बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मॅडम एक्स' लागलाय रेखाचा आणि पाच मिनिटांत 'मुल्ला की दौड मस्जिद तक' या न्यायाने पाय बेकरीकडे वळले. हिरो नाहीच व दोन रेखा आहेत, त्यामुळे एक रेखा वाईट आहे. ही इतकी SSSS फॅशनेबल आहे की , भांडी घासतानाचे अमेरिकन पिवळे ग्लोव्हज न काढताच वरून पिवळा झगा चढवला असावा असे वाटते आहे. ईजिप्शियन-पगडी सदृश टोप्या घातलेली रेखा व्हिलन आहे, बिनटोपीची मायाळू वाटतेय. कारण तिचे दिल वर्दीवाल्यावर आलेय म्हणून ती 'कानून की ताकत', 'सच्चाई की जीत' वगैरे दळण दळू लागलीये असं टोपीवाली म्हणतेय. पेपर टॉवेलच्या रिकाम्या रोलसारखी दिसणारी बंदूक घेऊन म्याडमने बऱ्याच जणांना मारून टाकले. 'सच्चाई की जीत' नाही झाली तरी चालत असल्याने मी बंद करावं म्हणताच काय झाले माहीत नाही हे टायपेपर्यंत म्याडम गोळी लागून शेरोशायरी म्हणत ड्रॅमॅटिकली मेली आणि आनंदी गाणेच लागले एकदम. आता सच्चाईवरचा विश्वासच उडाला. Happy

राकु व शत्रूघ्नचा 'बेताज बादशहा' सुरू झाला, आज 'बॅक टू बॅक बंडल' सिनेमे लागले आहेत. 'औरको की जमीन जमीन है, हमारी मात्र गर्दिश है' म्हणाले राकु म्हणजे काय हे त्यांनाही माहीत नाही. आपल्याला कळून उपयोग नाही. एकटे श्री श्री श्री राकु कमी वाटले की काय माहीत शत्रूघ्न सुद्धा राकु-राकु खेळतोय. 'खटमलों को मारमारके खून इकठ्ठा करनेसे ब्लड बँक नही बन जाता' म्हणे. Lol हे ऐकून मुकेश खन्ना 'गरीब का इन्तकाम, लुंगा तुमसे परशुराम' अशा यमकातून धमक्या देतोय. एकमेकांचा अतिशय राग आल्याने पत्त्यांची काटाकाटी करत आहेत. अर्थात राकुला तीन एक्के आले, ते म्हणाले 'मी दिवसरात्र इन्सानियतच्या गल्लीतून हिंडत असल्याने ही खरेतर नेकीची बरकत हाय येड्या.'

दोन्हीही पिसेबल आहेत. Happy 'बेताज बादशहा' फारच पोटेन्शियल असलेला आहे. उत्तिष्ठ जागृत पोरापोरींनो.

मॅडम एक्स पिसेबल हे फारच अंडरस्टेटमेंट आहे.
आटपाट नगर होतं. त्यात दीपक शिवदासानी नामे मानव राहत असे. एके दिवशी त्याला दृष्टांत जाहला आणि त्रिकालदेवच्या आदेशानुसार त्याने डॉन या अजरामर चित्रकृतिचा जेंडर-फ्लिप्ड रिमेक बनवण्याचा घाट घातला. खूपच गळ घालून त्याने आपल्या सासर्‍याला यात पैसे लावण्यासाठी तयार केले. सासरा म्हणाला बरं ठीक आहे पण अमिताभच्या जागी कोणाला घेणार? दीपक वदला की अमिताभच्या जागी ना जया ना हेमा ना सुषमा, फक्त आणि फक्त रेखा!
माझा फेवरेटेस्ट सीन हा आहे - https://youtu.be/1jk7bPqCFck&t=2528
मॅडम एक्स (वाईट रेखा) ने मोहसीन खानच्या प्रेयसीला ठार केले आहे. तो एकटाच तिच्या चितेला अग्नी देऊन शून्यात बघत उभा आहे. अचानक मॅडम अवतरतात, तिच्या चितेने आपली विडी पेटवतात आणि म्हणतात,
"इन्स्पेक्टर विजय. तुम्हारी ये महबूबा तुम्हारे साथ अग्नी के सात फेरे लेने के लिए नही, बल्कि अपनी चिता की लकडी से हमारी ये सिगरेट जलाने के लिए पैदा हुई थी."

