हा भाग टाकण्यासाठी मी पीक टाकणार होतो, पण खूप लोकांनी सल्ला दिला, की खूप डार्क लिहिलंय,.डोन्ट ओपन अप सो मच. म्हणून नाही टाकला.
कुणालाही curiousity असेल, तर संपर्कातून मेसेज करा. मी पर्सनली सेंड करेन.
३० ऑक्टोबर २०२४.
सर... माझा जिम ट्रेनर मला विचारत होता.
बोल राहुल. मी शर्ट काढला.. आणि आईस पॅक मानेवर ठेवला...
... आताशा मला जिम मध्ये शर्ट काढण्याची लाज नव्हती.
बेंगलोर हून कधी येणार?
मी कधी जाणार हेच ठरलं नाही अजून. इती मी.
पुढे काय करायचं आता? त्याचा प्रश्न.
पुढे म्हणजे?
म्हणजे राजे, झालं ना ट्रान्सफॉर्मेशन. ब्रॉड शोल्डर, भरलेली छाती, फ्लॅट पोट. अजून काय पाहिजे?
...आता तर बरं व्हायचय...
सर... तुम्ही खरच एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवा. बाबा ऐन वेळी का घात होतो माझा? इति बबलू शेठ.
अरे काल परवापर्यंत हा माणूस इतका भारी फेस कट घेऊन फिरत होता ना, ती माधवी मला विचारत होती, की मनीष सराना विचारा की फेस सर्जरी केलीय का. भारी खळी पडते त्यांची...
...बस माधवीच नाव घेऊन विनाकारण स्वतः विचारू नका. तिला हवं तर ती मला स्वतः विचारेल.
ओके. आम्ही गप बसतो.
पुढच्या चार महिन्यात, हवं तर पाच महिन्यात सिक्स पॅक बनवू. हा पुढचा प्लॅन...
जल्लोष जाहला.
जिम मध्ये केक कापताना हॅपी बर्थडे ऐवजी गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण चालू होतं.
*****
आज सकाळीच गायत्रीचा कॉल होता. व्हिडिओ कॉल...
सोया है अबतक... जाग जा... कर्नाटकी हिंदी.
जर मी तुझ्या आयुध पूजेला आलो नसतो ना, तर हे झालं नसतं...
...ओके. माझी चूक बस. आज काय प्लॅन.
सगळे प्लॅन विस्कटले गायत्री.
एक फोटो निकालले. क्या इश्यू है.
ऐसे जाऊ?
ठीक तो दिख रहा है.
मी फोन जवळ घेतला.
बापरे... ती शॉक.
मत जा. वाइल्डलाइफ कब शूरू करेगा?
तूच बोललीस ना, नरक चतुर्दशी...
हा. हिरोईन गायत्री रहेगा ना?
हंड्रेड पर्सेंट...
गुड बॉय. और एक बात कहू?
येस...
अभी थोडा ना नॉर्मल रहो. बस करो ये पागलपण. आंटी है उधर?
हा है.
दिजिए उसको...
उनको म्हण ग गायत्री.
हा उनको.
आंटी, इस्को बोला मैने, जा ऐसाही. ये नहीं जाता. समझाओ.
मी बोलते त्याच्याशी, मातोश्री आमच्या जवळच होत्या.
ऑर उनको ये भी बोला, अब शादी बनवा लो...
...हा मैभी बोला उनको. मातोश्रीच हसू लपत नव्हतं.
मी वैतागून फोन कट केला.
ऐक ना.
बोल.
गायत्री किती सुंदर आहे रे दिसायला...
...मला कळलं होतं रोख कुठे चाललाय...
नाही आई... नको... एक मैत्रीण मिळाली आहे, कमीत कमी ती असू दे.
ती गप्प. मी गप्प.
मनू... काय झालं.
काही नाही.
सांग ना.
बस ना आई माझ्याजवळ थोडं.
ती बसली. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं...
...आणि मी पुन्हा रडलो. खूप दिवसांनी...
आई....मी नीट खाल्लं नाही ग दीड वर्षापासून. मला जे हवं, ते मिळवलं. पण जे गमावलं ते गमावलंच ना. सगळ्यापासून दूर राहिलो. स्वतःचाच विचार केला. फक्त स्वत:चा... तुला, बाबांना, सिस्टरला, काहीही देऊ शकलो नाही... स्वार्थी झालो आहे खूप मी.
आम्ही कधी तक्रार केली?
का केली नाही?
कारण आम्हाला फक्त तू हवा होतास. दूर राहिलास तरीही. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात माझा मुलगा आहे, हे मला हवं होतं...
...मी हरलो का जिंकलो हेच कळत नाहीये मला...
ना तू हरलास, ना तू जिंकलास. तू एका साध्या गोष्टीला लढाई बनवलं.
मनू... तू तिचा घोष करत राहिलास...पण ती दीड वर्षापूर्वीच कायमची गेली होती. तुला कारण हवं होतं, तिच्या आठवणीत रमायचं, असं झालं तर परत येईल, तसं झालं तर परत येईन. तेच वेड घेतलं. पण हे कधी घडणार नव्हतं.
...आता एकच पर्याय आहे. विसर तिला. पूर्णपणे. आणि प्लीज, आम्ही थकलोय आता. आता खरच आमच्या मुलाची गरज आहे. आधार बन आता आमचा. लायबिलिटी नको. आता आम्ही नवीन बंगला बांधतोय, या वयात... तू तर कालपासून फक्त रडतोय.
