्रुप्स असतात तिथे विचारा…

एपी चा जीसी शी संबंध नाही.. खूप लोक एपी घेतही नाहीत ग्रिन कार्ड आधी..

AP चा GC शी संबंध आहे. GC प्रोसेस मध्ये असनाऱ्यानाच ap मिळत. कृपया वकिलाचा सल्ला घ्यावा. ऑनलाईन सल्ले हे तुमच्या केस शी डायरेक्ट relate होतीलच असे नाही. सध्या सावध असलेलं बरं

एपी चा जीसी शी संबंध नाही.. खूप लोक एपी घेतही नाहीत ग्रिन कार्ड आधी..>>>>>>>>>>>>काही लोकांमधे ही स्टेज स्किप होते आणि डायरेक्ट ग्रीनकार्डच मिळतं हे बघितलंय. माझ्या माहितीप्रमाणे त्यात त्यांना असा चॉईस नसतो एपी न घेण्याचा.

कंसराज हो आज वकिलांशी बोललो कारण तेच प्रत्येक केस वेगळी. त्यांच्यामते माझं करेक्शन ला टाकता येईल पण मुलीसाठी पुन्हा नवीन अ‍ॅप्लिकेशन करावं लागेल आणि एच४ वर शक्यतो प्रवास टाळा unless there is an medical emergency. हे जनरलच आहे पण इथे लिहून ठेवते.

धन्यवाद मंडळी... अमेरिकेत पेशन्स फारच वाढू लागलाय आताशा... Happy

GC प्रोसेस मध्ये असनाऱ्यानाच ap मिळत. >>>> हे बरोबर आहे पण एपी आणि ग्रीनकार्ड हे दोन्ही वेगवेगळे वर्क फ्लो आहेत, एपीचं काहीही झालं (किंवा झालं नाही) तरी जीसी मिळू शकतं.

वकिलाचा सल्ला घेण्याचा सल्ला योग्य आहे.

अमेरिकेत पेशन्स फारच वाढू लागलाय आताशा... >>>> हो, अमेरीकन इमिग्रेशन सिस्टीम पेशन्स वाढवायला शिकवते. Happy

एपी म्हणजे Advance Parole.
I-485 (Application to Register Permanent Residence or Adjust Status) मध्ये असताना, अमेरिकेच्या बाहेर प्रवास करायचा असेल तरच advance parole घ्यावा लागतो, अन्यथा नाही. Generally, an adjustment applicant that leaves the United States without an advance parole travel document will abandon the I-485 application and will have trouble re-entering.

I- 485 मध्ये असताना, अमेरिकेतच राहणार असाल तर advance parole घेतला नाही तरी चालते. इमिग्रेशन वकिलाला विचारून खात्री करून घ्या.

<< माझ्या लॉयरशी पण बोलले तर तिचं म्हणणं आहे करेक्शन डॉक्युमेंट हे लगेचच करायला हवं होतं. करेक्शन इतकं ८-९ महिने थांबून केल्यावर... >> अश्या परिस्थितीत पेशन्स ठेवणेच योग्य. Lol

उबो .. येस्स पेशन्स इज द की. Happy
I- 485 मध्ये असताना, अमेरिकेतच राहणार असाल तर advance parole घेतला नाही तरी चालते. इमिग्रेशन वकिलाला विचारून खात्री करून घ्या.>>>>>>>> ओके.
सध्या तरी माझी आई भारतात एकटीच राहते आणि तिच्या मेडीकल कारणांसाठी मला प्रवास विसा लागणारच आहे. सध्या नवर्‍याचा आहे ५ वर्ष एपी त्यामुळे निदान एक कोणीतरी जाऊ शकतं हाच रिलिफ.

माझ्या माहितीप्रमाणे त्यात त्यांना असा चॉईस नसतो एपी न घेण्याचा.
>> चूक.. I१३१ फाईल करायचा की नाही हा चॉईस तुमचा असतो..

>>एच४ वर शक्यतो प्रवास टाळा unless there is an medical emergency. हे जनरलच आहे पण इथे लिहून ठेवते.

हे सजेशन का आहे म्हणे सध्या? ट्रंप आल्यामुळे ? एचवन स्टेटस, कगदपत्र नीट असेल तर काय धोका आहे ?

हे सजेशन का आहे म्हणे सध्या? ट्रंप आल्यामुळे ? >>>>> हो सध्या तरी काही महिने.

एचवन स्टेटस, कगदपत्र नीट असेल तर काय धोका आहे ?>>>>>>>>>>> तसा धोका काही नाही.

एच४ वर शक्यतो प्रवास टाळा unless there is an medical emergency. > +१
आणी हे एच१ स्टॅपिंग साठी पण हाच अलिखित नियम आहे. स्टॅपिंग करताना कधी २२१g चा रंगीत कागद मिळेल याचा भरवसा नाही. हा कागद मिळाला तरी स्टॅपिंग होतेच पण किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.

अंजली, तुला योग्य ते सोल्यूशन मिळो.
सध्या भानगड अशी आहे की सगळे ठीक असले तरी पोर्ट ऑफ एंट्रीला कुठल्या तारखेचा शिक्का मारतील काही भरवसा नाही त्यामुळे लोकं सावधगिरी बाळगायला सांगत आहेत. गेल्या ट्रंप कारकिर्दीतही पोर्ट ऑफ एंट्रीला ३ महिन्याचाच शिक्का, पुन्हा पेपरवर्क वगैरे व्याप झाले होते.

हो थँक्यू. सोल्युशन फायनल हेच झालं की एपी नव्याने करायला टाकतोय या आठवड्यात.
I wish to sue USCIS पण त्याचा निकाल येईस्तोवर १०० वर्ष जायची Lol