गणेशोत्सव २०२४ श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 12:00

नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली ही आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव! या 'मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे हे पंचविसावे वर्ष!
पंचवीस वर्षे हा एक खूप महत्त्वाचा मैलाचा दगड. गणरायाच्या कृपेने आणि मायबोलीकरांच्या अलोट प्रेमाने, ओसंडणार्‍या उत्साहाने आजवरची ही वाटचाल आपल्या मायबोली परिवाराला शक्य झाली. मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सग्या-सोयर्‍यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणेश चरणी प्रार्थना. _/\_

सालाबादप्रमाणे या विद्या आणि कलांच्या अधिपतीचा जागर करायला इथे जमलेल्या सगळ्या मायबोलीकरांचे सहर्ष स्वागत.
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!

श्लोक : सुप्रिया जोशी यांच्या आवाजात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॐ ॐ ओंकार रुपं त्रहमिति च परम् यत्स्वरुपं तुरीयम् |
त्रैगुण्यातीतनीलं कलयति मनसू तेजसिंदूरमूर्तिम् |
योगीन्द्रै: ब्रह्मरन्ध्रै: सकलगुणमयम् श्री हरेंद्रेण संगम् |
गं गं गं गं गणेशं गजमुखममितो व्यापकं चिंतयन्ति ||

>>>>>>आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् | मंगलं परमं रुपं श्री गणेशं नमाम्यहम् ||

वाह! सुंदर.

|| श्री गणेशाय नमः ||

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ||
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १||

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ||
तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्रं चतुर्थकम् ||२||

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||३||

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||
एकादशं गणपतिं च द्वादशं तु गजाननम् ||४||

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर: ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ||
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् || ६ ||

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ||
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः || ७ ||

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः || ८ ||

इति श्री नारदपुराणे संकटविनाशानं श्री गणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

माबो गणेशोत्सवाला माबोकरांचा खूप उत्तम प्रतिसाद आहे .

लोकांच्या उत्साहाची , कल्पकतेची कमाल आहे .

जे काही थोडंफार वाचू / पाहू शकलो , आवडलं .

काही शशक अफलातून आहेत .

नंतर प्रतिसाद देतो . क्षमा असावी .

आज कसबा गणपतीसमोर थोडा वेळ ताशा वादनाची संधी मिळाली . मी कुठल्याही ढोलपथकाचा सदस्य नाही . किंवा सरावाला जात नाही . म्हणून तो योगच !

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां l
वारूनीया विघ्ने देवा रक्षावे दीनां ll

निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी l
चुकले मुकले काही त्याची क्षमा असावी ll

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
गणपती गेले गावाला , चैन पडेना आम्हाला...
घरचे गणपती गेले की जसं रिकामं रिकामं वाटत तसचं आज इथला गणेशोत्सव संपला तर वाटतंय. खरं तर इथलं सगळंच virtual आहे तरी ही वाटतंय हे नवल आहे.

खरंय
रोज इथे येऊन हे स्तवन ऐकायची सवय झालीय

छान झाला मायबोलीचा रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव. उपक्रम, खेळ कल्पक होते. पहिली दोन तीन पाने नुसते गणेशोत्सवाचेच धागे दिसत होते. उपक्रम आणि खेळ कल्पक होते आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही. संयोजकांचे अभिनंदन!

>>> छान झाला मायबोलीचा रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव. उपक्रम, खेळ कल्पक होते.
अगदी. अजून सगळे धागे वाचले नाहीत, पण दहा दिवस मांडवात धामधूम पाहून मस्त वाटलं. Happy
अभिनंदन, संयोजक. Happy

Pages