हा व्हिडीओ डिस्टर्बिंग वाटू शकेल. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर पहा.
https://www.youtube.com/watch?v=GYnbUiokKM8
आताच अॅमेझॉनवर ग्रेट इंडीयन फेस्टीवल झाला. या दिवसासाठी अॅमेझॉन वर्षभर तयारी करत असते. फ्लिपकार्ट आणि अन्य ऑनलाईन स्टोअर्स सुद्धा आपापले असे शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करत असतात. डेकॅथलॉन हा एक ब्रॅण्ड सुद्धा यासाठी प्रसिद्ध आहे. यांच्याकडे क्लिअरन्स सेल सुद्धा असतो. या उत्सवा दरम्यान मोठ मोठे डिस्काउंट्स दिले जातात. त्यामुळे या चार ते पाच दिवसांसाठी कधी कधी वाढीव चार दिवसांसाठी खूप मोठा ताण या स्टोअर्सच्या कामगारांवर येतो.
वर्षभरात जेव्हढा सेल होत नाही तेव्हढा या चार दिवसात होतो. म्हणजेच ३६० दिवसाचे काम चार दिवसात !
मनुष्याच्या क्षमतेच्या पलिकडे हा लोड असतो. अॅमेझॉनवर असा एक यूट्यूब वर व्हिडीओ उपलब्ध होता. तो बहुधा कंपनीने डिलीट करायला लावला असावा. कारण हे शोषण आहे. आठ तास काम हे शास्त्रशुद्ध पाहणीनंतर, अनेक अहवालानंतर संमत झालेले आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नावाच्या विषयात एखादा मनुष्य किती काम करू शकतो, दोन हातांनी किती काम करू शकतो याची पाहणी कशी करायची आणि काम कसे नेमून द्यावे हे शिकवत. पुढे त्यात मानवी मर्यादा आल्या. निरनिराळ्या हॅण्डबुक्स मधून मानवी शरीराची क्षमता सांगितलेली असे.
आता कम्युनिस्ट चीननेच बारा तास रोबोपेक्षाही भयानक रितीने कामगारांना राबवून घ्यायला सुरूवात केली आहे. यामुळे स्वस्तात उत्पादने देणे शक्य होते. चीनच्या चलनाचा दर, उपलब्ध असलेले मनुष्यबळ यामुळे लेबर स्वस्तात उपलब्ध आहे. त्यांच्या शोषणाच्या कहाण्या पोलादी पडद्याआडच रहात असत. दारिद्र्य आहे म्हणून त्याचा फायदा घेणे आहे हे. यालाच शोषण म्हणतात. काही भलावणकार आम्ही रोजगारनिर्मिती करतो असे म्हणतात. पण श्रम तर लागणारच आहेत. मोठी लोकसंख्या रोजगारापासून वंचित ठेवणे हे (रक्तरंजीत?) क्रांतीला निमंत्रण असते.
भारतातही आता बारा तासांचे काम सुरू झाले आहे. ते ही सकाळी जी क्षमता असेल त्याच क्षमतेने पूर्ण बारा तास काम करावे या अपेक्षेने.
हे सगळं कुठे जाणार आहे ? हे सगळं भयंकर आहे. रोबो हा यावरचा उपाय आणखी भयानक आहे. भीक नको पण कुत्रं आवर अशा पद्धतीने रोबो आता सगळं काम करू लागलेले आहेत.
खरंच आपण सोपी लाईफस्टाईल सोडून कुठे चाललो आहोत. आपल्या मुलांना असे राबावे लागले तर ? काही सांगता येत नाही.
टीप : मध्यंतरी सातत्याने मानवी मूल्यांबाबत मांडणी करणार्या एका महाभागाने अशाच एका विषयात त्याच्या पक्षावर ठपका आल्यावर "मग काय हाताने टायपिंग करायचे का ?" असा प्रश्न विचारला होता. एका वाक्यात हवा काढायची ही युक्ती यांना पक्षाच्या आयटी सेल मधे शिकवली जाते. टूलकीट येते. त्यामुळे अ असो कि ब, या दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी या विषयावर मत मांडू नये ही हात जोडून कळकळीची विनंती. तुम्हाला एकट्यालाच मतस्वातंत्र्य आहे असा अर्थ सोशल मीडीयावर तुम्ही काढलेला आहे. इतरांना लेबले लावून त्यांची मतं मोडीत काढणे, कुणी राष्ट्रद्रोही ठरवणे, कुणी धर्मद्रोही ठरवणे आणि आमच्या सोबत नसाल तर खलप्रवृत्तीसोबत तुम्ही आहात असा दम भरून आपले घोडे दामटणे यामुळे चर्चा करणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे ज्या सत्राशेसाठ विषयांची आपण वासलात . विल्हेवाट लावत असता, त्याच धाग्यावर सुखाने नांदावे ही विनंती.
