रेलवेच्या आठवणी
असाच कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो...
भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.)
गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती...
दोन दिवसानंतर दिवाळी होती.
म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती...
आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती... दुसरया दिवशी संध्याकाळपर्यंत घरी पोचतील...
हबीबगंजहून (आता रानी कमलापति) गाडी वेळेवर, म्हणजे संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांवर सुटली.
गाडी सुटल्यानंतर सीटवर सामान ठेवलं...
आम्ही आपल्या बर्थवर होतो... मी, मैडम आणि आमची छकुली रश्मि. आई पुढे जबलपुरहून आम्हाला ज्वाइन होणार होती...
मैडम नीट बसल्या आणि अामची छकुली डब्यांत जनसंपर्काला निघाली...
तिच्या मागे- मागे फिरत असतांना इटारसी कधी आलं ते कळलंच नाही...
इटारसीहून गाडी सुटली... (इथे इंजिनचा साइड चेंज होतो.)
इटारसी नंतर तवा नदी येते. त्यादिवशी नदीवरील पुल पार करून लगेच सुरू होणारया बोगद्यामधे गाडी उभी झाली. ती सुरूच होईना.
असं कळलं की इंजन फेल झालंय...
पाऊण तासानंतर इंजनची शिटी ऐकू आली आणि गाडी पुढच्या बागरातवा स्टेशनावर थांबली...
गाडी प्लेटफार्मवर नसून त्या शेजारच्या लाइनीवर उभी होती.
तर...
सात वाजत होते...
शेजारी बसलेले मुलं-मुली आपसात कुजबुजत होते ‘यार गाडी मिस हो जाएगी... कल शाम को पहुंच जाते... अब पता नहीं कब पहुंचेंगे...!’
हे ऐकून मी त्यांना सहज म्हणालो- ‘पीछे से जो भी गाडी आ रही है उससे चले जाओ... जबलपुर से आपकी गाडी आपको मिल जाएगी.’
ते सगळे एकदम दचकले...
त्यांनी विचारलं- ‘ऐसा कैसे हो सकता है... अपनी गाडी तो पता नहीं कब जाएगी... कनेक्टिंग गाडी तो निकल जाएगी.’
मी म्हणालो- ‘चलो देखते हैं क्या हो सकता है...’
त्यापैकी चाैघे माझ्यासोबत उतरले... अाम्ही फलाटावर पोचलो...
जे समजलं ते असं की पुढच्या पिपरिया स्टेशनावर एक इंजन आहे. ते येतंय ते आमचं इंजन काढून साइडिंगला टाकेल... नंतर तेच इंजन आमची गाडी घेऊन पुढे जाईल... त्यात दोन-अडीच तास लागणार होता...
इतक्यात एनाउंसमेंट ऐकू आली... ‘XXXXXX सुपर फास्ट गाडी एक नंबर प्लेटफार्म पर आ रही है...’
हे ऐकून मी म्हणालो- ‘चलाे एसएम के पास चलते हैं...’
आम्ही स्टेशन मास्टरच्या ऑफिसमधे गेलो...
तिथे ही गर्दी...
तो फोनवर बोलत होता...
फोन ठेवतांना त्याने पोर्टरला सांगितलं- ‘देखो गाडी आ रही है... थ्रू है...’
तो पोर्टर गेला.
मी त्याला विचारलं- ‘क्या स्थिति है सर, अमरकंटक की... कितनी देर लगेगी...’
तो म्हणाला- ‘पिपरिया से इंजन आ रहा है... वह शंटिंग करके आपकी गाडी का इंजन काटकर के साइडिंग में रखेगा... फिर आपकी गाडी लेकर आगे जाएगा...’
मी त्याला म्हणालो- ‘सर, इस गाडी में ये बच्चे हैं... इन्हें जबलपुर से इस्पात नगरी पकड़नी है... अमरकंटक के भरोसे रहेंगे, तो इनकी गाडी छूट जाएगी...’
तो माझ्याकडे बघत म्हणाला- ‘मैं क्या कर सकता हूं...’
मी म्हटलं- ‘कंट्रोल को फोन पर बताइए ना कि अमरकंटक में सवार कुछ पैसेंजर को जबलपुर से इस्पात नगरी पकड़नी है... वे कह रहे हैं कि पीछे जो XXXXX सुपरफास्ट आ रही है उसे कुछ देर यहां रोकने की अनुमति दें ताकि ये पैसेंजर उसमें चढ़कर जबलपुर वाली अपनी गाडी पकड़ सकें...’
