तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्टी मुळे पर्यटन जशी स्थळ ओसंडून वहात होती त्याच प्रमाणे जागोजागच्या कचराकुंड्या सुद्धा. महापालिका कर्मचार्यांना देखील सुट्ट्या असल्या मुळे, ह्या कचर्या पेट्या ओला /सुका हा भेदभाव विसरुन भरभरुन वहात होत्या.
गुरुवारी संध्याकाळी आम्ही सोसायटीतल्या अतीउत्साही सभासदांनी प्रत्येक घरी जाऊन विनंती केली, तीन दिवस कचरा गोळाकरण्यात येणार नाही, कृपया आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, कचरा कमीत कमी निर्माण करा, आपल्या घरीच ठेवा ,इ इ. काहींनी नुसतच ऐकुन घेतल्,काहींना पटल तर, आले मोठे शहाणे ह्या अविर्भावात ऐकवल ' अहो आपण जरी कचरा टाकला नाही, तरी बाकीचे टाकणारे च ना ?? ते थोडी थांबणार ? त्यातच आपला ही टाकायचा, घरी कसा काय ठेवणार ??"
शेवटी व्हायचे तेच झाल. कचरापेट्या भरभरुन वहायला लागल्या. लोक नाका तोंडावर रुमाल ठेवून , प्रसंगी रस्ता बदलुन ये जा करु लागले , पण कचरा टाकायचे कोणीही थांबले नाही. ही आपली मानसिकता. हे आपल /माझ घर आहे ते स्वच्छ ठेवायलाच हव, ह्या प्रमाणे च हा माझा देश, परिसर, (निदान कॉलनी )आहे, तो ही स्वच्छ ठेवायलाच हवा ही भावना आपल्या मनात कधी निर्मांण होणार ??
मध्यंतरी पुण्यात कचर्याची मोठी समस्या निर्माण झाली होती, देवाची आळंदी इथल्या कचराडेपोत कचरा टाकण्याविरुध्द तिथल्या स्थानिक नागरीकांनी आंदोलन केलं. स्थानिक वस्ती जवळ कचरा डेपो असण ह्याचा अनुभव पुणेकरांनी बरीच वर्ष घेतलाय.तरीही शहरातल्या कचराकुंड्या भरभरुन वहात होत्या, पण नागरीकांनी कचरा टाकण बंद केल नाही. आमच्या सोसायटी मधे त्या दरम्यान आम्ही एक उपक्रम राबवला, ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा ठेवणे, ओला कचरा सोसायटीतील आवारात जिरवणे, प्लॅस्टिक पिशवी न वापरणे. सुरवातीला अगदी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पण पुन्हा शनिवार, रविवार प्रत्येकाकडे जाऊन दोन्ही प्रकारचा कचरा वेगळा करण सगळ्यांच्याच कस हिताच आहे हे गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोन तीन आठवड्या नंतर आमच्या प्रयत्नांना यश आल. आता सोसायटी तील सर्व लोक ओला व सुका कचरा कटाक्षाने वेगळा टाकतात. आप जर मनात आणल तर ह्या समस्येवर निश्चित पणे मात करु शकतो. गरज आहे आपली मानसिकता बदलण्याची
आपण परदेशातल्या स्वच्छ्तेचे नेहमीच गोडवे गातो, पण इथे वाट्टेल तिथे कचरा टाकणारा माणूस,परदेशी गेल्यावर प्रसंगी कचरा आपल्या पिशवीत, खिशात बाळगतो पण रस्त्यावर टाकत नाही.
हीच मानसिकता आपण आपल्या देशा बाबत का ठेवत नाही ?? इथे तर 'थुकना मना है ' ही पाटीच लाल झालेली दिसते. सोसायट्यां मधे, लोकांनी थुंकु नये म्हणून देवांना वेठीला धरलेल दिसत.मग सरकारला /महापालिकेला दोष द्यायला मात्र सगळे पुढे असतो, पण हेही बघायला हव, महापालिकेन दिलेल्या किती सुचना / नियम आपण अंमलात आणतो ? पाळतो ?
प्लॅस्टिक मुळे होणार प्रदुषण - इतर अनेक भेडसावणार्या समस्यांपैकी ,माणसाने स्वतःच्या गरजे पोटी निर्माण केलेली एक समस्या. खरच आज प्लॅस्टिक चा होणारा वापर हे एक गंभीर समस्या बनलीय आणि ती निर्माण होण्यासाठी आपण आणि आपली मानसिकताच कारणीभूत आहे.