पहिल्या रेखाच्या पत्ते वगैरे खेळण्याच्या सीन मध्ये तिच्या मागचं पोस्टर अचानक अवतीर्ण होतं असे जादूचे प्रयोग पण आहेत या पिक्चर मध्ये. रेखाच्या टोप्यांवर एक विस्तृत लेख होईल अक्षरशः.
मी पायसच्या गळ्यात याच्या रिव्ह्यूची जबाबदारी टाकते आहे Proud

अस्मिता, पायस Lol कोठे आहेत ते ही सांगा. यू ट्यूबवर शोधेनच. लिंक पाहतो.

पेपर टॉवेलच्या रिकामा रोल ला Rofl

ऱमड आणि फा, आयपीटिव्हीवर 'गोल्डमाईन बॉलिवूड' नावाचे चॅनल आहे, नावाला जागून खरोखरच 'रत्नांची खाण' आहे असे लक्षात आले. तुम्ही ताबडतोब यूट्यूब गाठा, तुमचे डोळ्याचे आणि संवाद ऐकून कानांचेही पारणे फिटेल. Happy

रेखाच्या टोप्यांवर एक विस्तृत लेख होईल अक्षरशः. >>> अगदी. अवाक होऊन बघत राहिले होते. तिचा सगळा कपडेपटच 'आऊट ऑफ धीस वर्ल्ड' होता, शेवटी तीही तिकडेच गेली. Happy

शेवटी तीही तिकडेच गेली >>> Lol

ना जया ना हेमा ना सुषमा >>> Happy यातील "निरमा" संदर्भाला एक अ‍ॅक्नॉलेजमेण्ट Happy

सगळा कपडेपटच 'आऊट ऑफ धीस वर्ल्ड' होता, शेवटी तीही तिकडेच गेली >> Biggrin

मी पायसच्या गळ्यात याच्या रिव्ह्यूची जबाबदारी टाकते आहे >> Happy अस्मिता/फा किंवा इतर कोणाला घ्यायचा असेल तरी हरकत नाही. हा डाकू हसीना स्टाईल प्रबंधाचा विषय - ती लेडी डाकू तर मॅडम एक्स लेडी डॉन - आहे.
तर या प्रकारच्या फॅशनचे सिनेमे हा दुसर्‍या स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. नथिंग टॉप्स मॅडम एक्स (काही प्रमाणात खून भरी मांग वगळता) तरी माझी अशा फॅशनेबल सिनेमांची लिस्ट (नॉट एक्सहॉस्टिव्ह, अजून आहेत)
आंधी और तूफान (हेमा), बेवफाई (मीनाक्षी, https://www.youtube.com/watch?v=JcPKYr7-Q4M), पाप का अंत (हेमा), पथरीला रास्ता (डिंपल), इन्साफ की देवी (रेखा), फैसला मैं करुंगी (अनिता) इ.

'हम है मौत की वो एक्सप्रेस'...

त्यातले रेखाचे कपडे आणि हेअरस्टाईल्स मेकअप 'खून भरी मांग + अजूबा' वगैरे दोन तीन सिनेमातल्या स्टाईल्स मिळून बनवल्यासारखे आहेत. ज्यांनी मॅडम एक्स पाहिला असेल त्यांना 'खिलाडीयो का खिलाडी' मधली डॉन माया अगदी सॉफीस्टिकेटेड वाटली असणार.

"इन्स्पेक्टर विजय. तुम्हारी ये महबूबा तुम्हारे साथ अग्नी के सात फेरे लेने के लिए नही, बल्कि अपनी चिता की लकडी से हमारी ये सिगरेट जलाने के लिए पैदा हुई थी."
<<<<<<<<< Lol
पायस, प्लीज पूर्ण रिव्ह्यू लिही.

शेवटी तीही तिकडेच गेली >> Rofl

मॅडम एक्स विषयाची तुझी पी एच डी पूर्ण झालेली आहे म्हणून तुझ्या गळ्यात. त्याबद्दल लापि मागेच वाजवून झाली आहे Happy

बापरे, पायसनी दिलेला सीन अचाट आहे. Biggrin काय ते कपडे, केप, उड्या.... अरारारारा. मागे भिंतीवर 'जलाऊ लकडा' असं लिहून ठेवलंय. आता स्मशानात जलाऊ लाकडा नाहीतर काय फर्निचरची लाकडं मिळणार आहेत का?

