नमस्कार मायबोलीकर,
सरळ मुद्द्यावर येतो. मला फार पुर्वीपासुन म्हणजे २००६, २००७ पासुन रसायनशास्त्रात पी.एचडी करायची होती. फास्ट फोर्वर्ड....ईन शोर्ट, मी खुप हातपाय मारुन मल हव्या त्या मेन्टर(रीसर्च गाईड) कडे त्या लॅबमध्ये प्रवेश ही मिळवला. परत, फास्ट फोर्वर्ड....घाणेरडे अंतर्गत राजकारण, खालच्या दर्जाचे, 'संशोधन' ह्या शब्दाला फाट्यावर मारणारे सो कॉल्ड वैज्ञानिक, नावडता विषय बदलुन न मिळणे, फेलोशिपचे फॉर्म भरुनही, पैसे नावाच साट पण न देणे ह्यामुळे मी १४ ते १५ महीन्यांनी पी.एचडीच्या सर्व स्वप्नांना पुर्णविराम दीला. व तो आध्याय बंद केला.
पण......रसायनशास्त्र हे माझे प्रेम आहे, निर्जीव गोष्टी कधी धोका नाही देत. माझे केमिस्ट्रीचे ज्ञान हे वर्षानु वर्षे तसेच राहीले व वाढतही गेले. आता अजुन शिकायला जास्त काही नाही, असही वाटायला लागल. ते असो. तर मध्ये मला 'एकिकडुन'(ईथे त्या माध्यमाचे नाव मी लिहु ईच्छीत नाही) मला खालील प्रकराचा व्हीडीओ पाठवला गेला. तो व्हिडिओ WD-40 ह्या ख्यातनाम स्प्रेचा होता व मी अगदी सेम स्प्रे 'शोधुन' काढणे अपेक्षित होते. मला साधी सायकल ही चालवता येत नाही, २००३ पासुन काही कारणाने मी बाईक, स्कुटर चालवणे बंद केले आहे. तर मला WD-40 नावाचा स्प्रे असतो हे माहीतीही नव्हते व मी कधी साधे ऐकले ही नव्हते.
https://www.youtube.com/watch?v=QLrtS0dtOn8
युट्युबवर असे खुप व्हीडीओज आहेत, खुप विविध भाषेंमध्ये आहेत. हा एक अत्यंत प्रभावी व तितकाच प्रसिध्द (जगविख्यात) स्प्रे आहे, हे मला नंतर समजले. WD-40 : Water Displacement, 40 means it was the inventor's 40th trail/attempt to reach to this perticular formulation.
ते असो, तर ते सेम formulation मी स्वःता तयार केले आहे. मला जवळजवळ एक महीना लागला. ते formulation मी त्या क्लाईंटला विकले सुध्द्दा, त्यांनी ते अक्सेप्ट केले सुध्दा, त्यांनी मी पाठवलेले सॅपल ट्राय केले सुध्दा, आणि आता बल्क मध्ये बनवत असतील सुध्दा. कोणती कंपनी, काय ब्रँडखाली सर्व चालु आहे, मला काहीही माहीती नाही. हा एक सब-कॉन्ट्रॅक्ट होता.
मी तयार केलेल्या formulation चे डेमो दाखवणारे व्हिडीओज खाली देत आहे.
https://www.youtube.com/shorts/JFRevtUpzO0
https://www.youtube.com/watch?v=1M9LmtuurDQ
https://www.youtube.com/watch?v=GZxwF_RrYxo
https://www.youtube.com/watch?v=0usxamOEQxs
https://www.youtube.com/watch?v=YipxUwp7Jq4&t=7s
मला हा स्प्रे म्हणजे पुर्ण formulation शोधुन काढेपर्यंत खुप मानसिक ताण व ईतर शारीरीक ताण, तंतोतंत तेच केमिकल्स ईथे राहुन मिळवणे व ते आणणे वगैरे खुप त्रास झाला. पण रीझल्ट आवडलाही. सर्वात महत्वाचे की ते formulation त्या क्लाईंटने ट्राय करुन स्विकारले सुध्दा.
माझा हा लेख ईथे लिहण्याचा उद्देश :
मला हाच स्प्रे मार्केटमध्ये माझा स्वःताचा प्रोडक्ट म्हणुन launch करायचा आहे. मी NDA साईन नव्हते केले, तर तो काही प्रॉब्लम नाही. मला ह्या प्रॉडक्टची कॉस्ट कटींग कशी करायची ह्याचे पुर्ण ज्ञान आहे. खुप कॉस्ट कटींग शक्य आहे. मार्केट मध्ये विकताना डिस्ट्रीब्युशन नेटवर्क व तत्सम ज्ञान सोप्पे आहे. ते असो.
