कोकणची एक छोटी ट्रिप!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 27 September, 2024 - 17:14

बऱ्याच दिवसांपासून कोकण खुणावतोय, उद्या उठून निघायचे ठरतेय. पावसाचे अपडेट खूप शोधून नीट कळत नाहीये, तुम्हाला माहित असतील तर सांगा. पिंपरी चिंचवड पासून 200 ते 300 किमी किंवा अजून जरा जास्त प्रवास करू शकतो.
दापोली किंवा गुहागर डोक्यात आहे. प्लिज प्लिज कृपया कृपया हा धागा वाचा आणि प्रतिसाद द्या.
माझे ओळखीतले कुणीच दापोलीकडे राहत नाहीत, तुम्ही कुणाला ओळखत असाल तर कृपया एक फोन करून तपास करून इथे प्रतिसाद द्या. फॅमिली आणि एक लहान बाळ सोबत असणार असल्याने जरा धाकधूक
टीप: पुन्हा कधी लवकर जाणे होणार नाहीये, शक्यतो आताच जमले तर जमेल म्हणून कळकळीची विनंती..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/state_rain.pdf

पाऊस वळवाचा असेल. थोडा वेळ जोरात येतो. विंडी ला पहा जिकडे जाता तिकडे काय अंदाज आहे. फार होणार नाही. निश्चिंत होऊन जा.

दापोलीत चिक्कार होम स्टे आणि हॉटेल्स सुद्धा आहेत. त्यांचे नंबर्स गुगल / फेसबुक वगैरे वर मिळतील. त्यांना फोन करा. सगळी सिच्युएशन, बाळाचे वय वगैरे सांगा.

ते तुम्हाला रियल टाइम फर्स्ट हॅण्ड अपडेट्स देतील. काही धोक्याचे असेल तर अलर्ट पण करतील. माझा इन् जनरलच कोकणच्या होम स्टे वाल्या लोकांचा चांगला अनुभव आहे. केवळ स्वतः कडे कस्टमर यावा म्हणून कधीही चूकीची माहिती देऊन आपला जीव धोक्यात घालत नाहीत. आम्ही कोकणात फिरायला जाताना पुणे सोडलं की अध्ये मध्ये फोन करून होम स्टे वाल्यांना अपडेट पण करतो कुठपर्यंत पोचलो ते. त्यांना जेवण वगैरे तयारी करणे सोपे जाते आणि आपण वेळेत पोचणार नसू (विशेषत: सोबत लहान मुल असेल) तर अनेकदा होम स्टे वाले प्रामाणिकपणे "आज रात्री येऊ नका. वाटेत या या ठिकाणी चांगली हॉटेल्स आहेत तिथे मुक्काम करा आणि उद्या सकाळी या" असा सल्ला पण देतात.

सहलीस हार्दिक शुभेच्छा!

=====

धाग्याचे शीर्षक भारी आहे, कित्येकांच्या मनातले शीर्षक तुम्ही प्रत्यक्षात दिलेत धाग्याला! हार्दिक अभिनंदन!

मला कोकण पाहायचे हा धागा सध्यस ट्रेंडिंग आहे, तो पाहा. आता पावसाची भिती नाही त्यामुळे बिन्दास्त या.. सुंदर निसर्ग वाट पाहतोय.

सर्वांना धन्यवाद, नेटवर्क नसल्याने लिहायला जमले नाही..

तर शनिवारी सकाळी 8 वाजता निघालो, परतीचा असल्याने पाऊस जास्त त्रास देणार नाही अशी अपेक्षा होती ती खरी ठरली सुदैवाने! ताम्हिणी घाटात बऱ्यापैकी जोरदार पाऊस लागला,पुढचा प्रवास उन्हातून झाला.

आंजर्ले बीचला महालक्ष्मी भोजनालय: रूमचा योग्य दर, अप्रतिम जेवण..
पुढच्या वेळी इथेच