एकही प्रतिसाद मिळाला नाही तरी चालेल. पण उगाच पक्षीय पातळीवर विषय भरकटण्यापेक्षा ते लाखपटीने परवडलं.
अन यात वाईट म्हणजे ज्युनियर्स
अन यात वाईट म्हणजे ज्युनियर्स सुध्दा या मानसिकतेत आनंद घेणारे महाभाग असतात
आमच्या प्लांट मध्ये GEचा
आमच्या प्लांट मध्ये GEचा जनरेटर होता. त्यात बिघाड झाला म्हणून दुरुस्तीसाठी दोन अमेरिकन आले होते. ते सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत काम करत असत. आमचा एक चीफ सतत त्यांच्या बरोबर असे. एकदा तो अमेरीकनाला म्हणाला, "तुमचे छान काम आहे. ९ ते ५. जास्त वेळ थांबावे लागले तर ओव्हरटाईम लावायचा. आता तुम्ही गेलात कि मी थांबून रात्री ९ वाजे पर्यंत काम करत बसेन."
अमेरिकनाने त्याला सांगितले, "In my company if someone is working overtime, either he is overloaded or he is inefficient. I don't think you are overloaded."
रेव्यु - पोस्टशी सहमत.
रेव्यु - पोस्टशी सहमत.
किती वेळ काम करत आहे यापेक्षा कार्यक्षमता बघणे जास्त महत्वाचे आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्या कुटुंबासोबत किंवा इतर कुठल्याही आवडणार्या गोष्टी मधे वेळ घालविला तर दुसर्या दिवशीचे काम अधिक उत्साहाने होते.
प्राॅब्लेम बर्याच अंशी
प्राॅब्लेम बर्याच अंशी कर्मचार्याचा देखील असू शकतो...कामापलिकडे कोणतेही छंद नाहीत, पत्नीला हातभार लावायची, मुलांसह सहजीवनात रस नसला की मग कार्यक्षेत्र एकमेव विर॓गुळा ठरतो अन मग निवृत्तीनंतर ब्रह्मराक्षस बनतो...
हे देखील अशी कर्मचारी जात रोल माॅडेल बनायची कारणे मी पाहिली आहेत मग सुक्याबरोबर ओलेही
जळते
मूर्ती आणि सुब्रमण्यन यांच्या
मूर्ती आणि सुब्रमण्यन यांच्या मागे आपल्या त्या ह्यांची प्रेरणा असेल किंवा ते बोलविता धनी सुद्धा असू शकतील. अठरा अठरा तास काम. हक्कापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं. देशासाठी काही करायचं असेल तर कुटुंबाकडे दुर्लक्ष करा.
कुठलेही छंद नसणे, किंवा
कुठलेही छंद नसणे, किंवा कामाबद्दलच अफाट प्रेम असणे समजू शकतो पण तसे करणे इतरांवर बंधनकारक नको.
काम मिळविण्यासाठी जिवघेणी स्पर्धा आजच आहे आणि दिवसंदिवस अजून गंभिर होत आहे. १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशांत प्रत्येकाने आठवड्याला ७० तास काम केले तर लोकांचे दरडोई उत्पन्नावर काय परिणाम होतील ? बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल का ?
माझ्या मते हा पगाराचा विषय
माझ्या मते हा पगाराचा विषय नसून कीड लागलेल्या मानसिकतेचा आहे...
सो........ इट इज द टॉप हू मेक इट हॅपन >>
प्रत्येक वाक्याशी १००% सहमत आहे. >>> + १
या संदर्भातलं हे ट्वीट पटलंच
या संदर्भातलं हे ट्वीट पटलंच
Ranchod Das Chanchad
@rdchanchad
We are lucky that our maids, drivers, servants and nannies are not on linkedin watching us getting enraged by the idea of a 7 day work week.
अगदी बेजबाबदार विधान आहे.
अगदी बेजबाबदार विधान आहे. पिळवणुक करुन घेण्याची , एक्स्प्लॉयटेशन - वृत्ती आहे. निषेध.
