Submitted by अल्पना on 23 February, 2012 - 08:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ ज्वारीच्या शिळ्या भाकर्या, वाटीभर दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, चमचाभर दाण्याचे कुट, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, फोडणीसाठी तेल, जीरे, हिंग.
क्रमवार पाककृती:
शिळ्या ज्वारीच्या भाकर्यां अगदी बारिक कुस्करुन घ्या. मिक्सरमधून बारिक केल्या तरी चालेल. एका भांड्यात कुस्करलेली भाकरी, दही, बारिक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर आणि दाण्याचं कुट एकत्र करा. त्यावर हिंग-जिर्याची फोडणी घाला.
वाढणी/प्रमाण:
२ जण
अधिक टिपा:
एरवी फोडणीच्या पोळीसारखीच फो.ची भा. पण करतात. पण फोडणीची भाकरी बरीच कोरडी लागते म्हणून तोतरा बसू शकतो. म्हणून मग आई अश्या पद्धतीने भाकरीचा कुस्करा बनवते.
यात गाजर, बीट कीसून आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे घालून बदल करता येतो.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कच्चा कांदा पण चालेल का
कच्चा कांदा पण चालेल का थोडासा? मस्तच आहे पाकृ
आई कधी घालत नाही, पण इथे
आई कधी घालत नाही, पण इथे बर्याच जणांनी लिहिलंय की यात कच्चा कांदा घालून छान लागतं. मी पण घालेन पुढच्यावेळी.
मनासारखी ज्वारीची भाकरी मेली
मनासारखी ज्वारीची भाकरी मेली जमत नाही कधी.
अल्पनाच्या सगळ्या पाकृ माझ्या लक्षात आहेत सखुबत्ता, अमृतसरी छोले- टोटल हिट.
मस्त पाकृ मी रोज सकाळी
मस्त पाकृ
मी रोज सकाळी नाष्ट्याला घरच्या ज्वारीची गरम गरम भाकरी खाते. पण त्याची किंमत तुम्हा सगळ्यांच्या पोष्टी वाचुन कळाली
वा वा मस्तच.
वा वा मस्तच.
रैना,
रैना,
मस्त!! आम्च्याकडे ह्याला
मस्त!! आम्च्याकडे ह्याला भकरीचा काला म्हणतात. कच्चा कांदा खुप छान लागतो.ह्यात. एखादी सांडगी मिरची घातली तर अजुन झकास.
अरेच्चा इतकं चविष्ट लागतं हे
अरेच्चा इतकं चविष्ट लागतं हे प्रकरण???? करून बघायलाच पाहिजे.
वॉव !! आज एकदम नॉस्टेल्जिक
वॉव !! आज एकदम नॉस्टेल्जिक करणार्या रेसिपी येतायत. आधी वांग्याची (लग्नातली) भाजी आता हा भाकरीचा काला. यात कच्चा कांदा मस्तच लागतो. लहानपणी ११ वाजताच जेवण करुन शाळेत जायचो आम्ही. तेव्हा भाकरीला नाक मुरडणारे आम्ही ५ वाजता हा काला आवडीने खायचो. हा काला, उकड, दडपे पोहे, शेवयांचा उपमा, दहीपोहे , ... श्या काय मस्त् दिवस होते.
मवा, दीप ब्रँडचं ज्वारीचं पीठ
मवा, दीप ब्रँडचं ज्वारीचं पीठ मिळतं ग तिथे.
मामी, पुण्यात आलीस की गर्रम
मामी, पुण्यात आलीस की गर्रम गर्रम भाकरी करून घालीन तुला नि उरलेली पार्सल करून देईन. मग काला!
आईगं सही. यालाच आमच्यात
आईगं सही. यालाच आमच्यात "गोपाळ काला" म्हणतात. आज्जी करायची.
गरवी गुजरात च्या फ्रोझन बाजरीच्या भाकरी मिळतात. तेच आणून दुधाची तहान ताकावर भागवावी झालं.
छान रेसिपी आहे अल्पना.
छान रेसिपी आहे अल्पना. आमच्याकडे पण काला म्हणतात. बारीक कच्चा कांदा अणि सांडगी मिरची हवीच.
