
नमस्कार माबोकर्स, दिवाळी सुखाची गेली ना? माझी पण अनपेक्षित रित्या छान गेली. व भरपूर आराम पण झाला. त्या चे असे झाले कि ३० व ३१ October एक घरगुती कार्य क्रम डेहरा डून मध्ये होता व त्याला आमंत्रण होते. पहिले दिवशी साखरपु डा मुलीच्या घरी अॅन्से स्ट्र ल प्रॉपर्टी वर; व डून मध्ये एक मधुबन नावाचे फेमस व हाय क्वालिटी हॉटॅ ल आहे ति थे व्याही भोजन दुसृया दिवशी. असे दोन फोर्मल कार्य क्रम होते. नातेसंबध जपण्या साठी हे दोन्ही अटेंड करणे महत्वाचे होते. फार फार. काही आहेर ही करणे आमची फॅमिली प्रमुख म्हणून मी करणे गरजेचे होते.
हे सर्व ठीक आहे प ण माझी परिस्थिती दारूण के आगे टाइप थी. ऑक्टोबर मध्ये एक इमर्जन्सी हॉस्पिट ल स्टे झाला. तीन बाटल्या रक्त चढवले.मग जायचे तर अजून दोन बाटल्या रक्त चढवून मगच जा असे सांगितले डॉक्टर ने. त आता जायची फ्लाइट मंगळ वारी व आम्ही शनिवार रविवार रक्तपिपासू पणा करत आहे. अशी परिस्थिती. मधल्या रविवारी लेक कुत्र्या ला केनेल मध्ये सोडून आली. सोमवारी सकाळी डिस् चा र्ज मिळाला. मग घरी येउन आराम व रिक व्हरी टाइम हा मस्ट आहे.
आपण गेलो नाही तर लेकीला ही ब्रेक घेता ये णार नाही. इथेच दिवाळी घालवा वी लागेल. सिन्ग ल परेन्ट फॅमीलीस हे जरा ज डच जाते.
हे जाणून मी हे साहस करायचेच असे ठरवले. फक्त स्वतः साठी. जमतेय का ते बघायला.
मंग ल वा री दुपारी निघालो. उबर अगदी घराशी . मी, माझी काठी , व गळ्यातली पिशवि - झोला असे मला बसवले गेले व लेक दुसर्या बाजूने बसली. ती लहान असताना ती उजवी क डे व मी डा वीकडे असे बसत असू पण आता मी डिपेंडंट. अं धेरीहून एअर्पोर्ट ला पोहोचायला कमी वेळ लागतो. पहिले मुलुम्ड ते अंधेरी व मग पुढे जावे ला गत असे. आता डोमेस्टिक वाहतूक पण टी २ वरूनच होते. सर्व एका तच. मी उतरल्यावर टर्मिनल वर थो डी काठी घेउन लेकीच्या मागे न ध ड प डता चालले. जमलं . महत्वाची माहिती: इं डिगो मध्ये खुद्द एअर्लाइनला आधी सांगितल्यास व्हील चेअर सुविधा नि:शुल्क आहे पूर्ण पणे. व एअर्पो र्ट वर पेड सर्विस पण उपलब्ध आहे. बारक्या अटेंडंटसाइजच्या पण आरामशीर व्हिईलचेअर मध्ये बसवतात बेल्ट घालतात व पार गेट परेन्त नेउन पोहोचवतात.
आत गेलो तर हज उमरा गृप्स ची फार गर्दी होती. लेक बॅग चेक इन करून आली. स्त्री अटेडंट ने गेट च्या थोडे आधी सोडले म्हणजे आम्हीच तिला सांगितले. तिथे एक खाउ पिउ लाउंज आहे तिथे पाणी पुरी खाली लेक कोस्टा कॉफी घेउन आली. मुंम्बई एअर्पोर्ट टी टू वर व्हीलचेअर प्रवासी,
लेकुरवाळ्या बाया सिनिअर्स ह्यांच्या साठी वेग्ळा सिकुरिटी चेक आहे तिथे गर्दी कमी असते. व अटेंडंट नी माझी काठी पण चेक करुन घेतली.
ही सर्विस घरातल्या जेनांसा ठी अवश्य घ्यावी. त्या बाईने, मराठीच, माझ्या बो. पा.व माझा फोटो घेतला व ती गेली.
बोर्डिग न चालू झाल्याव र एक मुल गा आला व माझी व्हीलचेअर घेउन आम्ही निघालो. इथे ए अरो ब्रिज होता. मग विमाना परेन्त गेलो. रँप चढून. एकदम छान सर्विस. मग काठी घेउन सी ट परेन्त. तेही एअर होस्टेस विचारत विचारत मागे होती की जमते आहे का. मिडल सीट वर बसले. महत्वाची माहिती: जेनांना अॅड ल्ट डायपर नक्की घालुन न्या आमच्या इथे जेप्टोव र मिळ्तात. नाव शोधून लिहि ते.