देशासाठी ७०- ९० तास काम करा
देशासाठी ७०- ९० तास काम करा हा यडपटपणा आहे. चीन मधे इतके तास काम करतात, जपान मधे इतके वगैरे सांगणे हे त्याहून यडपट.
यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार नाही, खर्या प्रॉडक्टिविटीचा तर अजिबातच विचार नाही. एखाद्या व्यक्तीने नात्यांमधे गुंतवणूक करण्यासाठी दिलेला वेळ, एक पालक म्हणून पुढील पिढी घडवण्यासाठीचा वेळ हा गौण मानणे हे फार घातक. या अशा शोषणाच्या वृत्तीने देशाचे भले कसे होणार. मानवता बाजूला ठेवून केवळ भांडवली मानसिकतेने शारीरिक आणि मानसिक अनारोग्याची किंमत मोजली तरी सौदा घाट्याचाच.
कंपनीचा सीइओ हा ऑन कॉल असणे वेगळे. याचा अर्थ तो सतत काम करत असतो असा होत नाही. त्याला हवे तेव्हा काम हवा तेव्हा ब्रेक असे चालते. त्याच्या सोबत त्याचे ऑफिस सगळीकडे फिरते, त्याचे आयुष्य सोपे करायला वेगळ्या दर्जाचे रिसोर्सेस असतात. त्यातून जी काही सॅक्रिफायसेस केली जातात ती स्वतःच्या महत्वाकांक्षेची किंमत म्हणून , रिवॉर्डस काय याचा नीटच हिशोब बांधून स्वतःच्या मर्जीने केली जातात. त्याची तुलना सामान्य एंप्लॉयीजशी करणेच चुकीचे.
छान ऑलराऊंडर विचार करतेस तू
छान ऑलराऊंडर विचार करतेस तू स्वाती. आणि मांडतेसही 'मॅटर ऑफ फॅक्ट'. शिकण्यासारखे आहे.
एका जणाला ९० तास करायला
एका जणाला ९० तास करायला लावण्या पेक्षा, दोन जणांना ४५ तास करू द्या की. तेवढीच बेरोजगारी कमी होईल.
स्वाती २, खूप छान. सहमत.
स्वाती २, खूप छान. सहमत.
मूर्ति, सुब्रमन्यम यांच्या
मूर्ति, सुब्रमन्यम यांच्या विचारात तथ्य आहे, बट दॅट बोट हॅज सेल्ड. सद्ध्या जे विकसीत देश आहेत, त्यांच्या इंडष्ट्रियालिस्टनी, नागरिकांनी ७०-८० वर्षांपुर्वि हा फॉर्म्युला वापरला. त्यावेळेस कामगार कायदे न्हवते म्हणुन ते चालुन गेलं, आता तशी परिस्थिती नाहि. याची कल्पना मूर्ति, सुब्रमन्यम यांना असायला हवी. ती नहि म्हणुनच त्यांची खिल्ली उडवली जात आहे...
India Inc Profit Rising, But
India Inc Profit Rising, But Salary, Hiring Not Keeping Pace': Govt's Message To Companies In Economic Survey
मूर्ति, सुब्रमन्यम यांच्या
मूर्ति, सुब्रमन्यम यांच्या विचारात तथ्य आहे, बट दॅट बोट हॅज सेल्ड. सद्ध्या जे विकसीत देश आहेत, त्यांच्या इंडष्ट्रियालिस्टनी, नागरिकांनी ७०-८० वर्षांपुर्वि हा फॉर्म्युला वापरला.>>>> असहमत. विकसित देशांत ( उदा. जपान) लोक जरी ८०-९० तास आठवड्याला काम करतात तरी तिथल्या लेबर लॉ नुसार आठवड्याला फक्त ४० तास काम बंधनकारक आहे, वरच्या प्रत्येक तासासाठी कंपनीला कामगारांना त्यांच्या ओव्हरटाईमचा मोबदला देणेही कायद्याने बंधनकारक आहे, मुर्ती सुब्रमण्यम यांना आठ तासांच्या वेतनाच्या बदल्यात लोकांना १२ तास राबवून घ्यायचे आहे. दुसरी बाब विकसित देशांत लोकाना ओव्हरटाईम म्हणून का होईना पण १२-१२ तास आठवड्याचे ६-७ दिवस काम करावे लागले याचे प्रमुख कारण तिसऱ्या जगातील देशांनी आर्थिक उदारीकरणाचा अवलंब करायच्या आधी त्यांना भासत असलेली स्वदेशी मनुष्यबळाची कमतरता, त्यामुळे त्यांना ते करणे भाग होते आपल्याकडे मनुष्यबळाची काहीच कमतरता नाही आहे उलट आहे त्या मनुष्यबळात कपात करुन कामाचे तास वाढवण्याची भलामण सध्या या साठी चालू आहे कारण इंडोनेशिया, थायलंड, कोरीया मलेशिया यां सारख्या लहान साऊथईस्ट आशियाई देशांमुळे निर्माण झालेली स्पर्धा. जर तुम्हाला खरचं असं वाटत असेल की हे देशाच्या हिताला प्राधान्य देऊन त्या कळकळीपोटी हे विचार मांडतायत, तर ते नक्कीच तसं नाही आहे.