मध्यंतरी ५० मायाक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरा वर सरकार ने बंदी घातली होती. परंतु नियम हे तोडण्याकरताच असतात ह्या उक्तीनुसार, ती कधीच धुडकावुन लावली गेली आणि प्लॅस्टिकचा वापर जोमाने वाढला. आठाण्याची कोथींबीर असो नाहीतर आठहजाराचा शालु असो, प्लॅस्टिक च्या पिशवी शिवाय आपण ती घरीच आणु शकत नाही. इथे खरी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
आमच्या इथल्या दुकानदाराशी मी एकदा बोलले होते प्लॅस्टिक च्या पिशव्या न पुरवण्या बद्दल. त्याने २ दिवस बंद केल प्लॅस्टिक च्या पिशव्या देण, पण नंतर पुन्हा चालु. मला म्हणला " तुम्हाला पहिजे तर नका घेऊ, पण मी दिली नाही पिशवी तर शेजारचा दुकानदार देतो, गिर्हाइक जातं माझ अशाने" ही मानसिकता कधी बदलणार ?
माझ्या एका बहीणीची जर्मन मैत्रीण, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता आली होती, त्या दरम्यान पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव चालु होता, त्याला ही ती आमच्या बरोबर आली होती, त्या बद्दल ची तिची प्रतिक्रिया एकदम बोलकी होती.ती म्हणाली " तुम्ही लोक तुमच्या ' कले ' वर किंवा देवावर मना पासुन प्रेम करत नाही, फक्त स्वतःचा आनंद . स्वार्थ बघता त्यात " आम्हाला खर तर राग आला तिच्या ह्या बोलण्याचा ,
ती म्हणाली" ज्या गोष्टी वर आपण मना पासुन प्रेम करतो, आदर करतो, त्या गोष्टीची आपण सर्वतोपरी काळजी घेतो, ती घाण होणार नाही अस बघतो, पावित्र्य राखायचा प्रयत्न करतो, पण तुम्ही तर अशा सगळ्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, थर्माकॉल चे ग्लास, कागद इतक्या सगळ्या गोष्टी फेकुन सगळी कडे घाण करता, अगदी देवळात सुद्धा,
जस घर आपल/ माझ आहे ही भावना तुमच्या मनात असते ,तस हा देश 'माझा' आहे ही जाणीव तुम्हाला कधीच होत नाही , कधी झालेली मी बघीतली ही नाही, तस असत तर तुमच्या देशात माणसांच्या बरोबरीने कदाचित जास्त प्रमाणात पसरलेल कचर्याच साम्राज्य दिसलच नसतं" तिने दिलेले हे स्पष्टीकरण मनातुन १०० % पटल आणि मनाला लागल खर तर.
फक्त आपण नियम / अटी पाळून, स्वच्छता राखुन काय होणारे ? आपण प्लॅस्टिक चा वापर बंद करुन प्लॅस्टिक प्रदुषण कमी होणारे का ? फक्त आपणच कचर्याच वर्गीकरण करुन काय होणारे ? चला हे सगळे विचार कचर्यात फेकुन , कचर्याच/ प्लॅस्टिक च साम्राज्य नष्ट करायला आपल्या पासुनच सुरवात करुया,
<तुम्ही लोक तुमच्या ' कले '
<तुम्ही लोक तुमच्या ' कले ' वर किंवा देवावर मना पासुन प्रेम करत नाही, फक्त स्वतःचा आनंद . स्वार्थ बघता त्यात >
शंभर टक्के खरं.
छान लिहिलं आहे.
स्मि छान लिहिलयस.
स्मि छान लिहिलयस.
स्मि, मनापासून
स्मि, मनापासून लिहिलसं.
स्वच्छ देशासाठी सुरुवात आपणच करू या.
स्मि छानच लिहीलय... खरच
स्मि छानच लिहीलय...
खरच स्वच्छ देशासाठी सुरुवात आपणच करू या.
छानच लिहिलयस स्मिता..
छानच लिहिलयस स्मिता..
१०० % सहमत. मी परवा एका
१०० % सहमत. मी परवा एका मुलाला तो गुटका खाउन थुकत असताना हटकलं, तर तो मला म्हणतो "इथे कुठे लिहिलय कि 'इथे' थुकु नका ? " आम्ही बस डेपोत उभे होतो , तिकड्च्या भिंतिंवर लिहिलेल्या सुचनेकडे त्याचं लक्ष वेधलं , तरी त्याचा उर्मटपणा कायमच होता. अशा निर्ल्लज्ज लोकांच काय करायचं?
