बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अनटंच हे सुपरलोल आहे.

भुतालाही इतके डिटेल्स माहिती नसतील... >>> Lol पुन्हा पुन्हा वाचताना नवीन सापडत आहे इतके 'पॅक्ड" कंटेण्ट आहे Happy "ये देखने से पहले मै मर क्यूं गया" असे भूत म्हणेल.

हो सुचले तर लिहीतोच. हे "जवळून" काय आहे? सं स्प द्या Happy

अनटंच म्हणजे ऊर्मिलाची रंगीलातली फॅमिली आठवली, भाऊ आठवा. Happy

नायिकांचे वर्गीकरण आहे, आम्ही पडलो मुली. ऑब्जर्वंट मुलं 'जवळून' बघत असणार आणि सखोल निरीक्षण करत असणार. असे काही तरी माझ्या भोळ्या मनाला वाटले. Happy

ये देखने से पहले मै मर क्यूं गया">>> Lol हनिमूनची शक्यता दिली आहे की 'भट्ट भुतावळ हॉटिज' यादीत. अन्याय होऊ दिला नाही कुणावर.

काय अफाट व्यासंग! नमन दोघिंनाही. ह्यात एक महत्त्वाची कॅटेगरी राहुन गेली आहे. करण जोहर कॅटेगरी. नायिका अतिशय मठ्ठ असणे आवश्यक, कॉमन सेन्स चा अभाव हे क्वालिफिकेशन असल्याशिवाय स्टोरीत प्रवेश नाही. त्यामुळे पुर्ण तीन-साडेतीन तास आपली जवळची माणसे (मैत्रीण, हिरो इ.) ह्यांच्यातील कोण कुणावर प्रेम करते/करतो आणि कोण कुणावर प्रेम करत नाही ह्या दोन वाक्यात आणि सेकंदात आटोपता येतील अश्या उत्तरांचा शोध!

अगदी खरंय पर्णीका! Lol केजो चोप्राकाकांचंच एक्स्टेन्शन असल्याने वेगळं लिहीलं नव्हतं. बट वेल सेड!

Lol ओके ओके समजले.

अस्मिताने "बेकरीवर चिकटवले आहे" हे वाक्यही बेकरीवर चिकटवले आहे Happy

लिहीनच सुचले की पण काय जबरदस्त एकहाती लिहीले आहे! र्म्दची भरही जबरी आहे.

राज कपूरच्या नायिकांना ध ने एका वाक्यात गुंडाळले आहेच ( त्या निमित्ताने कशाततरी गुंडाळले गेले त्यांना. तशी उदाहरणे कमीच आहेत त्यांची. कोहरे की चादर वगैरे सोडले तर). पण त्या "बोली भजन तेरी, नीयत कव्वाली है" चे मुर्तिमंत उदाहरण असतात. वरकरणी धार्मिक वचने गातात. पण त्याच वेळेस कपड्यांद्वारे कहानी की माँग पूरी करतात.

या नायिकांच्या हिंदीची रेंज अशी असावी:
बरजात्या - कमालीचे "शुध" हिंदी. यांचे वाक्य हिंदीच्या १०० मार्काच्या पुस्तकातील व्याकरणाशी मॅच झाले नाही तर पुस्तकात चूक असेल.
चोप्रा - एक नायिका परदेशात ३-४ वर्षे असल्याने हिंदी अजिबात बोलत नाही तर दुसरी ऑल्मोस्ट बरजात्या लेव्हलचे बोलते. नाहीतर एकदम पंजाबी बोलते. ही भारतात नसली, तर बोलण्यात एकदा तरी भारत प्रेम आणेलच. हिच्यापासून जपून राहावे. कधी एकदम राष्ट्रगीत गाईल भरवसा नाही.
रामू - बम्बईय्या हिंदी. ही "जल लिजीए" म्हंटली तर ते जल लिजीए जितना जलना है असे वाक्य असेल. जेम्स बॉण्डचा रोल वेगवेगळे हीरो करतात तसा या सगळ्या हिरॉइन्स उर्मिला मातोंडकरचा रोल करतात.
सलिभ - राजपुताना हिंदी
भट्ट - आपल्यावर उपकार केल्यासारखे हिंदी. यांची नावेही मराठी सिरीज मधल्या स्लीवलेसबायांसारखी संजना, मायरा वगैरे असतात. पूर्ण इंग्रजी मिडियम मधे शिकलेले लोक देशी लोकांवर तु.क टाकत केवळ त्यांना कळावे म्हणून हिंदी बोलतात तसे या बोलतात. गाताना मात्र एकदम उर्दू, सूफी शब्दांची ची रेलचेल करतात. लाजमी, सरगोशी, ख्वाईशे वगैरे. हिंदू असले तरी लग्नाआधी "पर्दा" करतात. चुकून बरजात्याच्या पिक्चरमधे शिरल्या तर आलोक नाथला बुचकळ्यात टाकतील.