प्रवास आरामात झाला एक तास पन्नास मिनिट ची फ्लाइट आहे. विं डो सीट वर ब सलेला पॅसेंजर भप्पी लाहिरींचा मुलगा शोभत होता. इत के सो ने अंगावर. प ण एकदम समजूतदार.
मी माझे सतत गळणारे केस कोणाच्या अन्नात पडू नयेत व वाद होउ नयेत म्हणून बस ल्याव् र लगेच डोक्या वरून लाइट स्कार्फ बांधून घेतलेला.
मेनू मध्ये साबुदाणा खिचडी लिहिलेली होती पण उपल ब्ध नव्हती मग चिकन कप नूडल्स दोघिंनी घेउन खाल्ल्या. मला असले चाबर ट खाणेच जास्त जाते पण लेक देत नाही. अगदी तीन चतुर्थांश संपवला.. भूक लागलेली चक्क. व मग क्सला तरी ज्युस. दोन्ही अग दी जस्ट हिट द स्पॉट. तेव्हा. अॅक्सि डें ट नको म्हणून मी थोडासाच ब्रेफा खाल्लेला.
उतरल्यावर लगेच रँ प वर व्हीलचेअर आली. उलटी ठेवून मला ब सवले. महत्वाची माहिती: ह्या व्हील चेअर ला पुढे दोन सॉलिड दांड के स्टीलचे अस तात. ते धरून चेअर उचलतात पुढे एक व मागे एक व रँप वरुन्खाली उतरवतात. खाली उतरले की एक माणू स पु ढे एक्सिट परेन्त नेतो. होस्टे स नीट आहात ना विचारते. तर ए अर पो रट च्या बाहेर आलो. डून एअर्पोर्ट एकदम मस्त आहे त्या बद्दल पुढील भागात.
सर्वत्र रँपची सोय आहे. मुंबाई व डून दोन्ही क डे अपंग व्यक्तीं सा ठी व महिलां बाळॅ यांसाठी उत्तम व क्लीन टॉयले ट आहेत काय गं बै इं डिया अशी वेळ येत नाही.
बाहेर आल्याव र रँप आहे. व्हीलचेअर पार पार्किंग परेन्त नेता येते. कार बुकिन्ग लेकीने आधी च केले होते तो मुलगा आला व माझी ट्रान्सफर परत एकदा. ए अर्पोर्ट पासून डून एक तास प्रवास तो ही रात्रीचा. पण मी जमलं एक तरी म्हणून हॅपी हॅपी.
बाकी पुढील भागात. भाग एक समाप्त. हे फक्त प्र वास व स्टे चेच वर्णन आहे.
भाग १
बेंच प्लस टेबल सकाळी चहा
बेंच प्लस टेबल सकाळी चहा घ्यायला. रोमान्स करायला. दोन प ड दे सेट.
>>>>
जियो!! कुठल्याही हॉटेल रूम वर गेले की सोबत पार्टनर असो नसो, ती रूम रोमान्स फ्रेंडली आहे का हाच विचार पहिले माझ्याही डोक्यात येतो
लेक गोड आहे फार +७८६
तब्येतीची काळजी घ्या अमा, आणि लिहीत राहा.. ते ही असेच डिटेलमध्ये.. म्हणजे कधी देहराडून गेलोच या आयुष्यात तर मायबोली उघडून हाच धागा मार्गदर्शक म्हणून वाचणार
तब्येत सांभाळून सगळीकडं फिरत
तब्येत सांभाळून सगळीकडं फिरत आहात. कौतुकास्पद !
हाय शुभदुपा र. आज दुसरा दिवस
हाय शुभदुपा र. आज दुसरा दिवस डून.
तुड तुडीत आजोबा व जगावर वैताग लेल्या आजी सात वाजता कॅब मधून मसूरी बघायला गेले. तुम्हा ला प्लॅन करायचे असल्यास तुम्ही ही लवकरच निघा. म्हणजे डिरे क्ट वर परेन्त पाठवतात अ धिकारी . नाहीतर एक दोन किलो मीटर चालत जावे लागते. विथ किड्स जरा प प्रश्न येउ शकतो. वर्न व्ह्यू मस्तच आहे व प्रायवेट फोटो ग्राफर लगेच फोटो काढून देतत. मग उतरून लांडोर मध्ये केक बिस्किटे खा पार्सल घ्या अजून मसूरीत बघायला खूपच आहे. प्लान बनवून जा. आमच्या एका टॉबे को कस्ट मर चे हॉटॅ ल आहे. हा मला चाची म्हणा याचा. पण आता रवी चाचा वारले व एकटीने फोन करण् यात काही चा रम नाही. वो रौनक और थी. ऑफिसा तून फोन नंबर घेउन केला असता कॉल तर तो दावत पळत भेटायला आला असता. सो दॅट.