स्मि,छान लिहिलयस. जोपर्यंत
स्मि,छान लिहिलयस.
जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही. आपण परदेशात गेलो की तिथे ही असेच वागतो का? नाही. तिथले नियम आनंदाने पाळतो.वर त्यांच स्वच्छतेबद्द्ल कौतुकही करतो. तसेच जर आपल्या देशात वागलो तर आपलाही देश स्वच्छ होईलच.
खरच स्वच्छ देशासाठी सुरुवात
खरच स्वच्छ देशासाठी सुरुवात आपणच करू या.>>
नक्की करुया.
छान लिहिलयस स्मि
छान लिहिलयस स्मि
मस्त लिहिले आहे..
मस्त लिहिले आहे..
छान लेख आहे. याचा बाफ चालवला
छान लेख आहे. याचा बाफ चालवला पाहिजे.
जर प्रत्येक व्यक्तीने ओला आणि सुका कचरा वेगळा काढायचा ठरवला तर त्याची योग्य विल्हेवाट लावणं कित्ती सोपं जाईल?
मुंबईतील एका प्राध्यापिकेने प्लस्टिकच्या पिशव्यांपासून वीज निर्मिती चा प्रकल्प शोधला होता. अशा गोष्टींना का प्राधान्य मिळत नाही?
माझी खात्री आहे की पोलिटिकल विल असेल तर सर्व गोष्टी साध्य होतात.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर माझ्या कुत्र्याची विष्ठा मी रस्त्यावर सांडू देत नाही. कागदावर गोळा करतो आणि घरी येऊन संडासमध्ये फ्लश करतो. काही लोक मला येडा समजून बघत असतील; पण त्यांची पर्वा करत नाही.
शरद
माझ्या कुत्र्याची विष्ठा मी
माझ्या कुत्र्याची विष्ठा मी रस्त्यावर सांडू देत नाही>> बापरे, वाचुनच पोटात मळमळ झाली, हे तुम्हाला कसं काय जमतं बुवा. आता आज जेवताना आठवण होऊ नये म्हणजे जिंकलं.
जर्मन मुलीचे बोलणे अगदी पटले.
जर्मन मुलीचे बोलणे अगदी पटले.
मी- माझा हीच मानसिकता आहे
मी- माझा हीच मानसिकता आहे त्यामूळे असे होते.
शरदराव,
कुत्र्याला जरा गवतात, झाडीत नेलत तर विष्टेचं नैसर्गिक खत होतय, मग कागदाने टीपायची वेळ येणार नाही. अर्थात कुत्र्याला तशी सवय लावायला हवी अन ज्या शहरात राहता तिथे निदान पुसायला नाही तर हागायला तरी गवत हवे
चांगल लिहिल आहेस स्मि.. खर
चांगल लिहिल आहेस स्मि.. खर आहे
कुत्र्याची विष्ठा मी रस्त्यावर सांडू देत नाही >> शरदराव अगदी योग्य करता आहात.. इथे जपान मधे तर कुत्र्याला फिरवताना पिशव्या आणि स्प्रे घेउनच फिरतात. कुत्र्याने आपले काम केले कि ते पद्धतशीर पणे उचलुन पिशवीत टाकतात आणि वरती स्प्रे मारतात..
वेळोवेळी परदेशाशी तुलना
वेळोवेळी परदेशाशी तुलना करण्यात अर्थ नाही. चांगले वाईट लोक सगळीकडे असतात. आपल्याकडे मुळात लोकसंख्या इतर देशांच्या कितीतरी पट आहे, त्यामुळे वाईट लोकांची टक्केवारी कमी असली, तरी एकंदर संख्या जास्त होते. नाहीतर स्वछता काय कुणाला समजत नाही का?
कदाचित् स्वच्छता करण्याचे काम दुसर्या कुणाचे तरी अशी समजूत जास्त असेल. शिवाय स्वच्छता करणे हे आम्हा उच्च जातीय लोकांचे काम नव्हे. आम्हाला आमच्या जातीचा अतिशय अभिमान आहे, जीव गेला तरी बेहेत्तर, आम्ही असली जातीला लाज आणणारी कामे करणार नाही. हा संस्कृतिक फरक देशा देशात असतो.
अगदी बरोबर्.....सार्वजनिक
अगदी बरोबर्.....सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यानन्तर तो कचरा कुन्डीतच टाकण्याची मी मुलान्ला जाणीव्पुर्वक सवय लावली आहे.
