संथ चालती ह्या मालिका

Submitted by फारएण्ड on 2 June, 2008 - 00:00

कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्‍याच बेटियॉ दिसत होत्या. एकूण प्रसंग सात फेरे वाला होता. सगळे क्रमाक्रमाने आनंदी, वात्सल्ययुक्त (काही 'युक्त' म्हंटले की श्रीखंडच आठवते. भूक लागली ) वगैरे नजरेने पाहात असतात. तेवढ्यात त्यातली एक खुनशी वगैरे हास्य करते यातील त्या कृतिका देसाईसारख्या दिसणार्‍या बेटीकडे बघून (सोयीसाठी आपण तिला क्रुतिका देसाईच म्हणू), चार पाच वेळा कॅमेरा फटाफट झूम इन झूम आउट होतो, पण इकडे फेरे चालूच असतात. वधूच्या डोक्यावरचा घूंघट पूर्ण चेहरा झाकत असतो, पण पुढून खालच्या कोनातून बघितले की आत एक हॉरर पिक्चर मधे दाखवतात तसे डोळे असलेला चेहरा दिसतो. त्याचबरोबर एक दुसरी बेटी कोठेतरी बहुधा कोंडलेली तेथून बाहेर पडते व रिक्षाने कोठेतरी जायला निघते.

मग क्रु.दे. ला शंका येऊ लागते, तेवढ्यात तो घूंगट जरा हालतो आणि तिच्या लक्षात येते की ही भलतीच बेटी फेरे मारते आहे. आणि एकदम क्रु.दे. 'रोक दो ये शादी' ओरडते. पुढचे ५-१० मिनीटे प्रत्येकाचे reaction शॉट दाखवलेत नुसते वेगवेगळ्या कोनातून. प्रत्येक जण इमाने इतबारे दुसर्‍याची प्रतिक्रिया झाल्याशिवाय आपली देत नाही. इतके की शेवटी दिग्दर्शकच विसरतो की मूळ आरोळी क्रु.दे नेच मारली होती, कारण तिच्याच ओरडण्यावर तिचीच पुन्हा प्रतिक्रिया दाखवली आहे. या प्रतिक्रियांमधेच चार पाच फेरे होऊन गेले असतील मग तो गोंडस वगैरे दिसणारा वर त्या बेटीचा घूंघट (खस कन वगैरे नाही, अगदी 'घूंघट उठा रहा हू मै...' कभी कभी स्टाईल) उचलतो आणि अजूनपर्यंत तुमच्या लक्षात आले नसेल तर (मात्र तुम्ही या सिरीज पुन्हा पुन्हा पाहा) सांगतो की त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतीच मुलगी निघते.

मग तो बहुधा सासरा किंवा मोठा दीर असावा असा माणूस (तो पहिल्या मुन्नाभाई मधला... ज्याला शेवटी मुन्नाभाइ बोलका करतो तो, नाव आठवत नाही) बरेच डॉयलॉग बोलतो. मग पुढची वाक्ये ऐकू आली नाहीत (कोणीतरी चुकून रिमोटवर mute दाबले आणि रिमोट शोधून म्यूट बटन शोधून लावण्यासाठी तेथे काही रिची बेनॉ बोलत नव्हता) पण झीकृपेने सबटायटल्स होती: you are a prostitiute , किंवा ...behaving like a lajawanti girl किंवा असेच काहीतरी. वर तिला ही धमकी देतो की जर तू पुन्हा असे केलेस तर काहीतरी करीन. म्हणजे एकदा हा प्रसंग घडल्यावर सुद्धा पुढच्या लग्नात जिचे लग्न आहे तीच मुलगी फेरे मारायला उभी राहील याचा भरवसा यांना नाही.

१० मिनीटेच एवढी जबरदस्त असतील तर सिरीयल काय असेल? लावायला पाहिजे हे चॅनेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल २ मराठी मालिकांचे " डेडली" ट्रेलर पाहिले.

नवरी मिळे हिटलरला - दोन बायकांना खुर्चीत बांधून ठेवलंय, पैकी एकीच्या हाताला आणि कपाळावर बँडेज आहे. दुसरीच्या तोंडात बोळा कोंबलाय. एक माणूस त्यांना त्रास देतोय म्हणजे जिच्या हाताला बँडेज आहे तिथे जोराने दाबतोय आणि कपाळावर नेहेमी जिथे रक्ताचा ठिपका असतो तिथे बोट खुपसतोय. एवढं केल्यावर परत त्या दोघींच्या आजुबाजूला रॉकेल ओतलं आणि काडी ओढून त्याच्याकडे बघत बसतोय तर राकेश बापटची एंट्री. ढँटेडँ!

