क्रिकेट

Submitted by अलका_काटदरे on 27 July, 2008 - 06:27

(' दत्ताची पालखी '' या चालीने चाललेली बालकविता)

निघालो आई मी खेळाया क्रिकेट....

क्रिकेट, क्रिकेट, माझा आवडता क्रिकेट
मिळे मला स्वास्थ्य, नसे कसलिही कटकट
तेथे मला माझे सारे, मित्र भेटती थेट
एकमेका सांगू आम्ही, रोजरोजची सिक्रेट
निघालो, निघालो, आई मी सरावाला निघालो,
निघालो आई मी खेळाया क्रिकेट !!

क्रिकेट, क्रिकेट, जगभर खेळतात क्रिकेट
तुला मात्र वाटते आई, वेळ चालला फुकट
असं काही नाही आई, एकिने येऊ आम्ही निकट
मेहनत करू आम्ही, संकटे साराया बिकट
निघालो, निघालो, आई मी धावाया निघालो,
निघालो आई मी खेळाया क्रिकेट !!

आई मी निघतो आता, नाहीतर जाईल माझी विकेट
मित्र मला चिडवतील, सगळीकडून भरपेट
उभा करतील मला, धरूनिया नेट
आई नको ग बिघडवू, आमचा सारा सेट
निघालो, निघालो, आई मी खेळाया निघालो
निघालो आई मी खेळाया क्रिकेट !!

गुलमोहर: 

दत्ताची पालखी >>> ह्याची चाल कुठे मिळेल?

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा
निघालो घेऊन दत्ताची पालखी.......
(आली का लक्षात?, नाहीतर पुन्हा विचारा. मी हि कविता १-२ शाळांमध्ये पण दिली आहे- मुलांसाठी).