रवा नारळ लाडू

Submitted by मनीमोहोर on 27 October, 2024 - 03:44
Rava ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा नारळ लाडू...

दिवाळीत बेसनाच्या लाडवांचा मान वरचा आहे. सर्वांना ते लाडू जास्त आवडतात. पण मला पर्सनली बे ला तुपकट वाटतात . रवा लाडू जास्त आवडतात.

साहित्य
अर्धा किलो बारीक रवा ( चार वाट्या )
दोनशे ग्रॅम तूप ( एक वाटी )
दोन वाट्या नारळाचा चव
तीन वाट्या साखर
दीड वाटी पाणी
वेलची , बेदाणे, पिस्ते

क्रमवार पाककृती: 

रेसिपी

जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून ते थोडं गरम झालं की रवा घालून मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.

नंतर साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर एक चांगली येते.

पाक झाल्यावर त्यात भाजलेला रवा नारळ घातला, वेलची पूड घातली, ढवळल आणि त्यावर झाकण ठेवलं घट्ट. हे मी पहिल्यांदा च केलं आणि बेस्ट result मिळालाय. मिश्रण गार व्हायला झाकण ठेवल्यामुळे वेळ लागला आणि त्यामुळे रवा पाकात चांगला मुरला. अगदी बारा तासांनी लाडू वळले तरी ही मिश्रण छान moist होत. लाडू ही मऊ आणि तरी ही खुसखुशीत झालेत. लहान मुलं खाणार आहेत म्हणून फोटोत कळत नसलं तरी आकाराने मुद्दामच लहान केले आहेत.

वाढणी/प्रमाण: 
काय सांगू ?
अधिक टिपा: 

रवा बारीक च घ्यावा.
नारळ घातल्याने लाडू मऊ आणि moist व्हायला मदत होते त्यामुळे खोवायचा कंटाळा म्हणून स्किप करू नये.
झाकण नक्की ठेवा दीड एक तास तरी त्याने पाक पटकन सुखत नाही आणि रवा फुलायला मदत होते.
बेदाण्या पेक्षा पिस्ता लावा पांढऱ्या वर हिरवा उठून दिसतो. बेदाणे पाकात घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो सेम याच प्रकाराने लाडू केले. काल संध्याकाळी पाकात ढकलले नी जेवणानंतर लाडू करायच्या ऐवजी नाईट मॅनेजर बिंज वॉच केले. सकाळी आरामात उठून लाडू केलेत तरी सुरेख वळलेत.IMG_7763.jpeg

फोटोतले लाडू जहबरी दिसतायत. हे बघून मलाही रवा लाडू करायची सुरसुरी आल्यासारखी वाटतेय. टिकली तर करेन.

बाकी ममो, शेंगदाणे निवडताना खवट शेंगदाणे कचर्‍यात टाकून द्यावे ही टिप तुला माहित आहेच. Wink

IMG_20241116_080112.jpg

झाकण ठेवायची टीप केल्यामुळे छान मॉईस्ट झाले होते.
माझी आई करंजीच्या राहिलेल्या सारणाचे लाडू करायची सुक्या खोबर्याचे तेही फार आवडतात पण हे ओल्या नारळाचे पहिल्यांदाच केलेत चवीला फार छान झालेत.

मी पण हे लाडू केलेत पण पाकाचा धाक Wink असल्याने बिना पाकाचे केलेत. मस्त मऊ झालेत (वेगळ्या धाग्या वर रेस्पी टाकावी का? Wink
. ममो तुमचे लाडू इतके एकसंघ गोल कसे? Happy

सर्वांचेच लाडू दिसायला सुरेख असल्याने मोह होतोय.
कमी गोडाचे किंवा मधूमेहींसाठी चालणेबल लाडू बनवता का कुणी ?

मी काल बनवले.
ओलं खोबरं नव्हतं म्हणून dedicated वापरलं
पाक अजून जरा पक्का व्हायला हवा होता असं नंतर वाटलं
2 तास झाकणं देऊन ठेवलं होतं . मग बघितलं तरं वरचा रवा अगदी भुसभुशीत झाला होता , खालचा पातेल्यात दगडासारखा क डक होऊन चिकटलेला वाटला . चमच्याने खरवडून , सुरीने भोसकून निघाला.
हाताने सारखा केला तर लक्षात आलं थोडी कचकच लागतेयं आणि लाडू अजिबात बांधले जात नाहीयेत.
मग परत अगदी 2-3 मि. मंद आचेवर परतलं मिश्रण आणि परत झाकून ठेवलं. रात्री लाडू वळता आले पण मिश्रण moist वगैरे नाही वाटलं.
परत भाजल्यामुळे लाडू लालसर झालेत , पांढरे नाहीत.
माकाचु ??