फा Rofl

याचप्रमाणे केजोच्या पिक्चरांमध्ये नायिका कितीही परदेशात राहून आलेली / असलेली, टंच, आणि कमी कपड्यातली वगैरे असली तरी तिला 'ओम जय जगदिश हरे' येतच असतं. Wink

थँक्यू पर्णीका आणि फा Happy

त्यामुळे पुर्ण तीन-साडेतीन तास आपली जवळची माणसे (मैत्रीण, हिरो इ.) ह्यांच्यातील कोण कुणावर प्रेम करते/करतो आणि कोण कुणावर प्रेम करत नाही ह्या दोन वाक्यात आणि सेकंदात आटोपता येतील अश्या उत्तरांचा शोध!>>>> Lol त्यांना कॉमनसेन्स असता तर पिक्चर ऐवजी इन्स्टारीलमधे उरकता आले असते. Happy

बोली भजन तेरी, नीयत कव्वाली है
पुस्तकात चूक असेल.
कधी एकदम राष्ट्रगीत गाईल भरवसा नाही.
ते जल लिजीए जितना जलना है
गाताना मात्र एकदम उर्दू, सूफी शब्दांची ची रेलचेल करतात. लाजमी, सरगोशी, ख्वाईशे वगैरे. हिंदू असले तरी लग्नाआधी "पर्दा" करतात. चुकून बरजात्याच्या पिक्चरमधे शिरल्या तर आलोक नाथला बुचकळ्यात टाकतील.
>>> धमाल निरीक्षणं आहेत. Lol
राज कपूरचा परिच्छेद Rofl

ओम जय जगदिश हरे' >>>> Lol माझ्या ममव मनाला आधी 'सुखकर्ता दुःखहर्ता' म्हणून नंतर जी म्हणायची ती म्हण असे सांगावे वाटायचे. शास्त्र असते ते. Happy

विशाल भारद्वाज आणि अनुराग कश्यप यांच्या 'बोल्ड आणि अपफ्रंट' नायिका राहिल्या.

अस्मिताने "बेकरीवर चिकटवले आहे" हे वाक्यही बेकरीवर चिकटवले आहे >>> Lol

वरची चर्चा धमाल आहे
अस्मिताने केलेल वर्गिकरण एकदम भारी, बाकिच्यानी टाकलेली भरही

त्यामुळे पुर्ण तीन-साडेतीन तास आपली जवळची माणसे (मैत्रीण, हिरो इ.) ह्यांच्यातील कोण कुणावर प्रेम करते/करतो आणि कोण कुणावर प्रेम करत नाही ह्या दोन वाक्यात आणि सेकंदात आटोपता येतील अश्या उत्तरांचा शोध! >>> पर्णीका Lol

विशाल भारद्वाज आणि अनुराग कश्यप यांच्या 'बोल्ड आणि अपफ्रंट' नायिका राहिल्या. >> यस! मी आठवतच होतो अजून काय कॅटेगरी राहिली. महेश भट च्या "अर्थ" वगैरे मधल्याही राहिल्या.

सुखकर्ता दुःखहर्ता >>> Lol

महेश भट च्या "अर्थ" वगैरे मधल्याही >>> त्या कॅटेगरीचं नाव परवीन बाबी असं आहे म्हणे. Happy म्हणजे अर्थ मधली स्मिता किंवा अनकही मधली ईशा देओल हे सगळे रोल्स त्याच कॅटेगरीत येतात. Although अनकही मुकेश भट आणि सुष्मिताची स्टोरी आहे असं म्हणतात. पण मला ती अर्थ टाईपच वाटते.

हे लोक किती कमालीचे स्थितप्रज्ञ, निर्लज्ज किंवा जे काही म्हणाल ते असतात. स्वतःच्या वाह्यातपणावर स्वतःच पिक्चर काढतात आणि ते हिट झाले म्हणून खुश पण होतात. मेरा नाम जोकर, अभिमान, सिलसिला, डॅडी, फिर तेरी कहानी याद आयी, साझ, अनकही, एवढी उदाहरणं आता हातासरशी आठवली. अजुन बरीच असतील. ह्या प्रकाराला नक्की काय म्हणावे ते माझे अजुन ठरत नाहीये.

धमाल पोस्टी सगळ्याच Lol

भन्साळी हिरोईन बनण्यासाठी आणखी एक आवश्यकता म्हणजे धावण्याची आवड असली पाहिजे. ऐश्वर्या, दीपिका घरभर इकडून तिकडे धावतात. खामोशीत मनिषा बीचवर धावते आणि या सर्वांवर कडी म्हणून सोनम कपूर सावरियात शहरभर धावते.

भटावळीतही स्पेसिफिकली विक्रम भटच्या हिरोईनला धाप लागण्याची अ‍ॅक्टिंग यावीच लागते. हॉरर असेल तर तो व्हीएफएक्स, कमी कपडे, भूत, मख्ख हिरो अशी ठिगळे लावून त्यांना लपवतो. आणि हॉरर नसेल तर - https://youtu.be/VTfyB532-vo

पायस Lol धाप लागण्याची अ‍ॅक्टिंग लोल. त्यांचे प्रोफेशनही मार्केटिंग, फॅशन असेच काहीतरी असते ना?

त्या सीन मधे जोराचा वारा तिच्या रडण्यामुळे तयार होतोय असे वाटते. जितकी तिच्या रडण्याची इंटेन्सिटी जास्त तितके ते मागचे ब्लॅंकेट जास्त वर उचलले जाते. इन फॅक्ट त्यामुळे हा हॉरर सीन वाटतो Happy

अजून एक खास बेकरी कॅटेगरीतील ट्रिक. त्या सीन मधून अमिशाला मेंटली हटवा, पण तिचा आवाज व सीनमधला बाकीचा भाग तसाच ठेवा. हे दुसर्‍याच कशाचेतरी प्रतीक वाटेल Happy