तुम्ही लोक तुमच्या ' कले ' वर किंवा देवावर मना पासुन प्रेम करत नाही, फक्त स्वतःचा आनंद . स्वार्थ बघता .....हे पटत ...कारण....कुठ्ल्याही मन्दिरात जा........खुप अस्वछ्ता असते....ते पाहिल्यावर स्रधा डळ्मळ्ते........
वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत
वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत देश जागरूक आहे, पण ते सार्वजनिक स्वच्छतेत मात्र बदलत नाही, हेच आपलं रडं आहे...
घरचा कचरा चार वेळा काढतील, पण तोच कचरा गॅलरीतून खाली टाकतील...
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
घरचा कचरा चार वेळा काढतील, पण
घरचा कचरा चार वेळा काढतील, पण तोच कचरा गॅलरीतून खाली टाकतील...
>> असले भलते आरोप नकोत म्हणून आम्ही घरचा कचरा काढतच नाही
(Just kidding)
चांगला लेख आहे.. तळमळ दिसून येते..
माझ्याबरोबरच्या व्यक्तीनं (ओळखी/अनोळखी) जर रस्त्यावर काही टाकलं - तर मी जनरली थांबून ते उचलते - ती व्यक्ती (थोडं काही शिल्लक आहे हे गृहितक) खजील होते.. ह्यानंतर आपण काही सल्ला दिलात तर ते ऐकण्याची शक्यता वाढते.
प्लास्टिक कमीत कमी वापराव हे खरं - पण काही गोष्टीत त्याला पर्याय नाही - ह्यापेक्षा त्यासाठी तितकाच उपयुक्त biodegradable पर्याय शोधता आला तर उत्तम (कुणी शोधायचा हा प्रश्न रहातोच!)
आणि कागदाच्या जास्त वापर पण पर्यावरणाकरता योग्य नाही.. कापडी पिशव्या उत्तम - त्या reuse करता येतात. जिथे अशक्य तिथे प्लास्टिकचा वापर करावा.. balance असला पाहिजे..
स्मिता वैचारिक लेख... आणि
स्मिता वैचारिक लेख... आणि तुम्ही नुसतच लेखातुन हळहळ व्यक्त न करता...
गुरुवारी संध्याकाळी आम्ही सोसायटीतल्या अतीउत्साही सभासदांनी प्रत्येक घरी जाऊन विनंती केली, तीन दिवस कचरा गोळाकरण्यात येणार नाही, कृपया आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा>>>> हे पाऊल ऊचलल हे कौतुकास्पद ... अभिनंदन
खुपचं छान लेख . ही खरोखरच एक
खुपचं छान लेख .
ही खरोखरच एक ज्वलंत समस्या आहे आणि प्रत्येकाने ती सोडवण्यासाठी सामील होणं गरजेचं आहे . किमान आपण मायबोलीकर स्वत: सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळु शकतो व सहकार्यांना पण प्रेरित करु शकतो.
मध्यंतरी ५० मायाक्रॉन पेक्षा
मध्यंतरी ५० मायाक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरा वर सरकार ने बंदी घातली होती. परंतु नियम हे तोडण्याकरताच असतात ह्या उक्तीनुसार, ती कधीच धुडकावुन लावली गेली आणि प्लॅस्टिकचा वापर जोमाने वाढला
-----------------------------------------------
हे कधी झाले?
स्मि अगदी खर लिहीलयस.
स्मि अगदी खर लिहीलयस.
@नानबा......मी देखील तसच करते. त्यामुळे आत्ता पर्यंत पहिले माझा नवरा, आणि त्या नंतर ३-४ मैत्रिणी तरी बदलल्यात (अॅटलिस्ट मी बरोबर असताना तरी कचरा टाकत नाहीत इथे तिथे
)
माझा जिव्हाळ्याचा विषय. मी
माझा जिव्हाळ्याचा विषय.
)
मी भाजी-वाणसामान इ. आणायला जाताना घरातल्या कापडी पिशव्या घेऊन जाते. दुकानदाराला कटाक्षानं 'कॅरीबॅग नको' असं सांगते. त्यामुळे आता आसपासच्या दुकानदारांना माहीत झालंय. आता तेच मला विचारतात - पिशवी आणलीयेत ना? (पण फक्त मलाच विचारतात
बाकी, झक्कींना माझं थोडंफार अनुमोदन आहे. सगळ्याच्या मुळाशी लोकसंख्या हे कारण आहे.