मला ईथल्या माहीतीगारांकडुन खालील माहीती हवी आहे :
१) मला ह्या प्रोडक्ट साठी 'फंडींग' चे कुठले पर्याय आहेत? माझे लक्ष ७ ते १० लाख रुपये आहे. प्रत्येक युनिट सेल मागे ४५% प्रॉफीट असेल. ते पुर्ण वेगळे कॅल्क्युलेशन आहे, ते ईथे स्पष्ट करण्यात अर्थ नाही.
२) प्रायव्हेट कींवा सरकारी, प्रयत्न हमखास यशस्वी होतील, अश्या कुठल्या योजनेचा फायदा होऊ शकेल का? अश्या योजना आपल्या माहीतीत आहेत का?
३) एखादी संस्था कींवा व्यक्ती ह्या formulation मध्ये ईंटरेस्ट घेऊन भांडवल उपलब्ध करुन देऊ शकतो का, मी % प्रॉफीट ठरवायला तयार आहे.
तर मला क्रूपया ह्या बाबतीत मार्गदर्शन/मदत अपेक्षित आहे. धन्यवाद.
अभिनंदन आणि शुभेच्छा..
अभिनंदन आणि शुभेच्छा..
वड40 सारखे अजून काही products मार्केट मध्ये आहेत ह्याची तुम्हाला कल्पना असेलच
आपल्याला खूप खूप शुभेच्छा !
आपल्याला खूप खूप शुभेच्छा ! मनापासून कौतुक !!
शाब्दीक कोट्या करणे, कवितेतल्या व्याकरणाच्या चुका काढणे, चित्रपटाची पिसं काढणे, फॉर्वर्ड ची भुकटी करणे असे काही असते तर नक्कीच योगदान दिले असते.
पण एकतर आंत्रप्युनर बनणे, स्वतःचे संशोधन आणि बाजारगप्पा म्हटल्यावर माझ्यासारख्यांची अवस्था बंदे हाथ मधल्या अमिताभसारखी किंवा लॉकेट मधल्या विनोद खन्ना सारखी झाली आहे.
अर्थात मायबोलीवर तुम्हाला योग्य तो सल्ला मिळू शकतो. फक्त असे माबोकर्स जास्त सक्रीय नसतात.
चिकाटी आणि यशासाठी सलाम.
चिकाटी आणि यशासाठी सलाम.
छान प्रोडक्ट बनल्याबद्दल अभिनंदन.
गाववाले असल्याने पार्टनरशिपसाठी उत्सुक आहे. प्रोडक्शन कुठे करणार आणि किती जागा लागणार ह्यासोबत Investment कश्या टप्प्यात लागणार व इतर काही बेसिक गोष्टी संपर्क ईमेल मधून पाठवू शकता का.
अभिनंदन.
अभिनंदन.
WD-40 हे प्रॉडक्ट patented नाही, त्यामुळे ते बनवून विकायला कठीण पडू नये असा अंदाज, पण WD-40 हा ट्रेडमार्क वापरता येणार नाही, त्यामुळे वकिलाचा योग्य तो सल्ला घेऊनच पुढील पाऊल टाकावे.
७ ते १० लाख रुपये अगदी किरकोळ रक्कम आहे, ती उभी करणे कठीण नाही. यशाची खात्री असेल तर शक्यतो लोन घेऊनच धंदा सुरू करा, स्वतः:ची मालकी विकू नका. असे वैयक्तिक मत.
पण तुम्ही १ महिन्यात हा प्रॉडक्ट बनवू शकलात तर दुसरा कुणीपण बनवू शकेल हे लक्षात घ्या. खरी भिस्त प्रॉडक्ट मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून असेल.
अजून १ चांगला प्रॉडक्ट म्हणजे Windex. दोन्ही विका.
डॉ. केकी घर्डा यांच्यावर लिहिलेला हा लेख तुम्हाला स्फूर्तीदायक ठरेल, अशी आशा आहे. तुम्हाला शुभेच्छा.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी संदेशामधुन व्ययक्तिक प्रतिसाद देईन . ह्या बाबतीत चर्चा करायला व परीणामी प्रगतीला खुप वाव आहे. आपले प्रतिसद खुप प्रेरणादायी व शिकवणारे आहेत, धन्यवाद, आभारी आहे!
छान प्रॉडक्ट आणि शोधाबद्दल
छान प्रॉडक्ट आणि शोधाबद्दल अभिनंदन. उ बो यांनी दिलेला सल्ला योग्य वाटतो. त्यावर विचार करा. शुभेच्छा.