फाविदडिंना अनुमोदन! (केवढा हो
फाविदडिंना अनुमोदन! (केवढा हो तुमचा आयडी पण!)
तथ्य म्हणे!!
फाविदडिंना अनुमोदन! (केवढा हो
फाविदडिंना अनुमोदन! (केवढा हो तुमचा आयडी पण!)
तथ्य म्हणे!! >>+1
मेंटल हेल्थ किती महत्वाची आहे हे या सगळ्यात लक्षात येत नाही लोकांच्या या बाबतीतल्या प्रतिक्रिया पाहा https://youtu.be/sXDLc13wFik?si=0I6MlV59C6NJLrWa
मध्यंतरी एका CA स्त्री एम्प्लॉयी ने कामाच्या प्रेशर ने जीव दिला होता त्यावेळी हेच लोक वर्क लाईफ बॅलन्स चं महत्व पटवून देत होते तिने किती चुकीचं पाऊल उचललं यासाठी हळहळत होते.
स्ट्रेसफुल लाईफमुळे आधीच लोकांना आयुष्य जगायला वेळ मिळत नाहीये आणि हे कामाचे तास वाढवतायत. जिवंत माणसं आहोत Ai नाही कितीही राबवून घ्यायला.
@फार्स विथ द डिफरंस >> १००%
@फार्स विथ द डिफरंस >> १००% सहमत
अतिकामामुळे आत्महत्या करण्याला जपानमध्ये Karoshi म्हणतात. कामाच्या अतिताणामुळे जपानमध्ये दारू पिण्याचे प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे. हा व्हिडीओ अधिक माहिती देईल.
फाविदडि - आय थिंक यु हॅव
फाविदडि - आय थिंक यु हॅव मिस्ड माय पॉइंट.. विकसीत देशांचा सिनॅरियो (लेबर एक्स्प्लॉयटेशन) मी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा सांगतोय, आत्ताचा नाहि, तुमची उदाहरणं हल्लीची आहेत. प्लिज रीड माय कामेंट अगेन..
>>मुर्ती सुब्रमण्यम यांना आठ तासांच्या वेतनाच्या बदल्यात लोकांना १२ तास राबवून घ्यायचे आहे<<
भारतातील लेबर लॉज याच्याशी सहमत आहेत? कायदे असुनहि अशाप्रकारचं एक्स्प्लॉयटेशन होत असेल तर इंडिया कॅन बी कॅटगोराय्ज्ड अॅज ए बनाना कंट्रि..
मूर्ति, सुब्रमन्यम यांच्या ८०-९० तास काम करण्यामागचं कारण वेगळं आहे. आय्टि सर्विस इंडस्ट्री इज गोइंग थ्रु ए ट्रेमंडस प्रेशर टु शो प्रॉफिट्स अँड स्टे इन बिझनेस. तुम्हि कुठल्या फिल्ड मधे काम करता याची कल्पना नाहि, पण जेंव्हा कॉस्ट कटिंगचा प्रसंग येतो, तेंव्हा सर्विस इंडस्ट्री टेक्स द बिग्गेस्ट हिट. विषय व्यापक आहे, पंण थोडक्यात सांगतो - भारतीय कंपन्यांनी कितीहि टिमकी वाजवली (सिएमेम लेवल ५+ वगैरे), क्लायंट्स डोंट गिव ए रॅट्स अॅस हौ यु डिलिवर, (अॅज लाँग अॅज यु डिलिवर ऑन टाइम + विदिन बजेट), बट दे अॅवॉर्ड मल्टाय-मिल्यन कॉन्ट्रॅक्ट्स टु द लोएस्ट बिडर (रीड इंडियन आय्टि कंपनी). पिरियड. मूर्तिंनी याच मूलभूत पायावर इन्फोसिस उभारली (ऑन द ब्लड अँड स्वेट ऑफ वर्कर्स हु स्लॉग्ड लाँग अवर्स टु मीट डेडलाइन्स). त्यावेळची (लेट ८०ज, अर्ली ९०ज) परिस्थिती वेगळी होती, त्यांचे बिचारे एंप्लॉय्ज नाइव किंवा गरजु होते म्हणुन एक्स्प्लॉयटेशन चालुन गेलं, नॉट एनीमोर. आणि तसं हल्ली होत नाहि हे त्यांच्या चिंतेचं मूळ कारण आहे..
