Submitted by अनन्त्_यात्री on 4 December, 2024 - 07:32
फूट बोर्डाच्या सांडव्यावरून
फलाटावर धो धो कोसळणाऱ्या
बेलगाम लोकल गर्दीचा
थेंब बनायची सवय लागण्याच्या काळची गोष्ट...
...दोन उघडीवाघडी भीकमागी लेकरं
गर्दी बरोबर फलाटावर सांडताक्षणी
चटदिशी उठून
वाहत्या गर्दीच्या
काठावर गेली
एक नेहमीसारखा खाली बसला
अन् दुसरा ऐटीत उभा राहून
स्वतःच्या भिकेतले नाणे
बसलेल्याच्या ओंजळीत टाकून
निर्व्याज हसू लागला
मग अदलाबदल करून रिपीट ..
...विंदांच्या "घेता" कवितेच्या
दोन ओळींची लव्हाळी
गर्दीच्या महापुरात
जिवंत ठेवणारी
ती लेकरं
पुन्हा नाहीच दिसली कधी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक वेगळं निरिक्षण मन हेलावून
एक वेगळं निरिक्षण मन हेलावून गेले.
गर्दीचा थेंब व्वा...
नेहमीप्रमाणे छान कविता...
नेहमीप्रमाणे छान कविता...
गुढार्थाने सजलेली...!
>>>>बेलगाम लोकल गर्दीचा
>>>>बेलगाम लोकल गर्दीचा
थेंब बनायची सवय लागण्याच्या काळची गोष्ट...
वाह!!!
द. सा., रूपाली, सामो
द. सा., रूपाली, सामो प्रतिसादाबद्दल धन्यवाद!