आपल्याला खूप खूप शुभेच्छा !
आपल्याला खूप खूप शुभेच्छा ! मनापासून कौतुक !!
असे नवीन प्रॉडक्ट तयार करून तुम्हाला विकायचे आहे असे तुम्ही लिहिले आहे. तर असे व्यवसाय सुरू करण्याबाबत थोडी माहिती.
१ - यात अल्कोहोल असणार आहे का ? आणि हे compressed आणि air tight container मध्ये भरावे लागणार आहे का?
याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला त्या संबंधी परवानग्या लागतील. अशी कंपनी कुठल्या भागात सुरू करू शकतो, त्यासाठी पोलुशन कंट्रोल बोर्डाच्या परवानग्या आणि लागणारे मशिन्स लागतील. शिवाय काही स्पेसिफिक स्किल चे कामगार लागतील. याबद्दल अधिक माहिती काढा.
वरच्या प्रश्नाचे उत्तर ' नाही ' असे असेल तर तुम्ही घराच्या घरी किंवा एखादी छोटी जागा भाड्याने घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकाल. सुरुवातीला यात तुम्ही proprietary व्यवसाय सुरू करू शकता.
पण यासाठी लागणारा कच्चा माल तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात विकत घेता येतो का? की त्यावर काही निर्बंध आहेत हे माहिती करा. निर्बंध असतील तर प्रोप्रायोटरी चालू करून उपयोग नाही मग llp, किंवा ओपीसी किंवा pvt Ltd असा काहीतरी पर्याय शोधावा लागेल.
वरचा काहीही विचार करायच्या आधी finance बद्दल.
तुम्ही ७/१० लाख घालू शकता असे लिहिले आहे पण ते रिकव्हर किती वर्षात होणार? किती किंमत ठेवून तुमचा किती टक्के फायदा आहे ( घरी ४/५ वेळा प्रॉडक्ट बनवून याची गणिते सुटणार नाहीत ) त्यासाठी कच्चा माल, स्किल वर्कर्स, ऑफिस , फॅक्टरी जागा, लाईट पाणी बिल, मार्केटिंग बजेट , प्रॉडक्ट कंटेनर, लेबल्स त्याचं पॅकिंग, distribution network चे कमिशन, तुमचा पगार हे सगळं calculate करायला हवे.
एकच प्रॉडक्ट करून कंपनी चालणार नाही कारण फॅक्टरी मधले रोजचे तास काम करून घेतलं तरच फायदा होऊ शकेल. त्यामुळे अजून ४/५ प्रॉडक्ट तुम्ही निदान प्लॅन करून ठेवले पाहिजेत. म्हणजे एक सुरू झालं की दुसऱ्यावर काम करता येईल.
---
आता हे सगळं सुरू कसं करायचं?
तुम्ही घरच्या घरी सुरुवात करू शकत असाल तर ते एकदम बेस्ट.
ते झालं की लगेच कंपनी स्थापन करून ( CA तुम्हाला मदत करू शकेल ) लगेच startup india मध्ये रजिस्टर करा. त्याची माहिती असणारा CA किंवा गाईड शोधावा लागेल. हे झालं की तुम्हाला incubation center ची मदत मिळू शकेल. तिथून पुढे तुमचे काम कोणत्या स्टेज मध्ये आहे त्यानुसार मदत घेऊ शकता. म्हणजे रिसर्च मध्ये, किंवा बिझनेस ग्रोथ मध्ये इत्यादी. तुमची कल्पना चांगली असेल आणि incubation center मधून योग्य मार्गदर्शन मिळाले तर सरकार कडून तुम्हाला seed फंडींग मिळू शकतं, त्याचा खूपच फायदा होतो.
समजा तुम्ही घरून सुरुवात करू शकत नसाल तरी आयडिया बेस वर देखील incubation मध्ये प्रवेश मिळू शकतो. तिथे तुम्हाला रिसर्च साठी लॅब, पैसा, व्यवसाय सुरू करायचे मार्गदर्शन हे सगळे मिळू शकते. बहुतेक वेळा हे फ्री किंवा अगदी कमी फी मध्ये मिळते.
अरे हे भारी आहे...
अरे हे भारी आहे...
अभिनंदन ! आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा शानबा.
अभिनंदन आणि शुभेच्छा शानबा.
