"अंत: अस्ति प्रारंभ: - २ - छप्पर फाडके- छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 18 September, 2024 - 03:02

ती बस स्टॉपजवळ येत होती तेव्हा लांबूनच तिने त्याला ओळखल, कॉलेज मधे पॉप्युलर, विशेष करून तिच्या वर्गातल्या मुलींमध्ये.. तशी झपाट्याने पावलं टाकत ती तिथे पोहोचली.
“एकटाच दिसतोय.. वा काय संधी मिळलीये.” स्वतः च्या नशिबावर ती भारीच खूष झाली
आता ह्याला कसं हाय म्हणून बोलायचं असा विचार करत असतानाच.. अचानक पाऊस सुरू झाला. .तेही पावसाळ्याचे दिवस नसताना.
अर्थात त्याच्याकडे छत्री नव्हती. पण नेहेमी सगळ्या परिस्थितीसाठी सुसज्ज असणाऱ्या तिने सुहास्य वदनाने बॅगेतून लाल छत्री काढली..
“ जभी देता.. देता छप्पर फाडके.. “ मनात गुणगुणतच..
"ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच..
त्या लाल छत्राखाली ”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
ही मला आत्तापर्यंत या अंताची सर्वात आवडलेली शशक!

मला आत्तापर्यंत या अंताची सर्वात आवडलेली शशक!>>>
___/\___
मन पाखरू पाखरू झालं Happy

छप्पर फाड के चा द्व्यर्थ छानच>> मस्त पकडलस.. छान वाटलं.. थॅन्क्स

माझ्या एका जुन्या कथेतल्या नायिकेला ह्या शशांक मध्ये घुसवल.
https://www.maayboli.com/node/83462

मला शन्कर वैद्यान्ची छत्री कविता आठवली:

हा असा पाऊस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं...याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच...!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना...
समजुतीने चाललो तर...!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा..
अं...खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल...न पडता.
शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा...
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळतंय...

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं...माझं काय..?!
अमुक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात...माझ्याबरोबर..!
त्यामुळे...छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय...नाही का..?!!

रोहिणी, नानबा आणि संजना धन्यवाद!

नानबा, इतकी छान कविता संगितलीत त्याबद्दल धन्यवाद!

त्या छत्रितून ते दोघं पुढे चाललेत अगदीच काळपट आल.. फक्त त्यांनी एकमेकांची जागा घेतलीये.