तू भेटशी नव्याने - काळ - १९९९ एआय जनरेटेड छोटा सुबोध भावे अ‍ॅज कॉलेज स्टुडंट आणि नाकावर चश्मा घसरलेली प्रिंसिपल किशोरी आंबिये असा एक सीन दिसला ज्यात बहुतेक ती विरोध करतेय कॉलेज मधे कँटीन असण्याला. मग छोटा सुभा तिला कँटीन असण्याचं महत्व पटवून देतोय की जर स्टूडंसना चहा, कॉफी आणि काही खायला मिळालं नाही तर त्यांचं डोकं दुखेल मग अभ्यासावर फोकस होणार नाही, परीणामी कॉलेज चा निकाल वाईट लागेल
मग पुढच्या सीन मधे हा डायरेक्ट खिडकीत उभा आणि यंग जनता खाली त्याची वाट बघतेय आणि हा घोषणा करतोय आपल्याला कँटीन मिळणार आहे, मग उदो उदो आणि मग खिडकीतून उडीच!

कट टू २५ वर्ष पुढे! मग हिरवीण दिसली, आधी नुसते दात (एकावर एक असलेले थोडे पिवळे पण वाटले), मग एक साईडचा चेहेरा, मग डोळे, मग पाठमोरी, एकदा साईड अँगल असं काय काय दाखवत एकदाची ती पूर्ण दाखवली ते ती गणपतीच्या देवळात , तिथे फार मोठ्ठी लाईन असते. मग ती जोरात बोलते अरे आता काय करायचं फार वेळ जाईल मग आयडिया काढते उंदीरमामाच्या कानात आधी बोललं तर इच्छा पूर्ण होतात टाईप्स काहीतरी. मग सगळेजण साक्षात्कार झाल्यासारखा लाईन सोडून उंदीरमामाच्या कानात बोलायला जातात आणि आपली हिरवीण नेहेमी दुसर्‍यांचं भलं बघणारीच असतेय त्यामुळे तिने या लाईन तोडणार्ञांसाठी आधीच माफी मागून घेतलीये मामांच्या कानात. मग सगळे तिकडे गेल्यामुळे हिचा पयला नंबर लागतो देवदर्शनाला. बास!! एवढंच झेपलं!! पुढे बघायची हिम्मत नाही. Lol

Lol देवा! कँटीन मधे हल्ली लोकं खायला पण जातात? आमच्या वेळी टाइमपास करायला जात असत Proud
देवदर्शनाला जाणारी हिरवीण _/\_

नवरी मिळे हिटलरला >>> याचं टायटल साँग मस्त आहे. त्यामुळे सिरीअल बकवास असेल असंच वाटलं होतं. काडी ओढून त्यांच्याकडे बघत बसतोय म्हणजे? काडी आहे की दिवाळीला लावायच्या वायर्स?

आमच्या वेळी टाइमपास करायला जात असत Proud>>>>>>>>>>> हा हा अड्डा असायचा फुल टू.

काडी ओढून त्यांच्याकडे बघत बसतोय म्हणजे? काडी आहे की दिवाळीला लावायच्या वायर्स?>>>>>> लोल राकेश बापटच्या एंट्रीची वाट बघत Wink मग त्त्याला ती फुंकर घालून विझवायचा मान मिळतो Proud

मग एक साईडचा चेहेरा, मग डोळे, मग पाठमोरी, एकदा साईड अँगल असं काय काय दाखवत एकदाची ती पूर्ण दाखवली >>> Happy इतकं करूनही पोस्ट मधे तिचा अनुल्लेखच आहे Happy सगळी ग्रॅण्ड एण्ट्री वाया गेली Happy

सुभाचीच एक अशीच सिरीज मधे आली होती ना? तरूणपणचा सुभा आणि नंतरचा. तीच हिरॉइन. बहुधा प्रेमकहाणी. शिल्पा तुळसकर होती बहुधा (पण हे तुपारे बद्दल नाही)

बहुतांश सिरीज मधे स्लीवलेस घालणार्‍या स्त्रिया या वाईट असतात.

हाहा अनुल्लेखाने मारलं मी तिला... Lol

बहुतांश सिरीज मधे स्लीवलेस घालणार्‍या स्त्रिया या वाईट असतात.>>>>>>>>>>> लोल.. जबरी निरिक्षण!

शिल्पा तुळसकर ची तू तेव्हा तशी सिरीज म्हणताय का त्यात तर स्वजो होता ना? पट्या पट्या म्हणत असते त्याला ती?