माहितीपूर्ण प्रतिसाद सावली
@ बबड्या cool होय मला कल्पना
@ बबड्या cool होय मला कल्पना आहे, पण ते प्रॉड्क्ट्स सेम डब्ल्यु डी ४० सारखे नसावेत, माझे फॉर्मुलेशन तंतोतंत डब्ल्यु डी ४० (ओरीजीनल व्हर्जन) सारखे आहेत. आणि त्याचा सर्वात जास्त ख्प आहे. मुख्य गोष्ट हा स्प्रे कमी कींमतीत बन्वला जाउ शकतो. डब्ल्यु डी ४० हा थोडा महाग समजला जातो ग्राहकांकडुनही. आणि माझा मेन फोकस कॉस्ट कटींग आहे.
@ रघू आचार्य , @ Sparkle, @
@ रघू आचार्य , @ Sparkle, @ ऋन्मेऽऽष, @ उदय , @ उपाशी बोका आणि @ अni@,
सर्वांचे खुप आभार. उपाशी बोका ह्या युजरनेमशी मी खुप दीवसांनी संपर्क करत आहे, थँक्स ऊ.बो. ईथे लोटे करुन एक ठीकाण आहे तिथे घर्डा केमिकल्स हे नाव खुप प्रचलित आहे व अगदी ह्या गावतलीच (टेरव, चिपळूण) खुप माणसे तिथे कामला जातात. माझा मेन फोकस सध्या ह्या प्रोडक्ट वर आहे. कारण ह्याचे 'सुत्रीकरण' फार 'फ्लेक्जीबल' आहे.
अनी ह्यांच्याशी योगायोगाने व नशीबाने संपर्कात आलो आहे.
@ सावली
@ सावली
सविस्तर व माहीतीपुर्ण प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद. आपण दीलेली माहीती व त्या संस्था, योजना ह्या बबात मला एकुन ही माहीती नव्हते. आपणास व्य.नि करुन काही अजुन माहीती घेण्याचा प्रयत्न करेन. माझा कल 'कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्च्रींग' कडे आहे. स्वःता प्लँट उभारण्यावर नाही, मी ह्याबाबत आपल्याकडुन माहीती घेईन. धन्यवाद आपण काहीही कामात असाल तर त्यासाठी आपल्यास खुप शुभेच्छा!
केमिकल कॉम्पोसिशन चे प्रॉडक्ट
केमिकल कॉम्पोसिशन चे प्रॉडक्ट तयार करणे तसे चॅलेंजिंग काम असते, तुम्ही प्रॉडक्ट तयार केलात त्याबद्दल अभिनंदन ...... पण ( जे लिहतोय ते पॉसिटीव्हली घ्या , घेतलात तर तुम्हाला फायदा होईल.)
कमी किमतीला बनवला जाऊ शकतो आणि खूप जास्त किमतीला विकला जाऊ शकतो असे प्रॉडक्ट जनरली पेटंटेड असतात किंवा प्रोप्रायटरी (कंपोझिशन) असतात, त्या काम्पोसिशन ला समांतर अशी प्रॉडक्ट्स सब्स्टीट्युट केमिकल्स वापरून बनवली जाऊ शकतात. सहसा जनरल केमिकल (बनवणाऱ्याचे) प्रोडक्शन करणाऱ्याचे प्रॉफिट हे सगळ्यात कमी असते. त्यातल्या त्यात फाईन केमिकल्स आणि स्पेसिलीटी केमिकल वाले % मध्ये थोडे जास्त मार्गीं ठेवतात पण त्यांचा वोल्युम पण कमी असतो. तर मॅनुफॅक्टरइंग हा यातला सगळ्यात सोपा घटक आहे, (पचायला जरा अवघड आहे , पण सत्य आहे,) अवघड आहे ते म्हणजे , प्रॉडक्ट विकला जाणे आणि त्यासाठी डिस्ट्रिब्युशन नेटवर्क उभा करणे.
उदा. पाण्याची बाटली जी आपण २० रु MRP ला घेतो, ती ७ रु ला रिटेल वाल्याला मिळालेली असते , डिस्ट्रिब्युटर ला ६ रु ला मिळालेली असते. आणि ती तयार करायला ५.२० रु खर्च आलेला असतो. (यातला सगळ्यात जास्त खर्च हा बाटली चा असतो.) १२ लिट चा बॉक्स मॅनुफॅक्टरर ६२.४ रु ला पडतो ( सगळा खर्च पकडून ), डिस्ट्रिब्युटर ला ७२ ला पडतो, आणि रिटेलर ला ८४ रु ला पडतो. ( हाच बॉक्स जर ब्रँडेड असेल तर तो रिटेलर ला ११०-१२० रु ला पडतो)
आता रिलायन्स त्याचा प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणत आहे आणि डिस्ट्रिब्युटर प्राईज आहे ५८-६० रु बॉक्स .