लेख आवडला. फार त्रास होतो अशा
लेख आवडला. फार त्रास होतो अशा गोष्टींचा. खरं तर अशा बाबतीत कडक कायदे केले पाहिजेत. ते मोडले तर तितकीच कठोर शिक्षा, जबर दंड केला गेला पाहिजे. तो पर्यंत सुधारणा होणार नाही. अमेरिकेत किंवा कुठल्याही प्रगत देशात शिस्त पाळली जाते त्याचे कारण हेच आहे. आणि अर्थातच खूप काळापासून हे कायदे अस्तित्वात असल्यामुळे ती शिस्त ह्या देशांतील लोकांच्या अंगवळणी पडली आहे.
हम्म ! भारताची बेसुमार वाढणारी लोकसंख्या आणि त्याबाबत अजूनही असणारी उदासिनता ही माझी दुखरी नस आहे. लोकसंख्या कमी असती तर सगळ्याच समस्यांची तीव्रता कमी झाली असती.
छान लिहिलं आहेस स्मिता. आता
छान लिहिलं आहेस स्मिता. आता पुण्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे ना, पण तीही फार फार तर १-२ आठवडे चालेल.
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांनाच,
सगळ्याच्या मुळाशी लोकसंख्या हे कारण आहे. >>>> आणि त्याच्या मुळाशी शिक्षणाचा आभाव (इथे फक्त पुस्तकी शिक्षण म्हणायच नाहीये)
आमच्या इथल्या एका मोठ्या मॉल बाहेर एक ७० वर्षांचे आजोबा प्रत्येक गिर्हाईकाला कागदी पिशव्या वाटत बसलेले असतात, आणि सांगतात, इथुन पुढे प्लॅस्टिक च्या पिशव्या वापरण सोडा. लोक तेव्ढ्या पुरत ऐकतात, सोडून देतात. पण आजोबांची चिकाटी दांडगी आहे.
सध्या आमच्या इथे अजुन एक प्रयत्न चाललाय, आमच्या सोसायटी तल्या लोकांनी, एका एजन्सी ला संपर्क केलाय, ती एजन्सी ओला कचरा आणि सुका कचरा घेऊन जाणार, ओला कचरा खता साठी वापराय्ला देणार ,सुका कचरा (जेवढा रिसायकल करतायेइल तेवढा) पुनःवापरासाठी देणार, त्यासाठी प्रत्येक घराने त्या एजन्सीला त्या बदल्यात १५ रु महिना द्यायचे, पण त्यामूळे तुमच्या परिसरात कचराकुंडी ठेवयची गरज रहाणार नाही. अर्थात ह्या साठी सगळ्यांनी/ सगळ्या सोसायट्यांनी सहकार्य करायची गरज आहे, जे की सगळ्यात अवघड गोष्ट आहे.
सगळेचजण स्वतःच्या घरीसुद्धा
सगळेचजण स्वतःच्या घरीसुद्धा स्वच्छ रहातात अस नाही .मी अनेकांची गलीच्छ घर बघितली आहेत .
अर्थात प्रत्येकाच्या वैयक्तीक समस्यासुद्धा असू शकतात .सार्वजनीक स्वच्छतेबाबत म्हणायच तर आपल्या
देशात अपवाद वगळता जवळ जवळ रोज कचरा महापालीकेतर्फे उचलण्याची व्यवस्था असते .आँस्ट्रेलियात
इथे आठवड्यातून एकदाच कचरागाडी येते .याची कारण अती लोकसंख्या ,जिथे स्वच्छतेच्या कीमान
सोयी उपलब्ध नाहीत तिथे नियमाबाहेर सहकुटुंब रहाणे ,[उदाहरणार्थ -मरीनलाईन्सपासून जव्हेरीबजारला
जाणारा रस्ता ,तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक्सच्या रांगा दोन ट्रक्समध्ये जराही अंतर न ठेवता उभ्या
असतात .या रांगेच्या दोन्ही बाजूला फूटपाथवर अनेकांचे संसार आहेत .भर वस्तीत मलमुत्र ,थुंकण सगळ
रसत्यावर .स्वयंपाक ,झोपण,भांडी घासण हेही आलच .हे बहूतेक ट्र्क व टँक्सी चालकांचे संसार
असावेत .मुंबई बाहेरची वस्तीला आलेली लोक .हे चित्र १९९७-२००५ .आता काही फारसा फरक असेल
अस वाटत नाही .]तंबाखुची सवय्[मोठमोठे हिरा व्यापारी आलिशान गाडीतून स्वच्छ कपड्यानी उतरतील,
पहिले रस्त्यावर थूंकतील मग बँकेत येतील .अनेक गरीब लोक भूक मारण्यासाठी तंबाखू सतत चघळतात,
सोसायटीत घरोघरी बायका धुणी भांडी करायला जाण्यापूर्वी पहिले मजल्यावरच्या कोपर्यात थुंकतील ,
रिक्षावाले गिर्हाईक मिळेपर्यंत सतत थुकत रहातील ]रस्त्यावर जागोजागी अंतरा अंतरावर कचराकुंड्या
नाहीत त्यामुळे रस्त्यावर खाणारी मंडळी कागद फळांची साल रस्त्यावर टाकतात .बागेतसुद्धा हेच .