मी साडेसहाला चहा घेउन परत
मी साडेसहाला चहा घेउन परत झोपले. लेक ९ ला उठल्या वर ब्रेफा ला गेले. घराची रचना अशी आहे साधारण. एका बॅक कॉरिडोर मध्ये आमची रूम आहे. बाहेर पडल्यावर थोडे चालून राइट ट रन घेतल्यावर लेफ्ट ला सर्विस रूम २ व सर्विस कॉर्नर आहे. जिथे इस्स्त्री स्टॅड व इस्त्री, माहितीपत्रके असते. सर्विस रूम मध्ये डिशेस परत ठेवणे, आमलेटे बनवणे सामान थोडे ठेवणे, वर्कर्स ची प्राय्वेट स्पे स. रूम्स संपले की राइट ला जेवण सर्व करायची जरा मोठी खोली हॉलच म्हणा आहे. छान वॉर्म मोठी रूम इथे दोन टेबले आहेत. एक आठ सी टर, एक हायचेअर वाले १२ चेअर वाले अ एक भला मोठा सोफा आहे. फौजी स्टाइल कुशन वाला.
समोर का कोण जाणे आरसा वाले मोठे सर्विन्ग् टेबल. डावीकडे बुटक्या टेबल वर बशा प्लेटी बोल्स. मग एका उंच स्टँड वर बनाना ब्रे ड चे बारीक स्लाइस. व्हेरी डेन्स ब्रेड. मेरे से एक पीस संपवेना. मग दही वडा वगेरे गार बाबीं चे बोल. मग ती हॉट प्लेट. इतकी लहान पोरे होते तेंना भाजले तर म्हणून मला टेन्शन आलेले. त्यावर दोन डिशेस. मग डेझर्ट , आइ स क्रीम ठेवायची जागा. मग द्रव पदार्थ. ज्युसेस तेव्हा आर्टीफी शिअल क्रॅन बेरे ज्युस!!! न खपलेले दुकानद आराने ठोकले असतील. चहा कॉफी हॉटप्लेट वाली. दोन भांडी उकळत ठेवलेली. आता दाराच्या डावीकडे या. फौजि स्टाइल ब्रेड बॉक्स मध्ये साधा ब्रे ड व्हाइट टोस्टर व बटर, जॅम. बनवून घायचे.
ह्या पुढे पण एक बेस्ट जागा
ह्या पुढे पण एक बेस्ट जागा आहे. हॉलचे पुढे दार एका बाल्कनीत दोन मेटल ची टेबले व खुर्च्या. त्याच उरीव से ट ची ज्याचे टू सीटर आमच्या प प्रायवेट बाल्कनीत आहे कोवळ्या उन्हात रोमान्स वाला.
झाडे केअर लेसली लावलेली आहेत. बट चार्मिन्ग. मी ब्रेड टोस्ट जॅम बनवून घेतले. बाकी ऑप्शन्स पोहे सर्व भाज्या व जास्त हळद घातलेले आणि चक्क साबुदाणा व डा कम टिक्की. इम्प्रेस्स ड. ह्याचा एक प्रायवेट जोक्स आहे. जेव्हापण कोकिला मध्ये जातो सा व / साखी ट्रायकरतो. पण संपलेली असते. कधीच मि ळ त नाही.
शिवाय आमलेट टू ऑर्डर हा लेकीचा मामला. हे यप्प ड ऑर्डर देउन मग लगेच टोस्ट घेउन आले जो आमलेट येइ परेन्त गार होतील हे मला टेन्शन. मण आरामात सुट्टी असल्याने चालले होते प्लस कॉफी.
वापर लेल्या प्लेटी ठेवायला एक टेबल. मजा आली. झोप अनावर होउन रुम वर येइन आरामात पडी मारली. नेहा राठोड नावाच्या पोरीच्या नावाने नेट फ्लिक्स वर वीर झारा बघितली. थोडीशीच रोमांटिक पार्ट वाली. तिने डिसकनेक्ट केलेलेच नव्हते सोडताना.!
आताअ जरा पडते पाठ दुखली व जेवायचे आहे .
अश्र्विनीमामी,
अश्र्विनीमामी,
छान वर्णन. तुम्ही तब्येत सांभाळून सगळीकडं फिरत आहात.
खूप छान वाटले. लिहीत रहा इथे.