आता सुद्धा wd40 ला समांतर स्प्रे बाजारात आहेत. रिटेलर तोच प्रॉडक्ट विकतो जो त्याला जास्त मार्जिन देतो, ब्रँडेड वाले मार्जिन कमी देतात पण गिर्हाईक तेच मागतात म्हणून तो माल ठेवावा लागतो. आता रिटेल वाल्यांशी बोलून बघा कि त्या प्रोडक्त्त ची डिस्ट्रिब्युटर किमंत किती आहे, मार्केट मधले क्रेडिट किती दिवसाचे द्यावे लागते ?
मग तुमचा टार्गेट सेट करा कि मी मार्केट चा २% ५% शेअर मिळवीन , त्यासाठी तुम्हाला कॅपिटल किती लागेल, आणि खेळते भांडवल किती लागेल. आणि मग डिस्ट्रिब्युटर रेट ला तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती येईल.
हे सगळे गणित तुमचे ४५% चे मार्जिन १५ % पर्यंत जरी खाली आले तरी , बॉर्डर लाईन ला बिझिनेस चालू शकेल , प्रोव्हायडेड तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ वाढवत न्याल. त्यपेक्सा खाली आले तर मात्र याचा विचार सोडून द्या.
केमिकल घेताना ५० किलो चा रेट , २०० किलो चा रेट आणि टँकर रेट यात खूप फरक असतो, हे पण लक्षात घ्या. काही केमिकल चे मॅनुफॅक्टरिंग फक्त मोठ्या प्रमाणात फिसिबल होते. एक उदाहरण म्हणून आजच आलेला रेट खाली टाकतोय,
2-AMINO-2-METHYL-1-PROPANOL (AMP) (CAS No.124-68-5)
Packing : 5 kg.
Rs. 3500/= per kg + 18% GST Extra
2-AMINO-2-METHYL-1-PROPANOL (AMP) (CAS No.124-68-5) -2 ton
Packing : 190 kg.
Rs. 1200/= per kg. + 18% GST Extra
Ready Stock
Delivery from Ambernath / Bhiwandi Unit / Shipping Extra
Offer Valid for 1 week
Pre-payment against proforma
सो प्रोजेक्ट साठी ऑल द बेस्ट, विचार १० वेळा करा मग निर्णय घ्या.
निवांत पाटील छान प्रतिसाद.
निवांत पाटील छान प्रतिसाद.
निवांत पाटील छान प्रतिसाद.
निवांत पाटील छान प्रतिसाद.
<<<मॅनुफॅक्टरइंग हा यातला सगळ्यात सोपा घटक आहे, (पचायला जरा अवघड आहे , पण सत्य आहे,) अवघड आहे ते म्हणजे , प्रॉडक्ट विकला जाणे आणि त्यासाठी डिस्ट्रिब्युशन नेटवर्क उभा करणे.>>>हे बरोबर आहे. मार्केटिंग देखील यात धरावे लागेल.
तुम्ही कॉन्ट्रॅक्ट manufacturing केलं तरी देखील प्रॉडक्ट विकणार कसे आणि कुठे याचा आधी प्लॅन करावा लागेल.
<<<घेताना ५० किलो चा रेट , २०० किलो चा रेट आणि टँकर रेट यात खूप फरक असतो,>>> हे पण बरोबर आहे. यात प्रचंड फरक पडतो. त्यामुळे मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रॉडक्ट बनवतात आणि त्यांना ते खूप स्वस्त पडते. आणि प्रॉफिट मर्जिन खूप ठेवता येते.
((ब्रँडेड वाले मार्जिन कमी देतात पण गिर्हाईक तेच मागतात म्हणून तो माल ठेवावा लागतो.)) मला वाटतं उलट ब्रँडेड वाल्यांना प्रॉफिट मर्जीन फार असते ते. Distributor ला ५०/६०/६५ टक्के देखील सहज देऊ शकतात.
रिटेल वाल्याला त्यातले २५ ते ३० टक्के मिळते. फक्त मोनोपॉली प्रॉडक्ट रेंज असेल तरच ब्रँड कंपन्या मार्जिन कमी ठेवतात पण मार्केटिंग आणि availability वर पैसा घालतात म्हणजे मग लोक त्या स्पेसिफिक ब्रांडची डायरेक्ट मागणी करतात.
शानबा, तुम्हाला मनापासून
शानबा, तुमचे मनापासून अभिनंदन.
सावली आणि निवांत पाटील, छान- सविस्तर माहिती दिली आहे.
सावली - छान माहिती. इतर
सावली - छान माहिती. इतर व्यावसाय सुरु करणार्यांसाठी अशी माहिती उपयोगाची ठरेल.