बहुतांश सिरीज मधे स्लीवलेस घालणार्‍या स्त्रिया या वाईट असतात >>> हे बहुधा अगदी पूर्वीच्या मराठी सिनेमांपासून चालत आलेलं असावं. मला सामना की सिंहासन आठवत नाहीये नेमकं, पण सॉर्ट ऑफ वाया गेलेली स्त्री दाखवायची असेल तर स्लीवलेस मस्ट होता. Happy

१९९९ एआय जनरेटेड छोटा सुबोध भावे अ‍ॅज कॉलेज स्टुडंट>>> तो सगळ्या बायोपिक्स मधे काही ना काही जनरेटेडच दिसतो आता हे काय अजून. Lol

नवरी मिळे हिटलरला थोडा वेळ बघितले होते. त्या मालिकेच्या ब्रेक मधे पण एक उड्या मारून गुंडांना मारणारी बॉयकटवाली भयंकर विचित्र बाई (उड्यावस्थेत सिजीआय जमिनीवर नॉर्मल , पुन्हा रिपीट Lol ) दिसली व त्या मालिकेचीही उत्सुकता वाटली. इतके विचित्र की 'ब्रेथटेकिंग' झाले...!

डेडली आत्यामुळे मराठी मालिका अचानक 'साक्षात्कारी' वाटायला लागल्या. मधे कितीक वर्षे काहीही संबंध नव्हता आणि कधीही चुकल्याचुकल्या सारखे वाटले नव्हते. Lol

तिघांच्याही पोस्टी मस्त आहेत. Happy
ते स्लीवलेस किंवा अंगप्रदर्शन म्हणजे दुसऱ्यांच्या नवऱ्यांना पळविणाऱ्या खलनायकी छटा असलेल्या seductress / उच्छृंखल असे करतकरत नीच स्त्री पात्रांना आवर्जून दाखवायचे. 'माझ्या नवऱ्याची बायको'मधेही शनाया आवर्जून आधुनिक वेषांत दाखवलेली होती. म्हणजे फार काही बदललेले नाही. तेच नायिकेला कालबाह्य करून कोपऱ्यापर्यंत बाह्या असलेले ब्लाऊज देऊन पाठीवरून पदर घेऊन पुपो वाढायला लावतील. 'सौतन और सुहागन'ची वेगवेगळी व्हर्जन्स. जसे काही हे सगळे नवरे मदनाचे पुतळेच आहेत... Wink Lol

Seductress ला मराठीत काय म्हणावे... अभिसारिका?

Seductress ला मराठीत काय म्हणावे... अभिसारिका? >>> त्याला मराठीत शब्दच नसावा Happy कारण ओढूनताणून सुद्धा कोणी तसे जेन्युईन वाटणार नाही Happy समोरच्याची सिच्युएशन साधारण अशी होईल Happy

जसे काही हे सगळे नवरे मदनाचे पुतळेच आहेत >>> आणि आदर्शाचे सुद्धा Happy या सिरीज मधली एक सिक मेण्टॅलिटी असते की त्या शनाया/मायरा/संजना टाइप स्लीवलेस बायका मूळ कारण आहेत. मानबाच्या टायटल साँगचा टोनही तसाच होता असे आठवते. "तिला" धडा शिकवणे वगैरे.

त्या मालिकेच्या ब्रेक मधे पण एक उड्या मारून गुंडांना मारणारी बॉयकटवाली भयंकर विचित्र बाई >>> ओह ती एक सध्या चालू आहे सिरीज. पूर्वीच्या त्या "हम पाँच" मधली ती टॉम बॉय मुलगी असते ("काजलभाय"?) तसाच वेष करून तसेच बम्बैय्या बोलणारी एक आहे. जरा ओव्हरअ‍ॅक्टिंग करते.

उड्यावस्थेत सिजीआय जमिनीवर नॉर्मल , पुन्हा रिपीट >>> Lol

जरा ओव्हरअ‍ॅक्टिंग करते.>>> जरा? Lol
"तिला" धडा शिकवणे वगैरे.>>>> हो, ते फारच रिग्रेसिव्ह होते.