मॅडम एक्स विषयाची तुझी पी एच डी पूर्ण झालेली आहे म्हणून तुझ्या गळ्यात. त्याबद्दल लापि मागेच वाजवून झाली आहे
>>>> मम. Happy
पायस, वरची पोस्टही Lol
यातील "निरमा" संदर्भाला एक अ‍ॅक्नॉलेजमेण्ट>>> Lol मला लक्षात आले नव्हते हे.

पाहिला थोडासा मॅडम एक्स ! सुरुवातीला क्रेडिट्स मध्ये संगीत, दिग्दर्शन, वेषभूषा बरोबर टोपी डिझाईन चे शेपरेट क्रेडिट द्यायला हवे इतक्या विविध टोप्या आहेत.

हॅलो बेकर्स, कसे आहात (म्हणजेच सध्या सापशीडीच्या पटावरच्या कोणत्या घरात आहात?)
नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या वर्षी (परत एकदा) मायबोलीवर नियमीत यावं असा विचार आहे....

रार बॅक इन बेकरी आणि आम्हाला पत्ताच नाही? मला वाटले साउथचा हीरो गावात परतताना मोटरसायकलच्या चाकाने धुरळा उडवतो तसे माबोच्या पानावर दिसेल बेकरी धाग्याभोवती Happy

बाकी तू वरच्या पोस्ट्सवरून ओळख आम्ही सापाच्या तोंडाशी आहोत की शिडीवर Happy

रार बॅक इन बेकरी आणि आम्हाला पत्ताच नाही? मला वाटले साउथचा हीरो गावात परतताना >> तेरा ध्यान किधर है ? और रार इधर है असं वरुण धवन स्टाईल नाचत एंट्री करते आता (स्मायली +एक डोळा मारणारा चेहरा)
(बापरे ! मायबोलीवर एमोजी कसे टाकायचे हे देखील विसरले आहे मी... !)

झकास ! बेकरीचा स्वॅग पूर्वी होता तसाच आहे बघून बेस्ट वाटलंय !
आली बिचकत, रार बेकरीत, नव्या वर्षात.... खुळ्यावानी !

टेक्स्ट फॉरमॅट ऑप्शन मध्ये जाऊन शोधण्यात आणि इमोजी लिहिण्यात यश आले आहे Lol
(तिथला <आदरमोद> हा शब्द मी चुकून वेगळाच वाचला पटकन... म्हणलं मधल्या काळात ओटीटी कंटेट पाहून मायबोली इतकी पुढारली की काय ! ) Lol

आली बिचकत, रार बेकरीत, नव्या वर्षात.... खुळ्यावानी ! >>>> गंऽऽऽऽ रारनी Proud

खालचे टेक्स्ट फॉर्मॅट ऑप्शन्स पहा. तुम किसकी तलाशमें हो, हमें कैसे कळनेका? Wink

चुकून वेगळाच वाचला >>> तो वेगळाच लिहायचा असावा असा मला संशय आहे Proud अडमिनने आयत्यावेळी शब्द फिरवला असेल Wink

Bw >> मी एक स्टोरी ऐकली होती. तो शब्द गैर कारणांकरता पूर्वी वापरला जायचा. मग त्याची इमोजीच बनवून टाकली. खखो admin जाणो

रमड, एक्सॅटली.
ते न्यूयॉर्क टाइम्सचं स्पेल बी सोडवताना जसं दिलेल्या अक्षरातून विविध शब्द तयार केले जातात तसंच होतंय <आदरमोद> चं ! Proud

Hello rar Happy
मी तुमचं लेखन आवडल्याचे लिहिले होते हल्लीच. मनाचे श्लोक, 'प्रभाते मनी पती चिंतीत जावा' आणि ९८ चा साप वगैरे.' Happy मी बेकरीची नवीन मेंबर, आपली ओळख नाही. तुमच्या बद्दल रमड आणि फा कडून बरेचदा 'छान-छान' ऐकलं आहे. वेलकम बॅक. Happy