अाणि चमत्कार झाला...
तो फोनवर ऐकू लागला... पाच-सात मिनिटानंतर त्याने माझ्याकडे बघितलं.
काय म्हणाला असेल तो...
तो म्हणाला- *‘जाइए सर, XXXXX सुपरफास्ट एक नंबर पर रूक रही है... जबलपुर वाले उससे जा सकते हैं...’*
माझ्या सोबत असलेल्या मुलांना पहिले तर समजलंच नाही... मग ते एकदम आपापलं सामान घ्यायला पळाले आमच्या गाडीकडे...
मी एसएमला ‘थैंक्यू...’ म्हणून बाहेर आलो...
तर समोर ती सुपरफास्ट गाडी मी ज्या प्लेटफार्म वर उभा होतो, त्यावर येत होती.
मी पटकन खाली उतरून आपल्या गाडी मधे आलो... आणि दारावर उभा होऊन बघू लागलो...
ती सुपर फास्ट उभी झाली आणि तिच्या डब्यांच्या दारावर ही हॉस्टलर मंडळी तुटून पडली... माझ्यासमोर असलेलं दार होतंं... आम्ही आवाज देऊन ते दार उघडायला सांगितलं... आणि मुलं पटकन गाडीत चढली.
एका डब्यातून टीसीचा आवाज ऐकू आला... ‘सुपरफास्ट गाडी में कैसे चढ़ रहे हो...’
मी आपल्या जागे वरून ओरडलो... ‘कंट्रोल ने परमीशन दी है... इनको जबलपुर से कनेक्टिंग गाडी पकड़नी है...’
तो चुप झाला...
इतकं होईस्तोवर त्या गाडीच्या इंजनची शिटी ऐकू आली... आणि ती गाडी गेली सुद्धा...
मी खूप मोठं काम केलं... या थाटात आपल्या बर्थवर परतलो...
तर तिथे काही मुलं-मुली बसलेले दिसले.
मी विचारलं- ‘तुम्ही लोकं नाही गेला...’
ते म्हणाले- ‘सामान ज्यादा था... नहीं चढ़ पाये...’
एवढयात परत एनाऊंसमेंट ऐकू आली- ‘जनशताब्दी एक नंबर प्लेटफार्म पर आ रही है...’
हे एेकताच मी म्हणालो- ‘चला परत एसएम ऑफिसला जाऊ या... तुम्ही सगळे तयार रहा... ही संधी वाया घालवू नका...’
मी निघालो... परत फलाटावर चढलो... एसएम ऑफिस गाठलं...
मला परत बघून तो दचकला. म्हणाला- ‘चले गए कनेक्टिंग गाडी वाले...’
मी म्हणालो- ‘हां, लेकिन सबको पता देर से चला इसलिए बहुत से लाेग रह गए... सर, प्लीज इस जनशताब्दी को भी रोकने की परमीशन लीजिए ना कंट्राेल से...’
त्याने परत फोन लावला... आणि परिस्थिति सांगितली.
आणि परत म्हणाला- ‘जल्दी जाइए, गाडी पहुंच रही है...’
या वेळेस मी त्याला म्हणालो- ‘सर, जरा एनाऊंसमेंट कर दीजिए ना की जनशताब्दी यहां रूक रही है... जिन्हें जबलपुर से आगे इस्पात नगरी से यात्रा करनी है वे इस गाडी में चढ़ सकते हैं...’
त्याने माझ्याकडे एकदा बघितलं... आणि मग माइकवर एनाऊंसमेंट केलं...
मग विचारलं- ‘ठीक है जी...’
मी थैंक्यू म्हटलं.
तर त्याने विचारलं ‘आपको कैसे पता कि ऐसा करने से गाडी रूक जाएगी...’
मी त्याला सांगितलं मी देखील एका रेलवेकर्मीचा मुलगा आहे... माझे वडील स्व. दत्तात्रय लक्ष्मण तेलंग, बिलासपुरला लोको शेड मधे सीनियर मेंटनेंस फोरमेन होते... तसंच मी स्वत: स्टीम इंजनवर फायरमेन होतो... कंट्रोलची माहिती आहे...
मग मी त्याला आमच्या गाडी बद्दल विचारलं...
तो म्हणाला ‘दो-तीन घंटे लग जाएंगे... उससे पहले कुछ नहीं हो सकता...’