समोरच्याची सिच्युएशन साधारण अशी होईल >>> Lol Ross and his gas. हे जास्त मजेदार आहे की- जे चालले आहे त्याचे भान न बाळगता फिबीने ती बाई गेल्यावरही अवांतर कंटिन्यू करणाऱ्या माबोकरांसारखे अजून कशाकशात वापरतात विचारले आहे - ते ठरवता येत नाही. Lol

फिबीने ती बाई गेल्यावरही अवांतर कंटिन्यू करणाऱ्या माबोकरांसारखे अजून कशाकशात वापरतात विचारले आहे - ते ठरवता येत नाही. >>> Lol हो

सॉर्ट ऑफ वाया गेलेली स्त्री दाखवायची असेल तर स्लीवलेस मस्ट होता.
>>>>> अलिकडच्या काळात स्लीवलेस घालणाऱ्या वाईट स्त्रियांची प्रगती नुडल स्ट्रॅप ब्लाउजपर्यंत झालीय. पण आमच्या आया, मावश्या इ. कटोरीवरून प्रिन्सेस कटवर मुव्ह झाल्या तरी सो कॉल्ड सोज्वळ हिरॉईनी मात्र अजून १९७० च्या जमान्यातले ब्लाउज वापरतात.

सिडक्ट्रेसला आपल्याकडे फार पूर्वीपासून मोहिनी शब्द वापरताहेत की.

नवरी मिळे हिटलरला, उड्यावस्थेत सिजीआय जमिनीवर नॉर्मल , पुन्हा रिपीट Lol>>> बहुतेक पिसे मटेरियल सिरेल दिसतेय.

तो सगळ्या बायोपिक्स मधे काही ना काही जनरेटेडच दिसतो आता हे काय अजून. Lol>>>>>>>>>>>> Lol स्वतःचा बायोपिक करेल तेव्हा काय जनरेटेड दिसेल माहित नाही.

सिडक्ट्रेसला आपल्याकडे फार पूर्वीपासून मोहिनी शब्द वापरताहेत की.
>>> नाही माझेमन. प्रत्येक सुंदर स्त्री 'मोहिनी/कामिनी' वाटणारे पुरुष असू शकतात, ती seduce करत नसेल तरीही. त्यामुळे मोहिनी नाही चालणार, शब्दवेध धाग्यावर विचारता येईल. मलाही नसत्या उठाठेवी Lol

मी मोहिनी भस्मासुर रेफने म्हणतेय. पण 'लैला को देखो मजनू कि आँखोंसे' न्यायाने कुणालाही कोणीही मोहिनी वाटू शकते हे खरे आहे.

Happy हो. तेथेही भस्मासुर मूर्ख होता, स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. अगदी मराठी मालिकांतील नायकांसारखा Lol

अस्मिता Lol

वरच्या सगळ्याच पोस्टी मस्त आहेत Lol

लोल नवरी मिळे हिटलरला अशी सीरिअल आहे????????? नवरी मिळे नवऱ्याला असा मस्त टीपी पिक्चर आहे म्हागृचा. आणि त्यात ते निशाणा तुला दिसला ना हे अफाट भारी श्रवणीय आणि तितकेच भंगार चित्रित केलेले गाणे आहे.
भेटशी बद्दल पण भारी लिहिलं आहे अंजली.
दोन्ही बघाव्यातच, इतके छान लिहिले आहे Proud

Lol सात्विक चिडचिड

अशोकमामांची नवीन सिरियल कोणी पहातय का? कलर्सवर.
सुरूवात चांगली वाटली.
नवीन प्रोमो पाहून सिरियल 'परिचय' चित्रपटाकडे झुकणार असं वाटतंय.
शिस्तीचे आजोबा आणि मस्तीखोर नातवंडं.
ईथे बंडखोर मोठ्या बहिणीऐवजी बंडखोर मेव्हणी आहे.
ती अशोक मामांना म्हणजे बहिणीच्या सासर्यांना ताडताड बोलत असताना ते दोघे (बहिण व तिचा नवरा( मामांचा मुलगा )नुसते बघत ऊभे रहातात.

अशोकमामांची नवीन सिरियल कोणी पहातय का? >>>> सुरूवात चांगली वाटली, पण नंतर थोडी बोअर झाली. अशोकमामा दुबईला आल्यावर नातवंडांशी कसे जुळवून घेतात ते बघायला पाहिजे.

मुलगा व सून ऍक्सीडेन्ट मध्ये गेले , ती बंडखोर मेव्हणी not reachable आहे . मुलांना मुंबईत घेऊन यायचे ठरतेय . ठीक आहे प्लॉट वळणावर जाईल पण पहायला आवडतेय

मुलगा व सून ऍक्सीडेन्ट मध्ये गेले >>>> हे अनएक्सपेक्टेड होतं. बघायला पाहिजेत हे एपिसोड्स.

ती बंडखोर मेव्हणी डोक्यात गेली होती पहिल्यापासूनच. पण प्रत्येक मराठी मालिकेमध्ये असं एक क्यारेक्टर असायलाच लागतं त्याला आपण तरी काय करणार ??? Happy