शाळेतून घरी जाणारी मुलसुद्धा हेच करतात .ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी घरोघरी
कचरा कलेक्ट करणारी बाई सर्व एकत्र करणार व सोसायटीचा कचरा नेमका कचर्याच्या डब्यात
टाकेलच अस नाही .भर वस्तीत जागोजागी वेलमँनेज्ड स्वच्छतागृह नाहीत .सर्वसामान्य लोकाना या
सर्वांची छान सवय झाली आहे त्यामुळे स्व्त:च्या आळसाला मुरड घालण्यापेक्षा या कचर्यात भर घालण जास्त सोईस्कर वाटत.प्लँस्टीकच्या पिशव्याना कायद्यानेच बंदी करावी .१९९६ मध्ये अशी बंदी घातली
होती पण आठवडाभरसुद्धा टीकली नाही .त्याला अनेक कारणे आहेत .लोकानाच ती जास्त सोईस्कर
वाटते .प्रत्येकजण आपल्यापुरताच विचार करतो हेच खर .प्रत्येकजण इतका गांजला आहे की व्यक्ती
पासून समश्टीचा विचार रुजवायचे प्रयत्न त्यामानाने फार फार कमी पडत आहेत .बाकी लेख छान .
मी असे ऐकले (जे लोक
मी असे ऐकले (जे लोक अफ्रिकेतले, मध्यपूर्वेतले, दक्षिण अमेरिकेतले अनेक गरीब देश हिंडून आले आहेत, त्यांच्याकडून) की इतर देशात सुद्धा काही माणशी एक स्वच्छता गृह नसते, अगदी भारतासारखीच अवस्था आहे थोड्याफार प्रमाणात. स्वच्छता गृहे कमी. पण ते लोक भर रस्त्यावर तसले काही करत नाहीत! करत असतील तरी ते लक्षात येत नाही, कारण लोकसंख्या कमी.
रस्त्यावर थुंकणे नि चड्डी सोडून बसणे ही खास भारतीय संस्कृतीची वैशिष्ठ्ये आहेत. आणि लोकसंख्या जास्त असल्याने ते लगेच लक्षात येते.
स्वतःचे सामान उचलायला हमाल, स्वतःचे घर झाडायला, भांडी घासायला, कपडे धुवायला मोलकरीण पाहिजे. असे स्वच्छता करणारे लोक भारतात वेगळे असतात, त्यांचे ते काम आहे, आपले नाही.
भारतात एका ऑफिसात माझ्या हातून एक ग्लास टेबलावरून खाली पडून फुटला. मी लगेच खाली वाकून तुकडे गोळा करून शेजारच्या कचर्याच्या टोपलीत टाकायला निघालो, तर लगेच, 'अहो राहू द्या, राहू द्या. तुम्ही कशाला? अरे गजानन, प्यूनला पाठव!' मग अर्धा तास तो कचरा तसाच!
तर ही भारतातली पद्धत. प्रत्येक देशात वेगळी.
अमेरिकेत अगदी श्रीमंत मुले सुद्धा आवडीने स्वतःची गाडी स्वतः धुतील. स्वतःची खोली स्वतः जशी 'आवरायची' तशी 'आवरतील'. नोकरच काय, स्वतःच्या आईला सुद्धा त्या खोलीत यायला परवानगी नसते!
(काही खुळ्या आयांना वाटते, की आपण बाब्याची खोली आवरून दिली की तो तशीच ठेवेल! ती तशीच रहाते, जोपर्यंत बाब्या त्या खोलीत जात नाही. एकदा का तो त्या खोलीत गेला की एका मिनिटात तो पुनः 'आवरतो'.)
Pages