म्हणुन मी वर म्हणालो कि, दॅट बोट हॅज सेल्ड.. आजच्या काळात तुमची वेठबिगार मेंटॅलिटि खपवुन घेतेली जाणार नाहि..
बाय्दवे, मूर्ति इज वन ऑफ द बिगेस्ट हिपक्रिट. स्वतःला सोशलिस्ट म्हणुन घेतो, पण वागणं रुथलेस कॅपिटलिस्ट सारखं...
कायदे असुनहि अशाप्रकारचं
कायदे असुनहि अशाप्रकारचं एक्स्प्लॉयटेशन होत असेल तर इंडिया कॅन बी कॅटगोराय्ज्ड अॅज ए बनाना कंट्रि.. >>
गिव्ह मी अ ब्रेक. न्यूयॉर्कमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर किती तास काम करतात याची चौकशी करा. अदरवाईज रीड अ बुक टायटल्ड "Monkey Business" अंडर नो सर्कमस्टन्सस, इट कॅन बी जस्टीफईड टू वर्क मोर than 12 अवर्स अ डे.
स्वगत: इंग्रजी वाक्ये देवनागरीत वाचणे त्रासदायक आहेच, पण मुद्दाम तसे लिहिणेसुद्धा PITA.
In our country, there is a
In our country, there is a holiday on Sunday. When the British used to rule here, the Christian community used to celebrate the holiday (on Sunday), this tradition started from that time. Sunday is not associated with Hindus, it is associated with the Christian community.
हे कोण बोललं असेल ओळखा बरं
स्वाती२, फार्स विथ द डिफरंस
स्वाती२, फार्स विथ द डिफरंस - छान विचार मांडले आहेत.
फाविदडि - आय थिंक यु हॅव
फाविदडि - आय थिंक यु हॅव मिस्ड माय पॉइंट.. विकसीत देशांचा सिनॅरियो (लेबर एक्स्प्लॉयटेशन) मी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा सांगतोय, आत्ताचा नाहि, तुमची उदाहरणं हल्लीची आहेत. प्लिज रीड माय कामेंट अगेन..>> ओह... माझा अपेक्षित कालखंड समजण्यात घोळ झाला नक्कीच पण Correlation does not imply causation. जरी आजच्या प्रगत राष्ट्रांतील लोकांनी ८०-९० वर्षांपुर्वी कंबरतोड मेहनत केली असली तरी त्याचे ड्रायव्हिंग फोर्सेस हे राष्ट्र निर्माणाची प्रेरणा होते हे असे सरसकट डॉट्स कनेक्ट करणे चुकीचे ठरेल (किंबहुना माझ्या मते तो लिस्ट इंटेंडेड फॅक्टर होता - गाड्या सोबत नळ्याची यात्रा)
भारतातील लेबर लॉज याच्याशी सहमत आहेत? कायदे असुनहि अशाप्रकारचं एक्स्प्लॉयटेशन होत असेल तर इंडिया कॅन बी कॅटगोराय्ज्ड अॅज ए बनाना कंट्रि..>>>> हो आणि अगदी हाच माझा कंसर्न आहे...इंडिया ईज ऑलरेडी अ बनाना कंट्री इन धिस कॉंटेक्स्ट... आज सरकारी आस्थापनां व्यतिरिक्त अशा किती कंपनीज ईथे आहेत ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम पे करतात?? मी आयटी सेक्टरमधेच आहे, वर्कप्रेशरमुळे ( 'when situation demands' that's what they called it) दिवसाचे बारा - चौदा तास महीनोन महिने काम करुन सरते शेवटी अशा कंपनीतून जॉब सोडलेला आहे. ( पण सर्वत्र परिस्थिती जवळपास सारखीच आहे) यांची demanding situation more than often येते....हे लेबर लॉ हवे तसे वाकवतात. एचआर डिपार्टमेंट हे मुख्यत्वे डॅमेज कंट्रोल साठी किंवा असे इश्यू कव्हर अप करण्यासाठी वापरतात.