तोंपासु रेस्पी. धागा वर काढत
तोंपासु रेस्पी. धागा वर काढत आहे!
छान.. दह्यानी खरच कोरडे पणा
छान.. दह्यानी खरच कोरडे पणा जाईल आणि रुचकर पण होईल... नक्की करुन पाहिन..
आता सगळे इतके कौतुक करताहेत आणि इथे ना पीठ ना भाकरी करता येतात. :| हा हा हा....
खुपच छान लागते अशी भाकरी.
खुपच छान लागते अशी भाकरी. फक्त दा. कुटाएइवजी आमच्याकडे कच्चा कांदा घालतात. आणि फोडणी जीरे मोहरी बरोबर तळणीची मीरची घालतात. हे एक पोटभरीचे पुण्रांन्न होते. शिवाय भाकरी जाड झाल,फुगली नाही तरी कही बिघदत नाही.फ्क्त भाकरी आद्ल्या दिवशीची आसावी. दही सायीचे घातल्यास अजुनच चव छान लागते.
आमच्याकडेही ह्याला कालाच
आमच्याकडेही ह्याला कालाच म्हणतात. ताज्या भाकरीचाही काला छान लागतो. आमच्याकडे दही भाकरी मीठ आणि कढवलेली चटणी घालतात.
तोंडाला इतक पाणी सुटल ना मीही विकांताला करुन पहाणारच आहे.
अरे व्वा, मस्त. आम्ही जिर,
अरे व्वा, मस्त.
आम्ही जिर, मिर्ची, कढीपत्ता आणि लसुण फोडणीत घालतो, आणि मग त्यात ताक घालतो. थोडी उकळी आली की मग त्यात भाकरीचा चुरा घालतो.
मग वरुन कोथींबीर ---
छान रुपड दिसत आणि लगेच गट्ट्म होत
आमच्या कडे ह्याला तुक्कड्खीर
आमच्या कडे ह्याला तुक्कड्खीर म्ह्णतात.. कुट नसतं.... कच्चा कांदा एकदम बारीक चिरुन घालायचा आणि मेटकुट असतं.
आताच करून खाल्ले. म्हणून
आताच करून खाल्ले. म्हणून धागा वर काढतेय.
मस्तच चव. बा चि को आणि बा चि कांदा घातलाच पाहिजे.
मी थोडे दूध पण घातले कारण मला जरा सरसरीत हवे होते.
मी यात बा चि कां, टो घालते व
मी यात बा चि कां, टो घालते व दाकुऐवजी अख्खे शेंगदाणे अर्धा तास भिजवून घालते. साखर घालत नाही. उद्याच करते आता.
छान.
छान.
आज सकाळी केला होता भाकरीचा
आज सकाळी केला होता भाकरीचा काला. काल भाकरी केली आणि दोन जास्तीच्या करून ठेवल्या. आज सकाळी कुस्करून त्यात दही, थोडं दूध घालून ठेवलं, मीठ, किंचीत साखर. मी दा.कु नाही घालत यात. आणि कांदा बारीक चिरून घातला.मग सांडगी मिरची तळून घेतली ,चूरून घातली. अर्धा तास मुरल्यावर काय लागतं. सही.
अल्पना मी भाकरी कधी मिक्सर मधून नाही काढली. फोपो करताना मात्र पोळी काढते मिक्सर मधून . भाकरीचे मोठे तुकडे आवडतात. पण तू लिहीलंयस तर करून बघेन. दाकू पण घालून बघीन.
भाकरीचे मोठे तुकडे चालतील की.
भाकरीचे मोठे तुकडे चालतील की. पण दाण्याचे कुट घालून बघच.
मी खूप दिवसात नाही केली. हल्ली भाकरी केली तरी उरतच नाही.
अगदी मागच्या वर्षापर्यंत मी
अगदी मागच्या वर्षापर्यंत मी हा प्रकार आयुष्यात कधीच खाल्ला नव्हता. पण मग ही रेसिपी वाचण्यात आली आणि तशी करूनही पाहिली.प्रचंड आवडली . आता भाकरी उरली तरी काही टेन्शन नाही किंबहुना थोडीशी ठेवतेच ह्यासाठी .
Pages