सोड सगळं. सुरुवात कर जगायला. आनंदी रहा, मनसोक्त रहा. ही नागीण काही दिवसांत बरी होईल, पण मनाला कायम दंश करणाऱ्या नागापासून वाच. आयुष्यात एका छोट्याश्या गोष्टीच तू इतकं वेड घेतलं, की आयुष्यच जगणं विसरलास? उद्या काही मोठं संकट आलं, तर तू जगशील?
आयुष्यात अजून खूप गोष्टी येतील, धीराने सामोरं जा... बी ब्रेव...
...तिनेच माझे डोळे पुसले...
आणि मी फोन हातात घेतला, शेवटचा मेल टाईप केला...
...खरोखर शेवटचा...
अज्ञातवासी आज मोकळा झाला होता...
वेडेपणातून.
दीड वर्षांचा प्रवास शेवटी आज संपला होता.
न जिंकता, न हरता...
... पण त्याच्या आणि तिच्याही स्वप्नातला तो त्याने परत आणला होता.
समाप्त.
ऋणनिर्देश :
स्नेहल : दुसरी आई. सॉरी तुला खूप त्रास दिला. खूप...
शेवटी तुझ्याही मर्यादा संपल्या. कारण मीच माझ्या मर्यादा ओलांडल्या होत्या.
PW : इनिशियल टाकतोय. तू समजुन घे. सॉरी... तू जीव टाकलास माझ्यावर, मी त्या लायकीचाच नव्हतो ग. आय ऑलवेज टेक यू ग्रँटेड.
SP: तू काल माझा बडे विसरलीस, आणि मला खूप आनंद झाला... माझ्यावर कायम वेड्यासारखं प्रेम करत राहिलीस, हवं तेव्हा देत राहिलीस. पुन्हा एकदा, माझी ती लायकी नव्हती.
मनीमाऊ - तू अगदी वेडी होतीस. आज मान्य करतो. येस आय चिटेड ऑन यू. तुझ्यासारखा वेडं प्रेम करणारी व्यक्ती मी अजून शोधतोय ग. सॉरी... माफ करून टाक, नाहीतर मी अडकून पडेन परत.
जिच्यासाठी केला अट्टाहास ती एका गोंडस मुलाची आई - सगळं तुझ्याच साठी होतं ग राणी, तुला जे हवं ते ते देण्यासाठी...आपण आयुष्य सुरू करणार होतो, निर्णय घेणार होतो... ओके. तुझा भ्रमनिरास झाला माझं वजन बघून...
... पण आता मी जेव्हा तुझ्या स्वप्नातला राजकुमार आहे, तेव्हा तुला तो नकोय याची जाणीव मला झालीय.
असो... स्वत: ला सांभाळ... आणि तुझ्या मुलालाही... (जो माझ्यासाठी सगळ्यात प्रिय होता.)
क्रमशः
छान ... प्रवासाचा शेवट गोड
छान ... प्रवासाचा शेवट गोड झाला ..
..
पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ..!
दिवाळीच्याही हार्दीक शुभेच्छा ..!
छान ...
छान ...
@रुपाली - You know now, कुठून
@रुपाली - You know now, कुठून सुरुवात झाली, कुठे संपला.
@शर्मिला - थॅन्क्स
गोष्टी ट्रॅक वर येत आहेत हे
गोष्टी ट्रॅक वर येत आहेत हे बेस्ट
अज्ञातवासी : इतक्या कथा
अज्ञातवासी : इतक्या कथा समांतर चालु आहेत की आता कन्फ्युजन झालंय.
वैयक्तिक पातळीवर आता सगळं मार्गी लागत आहे हे बेस्ट! पुढच्या प्रगतीसाठी शुभेच्छा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
पुन्हा लिहिते झालात. अभिनंदन!
छान ...
छान ...
छान!
छान!
@झकासराव - वेळ लागेल, पण
@झकासराव - वेळ लागेल, पण येतील.
@भक्ती साळुंके - ही अगदी खरीखुरी कथा. आयुष्याला गोष्टीरूप द्यावं म्हणून वाइल्डलाइफ लिहिली.
@केशवकुल - धन्यवाद
@तोमिन - धन्यवाद
@देवकी - धन्यवाद
फार छान. हे सगळे खरे असेल तर
फार छान. हे सगळे खरे असेल तर लिहिण्यासाठी धाडस लागते. डिप्रेशन चे diagnosis होऊन त्यावर वेळीच उपचार होणे अत्यंत गरजेचे.
विचारांच्या जाळ्यांतून तुमची कायमची सुटका होवो. खूप खूप शुभेच्छा.
@ रोहिणी - थॅन्क्स...
@ रोहिणी - थॅन्क्स...
जे लिहिलं ते अगदी अगदी खरं...
मी तुम्हाला विचारपूस मध्ये
मी तुम्हाला विचारपूस मध्ये संदेश लिहिला आहे. नक्की वाचा.
@रोहिणी मी मेसेज वाचला.
@रोहिणी मी मेसेज वाचला.
तुम्हाला संपर्कातून मेल केला आहे.
Ok. मेलला reply केला आहे.
Ok. मेलला reply केला आहे.
गोष्टी ट्रॅक वर येत आहेत हे
गोष्टी ट्रॅक वर येत आहेत हे बेस्ट>>+111