जनशताब्दी येण्यापूर्वी मी परत आपल्या कोच मधे होतो...
जनशताब्दी आली... माझ्या समोरचं दार उघडतच नव्हते... त्या कोचमधला टीसी म्हणत होता- ‘इसमें जनरल टिकट वाले नहीं बैठ सकते... यहां स्टॉपेज नहीं है...’
मी ओरडून सांगितलं- ‘अमरकंटक का इंजन फेल हो गया है. कुछ सवारियों को जबलपुर से इस्पात नगरी पकड़नी है... हमने कंट्रोल से बात की है... तब जाकर तुम्हारी गाडी यहां रूकी है... इन लोगों के लिए ही गाडी यहां रूकी है इन्हें अंदर आने दो...’
त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने बघितलं... अंधारात नक्की काहीच दिसलं नसणार... पण त्याने दार उघडलं... आणि ते हॉस्टलर गाडीत चढले.
जनशताब्दी गेल्यानंतर मी बर्थवर परतलो... मैडमना सांगितलं... ‘आराम करा... गाडी सुटायला दोन-अडीच तास तरी लागतील...’
तसंच झालं...
रात्री अडीच-पावणे तीनला गाडी जबलपुरला पोचली... आई आली...
सकाळी सवा पाचला पोचणारे आम्ही दुपारी पावणे चार वाजता बिलासुपरला पोचलो...
त्या हॉस्टलर मुलांना मदत केल्याचं समाधान होतं मनात...
मस्त. माझे भोपाळ चे दिवस
मस्त. माझे भोपाळ चे दिवस आठवले.
झकास किस्सा!
झकास किस्सा!
मजा तं हिंदीचा लहेजा ल्यायलेल्या मराठीत आहे! भई वाह!
अरे वाह.. हे स्टेशन मास्टर
अरे वाह.. हे स्टेशन मास्टर इतकी चांगली लोकं असतात??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असा प्रश्न पडला वाचून..
पण तुम्ही स्वतःही रेल्वे कर्मचारी कुटुंबातील आहात म्हणजे नक्कीच असतात
माझे मत पूर्वग्रह दुषित असावे.. ते आता बदलले.. म्हणून या किश्याबद्दल धन्यवाद !
चांगली मदत केली तुम्ही.
चांगली मदत केली तुम्ही.
असे एका रेल्वेतून दुसऱ्यात गाडी पकडण्याचा अनुभव नाही पण मुंबई लोकल मधून कल्याणला उतरून पटकन दुसऱ्या फलाटावर एक्सप्रेस पकडण्याचा थरारक प्रकार बरेचदा केले आहेत.
इंटरेस्टिंग !
इंटरेस्टिंग !
तुम्ही केलेली मदत खूपच आगळीवेगळी आहे.
लहानपण पूर्ण रेल्वे स्टेशन जवळ गेल्याने, आणि रेल्वेतील बरेच लोक माहितीचे असल्याने, काही काही रुल्स माहिती आहेत.
पण अशी गाडी थांबवता येते हे ठाऊक नव्हते. छान मदत झाली त्यांना.
त्या मुलांना तिकीट पण नसेल ना काढावे लागले?
वा एकदम वेगळाच किस्सा. मस्त
वा एकदम वेगळाच किस्सा. मस्त आहे.
माणूसकी अजून बाकी आहे
माणूसकी अजून बाकी आहे
तुमच्या सारख्या मुळे चांगुलपणा आहे ह्यावर विश्वास टिकतो
खूप छान
अरे वा, वेगळाच किस्सा. तुम्ही
अरे वा, वेगळाच किस्सा. तुम्ही आपल्या माहितीचा उपयोग करून मुलांना मदत केली.
छान किस्सा
छान किस्सा
छान किस्सा!
छान किस्सा!
छान किस्सा! त्या मुलांना अशा
छान किस्सा! त्या मुलांना अशा प्रकारे मदत करायचे तुम्हाला सुचले , आणि तुम्ही ते प्रयत्न करुन कृतीत आणले याचे खूप कौतुक वाटले.
छान किस्सा. वेल डन.
छान किस्सा. वेल डन.
छानच!
छानच!
मस्तच. छान मदत केलीत तुम्ही.
मस्तच. छान मदत केलीत तुम्ही.
छानच
छानच
मस्तच..
मस्तच..
धमाल
धमाल