मुळात रवा नीट भाजलायं हे कसं कळतं ? तोपर्यंत लालसर नाही का होतं ?
मिश्रण भुसभुशीत का झालं असावं ?

स्वस्ति एकदम मंद आचेवर साधारण पंचवीस मिनिट आणि दहा मिनिट (अधिकचे) ओले खोबरे घालून चांगले भाजले जाते. गुलाबी रंग येतो आणि वास पण चांगला येतो. आच थोडी जरी जास्त ठेवली तर लाल रंगावर भाजला जाईल रवा आणि करपेल.
तुम्ही डेसिकेटेड खोबरे घेतले तर ते वेगळे दोन मिनिट शेकून रव्यात मिक्स केले असते तरी चालले असते. कारण ते तसेही ओले नसते. पाक पण बहुदा जास्त शिजला असावा. मोठ्या आचेवर पहिल्या तीन ते चार मिनिटात साखर विरघळते. नंतर मध्यम आचेवर दोन मिनिट आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिटात एकतारी पाक चांगला शिजतो आणि तयार होतो. झाकण ठेवल्यावर तुम्ही बहुदा मिश्रण हलवले नाही. झाकण ठेवल्यावर पहिले तीस मिनिट दर दहा मिनिटांनी ते हलवावे म्हणजे घट्ट गोळा होत नाही. झालाच तर सरळ मिस्कर मधून काढून दुधाचा हबका मारून लाडू वळावे.

लंपनने सांगितलेच आहे तरी माझे दोन आणे…. डेसिकेटेड कोकोनट असेल तर तूप जरा जास्त हवे कारण डेकोत तेलाचा अंश कमी असतो. मीकुठलाही पाक दुधात करते.लाडू कडक होत नाही.

मी कधी दूधाच्या पाकाबद्दल ऐकलं नव्हतं मंजूताई. नेहमीच्या पाकासारखाच करायचा का? आणि दूधाच्या पाकात केलेले पदार्थ मुंबईच्या हवामानात टिकतील का? लाडूचा नेक्स्ट स्लॉट करून पाहिन असा. बाकी दूधाच्या पाकामुळे अगदी राजस पदार्थ होत असेल.

मंजू नेहमी सांगते आणि मी नेहमी म्हणते करून पाहीन असं पण प्रत्येक वेळी विसरते. आता आठवणीने करीन. छान लागतील असा कयास आहे.
रवा लाडू थोडे बाहेर आणि बाकीचे मी नेहमी फ्रीज मध्ये ठेवते, ते संपत आले की पुन्हा फ्रीज मधले बाहेरच्या डब्यात काढून ठेवते, थोडा व्याप होतो लक्ष ठेवून संपत आले की फ्रीजमधले काढण्याचा पण त्यामुळे चांगले टिकतात चवीमध्ये कॉम्प्रमाईज न करता.
स्वस्ति, रवा लाडूहा तसा ट्रिकीच पदार्थ आहे, अनेक कारणांनी तो बिघडू शकतो. जाड रव्याचे कोणाचे होत ही असतील छान लाडू पण जनरली रवा लाडूंसाठी बारीक रवा घ्यायचा नेहमी, जाड रव्याचे लाडू छान नाही होतं. त्तू कोणता घेतला होतास ?
चार वाट्या रवा असेल तर मंद गॅसवर वीस पंचवीस मिनिट तरी मिनिटं तरी भाजावा लागतो त्यामुळे त्याचा रंग न बदलता छान भाजला जातो. भाजल्यावर थोडा गुलाबीसर होतो, परतताना हलका फील होतो आणि वास ही सुटतो. असो. बेटर लक नेक्स्ट टाईम. Happy

ममो, Lol बहुतेक प्रत्येक लाडवाच्या/वड्या पाककृतीमध्ये दुधातला पाक ट्रीक सांगितलेली असेल

हा धागा रवा लाडू करून झाल्यावर पाहिला. त्यामुळे पाकातल्या रव्याचा कढईत दगड होणे , ते निस्तरुन पुन्हा लाडू वळणे. हे सगळे करून झाले.
मंजूताई , दुधातला पाक ही नवीन गोष्ट आहे माझ्यासाठी !! नंतर सांगाल का ?