आय्टि सर्विस इंडस्ट्री इज गोइंग थ्रु ए ट्रेमंडस प्रेशर टु शो प्रॉफिट्स अँड स्टे इन बिझनेस.
क्लायंट्स डोंट गिव ए रॅट्स अॅस हौ यु डिलिवर, (अॅज लाँग अॅज यु डिलिवर ऑन टाइम + विदिन बजेट), बट दे अॅवॉर्ड मल्टाय-मिल्यन कॉन्ट्रॅक्ट्स टु द लोएस्ट बिडर (रीड इंडियन आय्टि कंपनी). पिरियड.>>> याच्याशी मी सहमत आहे...पण यांना पुरेसे प्रॉफिट मिळत नाही आहे का? तर ते तसं नाहीये, पण यात खरी गोम ही आहे की यांना नुसते प्रॉफिट शो नाही करायचे आहेत तर सदोदित ते चढत्या आलेखाने शो करायचे आहेत, अशी विचारसणी असणे यात नक्कीच काही चुकीचे नाही पण जेव्हा तुम्ही सामाजीक किंवा औद्योगिक प्रतलावर कोणतेही अमुलाग्र बदल घडवून आणाणारे उत्पादन न बनवता फक्त सर्वीस बेस्ड कंपनी उभारुन, कॉपी-पेस्ट कर्मचाऱ्यांच्या फौजा उभ्या करुन नफा कमवत असता तेव्हा कधी तरी तुमची कंपनी प्रॉफिट रेशोच्या सॅचुरेशन पॉइंटला जाणार त्यानुसार तुमच्या नफ्याच्या महत्वकांक्षांना थोडी रिअलीस्टीक फ्रेम असणे हे तुमचे शहाणपण (wisdom) आणि ग्राउंड रिॲलिटी कनेक्ट दाखवते.
(लेट ८०ज, अर्ली ९०ज) परिस्थिती वेगळी होती, त्यांचे बिचारे एंप्लॉय्ज नाइव किंवा गरजु होते म्हणुन एक्स्प्लॉयटेशन चालुन गेलं, नॉट एनीमोर.>>>सहमत, ज्याप्रकारे आपल्या येथील लो वेजेस लेबरचा गैरफायदा प्रगत देशातील कंपन्यांनी घेतला आहे त्या मधे आपल्या इथले असे उद्योजकही तेवढेच सहभागीदार आहेत. आणि पुर्वीच्या आर्थिक नफ्याची टक्केवारी आता ईतर प्रतिस्पर्ध्यांमुळे राखता येत नसल्याने दे गॉट रॅटल्ड.
Why Pune-Based Techie, Sole
Why Pune-Based Techie, Sole Earner In Family, Resigned From Infosys Without Another Offer In Hand?
(No subject)
पुढील वर्षी प्रमोशन नक्की.
पुढील वर्षी प्रमोशन नक्की.
फाविदडि, माझ्या वरच्या
फाविदडि, माझ्या वरच्या प्रतिसादात तुम्हाला तथ्य आढळलं असं दिसतंय. शेवटि काय, तेथे पाहिजे जातीचे. असो..
मूर्ति, सुब्रमन्यम यांच्या ७०-९० तासांच्या प्रपोजलमधे मला एक प्रश्न पडतो कि, इतकं काम आहे का यांच्याकडे? सेल्स पाइपलाइन तर ड्राय होत चालली आहे. बहुतेक आहे तो वर्क्फोर्स कमी करुन उरलेल्या वर्कर्सना ७०-९०तास काम करायला लावुन मार्जिन वाढवायचा विचार असु शकतो. दुसरी गोष्ट अशी कि, जेनएआय, ऑटोमेशन टुल्स मुळे सॉफ्टवेर एंजिनियरिंग लाइफसाय्कल मधली स्टेजेस मंडेन झाली आहेत. एआयच्या मदतीने वर्क हार्ड ऐवजी वर्क स्मार्ट हा मंत्र स्विकारला जात असताना वर्कर्स्ना ७०-९०तास कामाला जुंपणं हे मलातरी पटत नाहि. आणि हे कॉर्पोरेट लिडर्स या टेक्नॉलजी अॅडॉप्शन संदर्भात इतके डिसकनेक्ट असणं हि चिंतेची बाब आहे...
Pages