हाय वीर झारा बघत होतो मध्येच
हाय वीर झारा बघत होतो मध्येच मस्ती म्हणून मला लिंबू पाणी व लेकीने मोमो मागवले. उगीचच. थोड्या उशीराने रूम सर्विस आली. ग्लास भर सुरेख गार लिंबू पाणी व गरमागर्म मोमो आले. ते खाउन होइस्तो एक वाजलाच मग वरात निघाली लंच ला. तो परेन्त मसूरीचे पार्सल परत आलेले.
त्यांच्या कडून प्रवास वर्ण्न ऐकले. व अफाट कौ तिक केले. वर दोन परेन्त वेडिन्ग पा रटी दिल्ली हून पोहोचायची होती ते वाट बघत काका काकू तीन दा खाली जाउन बघून आले. मी जेवण घ् रात बसले शेव टी. हाताशी मस्त गारे गार दही वडे होते वर चटण्या वगैरे. मला राहवेना एक घेतलाच. तो खाता खाता आले सर्व लोक्स . मग नमस्कार चमत्कार. ते पण भुकेज लेले होते लगेच जेवण, गरम रोट्या इ चालू झाले. गप्पा इ नवर देवाची घाई ग डब ड. मजा आली. भा चीला पनीर व भेंडी भाजी खूप आवडली.
संध्याकाळ चा कार्यक्रम नीट पार पडला.
नेक्स्ट डे गप्पा मारत ब्रेफा. आज बटाटा वडा, बाँबे सॅडविच. प्लस ब्रेड आमलेट . केक. आजही डून मधला एका हॉ टेलात मनोमिलन कार्यक्रम होता. तिथे जुन्या पद्धतीचे टोमाटो सूप मस्त होते. व बाकी अॅवरेज जेवण. संध्या काळी मला जनसंपर्काचा कंटाळा आला. पार्टी वधूच्या घरी जेवायला गेली व परत मनोमिलन. लेकीस इथले उडीद वडे व दाल फारच आवडली. लेकीने जाताना मला आलू परा ठा मागवून दिला. तो खात मी जेम्स बाँड सिनेमा पाहिला. हॅपी अलोन.
पहाटे सर्व पार्टी दिल्लीस वंदे भारत ने रवाना झाली.
आम्ही आज नो वर्क म म्हण्णॉ न झोपा काढू मग ब्रेफा केला. कमी गर्दी आज. परतीचा प्रवास नीट झाला व प्रीपेड टाक्सी परेन्त चेअर मिळा ली.
घरी आलो प्रवास समाप्त. बेरी हाउस ची जादू अजून उतरलेली नाही. जमवाच डून चे.
त्या दिवशी आम्ही एकटे च होतो
त्या दिवशी आम्ही एकटे च होतो मग रूम वरच जेअण देतो म्हटला केअर टेकर. कॅसरोल मध्ये चा र फुलके ताजे, कोबीची भाजी भात डाळ. मला तर इतक्या केअर चे फार कौतूक वाटले. कारण गोळ्या घ्यायच्या असतात. कोणी इतकी केअर घ्यायची सवय गेलेलीच आहे.
तुमचा अनुभव चांगला झाला की.
तुमचा अनुभव चांगला झाला की. आणि कुठलाच त्रास झाला नाही हे महत्वाचे.
बेरी हाऊस चांगले वाटते आहे.
हे अपडेट्स वाचायचे राहिलेच
हे अपडेट्स वाचायचे राहिलेच होते अमा
छानच live अपडेट्स/ कॉमेंटरी आसनी तुमचे पंचेस.
मजा आली.
लेक आणि तुमचा फोटो गोड एकदम.
हे माझं वाचायचं राहून गेलेलं.
हे माझं वाचायचं राहून गेलेलं. किती छान चित्रदर्शी वर्णन. लेक फार गोड आहे, आईसारखीच.
आता अमा आपल्यात नाहीत हे वाटतच नाही, विश्वास बसत नाहीये, असं समोर बसून हे सांगतायेत असं वाटलं.
माझंही वाचायचं राह्यलं होतं..
माझंही वाचायचं राह्यलं होतं... डोळे पाणावले. अमा, मिस यू.
माणूस किती आशावादी असतो.
माणूस किती आशावादी असतो. निडरपणे परिस्थितीशी झुंज देत असतो. पूर्ण लेख, कॉमेंट्स वाचताना ती सकारात्मकता जाणवत राहते...
पण नियतीचे काही वेगळेच बेत असतात
माझंही वाचायचं राह्यलं होतं..
माझंही वाचायचं राह्यलं होतं... डोळे पाणावले. अमा, मिस यू. >> +१
Pages