पाण्याच्या ऐवजी दूध वापरायचे. दूधात पाक केला तरी लाडू टिकतात पण शंका असेल तर ममोची युक्ती वापरायची. ओल्या नारळाचे पदार्थ जास्त दिवस टिकत नाही आणि टिकण्यासाठी उरायला तरी हवे ना Happy

मी यंदा रवा - बेसन लाडू केले, तेव्हा दूध घालून पाक केला. लाडू चांगले झाले. दुधाची वेगळी अशी चव मला जाणवली नाही. पण खाणार्‍यांनी खवा घातलाय का? असं विचारलं. ती दुधाची किमया असणार.
इथे सई केसकरचा एकतारी- दोनतारी असा लेख आहे. त्यात पाक करतानाचं विज्ञान चांगलं समजावलं आहे. पाक करताना बिचकणार्‍या मंडळींनी वाचून बघा.

दूधाच्या पाकात केलेले पदार्थ मुंबईच्या हवामानात टिकतील का? >>> मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो. अगदी हबका मारला तरीही.

जाड रव्याचे लाडू छान नाही होतं. त्तू कोणता घेतला होतास ? >>> अगदी बारीक , चिरोटी रवा.
मी पहिल्यांदाच केले , म्हणून अगदी नैवेद्याची छोटी वाटी वापरली. आठेक लिंबाएवढे लाडू झाले.
चव आता उद्या च कळेल. पण आता confidence आला.
आमच्याकडे बेला बनवतात. मला आवडत नाहीत , म्हणून यावेळी मी रलाचा घाट घातला.

मी पहिल्यांदाच केले, एक वाटी रव्याचे पण माझे बिघडले. पाक घातल्यावर एकदम कडक गोळाच झाला. थोडावेळ झाकण ठेवले होते. मग तो गोळा मिक्सर मधून बारीक केला तो. आता लाडू वळलेच जात नाहीयेत. त्याला गरम करून तूप घालून बघितले, दुधाचा हात लावला पण काही उपयोग होत नाही. रवाच येत आहे हातात. २ /३ चमचे घेऊन शिरा पण करून पाहिला पण दाताखाली मऊसूत नाही लागत. काय करू आता त्या मिश्रणाचं?

चैत्रगंधा, तुझा आयडी आवडतो. नारळ घातल्यावर खडक व्हायला नको. ह्या रावांना खूप कमी तूप लागतं. नारळाने ओशटपणा येतो. सुधारण्यापलिकडे गेलेलं दिसतंय प्रकरण ..

एकदम थोडी साखर पाण्यात विरघळवून घेऊन ते पाणी उकळतं पाणी लाडवाच्या मिश्रणावर लागेल तसं बेता बेताने ओत म्हणजे मिश्रण सैल होऊन रवा मुरायला मदत होईल. एकदम ओतू नको नाहीतर खूप सैल होईल. नशीब एकच वाटी रवा घेतलाय, खूप नाही घेतलाय.
चैत्रगंधा तिच्या मुलीच ही नाव आहे असं वाचलेलं अंधुक आठवतंय.

चैत्रगन्धा त्यात अन्दाजे थोड थोड कन्डेस्ड मिल्क टाकुन परतुन घे आणी मिश्रण कडा सोडु लागल की तुप लावलेल्या ताटात वड्या थाप.

आर्च, साखर बुडेल इतकं दूध घालायचं उकळायला ठेवून ढवळत राहायचं . दूधावर फेस येऊन वर येऊ लागलं की गॅस बंद करायचा. रवा नारळाचे मिश्रण टाकायचं. मी झाकण ठेवत नाही. रवा पाकात मुरायला ठेवायचा. मिश्रण कोरडे वाटलं तर दूध घालायचं सैल झाले तर एक चटका द्यायचा ... हाका नाका Happy चटका मिश्रणाला द्यायचा बरं का
तापमान महत्त्वाचं.. रवा नारळ भाजले की लगेच पाक करायला घ्यायचा.

चैत्रगंधा, तुझा आयडी आवडतो>>धन्यवाद मंजूताई
चैत्रगंधा तिच्या मुलीच ही नाव आहे असं वाचलेलं अंधुक आठवतंय.>>> मान गये ममो.. काय स्मरणशक्ती आहे.

साखरेचे पाणी घालून बघते. नाही झालं तर मग प्राजक्ताच्या टीपप्रमाणे कंडेन्स मिल्क ट्राय करेन.

मी बनवलेले लाडू आज खाल्ले. चवीत काहीतरी missing वाटलं.
लेकाला आवडले , खोबर्याचे लाडू लागततायत म्हणाला. (म्हणजे खोबर्याची चांगली चव लागतेय , रव्याची चव नक्कीच लागत होती, खोबर्याची नक्कीच overpowering नव्हती Happy )
आई म्हणाली रवा अजून भाजायला हवा होता आणि खूप गोड लागतायेत. साखर जरा कमी हवी होती.
एकंदरीत , पहीला प्रयत्न .. not bad .
सर्वांना धन्यवाद.

Pages